स्त्री. पु. वगैरे वगैरे : परफेक्ट मॅरेज : एक मिथक
मुखपृष्ठ >> स्त्री. पु. वगैरे वगैरे >> स्त्री. पु. वगैरे वगैरे : परफेक्ट मॅरेज : एक मिथक
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

स्त्री. पु. वगैरे वगैरे : परफेक्ट मॅरेज : एक मिथक Bookmark and Share Print E-mail

alt

महेंद्र कानिटकर , शनिवार , ७ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
परफेक्ट सहजीवन कसं असतं? या प्रश्नाचं परफेक्ट उत्तर आजतागायत कुणाला मिळालेलं नाही. कारण ते तसं नसतंच. मग सुखी, समाधानी वैवाहिक आयुष्याची व्याख्या नेमकी काय असावी?
म्ह णता म्हणता आमच्या (मी व सौ. गौरी) लग्नाला गेल्या महिन्यात एकतीस र्वष पूर्ण झाली. त्याच्या अगोदर चार र्वष आमचं ‘प्रकरण’ का ‘प्रियाराधन’ म्हणतात ते चालूच होतं. थोडक्यात आम्ही एकमेकांना तब्बल पस्तीस र्वष ओळखत आहोत. या काळात अनेक समस्या आल्या. कधी कधी माझ्या बेबंद वागण्यामुळे गौरीनं टोकाची भूमिका घेऊन स्वतंत्र राहण्याची तयारीही दाखविली.
परंतु या समस्यांतून शिकणं आणि आपलं सहजीवन अधिक समृद्ध करणं हे आमचं प्राधान्य होतं. या शिकण्याच्या प्रक्रियेत एका टप्प्यावर आम्ही स्वत:साठी रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हियरल थेरपीचा अभ्यास केला, मी सोशल वर्क काऊन्सेलिंग लाइफ स्किल्स वगैरे गोष्टी केल्या आणि चक्क समुपदेशक झालो आणि आता या टप्प्यावर इतरांना वाटतं ‘महेंद्र-गौरी’चं नातं म्हणजे एकदम परफेक्ट!
मला आणि गौरीला विचाराल तर आम्ही दोघंही म्हणतो, ‘सुधारणेला भरपूर वाव आहे.’ म्हणूनच आम्ही ज्या कार्यशाळा घेतो, सेमिनार्स घेतो त्यांचं नावच मुळी आहे ‘नांदू या सौख्य भरे’ अर्थात नातं सुधारायला, सुखकारक करायला, तुम्ही आणि आम्ही चुकतमाकत, एकमेकांचे अनुभव वाटून घेत प्रवास करूया, असा त्या शीर्षकाचा एक अर्थ आहे. त्याचबरोबर ‘नांदा’ म्हणजे तुम्ही नांदा असा अर्थ होतो. ‘नांदू या’ शब्दात आम्ही स्वत: करीत असलेला निश्चय व्यक्त होतो.
हे सगळं सांगायचं कारण म्हणजे नुकताच आलेला ई-मेल! त्यात सुविधेनं विचारलं, ‘‘परफेक्ट सहजीवन कसं असतं? आमच्या लग्नाला तीन र्वष झाली. आम्ही एकमेकांना अगदी मॅच आहोत. जणू काही मेड फॉर इच अदर. सगळे म्हणायचेसुद्धा ‘लक्ष्मी-नारायणाचा’ जोडा! दोघांचे स्वभाव मिळते-जुळते, आवडी-निवडी सारख्या. पण गेले काही दिवस आम्हाला एकमेकांचा कंटाळा येऊ लागला आहे. म्हणजे तो कसा वागणार हे मला ठाऊक असतं. मी कशी वागणार ही गोष्ट तो जाणू शकतो. म्हणजे दोघांच्या वागण्यातली उत्स्फूर्तता संपली आहे. म्हणून माझ्यापुढे प्रश्न पडलाय, परफेक्ट सहजीवन असं काही असतं का? जर नात्यात नावीन्य नसेल, एकमेकांना जाणून घेण्याची उत्सुकता नसेल तर ते नातं शिळं होणार नाही का?’’
सुविधानं निर्माण केलेले प्रश्न मला अजूनही पडतात. आमच्या सहजीवनातसुद्धा अशा अनेक गोष्टी आहेत त्यात नात्यातली उत्स्फूर्तता कमी झाली आहे, असं वाटतं. तरी बरं, माझे आणि गौरीचे स्वभाव अगदी दोन टोकाचे आहेत. ती शिस्तप्रिय, स्टिकलर. म्हणजे एखादी गोष्ट अमुक एक नियमितपणाने करायची, असं तिनं ठरवलं की ठरवलं. याउलट मी. मला एकच गोष्ट त्याच पद्धतीनं करणं न आवडणारा. ती कमालीची व्यवस्थित. प्रत्येक गोष्ट जागेवर ठेवणारी. मला रोज गाडीची किल्ली कुठे ठेवली हेच आठवत नाही! ती स्पष्टवक्ती, मी मोघम बोलणारा. मी उधळ्या तर ती काटकसरी. अशा अनेक गोष्टी. आवडी-निवडीतही कमालीचा फरक. मी गोडखाऊ. ती श्रीखंडसुद्धा टी-स्पूनने वाढून घेणारी. तिला नाटय़संगीताची आवड. मला हल्ली प्रीतम आवडतो. तिला सण-समारंभात रमण्याची आवड, तर मला एकुणातच गर्दीची अ‍ॅलर्जी. एवढे फरक असूनसुद्धा आम्ही संसार कसा केला आणि निभावला हे अनेकांना प्रश्नचिन्हाचे वाटते. मला नाही.
याचं पहिलं कारण म्हणजे कितीही त्रास झाला तरी एका बिंदूवर आम्ही एकमेकांमधील फरक स्वीकारले आहेत. आम्ही म्हणत गेलो, ओके, हे फरक आहेत. त्याच्यासह राहायला शिकायला हवं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आमच्यातले फरक हे वरवरच्या गोष्टींवरचे आहेत; परंतु जगण्याविषयक जी मूल्ये आहेत ती सारखी आहेत.
परफेक्ट मॅरेज ही गोष्ट अस्तित्वातच नसलेली गोष्ट आहे, असं माझं ठाम मत आहे. परफेक्शन ही एक स्थिर गोष्ट असते. म्हणजे लग्नाच्या संदर्भात आवडी-निवडी, स्वभाववैशिष्टय़, जीवनशैली, उद्दिष्टं, मूल्यं, पैसे खर्च करणं/ साठवणं, वैवाहिक जीवनात जोडली गेलेली नवी नाती, अशा सगळ्या गोष्टी स्थिर आहेत, असं मानून चालायला लागून, ‘परफेक्ट मॅरेज’ अशी काही तरी गोष्ट प्रत्येकाच्या मनात असते.
परंतु प्रत्येक माणूस हा बदलता असतो. काही गोष्टी पक्क्या जुनाट असतात. त्या बदलत नसतीलही! पण इतर सर्व गोष्टी काळानुरूप आणि वयानुरूप बदलत जाणाऱ्या असतात. अगदी माझ्या घरचं उदाहरण सांगतो. माझ्या लहानपणी, आमच्या घरी तिखट स्वयंपाक असे. गौरीच्या माहेरी सौम्य स्वयंपाक. लग्नानंतर आम्ही स्वतंत्र राहू लागल्यावर तिला तिखट स्वयंपाक करताच येईना. मीही आमटी-भाजी तिखट आणि बरोबर झणझणीत चटणी असं जेवू लागलो. पण अजून काही र्वष झाली आणि आमच्या घरच्या चटणीचीही चव बदलली. हल्ली मला (कोणताही आजार नसताना) तिखट जेवण सहनच होत नाही. एकेकाळी पुणेरी असो का कोल्हापुरी मिसळ चापणारा मी, मिसळ खाऊ लागताच नाका-तोंडातून पाणी येते म्हणून मिसळच खात नाही. त्यामुळे माझ्या माहेरी (पक्षी आईकडे) जेवायला जाणंही कमी झालंय. हे आवडी-निवडी बदलाचं साधं उदाहरण.
परंतु माझ्या पाहण्यात एखादीची वृत्तीच बदलल्याचीही उदाहरणं आहेत. निमा आमच्या वर्गात होती. अतिशय तेजस्वी मुलगी. दिसायला सुंदर वगैरे नव्हती, पण कमालीची स्मार्ट. तिचं वाचन अफाट होतं. महाराष्ट्रातल्या सर्व महत्त्वाच्या वादविवाद स्पर्धा तिनं जिंकल्या होत्या. वादविवाद स्पर्धा असो वा परीक्षा जिंकणं ही तिची जिगर होती. बी. कॉम.नंतर तिने सी.ए. जॉइन केलं आणि इन्टर पास होण्याच्या आत तिचं लग्न ठरलं. मुलगा सांगलीचा होता. शेतीवाडी खूप होती. घराणं नावाजलेलं, पण सी.ए. पूर्ण करण्यापूर्वी ती लग्न का करतेय, ते समजेना. निशानंच सांगितलं, ‘‘माझ्या आई-वडिलांचा पत्रिकेवर विश्वास जबरदस्त. आत्ता लग्न केलं नाही तर पुढची पाच-सात र्वष विवाहयोग नाही. पाठची बहीणपण होती. म्हणून तिनं लग्न केलं. अधून मधून पुण्यात आल्यावर भेट होई. तिच्यातल्या काही  शारीरिक समस्यांमुळे ती आई होण्यास असमर्थ होती. पुष्कळ काळ उपचार झाले, पण ती आई काही झाली नाही. शिक्षण तर थांबलंच होतं. ती गृहिणी झाली. दरम्यान, तिच्या नवऱ्यानं वाडीवरच्या एका बाईशी संधान बांधलं आणि दिवस-रात्र तिकडेच पडीक असे. निमाचे दागिनेही वाडीवरलीला देत असे. आपण आई होऊ शकत नाही, नवऱ्याला सुख देऊ शकत नाही, या अपराधीपणाच्या भावनेत तिचा स्मार्टनेस कधी गायब झाला, हे तिचे तिलाच कळले नाही. तीन-चार वर्षांपूर्वी अचानक निमा भेटली. तिच्या नवऱ्याला मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलं होतं. दारूचा आजार. शिवाय अनियंत्रित मधुमेह यामुळे तो काहीच दिवसांत स्वर्गवासी झाला. निमा स्वत:ला सावरू शकली नाही. तिने आत्महत्येचे प्रयत्न केल्यामुळे एका मानसिक आरोग्य केंद्रात ती राहते.
तात्पर्य माणसं परिस्थितीनुरूप, कालानुरूप बदलतात. निमा आणि तिच्या नवऱ्याची उत्तम कुंडली जमूनसुद्धा त्यांचं सहजीवन परफेक्ट होऊ  शकलं नाही. मान्य आहे, हे टोकाचं उदाहरण आहे. आपण चारचौघांसारखं उदाहरण बघू या.
निकिता आणि अद्वैत यांचा प्रेमविवाह. दोघं एकाच चाळीत राहायचे. अद्वैत हुशार, पण शामळू. निकिता ओव्हरस्मार्ट. लग्न झालं तेव्हा निकिता एका बँकेत काम करायची. हा एका छोटय़ा कंपनीत अकाऊन्टन्ट. काहीच दिवसांत निकिता बँकेच्या परीक्षा देत मॅनेजर झाली. अद्वैतनं मुलाच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. सगळेजण चेष्टा करीत, ‘तुझी बायको ओव्हरटेक करतीय.’ तो फक्त हसत असे. निकिता त्या खासगी बँकेत सर्वात तरुण असिस्टन्ट जनरल मॅनेजर झाली. अद्वैत मात्र त्याच कंपनीत वार्षिक वाढीवर संतुष्ट राहत मुलाचा पालक झाला आणि अचानक निकिताला एका मल्टीनॅशनल कंपनीत बँकिंग सव्‍‌र्हिसेस मॅनेजर म्हणून ऑफर आली. तो पगार अद्वैतच्या पगाराच्या दहापट होता. मुलगा आता कॉलेजमध्ये होता म्हणून अद्वैतनं तिला ‘संधी’ सोडू नये, असा सल्ला दिला. निकिता दिल्लीला असते, मुलगा मणिपाल सिक्कीम युनिव्हर्सिटीत आणि हा आहे तिथे पुण्यात.
लोक निकिताचा इन्टरव्ह्य़ू वगैरे छापतात. त्यांचं सहजीवन कसं परफे क्ट आहे, याचं कौतुक करतात. अद्वैत आहे तिथेच आहे. एकटय़ा पुरुषाकडे कामवाल्या बाया येत नाहीत म्हणून भांडी, कपडे, स्वयंपाक सगळं तोच करतो. लोक म्हणतात, त्यांचं परफेक्ट मॅरेज आहे.
जसजसा मी आसपास बघायला लागतो तेव्हा तेव्हा परफेक्ट मॅरेज हे केवढं मोठं मिथक आहे ते जाणवायला लागतं. मुळात घोटाळा हा आहे की, परफेक्ट मॅरेज म्हणजे नेमकं काय? ते दिसतं तसंच असतं का?
 अनेक नामवंत साहित्यिकांच्या पत्नींनी आत्मचरित्रं लिहिली आहेत. त्यात बहुतांश सूर परफेक्शनचा नाहीच आहे. अनेक स्त्रियांच्या आत्मचरित्रात माझे जीवन म्हणजे अखंड तडजोड असा अनुभव आहे (‘नाच गं घुमा’, ‘दुर्दैवाशी दोन हात’, ‘सांगत्ये ऐका’ ही काही ठळक उदाहरणं). माझ्या वाचनात तरी कर्तृत्ववान स्त्रियांच्या साध्यासुध्या नवऱ्यांनी केलेली तडजोड आलेली नाही.
मध्यमवर्गीय कुटुंबातही परफेक्ट म्हणजे आर्थिकदृष्टय़ा समाधानी, मुलांचे शिक्षण व्यवस्थित, सून/जावई चांगले आणि? यादी इथेच संपते. लग्नाला अनेक वर्षे झाली तरी पती-पत्नी एकमेकांच्या वागण्याची, दुसऱ्या जोडप्याच्या वागण्याशी तुलना करीत आपण किती परफेक्ट आहोत वा नाही आहोत हे ठरवीत असतात.
माणसांच्या वागण्याचे- चांगले किंवा वाईट, ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट असे ठोकताळे मांडता येत नाहीत. याचं मुख्य कारण म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाची बौद्धिक वाढ वेगळी, प्रत्येकाची भावनिक प्रतिसाद देण्याची पद्धती वेगळी, प्रत्येकाचे संस्कार वेगळे आणि प्रत्येकाची मूल्यंही वेगळी! नाति चरामी म्हणणारा निकिताचा नवरा याच समाजातला आणि अंध माणसाशी फसवून लग्न केल्यामुळे दुर्दैवाशी दोन हात करणाऱ्या  माझ्या माहितीतल्या सरोजिनी शारंगपाणीही वेगळ्या.
जर परफेक्ट मॅरेज मिथक असेल तर त्या दृष्टीने पावले उचलावीत का? का असंच समजावं, जे पदरी येईल ते स्वीकारावं? स्वीकार- आहे तसा जोडीदाराचा स्वीकार हीच परफेक्ट मॅरेजची, पती-पत्नी नात्याची अंतिम पायरी आहे का?
याबद्दल सविस्तर चर्चा २१ जुलैच्या अंकात.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो