ग्रंथविश्व : एका वाघिणीचे आत्मकथन..
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

ग्रंथविश्व : एका वाघिणीचे आत्मकथन.. Bookmark and Share Print E-mail

 

विनय उपासनी, शनिवार, ७ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
एखाद्या ध्येयाने प्रेरित होऊन त्याच्या पूर्ततेसाठी सर्वसंगपरित्याग करून स्वतला झोकून द्यायचे, मात्र त्यात फोलपणा जाणवला की पुन्हा सामान्य आयुष्याकडे वळायचे, हा म्हटलं तर खूप अवघड, म्हटलं तर खूप सोपा निर्णय. त्यातही ध्येय जर प्रस्थापित व्यवस्थेशी लढा देऊन स्वराष्ट्रनिर्मितीचे असेल तर असा निर्णय घेणे खूपच कठीण.

मात्र, प्रस्थापित व्यवस्थेशी लढताना काही कारणास्तव जर आपल्याच लोकांचे निर्घृणपणे, निर्दयपणे मुडदे पाडावे लागत असतील, ज्या लोकांसाठी आपण लढतो आहोत, त्यांचाच जर या ध्येयाला विरोध असेल तर मग काय.. ध्येयाकडे पाठ करून पुन्हा प्रस्थापित समाजव्यवस्थेकडे वळण्याचा अवघड- कटू वाटणारा निर्णय घ्यावा लागतो. असाच काहीसा प्रकार ‘तमिल टायग्रेस’ या पुस्तकाच्या लेखिका निरोमी डी सॉयझा यांच्या बाबतीत घडला आहे.
श्रीलंकेतील तामिळींमध्ये स्वतंत्र तमिळ इलमसाठीचा अंगार फुलवून त्यांना प्रस्थापित समाजव्यवस्थेविरोधात शस्त्र हाती घेण्यास भाग पाडले ते लिबरेशन टायगर्स फॉर तमिल इलम (एलटीटीई) या संघटनेचा संस्थापक-म्होरक्या वेळुपिल्लई प्रभाकरन याने. या सशस्त्र क्रांतीला श्रीलंकेतील तामिळींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुढल्या तीन दशकांहून अधिक काळात सरकार आणि एलटीटीई या दोन्ही बाजूची अपरिमित मनुष्यहानी झाली. एलटीटीईच्या ध्येयाने झपाटून जात स्वतच त्या व्यवस्थेचा भाग बनलेल्या परंतु त्यातील फोलपणा जाणवलेल्या लेखिकेचा प्रवास हाच या तमिल टायग्रेस या पुस्तकाचा गाभा आहे.
श्रीलंकन तमिळींमध्ये स्वतंत्र तमिल इलमचा अंगार फुलवण्यास प्रभाकरनने सुरुवात केली, त्यावेळी लेखिका दक्षिण श्रीलंकेतील सिंहलीबहुल कँडी शहरानजीकच्या नॉर्टन ब्रिज गावात शाळेत शिकत होती. मात्र, संघर्षांची धग जसजशी वाढत गेली तसतसे लेखिकेला कुटुंबासह उत्तर श्रीलंकेतील तामीळ वाघांचा बालेकिल्ला असलेल्या जाफन्यात स्थलांतरित व्हावे लागले. हा १९८३चा काळ. म्हणजे यावेळी एलटीटीई आणि श्रीलंकन सरकार यांच्यातील संघर्ष तीव्रतेकडे वाटचाल करत होता. याच कालावधीत पौगंडावस्थेकडे वाटचाल करत असलेल्या लेखिकेच्या संस्कारक्षम-संवेदनशील मनावर संघर्षांचा परिणाम होऊन तमिल इलमसाठी लढणाऱ्या तामिळी वाघांच्या कळपात आपणही सामील व्हावं आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावत हातात शस्त्र घेऊन क्रांतिकारक व्हावं हे क्रांतिकारी विचार पक्के होत गेले. जाफन्यातील त्यावेळची युद्धजन्य परिस्थितीच तशी होती. महिला तमिळ वाघ ही संकल्पनाही त्यावेळी एलटीटीईच्या नेतृत्वाला पटणारी नव्हती. त्यामुळे लेखिकेला संघटनेत प्रवेश देण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु तरीही क्रांतिकारी विचारांनी झपाटलेल्या लेखिकेने कथा-कवितांच्या माध्यमातून एलटीटीईच्या केडर्सची मने जिंकलीच होती. त्यामुळे जाफन्यातील कॉलेजात एलटीटीईच्या विद्यार्थी परिषदेची प्रतिनिधी म्हणून तिची नियुक्ती होऊ शकते. तरीही हातात शस्त्रे घेऊन शत्रूशी लढण्याची लेखिकेची तडफड तिला शांत बसूच देत नाही.
दरम्यानच्या काळात तामिळी वाघांची श्रीलंकन सन्य आणि भारतीय शांतिसेना अशा दोन आघाडय़ांवर लढाई सुरू असते. महिलांनाही संघटनेत प्रवेश देऊन त्यांनाही या सशस्त्र संघर्षांत सामील करून घेण्याच्या विचारावर अखेरीस एलटीटीईचे नेतृत्व राजी होते आणि येथूनच तमिल टायग्रेसचा प्रवास सुरू होतो. त्यानंतर मग कॉलेजची मत्रिण अजंतीबरोबर घरदार सोडून संघटनेत सामील होणं, संघटनेची उद्दिष्टे समजून घेताना ज्येष्ठांनी दिलेला सल्ला, कठोर प्रशिक्षण या नेहमीच्या टप्प्यांचे वर्णन लेखिकेने विस्ताराने आणि रंजकपणे केले आहे. शस्त्रप्रशिक्षण पूर्ण होऊनही प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाण्याची संधी लवकर मिळत नसल्याने होणारी घुसमट, प्रत्यक्षात संधी मिळाल्यानंतर युद्धभूमीचा आलेला दाहक अनुभव, सतत जंगलात भटकणे, शत्रूच्या हाती लागू नये म्हणून सातत्याने भूमिगत राहावे लागणे, संघटनेतील नेतृत्वाचे अंतर्गत हेवेदावे, रक्तरंजित राजकारण यामुळे मन उदास आणि भ्रमनिरास झालेली लेखिका अखेरीस संघटनेला सोडचिठ्ठी देण्याचाच निर्णय घेते. मात्र, या संपूर्ण प्रवासात आलेल्या कडू-गोड आठवणी तिला हा निर्णय घेताना अधिक त्रासदायक ठरतात. परंतु तरीही संघटना सोडून पुन्हा घराकडे परतण्याचा तिचा निर्णय ठाम होतच जातो. एलटीटीईसारखी कट्टर संघटना सोडून पुन्हा सामान्य नागरिकाचे जीवन जगताना आलेले अनुभव यात नसले तरी तिचे पूर्वायुष्य अजूनही लेखिकेला सलत राहते याची जाणीव पुस्तकाच्या अखेरच्या काही प्रकरणांत होतेच.
प्रेमात पडू नका..
संघटनेत प्रेम हा शब्द वज्र्य मानला गेलेला. प्रेमात पडलेल्यांना देहदंडाची शिक्षा असा कठोर नियम एलटीटीईत लागू असतो. त्यामुळेच लेखिका रोशन नामक तामिळ वाघाच्या प्रेमात पडली तरी त्याचा थेट उल्लेख पुस्तकात कुठेच नाही. मात्र, रोशन हे व्यक्तिमत्त्व पुस्तकात सातत्याने डोकावत राहतं. शत्रूवर्गासाठी कोणीतरी हेरगिरी करतो, असा साधा संशय आला तरी शहानिशाही न करता थेट त्याला ठारच मारायचं, हा दंडकही लेखिकेला अस्वस्थ करतो. अशा अनेक कारणांमुळे लेखिका अखेरीस संघटना सोडण्यास उद्युक्त होते.
जात नाही ती जात..
जातीयता ही फक्त भारताचच नाही तर भारतीय उपखंडाचीही समस्या आहे. या पुस्तकातही त्याचा प्रत्यय येतो. अर्थात लेखिका थेट याचा उल्लेख करत नसली तरी संघटनेत वावरताना तिला आलेल्या अनुभवांतून हे ठळकपणे दिसून येते. एलटीटीईतील बहुतांश वाघ हे तामिळींच्या कनिष्ठ वर्गातून आणि म्हणून गरिबीतून संघटनेत सामील झालेले. त्यामुळे अर्थातच शिक्षणाची वानवा. मात्र, लेखिकेची कौटुंबिक पाश्र्वभूमी त्या उलट. वडील उच्चशिक्षित कॅथॉलिक ख्रिश्चन तर आई हिंदू, तमिळ. त्यामुळे लेखिका उच्चमध्यवर्गीय कुटुंबातील. हीच कौटुंबिक पाश्र्वभूमी लेखिकेला संघटनेत सामील होण्याच्या आड येते. एलटीटीईचा स्थानिक कमांडर कित्तू आणि नंतर दिलीपन हे लेखिकेला हेच समजवतात. उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींनी अशा संघटनांकडे फिरकूही नये असे तिला ते दोघेही आडून आडून सुचवू पाहतात. प्रत्यक्ष संघटनेत काम करतानाही तिला व तिच्या महिला सहकाऱ्यांना वेगळी वागणूक दिली जाते. कारण तिच्या महिला सहकारी कनिष्ठ वर्गातून संघटनेत आलेल्या असतात. एके ठिकाणी तर तिच्या सहकाऱ्याला आपल्या संघटनेचं नाव एलटीटीई आहे हेही माहीत नसते. आपण केवळ तामिळ वाघांचे काम करतो एवढंच त्या वाघिणीला माहीत असतं.
श्रीलंकेतील वर्गसंघर्ष, त्याची पाश्र्वभूमी, एलटीटीई, तीन दशकांचा रक्तरंजित संघर्ष, समविचारी संघटनांचा एलटीटीईने पद्धतशीरपणे केलेला बंदोबस्त या सर्वाविषयी जाणून घेण्याची इच्छा असेल तर हे पुस्तक नक्कीच वाचनीय आहे. तीन वर्षांपूर्वी प्रभाकरनच्या मृत्यूनंतर एलटीटीई आता निष्प्रभ झाली असल्याचे लेखिका सांगते. त्यातही तथ्य असल्याचे जाणवत राहते, एवढेच.
तमिल टायग्रेस
- निरोमी डी सॉयझा
मेहता प्रकाशन.
पृष्ठे : ३०८; किंमत : ३९५ रुपये.