चित्रगीत : चांदणशेला
मुखपृष्ठ >> लेख >> चित्रगीत : चांदणशेला
 

लाइफ स्टाईल-मनोरंजन-कला

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

चित्रगीत : चांदणशेला Bookmark and Share Print E-mail

अनिरुद्ध भातखंडे - रविवार, ८ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

ध्यानीमनी नसताना एखादा उत्कट कलाविष्कार अनुभवण्यास मिळाला तर मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. सारेगमा कंपनीची निर्मिती असलेल्या ‘चांदणशेला’ या अल्बमने नुकतीच ही अनुभूती दिली. ‘शब्द सुरांचा नवा अविष्कार’ अशी टॅगलाईन या अल्बमवर आहे. प्रत्येक गीतकार-संगीतकाराला आपली गाणी वेगळीच वाटतात, त्यामुळे ही टॅगलाईन हा केवळ जाहिरातीचा प्रकार असेल, असे वाटले. मात्र ही गाणी ऐकल्यानंतर ही टॅगलाईन १०० नाही तर १०१ टक्के खरी असल्याचे जाणवले. कामिनी फडणीस-केंभावी यांची गीते (खरं तर कविता) आणि शशांक पोवार यांचे संगीत. ही दोन्ही नावे तशी प्रस्थापित नसलेली. तरीही यात घडणारा कलाविष्कार थक्क करणारा! हरिहरन, रघुनंदन पणशीकर, महालक्ष्मी अय्यर, बेला शेंडे, वैशाली सामंत अशा दिग्गज गायकांसह जसराज आणि जयदीप या नव्या गायकांनी यातील विविधरंगी गाणी गायली आहेत.
बेला शेंडे हिने गायलेल्या ‘मन रुमझुम रुमझुम गाते’ या गीताने या अल्बमची सुरुवात होते. अतिशय गोड सुरावटीच्या या गाण्यात संगीतकाराने सारंगीचे तुकडे वापरुन आपली प्रगल्भता सिद्ध केली आहे. भावगीतांच्या परंपरेशी नातं सांगणाऱ्या या चालीसाठी पोवार यांनी योजलेला ठेका आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रचलेला वाद्यमेळ एक अनोखं फ्यूजन निर्माण करतं. या अल्बममधील एकूण सात गाण्यांपैकी हेच सर्वात चांगलं गाणं ठरावं. या अल्बमचं प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे या गीतांचे शब्द! रघुनंदन पणशीकर यांनी गायलेल्या गाण्याचा मुखडा पहा, ‘संध्येच्या पारावरती विस्कटले उन जरासे, मग उगाच ऐकू येती दिवसाचे क्षीण उसासे’.. मराठी भावगीतांतील काव्यात काहीसा तोचतोचपणा येऊ लागला असताना या ओळी वेगळाच साहित्यिक आनंद देऊन जातात. संध्याकाळच्या पाश्र्वभूमीवरील या गाण्यात यमनच्या बरोबरीने ‘मारवा’चे सूर योजण्याची पोवार यांची कल्पकता दाद देण्याजोगी. पणशीकर यांच्या भारदस्त आवाजाने या गाण्याला पुरेपूर न्याय दिला आहे. मराठीत कमालीचं सहज गाणाऱ्या महालक्ष्मी अय्यरने गायलेलं ‘देहावर मोहरली रिमझीम सावरिया’ हे गाणंही उत्तम जमलं आहे. पहाडीच्या ठेक्यातील हे गीत ऐकताना अतिशय प्रसन्नता लाभते. जसराज जोशी याच्या स्वरातील ‘सुचावे न काही रुचावे मनासी, अशी हाय कोठून येते उदासी?’ हे गाणंही हटके आहे. गजलच्या फॉर्ममधील या गीताला पोवार यांनी अपारंपरिक चाल देऊन नवा प्रयोग केला आहे. जसराजने अतिशय समर्थपणे अस्वस्थ मनाची अवस्था श्रोत्यांपर्यंत पोहोचवली आहे. एक उत्तम पाश्र्वगायक होण्याची वैशिष्टय़े त्याच्या आवाजात आहेत. जयदीप बगवाडकर या आणखी एका तरुण गायकाने म्हटलेलं ‘जरा स्पंदनांना सांभाळ राणी, ऐकेल कोणी आपुली कहाणी’ हे रोमँटिक गाणंही पुन्हापुन ऐकण्यासारखं. ‘दिन आज भटकत राही, का उगाच स्मरते काही? हे गीत वैशाली सामंतने अतिशय समरसून गायलं आहे. अल्बमच्या अखेरीस येणारं हरिहरन यांच्या घनगंभीर आवाजातील ‘का हे मन जळते, का हे मन छळते? हे गाणं या अल्बमचा कळसच ठरावं! या सातही गीतात ‘चांदणशेला’ हा शब्द नसताना अल्बमला हे नाव कसं, असा प्रश्न पडला असतानाच हरिहरन यांच्या गीतानंतर कामिनी फडणीस-केंभावी यांचं काव्यवाचन कानी पडतं. ‘ही कुठली शुभंकर वेळा, हा ॠतू कोणता आला? कुणी देहावर पांघरला, जणू हळवा चांदणशेला’ ही ग्रेस यांच्या शैलीशी नातं सांगणारी कविता ऐकणं म्हणजे भरपेट जेवल्यानंतर मसाला पानाचा आस्वाद घेण्यासारखंच! अतिशय उच्च निर्मितीमूल्यं असणाऱ्या या अल्बमने मराठी भावसंगीत अधिक समृद्ध केलं आहे, असं म्हणणं अतिशयोक्तीचं ठरणार नाही, ही गाणी ऐकणारा प्रत्येक रसिक या विधानाशी सहमत होईल, यात शंका नाही.
खाऊचा गाव
वयाच्या ८०व्या वर्षी अतिशय उत्साहाने नवनवीन स्वररचना तसेच काव्यं करणारे अष्टपैलू कलाकार म्हणजे यशवंत देव. देवसाहेबांनी गेल्या वर्षी १ नोव्हेंबरला वयाची ८० वर्षे पूर्ण केली. गतस्मृतिंना उजाळा देत बसण्याचे हे वय. देव मात्र यास अपवाद आहेत. नव्या पिढीशी नातं निर्माण करणं त्यांना आवडत असल्याने ‘खाऊचा गाव’ या लहानग्यांच्या अल्बमला त्यांनी लीलया संगीत दिले आहे. या अल्बममध्ये आठ बालगीते असून सारेगम फेम मुग्धा वैशंपायन, आर्या आंबेकर आणि अबोल कानडे या बालगायकांनी ती गायली आहेत. अबोलने गायलेल्या ‘चला चला पाहू खाऊचा गाव, पाणी सुटे जिभेला धाव, धाव, धाव’ या गीताने या अल्बमची सुरुवात होते. अबोलने बालसुलभ स्वरात या गाण्याला चांगला न्याय दिला आहे. प्रिया सफळे यांनी या गीतात लहान मुलांना आवडणाऱ्या खाद्यपदार्थाच्या जंत्रीचे वर्णन केले आहे. अबोलनेच मुग्धा आणि आर्यासह गायलेले स्वप्नामध्ये ‘आम्ही पाहिला नवलाईचा गाव, वेशीवरती पाटी होती मोठय़ांना मज्जाव’ हे गाणं म्हटलं आहे. हे गीत खुद्द देवांनीच लिहीले आहे. त्यांचे अष्टपैलूत्व यापूर्वीच सिद्ध झाले आहे, या गाण्याच्या निमित्ताने ते नव्याने अधोरेखित होते इतकेच.
मुग्धाने गायलेलं ‘आम्हा लहान मुलांचं कुणी ऐकेल का?’ हे गाणंही जमून आलं आहे. मात्र यातील ‘इतिहासातल्या लढाया पूर्वी होऊन गेल्या, तलवारी का पुस्तकातून अजून गंजत पडल्या, भविष्याचे कोडे त्यातून उकलेल का? या दवणेंच्या ओळी खटकतात. लहान मुलांच्या भावविश्वाचा विचार करुन या ओळी लिहील्या असाव्यात, तरीही मुलांवरील संस्कारांसाठी अतिशय आग्रही असणाऱ्या दवणे यांनी अशा ओळी लिहील्याचे आश्चर्य वाटते. मुलांना इतिहासातील चुकांपासून आपण बोध घेतला व त्यांची पुनरावृत्ती टाळली तर भविष्याचे कोडे नक्कीच उलगडेल, हे जाता-जाता सांगावंसं वाटतं. दवणे यांची ‘निळ्या डोंगर आड तिथेही सात समुद्रापार’ (मुग्धा व अबोल), ‘सहल हवी हो सहल हवी’ (आर्या व अबोल), ‘लखलखते टपटपते’ (मुग्धा व अबोल) ही अन्य गाणीही श्रवणीय आहेत. आर्याने एकटीने गायलेलं ‘ही वनराणी मुक्त उधळिते, गंध नवा’ हे खरं तर बालगीत न वाटता भावगीत वाटावं अशा तऱ्हेने देवांनी स्वरबद्ध केलं आहे. राजा मिसर यांचं हे गीत आर्याने एखाद्या जाणत्या गायिकेच्या थाटात गायलं आहे. मिसर यांनीच लिहीलेल्या ‘पाऊस येतो शाळा भिजवतो’ या गीताला देवांनी अतिशय साधी व पारंपरिक चाल लावल्याने ते विशेष लक्षात रहातं. अबोलने हे गाणंही सहज गायलं आहे. या अल्बमची संकल्पना पांडुरंग घांग्रकर यांची असून सिद्धी सफळ हिचे निवेदनही दोन गाण्यांदरम्यान रंगत निर्माण करतं. ‘युनिव्हर्सल म्युझिक इंडिया’ची निर्मिती असलेला हा अल्बम लहानग्यांनी अवश्य ऐकावाच मात्र थोरामोठय़ांनीही त्याचा आस्वाद घेऊन बालपणीच्या विश्वात सैर करुन येण्यास हरकत नाही.      
(समीक्षणासाठी सीडी-डिव्हीडी आमच्या महापे कार्यालयात ‘चित्रगीत’च्या नावे पाठवाव्यात.)

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो