लालकिल्ला : राजकीय उत्खनन
मुखपृष्ठ >> लाल किल्ला >> लालकिल्ला : राजकीय उत्खनन
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लालकिल्ला : राजकीय उत्खनन Bookmark and Share Print E-mail

 

सुनील चावके - सोमवार, ९ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

बाबरी मशिदीच्या पतनाच्या वेळी तेव्हाचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांची नेमकी भूमिका तसेच सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपदाचा ‘त्याग’ करण्यामागची कारणे याबाबत आजवर अनेकांनी विविध तर्क लढवले. अलीकडे माजी मंत्री अर्जुन सिंह व माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम  यांनी या राजकीय उत्खननात नव्याने भर घातली आहे.


वीस वर्षांपूर्वीचा बाबरी मशिदीचा ‘विध्वंस’ आणि आठ वर्षांपूर्वी सोनिया गांधींनी पंतप्रधानपदाचा केलेला ‘त्याग’ या देशाच्या अलीकडच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणाऱ्या दोन ठळक घटना. लागोपाठच्या दशकांमध्ये घडलेल्या या नाटय़मय कथानकांचे

माजी पंतप्रधान दिवंगत नरसिंह राव ‘खलनायक’, तर न झालेल्या पंतप्रधान सोनिया गांधी ‘नायिका’. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि दिवंगत काँग्रेस नेते अर्जुन सिंह आणि ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांची पुस्तके तसेच माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंह यांच्या लेखामुळे अनेकांच्या डोळ्यांदेखत घडलेला, फार जुना नसलेला हा इतिहास पुन्हा ताजा झाला. या कथानकांमध्ये गुंतलेल्या बहुतांश पात्रांच्या वृत्ती आणि प्रवृत्ती, स्वार्थ आणि परस्परांना शह देण्याच्या डावपेचांवर त्यामुळे नव्याने प्रकाश पडला आहे.
सोनिया गांधींनी २००४ साली केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या सरकारच्या स्थापनेचा दावा करताना तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची भेट घेतली तेव्हा त्यांच्या नेतृत्वाला विदेशी वंशाच्या वादाची किनार लाभली होती. पाचच वर्षांपूर्वी विदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित करून शरद पवार आणि पूर्णो संगमा यांनी काँग्रेसमधून स्वत:ची गच्छंती ओढवून घेतली होती. पण २००४ सालच्या संक्रांतीदरम्यान सोनिया-पवार यांच्यात झालेली निवडणूकपूर्व दिलजमाई पचवू न शकलेल्या संगमा यांनी थयथयाट करून राष्ट्रवादीमध्ये ‘फूट’
पाडली होती. खरे तर केंद्रात काँग्रेस आघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या चार महिने आधीच संगमांची डोकेदुखी संपल्यामुळे एकीकडे पवारांना हायसे वाटत असले तरी विदेशी वंशाच्या सोनिया गांधी पंतप्रधान होणार या वास्तवामुळे ते अस्वस्थही झाले असतील. आपण सोनियांच्या मंत्रिमंडळात सामील झालो नसतो, असे त्यांनी नंतर एका मुलाखतीत बोलूनही दाखविले. सोनिया पंतप्रधान होऊ नयेत, असे त्यांनाही वाटत असल्याचे यानिमित्ताने सांगण्यात येत आहे. स्वत:ला काँग्रेसचे शेवटचे पंतप्रधान समजणारे नरसिंह राव त्या वेळी हयात होते. अर्जुन सिंहांनी आपल्या मरणोत्तर पुस्तकात केलेल्या दाव्यानुसार नव्वदीच्या दशकात सोनिया गांधींकडे काँग्रेसचे अध्यक्षपदही सोपवायला राव राजी नव्हते. अशा स्थितीत सोनिया पंतप्रधान होणार या विचाराने राव किती कासावीस झाले असतील याची कल्पनाच केलेली बरी. सोनियांच्या नेतृत्वाला राव-सोनिया, पवार-सोनिया, संगमा-सोनिया अशा आजीमाजी काँग्रेसजनांच्या वैयक्तिक कटुतेची पाश्र्वभूमी लाभली असताना इटलीमध्ये जन्मलेल्या सोनिया गांधींच्या हाती देशाचा कारभार जाईल, या वास्तवाने सुषमा स्वराज, उमा भारती, गोविंदाचार्य, सुब्रमण्यम स्वामी यांच्यासह तमाम विरोधक पेटूनच उठले होते. विदेशी वंशाच्या मुद्दय़ावरून सोनियांचा पंतप्रधानपदाचा दावा नाकारावा, असा दबाव त्या वेळी मीडियासह चोहोबाजूंनी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्यावर आला होता. या पाश्र्वभूमीवर मनमोहन सिंग यांच्यासोबत राष्ट्रपती भवनात सोनियांनी कलाम यांची भेट घेतली तेव्हा कलाम यांनी सोनियांकडे भारतीय तसेच इटालियन असे दोन पासपोर्टस् आहेत काय, अशी विचारणा केली. तेव्हा सोनियांना सत्य सांगण्यावाचून पर्यायच उरला नव्हता, असा दावा सातत्याने करण्यात आला. सोनियांनी स्वखुशीने नव्हे तर मजबुरीपोटी पंतप्रधानपद नाकारले, या ‘अपप्रचारा’ला खुद्द कलाम यांनीही गेल्या आठ वर्षांत कधी लगाम लावला नाही. या रूढ झालेल्या मिथकाच्या विपरीत सोनियांनी पंतप्रधान व्हायचे ठरविले असते तर त्यांना शपथ देण्यावाचून आपल्यापुढे पर्यायच नव्हता, असे आपल्या ताज्या पुस्तकात घूमजाव करीत कलाम यांनी या वादावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला आहे. कलाम यांचा हा राजकीय अप्रामाणिकपणा आहे की कटू सत्याला भिडण्याचा दुबळा प्रयत्न, अशी त्यामुळे चर्चा होत आहे. कलाम यांच्या या ‘सत्यवचना’बद्दल काँग्रेसने त्यांची पाठ थोपटली नाही, पण काँग्रेसविरोधी पक्षांची मात्र त्यांनी सहानुभूती गमावली.
राम जन्मभूमी आंदोलन शिगेला पोहोचले असताना नरसिंह राव यांनी दाखविलेली निष्क्रियता ही दिल्लीच्या राजकारणातील दंतकथा बनली आहे. बाबरी मशीद ढासळणार हे वास्तव ६ डिसेंबर १९९२ च्या पूर्वसंध्येला दिल्लीतील राजकीय वर्तुळाला ठाऊक होते. पण नरसिंह राव त्यापासून शेवटपर्यंत ‘अनभिज्ञ’ होते. स्व. प्रमोद महाजन यांच्या सौजन्याने अयोध्येतील ‘आँखो देखा हाल’ बघून दिल्लीत परतलेल्या दोन मराठी पत्रकारांनी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या एका तरुण नेत्याला बाबरीच्या संभाव्य पतनाची जाणीव संपूर्ण तपशिलांसह ५ डिसेंबरच्या सकाळीच करून दिली होती. या नेत्याने तातडीने थेट नरसिंह रावांची भेट घेत त्यांना सतर्क केले होते. त्याच दिवशी तत्कालीन गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यादेखत संधी साधून या नेत्याने नरसिंह रावांपुढे हा विषय पुन्हा उपस्थित केला. त्या वेळी संतापलेल्या रावांनी ‘पंतप्रधान मी आहे की तुम्ही?’ असा प्रश्न विचारून दोघांनाही निरुत्तर केले. तरीही या तरुण नेत्याने आपल्या परीने बाबरी पतनामुळे उद्भवणारी संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी राव यांच्या मंत्रिमंडळातील अनेक ज्येष्ठ मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना आक्षेप नोंदविण्यासाठी प्रवृत्त केले. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. शेवटी ठरल्या मुहूर्तावर ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद जमीनदोस्त झाली. त्या दिवशी नरसिंह राव काय करीत होते, हा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आजही खमंग चर्चेचा विषय ठरला आहे. काहींच्या मते राव त्या दुपारी निश्चिंत होऊन वामकुक्षी घेत होते, तर ‘आतल्या गोटातील’ माहिती ठेवणारे कुलदीप नय्यर यांच्यानुसार ते बाबरी भुईसपाट होईपर्यंत देव पाण्यात बुडवून बसले होते. कुणी तरी कानात येऊन सांगेपर्यंत ते देवपूजेतून उठले नाहीत. नरसिंह राव यांच्या खास विश्वासातले, आज हयात नसलेले तत्कालीन अ.भा. काँग्रेसचे सर्वशक्तिमान राष्ट्रीय सरचिटणीस बाबरी पतनानंतरच्या घडामोडींचे साक्षीदार होते. बाबरी विध्वंसासाठी उन्मादी कारसेवकांइतकेच जबाबदार ठरलेल्या राव यांचे पंतप्रधानपद ६ डिसेंबरच्या सायंकाळी धोक्यात आले होते. या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी अर्जुन सिंह बंडखोरांचे नेतृत्व करीत त्या वेळी केंद्रात सत्तापालट करू शकले असते. पण अशा वेळी नरसिंह रावांनी आपली चाणक्यनीती पणाला लावून अर्जुन सिंहांना आपल्या निवासस्थानी बोलावून घेतले. अर्जुन सिंह समोर आल्यानंतर ढासळलेल्या बाबरीपेक्षाही या घटनेमुळे आपण पार खचून गेलो असल्याचे भासविण्यात राव पुरेपूर यशस्वी ठरले. देशाला सामोरे जाण्याची आपली मानसिक स्थिती नसून माझ्याऐवजी सरकारच्या वतीने आज तुम्हीच निवेदन काढा, असे रावांनी सांगितल्यामुळे अर्जुन सिंहांचा भाव वधारला. दुराग्रही आणि अहंकारी रावांची जिरविल्याच्या आनंदात अर्जुन सिंहांनी पूर्ण आवेशात भाजपची भर्त्सना आणि सरकारचा बचाव केला. एवढय़ा आपत्तीच्या प्रसंगी एका बडय़ा सेक्युलर बंडखोराला आपला प्रवक्ता म्हणून वापरण्याची धूर्त खेळी यशस्वी होताच राव यांच्या चेहऱ्यावरील तथाकथित तणाव व वैफल्य नाहीसे झाले होते. त्यांच्या विश्वासातील दिवंगत सरचिटणिसाने कथन केलेला हा किस्सा येथे उल्लेखनीय ठरतो. राव यांच्या दृष्टीने उपयुक्तता संपताच यथावकाश काँग्रेस सोडायला भाग पाडून अर्जुन सिंहांचा काटा काढण्यात आला. नरसिंह रावांचे २३ डिसेंबर २००५ रोजी निधन झाले. दुसऱ्या दिवशी ९, मोतीलाल नेहरू मार्गापासून काही मीटर्सच्या अंतरावर असलेल्या २४, अकबर रोड येथे त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी आणले गेले. पण रावांच्या पार्थिवाला काँग्रेस मुख्यालयाचा प्रवेश मज्जाव करण्यात आला. केंद्रात सत्ता असूनही काँग्रेसश्रेष्ठींनी अन्य दिवंगत पंतप्रधानांप्रमाणे दिल्लीतील राजघाट परिसरात अंत्यसंस्कार न करता त्यांचे पार्थिव हैदराबादला रवाना केले. निधनानंतरही सोनियांच्या मनातील त्यांच्याविषयीचा कडवटपणा संपला नव्हता, हेच त्यातून स्पष्ट होते. कलाम आणि अर्जुन सिंहांची पुस्तके चर्चेत असतानाच नटवर सिंह यांनीही एका लेखात १९९१ साली पंतप्रधानपदासाठी सोनिया गांधींची पहिली पसंती डॉ. शंकर दयाळ शर्मा हेच असल्याचा दावा केला आहे. वृद्धापकाळामुळे ही जबाबदारी पेलविणार नसल्याचे सांगून शर्मा यांनी सोनियांचा हा प्रस्ताव नम्रपणे नाकारल्याचेही नटवर सिंह यांनी नमूद केले आहे. राव आणि सोनिया यांच्या राजकीय संबंधांवर नेहमीच परस्पर तिरस्कार आणि गूढ कटुतेचे ढग दाटलेले राहिले. अर्जुन सिंह आणि नटवर सिंह यांच्या दाव्यांमुळे ते नव्याने अधोरेखित झाले आहेत. तीच गोष्ट शरद पवार सोनिया गांधी यांच्या संबंधांची. शरद पवार कमालीचे बेभरवशाचे असून त्यांचा काँग्रेस पक्षात पुन्हा समावेश केल्यास ते पुन्हा धोका देऊ शकतात, असाही इशारा स्व. राजीव गांधींना दिल्याचा दावा अर्जुन सिंहांनी आपल्या पुस्तकात केला आहे. त्यातला खरेखोटेपणा सांगण्यासाठी आज ते दोघेही हयात नाहीत. पण विदेशी वंशाच्या मुद्दय़ावरून सोनिया-पवार यांच्यात कटुता निर्माण करण्यात नरसिंह राव यांनी दिलेली ‘प्रेरणा’ महत्त्वाची ठरल्याची वदंता आजही कायम आहे. सोनिया काँग्रेसच्या अध्यक्ष आणि देशाच्या पंतप्रधान होत असताना दोन्ही पदांसाठी त्यांचेच नेतृत्व कसे योग्य आहे, असे त्यांच्यादेखत सांगणारे पवार सोनियांविषयी मनात कोणता विचार करीत होते, हेही आता उघड झाले आहे.
नरसिंह राव आणि अब्दुल कलाम यांच्या कथित तिरस्काराला सामोरे जाणाऱ्या सोनिया गांधींनी मौन बाळगले आहे. नरसिंह राव आणि सोनिया गांधी यांच्या विश्वासाला समानपणे पात्र ठरलेले मनमोहन सिंग हेही त्यावर कुठलेच भाष्य करणार नाहीत. पण सर्वसामान्यांच्या स्मृतीत कायम असलेल्या या घटनांचे लहानमोठे साक्षीदार अधूनमधून आपल्या भावना व्यक्त करीत या इतिहासाला उजाळा देत राहतील आणि अशा राजकीय उत्खननातून देशाची सर्वोच्च पदे भूषविणाऱ्या अव्वल आणि महत्त्वाकांक्षी राजकीय नेत्यांच्या स्वभावाचे सूक्ष्म कंगोरे, त्यांच्या वृत्ती, प्रवृत्तीतील नवे पैलू उजेडात येत राहतील. 

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो