खाणे पिणे आणि खूप काही : दरवळ माहेरच्या आठवणींचा..
मुखपृष्ठ >> खाणे, पिणे नि खूप काही >> खाणे पिणे आणि खूप काही : दरवळ माहेरच्या आठवणींचा..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

खाणे पिणे आणि खूप काही : दरवळ माहेरच्या आठवणींचा.. Bookmark and Share Print E-mail

गावाकडची चव
विमल खाचणे , शनिवार , १४  जुलै २०१२

माझ्या माहेरी मिरचीची भाजी खाण्याकरिता सर्व नातेवाईकांना बोलावले जायचे. काका, बाबा मुद्दाम घराच्या अंगणात एक मोठी दगडाची चूल मांडून चुलीवर कलई लावलेल्या  पितळी पातेल्यात ही भाजी करायचे. ज्वारीच्या भाकरीबरोबर ती मिरचीची भाजी सर्वाना खायला द्यायचे. सर्व नातेवाईक मिळून गप्पा करत त्या भाजीचा आस्वाद घेत. काहीजण तर ती भाजी पीतसुद्धा असत. फारच मजा यायची.. असे पदार्थ माहेरच्या आठवणींचा दरवळ आणतात..
माझे लहानपण विदर्भातील गावाकडेच गेले कारण माझे माहेर विदर्भच. जेव्हा आम्ही सुट्टीत गावी जात असू तेव्हा आजीच्या हाताच्या शेवाची रश्श्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी, परोठा, अनेक प्रकारचे भाज्यांचे प्रकार याची चव आजही जिभेवर रेंगाळते आहे. आमच्या गावी करतात तशी शेवाची रश्श्याची चव कुठेच चाखायला मिळाली नाही. कोणी घरी पाहुणे आले की, मुद्दाम ही भाजी आजी करायची. त्याबरोबर जी ज्वारीची भाकरी करायची त्याचा वास फारच खमंग असायचा. भाकरीचा घास चावला की गोड गोड लागायची. शेवाचा मसाला आमच्या घरीच तयार करत असत. त्यात मसाल्याची मोठी वेलची, खोबरे, लवंग, मिरे, शहाजिरे, तमालपत्र, जिरे, नागेसर, लालमिरची, तीळ, लसूण, दगडफूल हे सर्व पदार्थ भाजून तो गोळा पाटय़ावर वाटून त्या गोळ्याला जिरे, मोहरीची फोडणी देऊन तो चांगला तेलात परतून घेत असत. नंतर गरम पाणी टाकून त्यात चवीपुरते मीठ टाकून चांगल्या उकळ्या आल्या की, खाली उतरून त्यात घरीच केलेली शेव टाकायची. आजी सहज कमी वेळात परोठा करायची. नावीन्याने सहजच नटवता येणारा. गव्हाच्या पिठात भाज्या, पालेभाज्या घालून कोथिंबीर वा धणे-जिरे पूड याची जोड देऊन केलेल्या परोठय़ाबरोबर तूप, ताकाची अशी जोड देऊन कमी वेळात, कमी श्रमात परिपूर्ण जेवण सहज वाढत होती. आम्हा मुलांना भाज्या, पालेभाज्या खाण्याचा भयंकर कंटाळा. मोठय़ांनासुद्धा काही भाज्या आवडत नसत. अशा वेळी परोठा माध्यमातून भाज्या खाण्यातून येत होत्या. परोठय़ासोबत कधी तूप, लोणी, कोरडय़ा चटण्या, लोणची वगैरे असायच्याच अगर चटणी दह्य़ात किंवा तेलात कालवून खाण्यात येत असे. त्यामुळे परोठा फारच खुमासदार लागत असे.
विदर्भात उन्हाळा फार असतो. रखरखत्या वैशाख वणव्यात पशू-पक्षी, मानव यांना शीतलता प्रदान करणारी ही शीतल चिवळी भाजी निसर्गाने निर्माण केली. सूर्य आग ओकत असताना अंगातून घामाच्या धारा निघत असतात अशा वेळी आमच्या घरात चिवळी भाजीचे धपाटे खायला मिळायचे. कारण ही भाजी खाल्ल्यास शरीराला आपोआपच शीतलता प्राप्त होते. किंचित लालसर, गुलाबी, बारीक देठे व पिटुकली हिरवी पाने असलेली ही भाजी उन्हापासून संरक्षण करायची. त्या वेळी कुलर नव्हते तेव्हा लहान बाळांना या भाजीवर झोपवत असत. अंगणात ही भाजी लावली की, लहानसहान पक्षी (चिमण्या, लाल बुडय़ा, मैना) या भाजीवर मस्तपैकी ताव मारत असत. उन्हाची तीव्रता व पाण्याची तहान यामुळे भागत असे. अशा या शीतल भाजीचे अनेक प्रकार होत असत. चिवळी भाजी स्वच्छ निवडून धुवून चिरत असत. त्या भाजीत कणिक, बाजरी पीठ, बेसन पीठ, तांदूळ पीठ, चार चमचे नाचणी पीठ, आंबट दही, आले, लसूण, जिरे पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, २ चमचे तीळ, ओवा प्रत्येकी एक चमचा, थोडी चवीपुरती साखर, हळद, तिखट-मीठ चवीनुसार. प्रथम तेलात चिवळी भाजी परतून घेऊन त्यात ती चवीनुसार मीठ, तिखट, हळद, साखर घालून भाजी गार झाल्यावर त्यात सर्व पीठे, पेस्ट कोथिंबीर, दही, तीळ, ओवा घालून पिठाला लागेल एवढे पाणी घालून गोळा करायची. पोळपाटावर लहान लहान धपाटी लाटून तव्यावर थोडे-थोडे तेल टाकून भाजायची. कैरीची आंबट-गोड चटणी, शेंगदाणे चटणी किंवा टोमॅटो
सॉस सोबत खायला असायचाच. माझ्या आजोबांना मात्र रोज खलबत्त्यात कुटून केलेली ताजी शेंगदाणे चटणी जेवणात लागत असे. तसे विदर्भात प्रत्येक पदार्थात शेंगदाण्याचा कूट असतोच.
शेंगदाणे हा आपल्या आहारातील स्निग्ध पदार्थ आहे. विदर्भ, खानदेश या भागांत याची लागवड बऱ्याच प्रमाणात होत असे. यांच्या पुष्कळ जाती असून दाण्याच्या जातीचे रंग वेगवेगळे असतात. पातळ गुलाबी साल असलेले गावरान दाणे यांना तेल कमी असते म्हणून आमच्या घरात याचा जास्त उपयोग करीत असत. माझे काका शेंगदाण्याच्या हंगामात शेतात मोठी शेकोटी करून त्यात ओल्या शेंगा चांगल्या निखाऱ्यावर भाजून सर्व घरातील व्यक्तींना, नातेवाईकांना त्या शेंगा खायला शेतात बोलावत असत. गप्पा करता करता शेंगा खाण्याची मजा काही औरच येत असे. आमच्या भागात त्या वेळी बारमाही ओल्या शेंगा मिळत नसत. तेव्हा आई शेंगदाणे रात्री भिजवून सकाळी ते उपसून फडक्यात गुंडाळून चोळायची. नंतर ते जरा पसरून पाखडायची म्हणजे पांढरे दाणे व्हायचे. ते दाणे पाटय़ावर वाटून घ्यायची. त्यात पाणी घालून कालवून फडक्यातून गाळायची. चोथा पिळून बाजूला ठेवायची. त्या वाटलेल्या दाण्याच्या दुधात थोडे ताक घालून त्यात मीठ आणि चवीसाठी साखर घालायची. आल्याचा तुकडा वाटून त्यात टाकत असे. नंतर तूप-जिऱ्याच्या फोडणीत दोन-तीन वाळलेल्या लाल मिरचीचे तुकडे घालायची. त्यात तयार मिश्रण टाकून उकळी फुटेपर्यंत सतत ढवळत राहायची. त्यात वाळलेली कोथिंबीर घालायची, कारण उन्हाळ्यात हिरवा भाजीपाला मिळत नसे. त्यामुळे कोथिंबीर, गवार, वालाच्या शेंगा, वांग्याच्या उसऱ्या, मेथीची भाजी, हरभऱ्याची भाजी वाळवीत असत. शेंगदाण्यामध्ये ‘अ’, ‘ब’ ही जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे त्याचा वापर जास्त होत असे. हंगामात ओली मेथी तोडून स्वच्छ धुवून त्यात कच्चा बारीक कांदा, दाण्याचे कूट, तिखट, मीठ थोडी साखर घालायचे. तो खुडा जेवणात तोंडी लावत असत. तसेच हरभऱ्याच्या वाळवलेल्या भाजीमध्ये कोरडं हरभऱ्याचे डाळीचे पीठ आणि दही घालून पेस्ट करून त्याल हिंग मोहरीची फोडणी करून त्यात मिरची, लसूण घालून ती पेस्ट घालून वाफ काढायची. त्यात वाळवलेले बोरे घालायचे आणि चांगले शिजवून घ्यायचे. ज्वारीच्या भाकरीबरोबर फारच चवदार लागायची.
हिरव्या भाज्या फक्त हंगामातच मिळत असल्यामुळे त्याकाळी वाळवून ठेवण्याला फारच आमच्याकडे महत्त्व असे. हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून वाळवून जेवणाच्या पदार्थात वापरीत असत. हिरव्या मिरच्यांना दही, मीठ, जिरेपूड लावून वाळवून ठेवत. खारोळ्या करताना बाजरीचे पीठ शिजवून त्यात तिखट, मीठ, हळद, मसाला, कोथिंबीर घालायचे. मिश्रण शिजल्यानंतर थंड झाल्यावर त्याच्या लहान लहान वडय़ा करायच्या आणि उन्हात वाळवून घ्यायची. त्या वडय़ा तळून खूपच चांगली चव लागते. तसेच वाळवलेला ज्वारीचा हुरडा बारीक दळून त्याच्या बिबळ्या होत असे. बिबळ्या करण्याकरिता चुलीवर पातेल्यात पाणी उकळले की, त्यात पाण्यात भिजविलेले पीठाचे मिश्रण त्या उकळत्या पाण्यात टाकायचे. मिश्रण ढवळते ठेवायचे. दरम्यान, हळद, मीठ, तिखट, लसूण, जिरे, कोथिंबीर, तीळ टाकून ते मिश्रण घट्ट झाल्यानंतर ते पूर्ण शिजून येत असे. नंतर हाताला सहन होईल इतके थंड झाल्यावर मिश्रण परातीत काढून पोळपाटावर पापड ठेवून मिश्रणाचा साधारण मोठा गोळा घेत असे आणि पोळीच्या आकाराएवढय़ा जाडसर पोळ्या लाटत असे. त्यांना चाकू किंवा सुरीने सरळ उभे, आडवे कापून चार तुकडे करायचे. उन्हात चांगले कडक वाळवून घ्यायची. बिबळ्या तयार झाल्या की, आजी तेलात न तळता विस्तवावर भाजून नास्त्याकरिता आम्हाला द्यायची.
नागदिवाळीच्या दिवशी ‘ढपुरे’ (नागदिवे) आमच्याकडे गावी व्हायचे. प्रथम ज्वारीचा हुरडा थोडा जाडसर दळून घ्यायचं. नंतर पातेल्यात पाणी घेऊन ते पीठ शिजवून घट्ट होऊ देत असत. थंड झाल्यानंतर त्याचा एकेक गोळा हातावर लांबट पुरीसारख्या आकाराच्या तयार करायच्या. त्याची दोन्ही तोंडं (लांबलेले भाग) एकमेकांशी घट्ट जोडून हाताच्या पोकळ मुठीसारखे गोल आकाराचे पोकळ ढपुरे (नागदिवे) तयार करायचे. नंतर पातेल्यात पाणी टाकून पातेल्याच्या तोंडाला स्वच्छ कापड बांधत असत. त्या कापडावर कच्चे ढपुरे ठेवत असत. त्यावर झाकण ठेवून पातेले चुलीवर ठेवून त्या पातेल्याला बांधलेल्या कपडय़ातून वाफ बाहेर आली की, पातेले खाली उतरून ठेवून ढपुरे काढून दुधाबरोबर अगर फोडणीच्या वरणासोबत आवडीप्रमाणे खाल्ले जात होते.
त्याकाळी माझ्या माहेरी मिरचीची भाजी खाण्याकरिता सर्व नातेवाईकांना बोलावले जायचे. काका, बाबा मुद्दाम घराच्या अंगणात एक मोठी दगडाची चूल मांडून चुलीवर कलई लावलेले पितळी पातेले ठेवून त्यात पाणी टाकायचे. पाण्याला उकळी आली की, तुरीची डाळ त्यात टाकायची. त्यात हळद, तेल, टाकून वांगी चिरून टाकायची. बऱ्याच हिरव्या मिरच्या घालायच्या. तसेच कांदे चिरून टाकायचे. हे सर्व पदार्थ शिजत आले की, त्यात आंबटचुका घालायचं, कारण आंबटचुका घातला की, भाजी तिखट लागत नाही. हे सर्व पदार्थ शिजत आले की पातेले चुलीवरून खाली उतरून ती डाळ घोटून त्यात मीठ, पाणी घालून वरणासारखी पातळ करायचं. फोडणीला तेल टाकून त्यात मोहरी, जिरे, लसूण पेस्ट टाकून त्यातच गोडा मसाला टाकायचं. त्यात वरील पातळ केलेली भाजी टाकायची. नंतर उकळी आली की, कोथिंबीर, दाण्याचे कूट टाकून खाली उतरून ठेवायचं, ज्वारीच्या भाकरीबरोबर ती मिरचीची भाजी सर्वाना खायला द्यायचे. सर्व नातेवाईक मिळून गप्पा करत त्या भाजीचा आस्वाद घेत. काहीजण तर ती भाजी पीतसुद्धा असत. फारच मजा यायची.. असे पदार्थ माहेरच्या आठवणींचा दरवळ आणतात. आणि मन त्या आठवणीत रमतं..

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो