करिअरिस्ट मी : सांगीतिक वारसा
मुखपृष्ठ >> करिअरिस्ट मी >> करिअरिस्ट मी : सांगीतिक वारसा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

करिअरिस्ट मी : सांगीतिक वारसा Bookmark and Share Print E-mail

वैजयंती कुलकर्णी आपटे , शनिवार , १४  जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

योजना शिवानंद स्वत: एक गायिका. आजही आपली ही गाण्याची आवड त्या कार्यक्रमातून पूर्ण करत असतातच. पण गाण्याची हीचआवड त्यांना करिअरमध्ये बदलता आली. पूर्र्वीची ‘एचएमव्ही’ आणि आताची ‘सारेगम’ या संगीत कंपनीत त्या सध्या वरिष्ठ प्रबंधक या पदावरून जुन्या गाण्याचा, संगीताचा वारसा जतन करण्याचं काम करीत आहेत. त्याचमुळे संगीताचा मोठा खजिना रसिक चाहत्यांसाठी खुला झाला आहे.
तो १९७५-७६ चा काळ असेल. चर्चगेटच्या एस. एन. डी. टी. महाविद्यालयाच्या वार्षिक संमेलनात - ‘निगाहे मिलाने को जी चाहता है’ ही कव्वाली जोरकसपणे सादर करणारी योजना सप्रे ही त्यानंतर महाविद्यालयात खूपच लोकप्रिय झाली. बी.एससी.च्या दुसऱ्या वर्षांत शिकत असलेली योजना. तिच्यामध्ये उत्तम गायिका दडलेली आहे याची चुणूक तिने त्या कव्वालीतून दाखवून दिली.
खरे तर योजनामधली कलाकार- अगदी लहानपणापासून म्हणजे माँटेसरीतच - दादरच्या दातार बाईंच्या शाळेपासूनच तयार होत गेली. त्यांनी शिकवलेली गाणी, अभिनय गीते, नंतर दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात संगीत, नाटक, नृत्य अशा सर्व क्षेत्रांत योजना आनंदाने बागडू लागली. मुळातच आवाज चांगला असल्याने शाळेची प्रार्थना, समूहगीत यासाठी योजनाचीच निवड व्हायची. अगदी दहावीत असतानाच तिने नाटकातही काम करायला सुरुवात केली. ‘राजा शिवाजी विद्यालय’ म्हणजे तेव्हाच्या किंग्ज जॉर्ज शाळेत संगीत शिक्षक नेवरेकर होते. आणि नंतर विद्याताई साठे- या संगीत शिक्षकांनी योजनाकडून खूप तयारी करून घेतली. योजनाची आई गायिका होत्या. मात्र घरी जरा शिस्तीचे वातावरण असल्यामुळे - अभिनय-नृत्य या क्षेत्रांत योजना फारसे काही करू शकली नाही. खरे तर तिला अभिनयाचे शिक्षण घेण्यासाठी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये जायची खूप इच्छा होती. पण वडिलांनी ठाम नकार दिला. संगीताचे शिक्षण मात्र चालू राहिले. गोविंदराव पटवर्धन, पं. वसंतराव कुलकर्णी यांच्याबरोबरच मुंबई विद्यापीठात डॉ. अशोक रानडे यांच्यासारखे गुरू योजनाला लाभले. आणि तिच्यातल्या गायकीचा विकास होत गेला.
योजनाने एकीकडे बी.एस्सी. इन टेक्सटाइल डिझायनिंग आणि दुसरीकडे मुंबई विद्यापीठातून संगीताचा डिप्लोमा केला.
 बऱ्याचदा आपण आयुष्यात विचार एक करतो आणि घडते दुसरेच. योजनाच्या बाबतीतही काहीसे असेच झाले. तिच्या आयुष्यात अशी काही स्थित्यंतरे झाली की, तिचे आयुष्यच बदलून गेले. ज्ञानसरिता-डी. एस. हायस्कूल, पश्चिम रेल्वे इथे तिने नोकरीही केली. पं. शिवानंद पाटील यांचा तिच्या जीवनातला प्रवेश आणि ‘सारेगामा’ म्हणजेच पूर्वीच्या एच. एम. व्ही. या कंपनीत तिचा प्रवेश. या दोन महत्त्वाच्या गोष्टी तिच्या आयुष्यात घडल्या. पं. शिवानंद पाटील यांच्यामुळे तिचे वैयक्तिक आयुष्य तर संगीतमय झालेच. पण तिच्या ‘सारेगामा’ या कंपनीतल्या प्रवेशामुळे शास्त्रीय संगीत आणि मराठी संगीत शौकिनांना सतत नवीन मेजवानी देण्याचे काम ती गेली १८ वर्षे करते आहे. मराठी संगीताचा हा दुर्मिळ आणि अनमोल ठेवा जतन करण्याचे काम ‘सारेगामा’ म्हणजेच पूर्वीची एच. एम. व्ही. कंपनी करते आहे. मराठी भावगीते, सुगमसंगीत, नाटय़संगीत आणि चित्रपट गीतांबरोबरच शास्त्रीय संगीताचा हा अनमोल ठेवा, नव्याने आधुनिक आणि आकर्षक स्वरूपात नव्या पिढीला पेश करण्याचे काम ‘सारेगामा’ कंपनी करते आहे. या संपूर्ण कामाची जबाबदारी सारेगामाच्या सीनिअर मॅनेजर योजना शिवानंद आणि त्यांची टीम अगदी समर्थपणे सांभाळत आहेत. या कामासाठी लागणारी चिकाटी, अभ्यास, संशोधक वृत्ती आणि मुख्य म्हणजे संगीताचे प्रेम- हे योजनाकडे पुरेपूर असल्याने हे काम ती अतिशय आत्मीयतेने करते आहे.
 एच. एम. व्ही. कंपनीत प्रवेश कसा झाला? यावर बोलताना योजनाताई म्हणाल्या, ‘नेहरू सेंटरमध्ये १९९४ मध्ये मल्हार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पं. शिवानंद पाटीलही सहभागी होणार होते. त्या वेळेस या संगीताच्या कार्यक्रमाचे एच. एम.व्ही.ने ध्वनिमुद्रण करावे, अशी कल्पना पुढे आली. कारण हा मल्हार राग १२-१५ गायकांचा स्वरविलास होता. एच.एम.व्ही.च्या अधिकाऱ्यांना याबाबत भेटण्यासाठी शिवानंदजी गेले तेव्हा मीही त्यांच्याबरोबर होते. त्या वेळी ‘आम्ही रेकॉर्डिग’ करू पण आमच्याकडे या सगळ्याची माहिती असणारी व्यक्ती नाही, असे सांगितले. त्या अधिकाऱ्यांनी मलाच विचारले की, तुम्हीच या प्रोजेक्टच्या को -ऑर्डिनेटर म्हणून काम कराल का? मी लगेच होकार दिला आणि एच.एम.व्ही. कंपनीशी माझं नातं जुळलं ते कायमचं. नंतर काही दिवसांनी रेकॉर्डिग अधिकारी ही जागा रिकामी झाली. त्या वेळी एच. एम. व्ही.चे संचालक राजीव गोएंका यांनी त्याबाबत मला  विचारले. माझी द्विधा मन:स्थिती होती. पश्चिम रेल्वेची सुरक्षित नोकरी की ही आवडीचे काम असणारी- सतत संगीताच्या सान्निध्यात ठेवणारी एच.एम.व्ही.ची नोकरी? असा प्रश्न होता. त्या वेळी अर्थातच मी संगीताला प्राधान्य दिले आणि हाच माझ्या आयुष्यातला टर्निग पाँइंट ठरला.’
 योजनाताईंना शास्त्रीय आणि सुगम संगीतात अनेक गुरू लाभले. निवृत्तीबुवा सरनाईकांपासून ते माणिक भिडय़ांपर्यंत आणि नाटय़ आणि सुगम संगीतात जयमाला शिलेदारांपासून यशवंत देवांपर्यंत. या सगळ्या गुरूच्या शिकवणीचा कस लागेल असे हे काम आहे. उत्तम गायकाने उत्तम ऐकलेही पाहिजे हा अशोक रानडय़ांचा गुरुमंत्रही त्यांच्या कामी आला. रेकॉर्डिग अधिकारी म्हणून एच.एम.व्ही.मध्ये रुजू झाल्यानंतर प्रथम शास्त्रीय संगीताची ध्वनिमुद्रणे त्यांनी सुरू केली. त्यामध्ये पंडित जसराज यांचे कानडाचे प्रकार, पं. हरिप्रसाद चौरासिया यांचे प्रेमयोग, राकेश आणि रूपक कुलकर्णी यांची जुगलबंदी, रोणु मुजुमदार, बबनराव हळदणकर, डी. के. दातार अशा अनेक नामवंत गायकांचा समावेश आहे.
एच.एम.व्ही. कंपनीत मोठी परंपरा आहे. त्यांच्याकडे अनेक नामवंत ज्येष्ठ-श्रेष्ठ गायक गायले आहेत. संगीत क्षेत्रात आता खूप तांत्रिक प्रगती झाली आहे. पूर्वी ग्रामोफोनवर रेकॉर्ड लावून तो ग्रामोफोन  हाताने फिरवायचा, इथपासून ते रेकॉर्ड प्लेयर, कॅसेट प्लेयर, सीडी ते आता डिजिटल रेकॉर्डिग होते. हल्ली तर पेन ड्राइव्ह आणि आयपॉडचा जमाना आहे. पण या जुन्या गायकांच्या-त्यांच्यापैकी अनेक जण आता हयात नाहीत-अशा गायकांच्या जुन्या रेकॉर्ड मिळवून त्या नव्या तंत्रात म्हणजे सीडीमध्ये रूपांतरित करण्याचे महत्त्वाचे काम योजनाताई गेली १८ वर्षे करत आहेत.
सुरुवातीची पाच वर्ष रेकॉर्डिग अधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांना ए. एन. आर. आर्टिस्ट रेपोटायर म्हणून पद देण्यात आले. मुळात संगीताची आवड, त्यात जाणकार, अभ्यासू वृत्ती, मनापासून कामावर प्रेम या गुणांमुळे योजनाताई इथे रमल्या. आवडीचे काम असले की कितीही काम केले तरी कंटाळा येत नाही. वेळ-काळाचे बंधन राहत नाही. योजनाताईंनी या कामात स्वत:ला अक्षरश: झोकून दिले आणि एच.एम.व्ही.च्या माध्यमातून संगीत रसिकांना हा दुर्मिळ वारसा उपलब्ध करून दिला. नावीन्याची आवड, कल्पकता आणि संगीताची आस यामुळे योजनाताईंनी अनेक नव्या रेकॉर्डस्, कॅसेटस्, सीडी तयार केल्या.  पूर्वी एच. एम.व्ही.ने एखाद्या गायकाची रेकॉर्ड काढली की तो त्याचा मोठा मान समजला जायचा. पण आता स्पर्धा वाढली. अलीकडच्या काळात तर कलाकार स्वत:च स्वत:चे अल्बम बनवायला लागले. अशा परिस्थितीत स्पर्धेत स्वत:चे स्थान टिकविणे, अनेक नावीन्यपूर्ण कल्पना लढविणे हे मोठे आव्हान आहे. आणि योजनाताई अतिशय सक्षमपणे हे आव्हान पेलत आहेत, असे वाटते. गेल्या आठ वर्षांपासून ‘सारेगामा’च्या मराठी विभागाची जबाबदारीही त्या पेलत आहेत आणि आता सारेगामाच्या वरिष्ठ प्रबंधक म्हणून काम करत आहेत. एखादी कल्पना सुचली की त्यावर अभ्यास करून, ती सीडी तयार करायची, त्याचे कव्हर, त्याचे नाव ठरवायचे, ती प्रकाशित करण्यासाठी इव्हेंटस् करायचे, ही सगळी जबाबदारी योजनाताई सांभाळत आहेत. अर्थात या कामात त्यांच्या सहकाऱ्यांचीही त्यांना तेवढीच मोलाची साथ आहे. आणि सारेगामाचे चीफ फायनान्स ऑफिसर जी. बी. अहिर यांचा पूर्ण पािठबा आणि प्रोत्साहन आहे. सारेगामा कंपनीने प्रकाशित केलेल्या या सीडीज आणि त्यांची नावे पाहिली की योजनाताईंनी या प्रत्येक कलेक्शनमागे किती मेहनत घेतली आहे ते लक्षात येते. इतकेच नाही तर एच.एम.व्ही.ने काढलेल्या जुन्या काळातल्या अनेक गायकांच्या दुर्मिळ रेकॉर्डस् ना त्यांच्याकडे आहेत ना बाजारात. अशा वेळी अनेक जुन्या गाण्याच्या संग्रहाकांची मदत योजनाताई घेतात. त्यामध्ये त्या आवर्जून उल्लेख करतात तो व्यवसायाने पोस्टमन असलेल्या मंगेश कसरकर यांचा आणि कुल्र्याचे दादा दातार यांचा. दातारांकडे तर ३-४ हजार रेकॉर्डस्चा संग्रह आहे.
आत्तापर्यंत त्यांनी शास्त्रीय संगीताच्या अनेक सीडीज् त्यांनी नावीन्यपूर्ण नावाने आणि  विशिष्ट थीम घेऊन प्रकाशित केल्या. उदाहरणार्थ- ‘फॅसिनेटिंग भैरवी,’ ‘रोमँटिक पहाडी’, ‘एव्हरग्रीन यमन’, ‘रॉयल दरबारी’, ‘मॅग्निफिसंट मालकंस’, तर व्हिन्टाज् मालिकेत मोगुबाई कुर्डीकर, गंगूबाई हंगल, केसरबाई, सवाई गंधर्व, छोटा गंधर्व, अब्दुल करीम खान, नारायणराव व्यास, विलायत खान यांची गायकी आहे. ‘बेस्ट ऑफ इंडियन क्लासिकल एव्हर’ या १४ सीडीज्च्या पॅकमध्ये १९०२ ते २००० या काळातल्या गायकांचा वेध घेतला आहे.
पं. बिस्मिल्ला खान, पं. रविशंकर आणि पं. भीमसेन जोशी या भारतरत्न त्रयीचे ध्वनिमुद्रण-शिवकुमार शर्मा, किशोरीताई, कुमार गंधर्व यांचेही ध्वनिमुद्रण आता सीडीवर उपलब्ध आहे.
मराठी विभागाची जबाबदारी घेतल्यानंतरही योजनाताईंनी अनेक नव्या कल्पना आणि थीम्सवर आधारित सीडीज् प्रकाशित केल्या. त्यात प्रामुख्याने उल्लेख करायचा म्हणजे ‘महाराष्ट्र गौरव’ ही कवींची मालिका, ‘ज्ञानेश्वर माऊली’ ही लता मंगेशकर आणि हृदयनाथांची सीडी, ‘मत्स्यगंधा ते महानंदा’ ही नाटय़संगीतावर आधारित सीडी यांचा.
‘महाराष्ट्र गौरव’ या कवींच्या मालिकेत मंगेश पाडगावकर, शांता शेळके, गदिमा, भा. रा. तांबे, कुसुमाग्रज, सुरेश भट, आरती प्रभु आणि ना. धों. महानोर यांच्या गीतांचा समावेश आहे.  सुगम संगीत आणि भावगीतांच्या सीडीज्मध्ये ‘भक्तीलता’, ‘भक्ती आशा’, ‘भावलता’, ‘भाव आशा’ अशी सीडीज आहेत. आणि दुर्मिळ सीडीज्मध्ये अगदी मालती पांडे, स्नेहल भाटकर, ललिता फडके, सुमन कल्याणपूर, जी. एन. जोशी, गजानन वाटवे अशा अनेक गायकांचा समावेश आहे. आपल्या ज्येष्ठ गायकांच्या संपूर्ण कारकीर्दीचा आढावा घेणारा ‘जीवनगाणी’ हा सीडी संचही खूप लोकप्रिय झाला. त्यामध्ये लतादीदी, आशा भोसले, सुधीर फडके, यशवंत देव, पं. हृदयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे आणि पं. भीमसेन जोशींचा समावेश आहे. भीमसेनजींच्या तर कानडी गाण्यांच्याही सीडीज् सारेगामाने प्रकाशित केल्या आहेत. योजनाताईंचे हे एवढे काम पाहिल्यावर अक्षरश: थक्क व्हायला होते. केवळ संगीतावर प्रेम आणि अभ्यासू वृत्ती नाही तर एखादा ध्यास घेतल्यासारख्या त्या हे काम करत आहेत. एवढी एनर्जी त्या आणतात कुठून, असा प्रश्न पडतो. एखाद्या गायकाचे ध्वनिमुद्रण करायचे म्हणजे त्याला भेटावे लागते, त्यासाठी त्याच्या गायकीचा अभ्यास करावा लागतो. कारण अशा मोठय़ा गायकांना भेटायचे म्हणजे होमवर्क करायला पाहिजे. त्यांची तंत्रे सांभाळता आली पाहिजेत आणि मुख्य म्हणजे आपली कल्पना त्यांना पटवून द्यायला पाहिजे. हे सगळे करताना अगदी तारेवरची कसरत करावी लागते. योजनाताई म्हणाल्या, ‘‘पण आता या सगळ्या गायक आणि संगीतकारांशी एवढे चांगले संबंध निर्माण झाले आहेत की कुठलीही अडचण येत नाही. ’’ याच संदर्भातील एक आठवण त्यांनी सांगितली, प्रसिद्ध संतुरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संतुरवादनाच्या १८ सीडीज्चा संच काढायचे ठरले. म्हणून योजनाताई त्यांना भेटायला गेल्या. मुळात १८ सीडीज् निघू शकतील याचे त्यांना आश्चर्य वाटले. मात्र योजनाताईंनी प्रत्येक सीडीमध्ये काय असेल याचा पूर्ण आराखडा बनवून नेला होता. १९५५ ते १९९८ अशा ५३ वर्षांच्या सांगीतिक काळातील ही ध्वनिमुद्रणे होती. सोलो, जुगलबंदी, मैफली, थिमॅटिक, चित्रपटातील ट्रॅक असे वैविध्य त्यामध्ये होते. हा आराखडा पाहून त्यांचा स्वत:वरच विश्वास बसेना. मात्र, योजनाताईंनी या सीडीज्च्या संचाद्वारे एखाद्या अभ्यासकालाही मार्गदर्शन मिळेल हा विचार त्यांना ऐकवला. त्यामुळे ते खूपच प्रभावित झाले आणि सीडी प्रकाशनाच्या प्रमोशनमध्येही उत्साहाने सहभागी झाले.
       ‘सारेगामा’ कंपनीच्या एवढय़ा मोठय़ा व्यापात योजनाताईंचे स्वत:च्या गाण्याकडे मात्र दुर्लक्ष झाल्यासारखे झाले आहे. मुख्य म्हणजे स्वत:चा रियाज-अभ्यास यासाठी वेळच मिळत नाही. मात्र कधी कधी त्या गाण्यांचे जाहीर कार्यक्रम करतात. दरवर्षी आषाढी एकादशीला मात्र शिवानंद पाटील न चुकता अभंग गायनाचा जाहीर कार्यक्रम आयोजित करत होते आणि आता योजनाताईंनीही तीच परंपरा कायम ठेवली आहे. यंदाही त्यांनी ‘विठ्ठल वेणुनाद’ हा नवा प्रयोग केला. यात ११ बासरीवादकांसह अनोखी अभंगवाणी सादर केली. गाण्याबरोबरच अभिनयाचेही त्यांचे करिअर मागे पडले आहे.
अशा चतुरस्र व्यक्तिमत्त्वाच्या योजना शिवानंदांचे वर्णन ‘तिलक कामोद’ रागातल्या या पारंपरिक बंदिशीनेच होऊ शकते.
‘सूर संगत राग विद्या संगीत प्रमाण
जो कंठ गायन कर दिखावे
वाको जानिये गुनीजन’

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो