माणसं अशीही
मुखपृष्ठ >> लेख >> माणसं अशीही
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

माणसं अशीही Bookmark and Share Print E-mail

डॉ. आशुतोष माळी , शनिवार , १४  जुलै २०१२
(जनरल सर्जन)

तातडीचे उपचार करून तिला मरणाच्या दारातून वाचवलं. त्यासाठी तिची गर्भपिशवी काढावी लागली. पण आता मुलगा होणार नाही, या रागाने तिचा नवरा सरळ निघूनच गेला. तिच्या आईने मात्र ऋण फेडले..
मी व माझी स्त्रीरोगतज्ज्ञ पत्नी डॉ. अर्चना. आम्ही एकत्रितपणे संगमनेर येथे प्रॅक्टिस सुरू केली. ते साल होतं १९९५. जवळच्या अकोले तालुक्यातून खूप अवघड केसेस यायच्या. पण ती केस मनात अडकून राहिली.
१९८६ मध्ये रात्री एक वाजता अकोले तालुक्याच्या खटपट नाक्याची अ‍ॅम्ब्युलन्स डिलिव्हरीचा एक गंभीर रुग्ण घेऊन आली. तिच्या पहिल्या चार डिलिव्हरीज खेडय़ातल्या घरीच नॉर्मल झाल्या होत्या. ती पाचव्या खेपेची बाळंतीण होती. बाळ खूप मोठं असल्यामुळे व गर्भपिशवीचा दाब कमी झाल्यामुळे  तिला संगमनेरला पाठविले होते. श्रमामुळे व अतिरक्तस्रावामुळे ती शॉकमध्ये गेली होती. संगमनेरातील स्त्रीरोगतज्ज्ञांनी तिला नाशिकला घेऊन जाण्याचा योग्य सल्ला दिला होता.
त्या काळी संगमनेर तालुका असूनही भूलतज्ज्ञ, रक्तपेढी, सोनोग्राफी, पॅथॉलॉजिस्ट, आयसीयू, मॉनिटर्स यांची उपलब्धता नव्हती. परंतु अ‍ॅम्ब्युलन्सचा ड्रायव्हर व २ कार्यकर्ते म्हणाले, ‘‘अशीही ती नाशिकपर्यंत जाताना मरणारच आहे. तुम्ही येथेच काहीतरी उपचार करा. निदान जगण्याची आशा तरी आहे इथे. आम्ही रक्ताची सोय करण्याचा प्रयत्न करतो. त्या रुग्ण स्त्रीबरोबर फक्त तिची आई होती व पुढे जाण्यासाठीही तिच्याजवळ पैसे नव्हते. म्हणून रिस्क घेण्याचे ठरवले व तिला अ‍ॅडमिट केले.
प्रवासात वेळ गेल्यामुळे बाळाचे डोके खाली आले होते. ती अत्यंत अस्वस्थ होती व लवकर मोकळे करण्यासाठी मोठय़ाने आरडाओरडा करीत होती. थोडय़ाच वेळात तिची सुटका केली. बाळ चार किलोचे होते. डिलिव्हरीनंतर खूप रक्तस्राव होऊ लागला व तिची गर्भपिशवीसुद्धा आकुंचन पावत नव्हती. एकजण वरून मसाज करतोय, मी पेशंटवर गर्भपिशवी आकुंचन पावण्यासाठी उपचार करतोय व माझी पत्नीही उपचार करीत होती. तरीपण रक्तस्राव थांबतच नव्हता. साऱ्या लेबर रूममध्ये रक्ताचे थारोळे झाले. हे सर्व दृश्य बघून काय करावे काहीच सुचेना. सगळे हतबल झाल्यातच जमा होतो.
तिच्या आईला याची कल्पना दिली तर ती रडायलाच लागली. दवाखान्यातच २-३ जणांचे (ड्रायव्हर व कार्यकर्ते) रक्त तपासण्यास लॅब टेक्निशियन मित्रास सांगितले. तोपर्यंत पेशंट आणखी शॉकमध्ये गेली होती. नाडी १४० प्रतिमिनिट व रक्तदाब ६० झाले होते. सलाईनही आऊट गेले होते. प्रसंगावधान राखून आम्ही जवळचे मित्र डॉ. शिवाजी कर्पे व माझी नर्स आई पुष्पावती हिला मदतीसाठी बोलावून घेतले.
रुग्णाला ऑक्सिजन चालू केला होताच. ती बेशुद्ध झाल्यातच जमा होती व थंडगार पडू लागली होती. तिचे प्राण वाचविण्यासाठी तिची गर्भपिशवी काढण्याचा निर्णय आम्ही घेतला व तिच्या आईची संमती घेतली. पत्नी डॉ. अर्चना व डॉ. शिवाजी तिला दिसेल तेथे शीर सापडवून सलाईन देत होते. भूलतज्ज्ञ कोणी नव्हतेच व आम्हीही तिला स्पायनल अ‍ॅनेस्थेशिया देण्यास धजावत नव्हतो व तशीही ती बेशुद्धच होती, म्हणून लोकल अ‍ॅनेस्थेशिया देऊन पहाटे ३.३० वाजता मी व माझी आई आम्ही गर्भपिशवी काढण्यास सुरुवात केली. मी थोडा धास्तावलो होतो. ऑपरेशन करताना रक्तस्राव अगदी कमीच होता. मध्येच पेशंट वेदनांमुळे दोनदा बेफाम झाली. साधारण ४०-५० मिनिटे ऑपरेशनला लागली.
मध्यंतरी दोन बाटल्या रक्त रुग्णाला दिले गेले. तिचे बीपी ८० व नाडी १२४ झाली होती. त्यामुळे थोडे हायसे वाटले. सर्व आवरताना सकाळचे ६ वाजले होते. ऑपरेशननंतर शारीरिक व मानसिक श्रमाने इतके दमलो होतो की काहीच सुधरत नव्हते. दमल्यामुळे कोठेही झोपण्याची तयारी होती. पेशंट तपासणीच्या टेबलावरच डोळा लागला. साडेसात वाजता धसक्याने जाग आली. पेशंट थोडी कण्हत होती. सुटकेचा नि:श्वास टाकून व देवाचे आभार मानून घरी गेलो. दोन तासांनी आम्ही सगळे परत तिच्याजवळ आलो तर ती उठून बसण्याची इच्छा व्यक्त करीत होती. हे पाहून आम्ही सगळेच खूश झालो. देव तारी त्याला कोण मारीचा प्रत्यय आम्हा सर्वाना आला. हळूहळू तिच्यात खुपच सुधारणा झाली व बाका प्रसंग टळला.
दुसऱ्या दिवशी तिचा नवरा भेटायला आला. आम्ही उत्साहाने त्याची बायको कशी मरणाच्या दारातून परत आली ते सांगत होतो. तिला वाचविण्यासाठी तिची गर्भपिशवी काढून टाकावी लागली हे सांगताच त्याचा नूर पालटला. तो म्हणाला, ‘डॉक्टर मला पहिल्या चार मुलीच आहेत. मुलगा नाही व त्यात तुम्ही हिची पिशवी काढलीत. आता मला हिचा काय उपयोग? असे म्हणून तणतणत व आमच्यावर, बायकोवर व सासूवर रागावून, चिडून निघून गेला तो परत फिरकलाच नाही. तिची आई मात्र आमचे सर्व प्रयत्न बघत होती. १० दिवसांत तिला आम्ही एक पैचाही खर्च सांगितला नव्हता व सर्व औषधेही दवाखान्यातूनच वापरली होती. ‘माझी मुले लहान आहेत व जवळ पैसेही नाहीत तेव्हा मी शेत विकून किंवा गहाण ठेवून तुमचे पैसे आणून देते,’ असे विनवू लागली. ‘तुझी मुलगी बरी झाली हेच आमचे बिल. तू शेत विकू नकोस, जसे जमतील तसे बिल फेड,’ असे सांगून घरी पाठविले. जाताना ती माऊली म्हणाली, ‘माझ्या मुलांचा प्राण तुम्ही वाचविला याची मला जाणीव आहे. मी जमतील तसे पैसे आणून देईन.’
खंत इतकीच वाटली की, प्रत्यक्ष तिचा नवरा इतका निर्दयपणे का वागला? आणि ज्यांचा काहीही संबंध नाही त्या ड्रायव्हरने व इतर कार्यकर्त्यांनी अपरात्री रक्त द्यावे, या त्यांच्यातल्या देवत्वाला तोडच नव्हती.
यानंतर बिलाचे आम्ही विसरूनही गेलो होतो. १०-१२ वर्षांनंतर ती माऊली दवाखान्यात आली व म्हणाली, ‘मला ओळखले का?’ आम्ही ओळखू शकलो नाही. त्या रात्री तुम्ही वाचविलेल्या मुलीची मी आई आहे व तिने ३००० रुपये आम्हाला दिले व भरभरून आशीर्वाद दिले. आमच्याही डोळ्यात नकळत पाणी तरळले, कारण त्या गरीब माऊलीची माणुसकी व पैसे देण्याची कळकळ हेच होते. इतक्या वर्षांनी पैसे येतील असे स्वप्नातदेखील वाटले नव्हते. अजूनही ती केस व ती रात्र आठवली की, अंगावर काटा येतो व एका रुग्णाचा जीव वाचविण्यात आपलाही सहभाग आहे या जाणिवेने ऊर भरून येतो.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो