स्त्री जातक : शोषणाच्या सावल्या
मुखपृष्ठ >> स्त्री जातक >> स्त्री जातक : शोषणाच्या सावल्या
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

स्त्री जातक : शोषणाच्या सावल्या Bookmark and Share Print E-mail

डॉ. अनघा लवळेकर , शनिवार , १४  जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

स्त्रीने इतरांनी केलेल्या शोषणाबद्दल स्वत:ला अपराधी मानणं बंद करायला हवं आणि त्यासाठी ‘स्व’ बळकट व्हायला हवा. आयुष्यात अंतिमत: काय महत्त्वाचं हवं ते तिचं तिनेच ठरवायला हवं.
आ मच्या पिढीनं परकऱ्या किंवा फ्रॉकच्या वयात असताना ‘लहान माझी बाहुली-मोठ्ठी तिची सावली..’ हे गाणं कितीदा तरी म्हटलं आहे. त्यातली नकटय़ा नाकाची, घाऱ्या डोळ्यांची, केळ्याचं शिकरण करताना सालीवरून पाय घसरून आपटलेली, करपलेल्या भाताकडे हताशपणे पाहणारी भावली म्हणजे बावळटपणाचं अगदी मूíतमंत प्रतीक वाटायची. ‘तिच्या त्या मोठय़ा-मोठय़ा सावली’च्या ओळीचं प्रयोजन मात्र कळायचं नाही. परवा एका मैत्रिणीशी गप्पा मारताना अचानक ते लख्कन समोर आलं.
 ही मैत्रीण अत्यंत सुस्थितीतील, सुशिक्षित, स्वभावानं मवाळ, कधीही अधिकउणा शब्द न काढणारी. तिच्या आयुष्यात काहीतरी विपरीत घडल्याचं कळलं म्हणून मी भेटायला गेले. तिनं नवऱ्यावर हात उगारून, त्याला काठीनं बदडूून बाहेर हाकलून दिलं होतं आणि स्वत:च पोलिसांकडे जाऊन ते सांगितलं होतं. स्वत:च्या स्वभावाच्या  इतकं विपरीत टोकाचं ती का वागली असेल? वरवर पाहता त्यांच्या कुटुंबात काही वेगळं घडत असेल असं कानावरही नव्हतं.
भावनांचा पहिला आवेग ओसरल्यावर ती म्हणाली, ‘‘तुलापण आश्चर्य वाटलं ना माझ्या वागण्याचं? पण पाणी डोक्यावरून जायला लागेपर्यंत मी खूप गप्प बसले. इतकी, की बेडरूमच्या दाराबाहेरसुद्धा काही येऊ दिलं नाही. हा माझा ‘सभ्य-उच्चशिक्षित-सुसंस्कारित’ नवरा रोज रात्री माझ्याबरोबर जे वागायचा ते मी आज प्रथमच कुणाशी तरी बोलते आहे. रोज रात्री दीड-दोन वाजेपर्यंत तो मला बेडरूमच्या भिंतीपाशी उभा करायचा, डोक्यावर चपला ठेवायचा आणि शिव्यांची बरसात करायचा. हातात त्याचा पेला आणि समोर मी! पहाटेनंतरचा तो आणि रात्रीचा तो यात जमीन-अस्मानाचा फरक होता. दिवसा माझं कौतुक, मला मदत, मुलांच्यासाठी झटणं, नातेवाईकांत रमणं, प्रमोशन्स सगळं चालू होतं. रात्र झाली आणि मी आवरून आत आले की याचा अवतार बदलायचा. ऐकवणार नाहीत अशा शिव्या! मी किती मूर्ख-नालायक बाई आहे याचा समाचार. आधी वाटलं की कुठला तरी राग काढत असेल.. पण आता चौदा र्वष झाली मी रोज रात्री ही छळवणूक सहन करते आहे. स्वत:च्याच सावलीला भ्यावं तशी माझी अवस्था झाली आहे. दिवसाचं त्याचं रूप खरं का रात्रीचं? मी नक्की काय प्रतिसाद द्यावा हे कळेनासं झालं आहे. शेवटी परवा माझाही तोल गेला आणि धुण्याच्या काठीनं त्याला मारत मी बाहेर काढलं. तमाशा झालाच पण मी लक्ष दिलं नाही. आता वाटतंय आपण केलं ते बरोबर का चूक?’’
मी म्हटलं, ‘‘पहिली गोष्ट म्हणजे जे घडलं ते अचानक घडलेलं नाही हे लक्षात घे. ते फक्त एकदम बाहेर आलं आहे इतकंच. इतक्या उशिरा तू प्रतिक्रिया व्यक्त केलीस हे चूक, पण जशी केलीस त्यावर आत्ता काही न बोललेलं बरं. तू स्वत:ला आधी यासाठी माफ करायला हवंस. तरच तू  तुझ्यापेक्षा मोठय़ा झालेल्या मनातल्या भीतीच्या आणि संताप, लाज यांच्या सावलीबाहेर पडू शकशील! ’’
तिच्याशी हे बोलत असताना लक्षात येत होतं की ही ‘शोषणाची सावली’ किती सर्वव्यापी आहे. वरवर लालभडक आणि रसरशीत दिसणाऱ्या सफरचंदातही अळीच्या रूपानं तक्षक नाग लपलेला असावा तशी आहे. ‘शोषण’ म्हणजे काय? कुठलीही एखादी व्यक्ती केवळ आसुरी आनंदासाठी, वैयक्तिक स्वार्थासाठी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला तिच्या मनाविरुद्ध एखादी कृती करायला भाग पाडते, भावनिक फायदा घेते, तेव्हा जणू काही त्या दुबळ्या बनलेल्या व्यक्तीचा जीवनरसच ती शोषून घेत असते. तिला अधिकाधिक दुबळं बनवत असते.
‘शोषण’ होतं कुणाचं? तर समाजाच्या उतरंडीत जे सर्वात खालच्या-खालच्या पायऱ्यांवर असतात त्यांचं. ज्यांच्याकडे ना आर्थिक ताकद असते ना सत्तेची! जे संघटित नसतात, स्वत:च्या क्षमता सिद्ध करायची संधीच ज्यांना पुरेशी मिळालेली नसते अशाच व्यक्तींना शोषणाला सामोरं जावं लागतं. स्त्रियांच्या शोषणाच्या बाबतीत वर उल्लेखलेल्या गोष्टींशिवायची महत्त्वाची बाजू असते ती सामाजिक संस्कार, अपेक्षा आणि प्रथापरंपरांची. त्यांच्यामुळे या शोषणाचंही झट्कन् ‘उदात्तीकरण’ व्हायला वेळ लागत नाही. मग ते कुटुंबातील जवळच्या व्यक्तींकडून झालेलं असो किंवा सामाजिक व्यवस्थेच्या इतर प्रतिनिधींकडून.
जन्मपूर्वावस्थेपासूनच स्त्रियांचं शोषण सुरू होतं असं म्हटलं तर आज वावगं ठरणार नाही, इतके त्याचे ठोस प्रसंग, पुरावे समोर येत आहेत. स्त्री- हक्काच्या, स्त्रियांच्या बाजूनं असणाऱ्या अनेक कायद्यांचा संदर्भ देऊन जेव्हा कुणी म्हणतं, की, ‘स्त्रियांचं शोषण होतं’ असं म्हणणं ही स्त्रीवाद्यांची एक फॅशन आहे. पण प्रत्यक्षात शोषणाची व्याप्ती बघितली तर हा आक्षेप घेणारे किती एकांगी विचार करतात हे लक्षात येतं. ‘एखाद्या देशाचं पंतप्रधान किंवा राष्ट्रपतीपद स्त्रीनं भूषविलं म्हणजे त्या देशातल्या सरसकट सर्व स्त्रिया या सन्मानाच्या जीवनाच्या गुणवत्तेच्या सर्वसामान्य पातळीवर गेल्याच असणार’ हे जेवढं बालिश, अपरिपक्व गृहीत आहे, तेवढंच ते ‘फॅशन’चं गृहीत आहे.
शोषणाला वय, जात, आर्थिक सामाजिक स्तर कशाचंही वावडं नाही. झोपडीत राहाणाऱ्या बाईला रोज उघड मार खायला लागणं आणि उच्चभ्रू वस्त्यांमध्ये दरवाजे बंद करून मानसिक खच्चीकरणाची पद्धतशीर सोय करणं त्या बाईच्या दृष्टीनं सारखंच वेदनादायी आणि उद्ध्वस्त करणारं असतं. मग ते कुटुंबात होत असो किंवा व्यवसायाच्या ठिकाणी. यात पहिला बळी जातो तो स्त्रीच्या मन:स्वास्थ्याचा. सतत भीती, असुरक्षितता वाटणं, चिंता वाटणं, दुबळापोकळ संताप, स्वत:विषयीसुद्धा तिरस्कार वाटणं अशा गोष्टींनी तिचं मन भरून जातं. मनाला काजळून टाकणाऱ्या अशा भावनांनी सतत ग्रस्त असतानादेखील बहुतेक स्त्रिया आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्या, भूमिका बऱ्यापैकी यथायोग्य पार पाडत असतात, असं दिसतं. कुठे लॉक होत असतील ही सारी आंदोलनं? किती काळ ती बंदिस्त राहू शकतील? कधीतरी तर वाफ वर येईलच ना? मग ती उसळून आलेली वाफ कधी दुसऱ्याला तर कधी स्वत:लाच भाजून काढते. कधी आपल्यापेक्षा कमी ताकदवान अशा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीवर ती आपल्या साठलेल्या भावनांचा उद्रेक काढते. शोषणाचं दुष्टचक्र अशा पद्धतीनं चालूच राहातं.
‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ या चित्रपटातील एक संवाद या निमित्तानं आठवतो. एका स्त्रीवर झालेल्या अन्यायाला जगासमोर आणण्यासाठी दुसऱ्या स्त्रीला -तिची केस लढवताना- स्वत:चा  ‘संसार’ सोडावा लागतो. इतकंच नाही तर त्या ‘सो कॉल्ड सुरक्षित’ घरातील छुपं शोषणही सहन करावं लागतं. चित्रपटातील एक वरिष्ठ न्यायाधीश त्यावर प्रश्न करतात, ‘खरंच आपण झालो का खऱ्या अर्थानं मुक्त? सावित्रीबाईंच्या अंत्ययात्रेला जमलेल्या गर्दीत चालत राहाणाऱ्या आपण- अजूनही फक्त चालतोच आहोत!’ स्त्रियांचं रोज- प्रतिक्षणी होणारं शोषण- मग ते गर्भातच कुस्करलेल्या कळीचं असो किंवा पंचाहत्तराव्या वर्षी बलात्कार अनुभवलेल्या विकल वृद्धेचं असो,- प्रश्न अजून उत्तरोत्तर गंभीरच बनतो आहे, हेच दाखवतो. अशा स्त्रिया मग कालांतरानं असहाय्य बनायला अक्षरश: ‘शिकतात’. लढायचं बळच संपून जातं. काही जणी त्याला इतक्या सरावतात की ‘मेलं कोंबडं आगीला भीत नाही’ या म्हणीप्रमाणे वास्तवाशी तडजोड करतात. रोज त्याला सामोऱ्या जातात. काही ठिकाणी तर या शोषणालाही ‘प्रतिष्ठाच’ देऊन टाकतात. धार्मिक, पारंपरिक प्रथांमधून होणाऱ्या अशा शोषणाला मग सामाजिक मान्यताच मिळते- कायदा काहीही म्हणो!
वाढती बाजारू संस्कृती तर स्त्रियांच्या सर्व प्रकारच्या शोषणाचा विडाच घेऊन आली आहे असं वाटावं अशीच परिस्थिती आहे. बाईचं शरीर, तिची बुद्धिमत्ता, अगदी तिचं नुस्तं ‘बाई’ असणं (वेगवेगळ्या भूमिकांतलं) बाजारात जसं लागेल तसं खपवण्यात ना शोषकांना गैर वाटतं- (त्यांना का वाटेल म्हणा? तो तर ‘व्यवसाय’ आहे!) ना त्या प्रकारे स्वत:ला वापरू देणाऱ्या स्त्रियांना! कुठलीही बडी चित्रपटतारका घ्या! निव्वळ व्यक्तिगत अभिनयाची गुणवत्ता त्यांनी नाकारलीच आहे. स्वत:ला प्रदर्शनीय (खरं तर ‘आसक्तनीय’ किंवा ‘आकर्षणीय’) केल्याशिवाय भवितव्यच नाही हे त्यांनी ठरवलेलंच आहे. या प्रकारच्या ‘स्वशोषणा’मुळे ‘आपण आपल्याबरोबर अनेक स्त्रियांना केवळ ‘देह’ आणि ‘उपभोग्य वस्तू’ बनवून टाकतो आहोत आणि इतरांना त्याच हक्कानं शोषण करायला प्रवृत्त करत आहोत’ याची जाणीव या  झगमगाटी दुनियेतील कलाकारांना व्हावी अशा माझी कळकळीची इच्छा आहे.
दुसऱ्यानं किंवा स्वत:च केलेलं शोषण थोपवायचं असेल तर काय व्हायला हवं?
मुख्य म्हणजे इतरांनी केलेल्या शोषणाबद्दल स्वत:ला अपराधी मानणं बंद व्हायला हवं. एका समुपदेशकाकडे लैंगिक शोषणाला बळी पडलेली, नैराश्यग्रस्त झालेली एक युवती गेली होती. काही केल्या तिची स्वत:बद्दलची स्वीकारशीलता तयार होत नव्हती. ‘मी आता पूर्वीची राहिले नाही. मी मनाने आणि शरीरानेही उद्धस्त झालेय, असं तिचं म्हणणं होतं. अखेर समुपदेशकानं एक वेगळा उपाय केला. तिनं त्या युवतीसमोर एक आरसा धरला आणि विचारलं, ‘‘यात कोण आहे?’’
‘‘मीच!’’ ती म्हणाली.
 मग समुपदेशकानं त्या आरशावर थोडी घाण टाकली आणि म्हटलं, ‘‘अगं, तुझ्या चेहऱ्यावर ही घाण पडली आहे, ती पुसून टाक ना!’’
 ‘‘माझ्या चेहऱ्यावर!’’ युवती आश्चर्यानं म्हणाली, ‘‘कुठे? ती घाण आरशावर पडली आहे’’ तोच धागा पकडून समुपदेशक म्हणाला, ‘‘तेच तर मी तुला समजावण्याचा प्रयत्न करते आहे. तुझं शोषण हा तुझा भूतकाळ आहे. ते घडून गेलं आहे. आजच्या तुझ्या ‘वर्तमानावर त्याची घाण कशी दिसेल? ते अनुभव म्हणजे जणू तुझं आरशातलं प्रतिबिंब आहे असं समज. खरंखुरं वाटणारं, हुबेहूब, पण तुझ्या ‘आज’ला ते स्पर्श करू शकत नाही.’’या बोलण्यानं त्या युवतीला खूप गोष्टी स्पष्ट झाल्या. तेव्हा शोषणाच्या चक्रातून बाहेर पडायचं असेल तर आधी ‘स्व’  बळकट व्हायला हवा. त्यासाठी इतरांची मदत घ्यायला काहीच हरकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शक्य तितक्या लवकर ‘नाही’ म्हणणं(STOP) आपल्याला आयुष्यात ‘अंतिमत:’ काय महत्त्वाचं आहे त्याची स्पष्टता असणं (आणि ती पैसा/ प्रसिद्धी/ पदोन्नती कधीच असू शकत नाही हे आपणही जाणतो.) ‘मी विक्रीसाठी नाही’ हे पुन:पुन: स्वत:लाही बजावणं!अखेर कुडाच्या घरातल्या झावळ्यांखाली काय आणि शंभर मिनारांच्या गगनचुंबी हवेल्यांमध्ये काय- स्त्रीचं शोषण केवळ ती आणि तीच थांबवू शकते. तुम्हाला काय वाटतं?

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो