स्त्री समर्थ : ‘बाईले मारनं सोप्पं नाही.’
मुखपृष्ठ >> स्त्रीसमर्थ >> स्त्री समर्थ : ‘बाईले मारनं सोप्पं नाही.’
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

स्त्री समर्थ : ‘बाईले मारनं सोप्पं नाही.’ Bookmark and Share Print E-mail

प्रा. सुलभा चौधरी , शनिवार , २१  जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

वर्धा जिल्ह्य़ातल्या पाथरी गावातली एक अशिक्षित स्त्री, सुमन गवळी. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येते आणि बदलू पाहते आजूबाजूचं भीषण वास्तव. अर्थातच तिला विरोध होतो,वाळीत टाकलं जातं. पण गप्प राहण्याऐवजी ती कणखर बनते. तिच्या आवाजाला धार येते आणि गाव बदलू लागतं.. त्या सुमन गवळीची ही विलक्षण कथा.
स मुद्रपूर तालुक्यातलं पाथरी हे गाव जुन्या वळणाचं, जुन्या चालीरीती पाळणारं. सुमन लग्न होऊन सासरी आली तेव्हा पाथरी गावचे लोक तिला ‘रांगडीन’ म्हणत. धिप्पाड शरीराची सुमन अस्सल गावरान भाषा बोलायची. लहानशा खेडय़ातून आल्याने थोडी बुजरीही होती. हीच सुमन आता महिला बचतगटाच्या मदतीने तिच्यासह गावाचा विकास साधतेय. तिच्या या प्रवासाची ही कहाणी.पाथरी गावात ‘चेतनाविकास’ संस्थेच्या वतीने बचत गटाचा प्रस्ताव आला. त्यासाठी इतर महिलांप्रमाणे सुमनने नाव घातले. तिच्या अंगभूत गुणांमुळे आपसूकच तिच्यावर बचतगटाच्या नेतृत्वाची धुरा आली. या जबाबदाऱ्या पेलतांना तिला गावातल्या समस्या जाणवू लागल्या. दारूमुळे अनेक घरातले कर्ते पुरूष रोजगार गमावून बसले होते व संसाराचा गाडा ओढणं बायकांच्या नशिबी आलं होतं. दुसरीकडे आपसात होणाऱ्या भांडणांनी गावात अशांतता नांदत होती.
   सुमनच्या घरची परिस्थितीही बेताचीच होती. शिवाय तिचाही नवरा दारू पिणारा. ती दाईचं काम करायची. बकऱ्या चारायची अन् शेतात राबायची. बकऱ्या राखायला जायची तेव्हा तिच्या सोबत असायची तिची जिवाभावाची चंपी कुत्री आणि खांद्यावर असायचा तिचा लाडका पोपट. हातात काठी घेऊन ती रानोमाळ तुडवतांना दिसायची..
स्वत: अठराविश्व दारिद्रय़ात जगणाऱ्या सुमनची समाजसेवा अगदी घरापासून सुरू झालीय. तडकाफडकी मृत्यू पावलेल्या तिच्या बहिणीची चार मुलं अनाथ झाली. छोटी मुलगी अवघी तीन महिन्यांची. अशा वेळी सुमन त्या लेकरांची माय झाली. त्यांना घरी घेऊन आली आणि स्वत: कष्ट करीत राहिली. तिने कधी गरिबीचं रडगाणं गायलं नाही की मनाचा दयाळूपणा सोडला नाही. दोन मुलं तिची स्वत:ची आणि चार मुलं बहिणीची अशी सहा मुलं पोसण्यासाठी ती अखंड कष्ट करत राहिली.
        तिने कष्टाने मिळवलेले पैसे नवरा अधूनमधून पळवायचा. पण मुलांच्या प्रेमापोटी सुमन कणखर झाली. नवऱ्याशी वागण्या-बोलण्यात जरब येऊ लागला. त्याला चार शब्द सुनावतांना सुमनमधली रणरागिणी प्रकटू लागली. पण मुला-बाळांच्या काळजीने सुमनच्या जीवाला घोर लागलेला असायचा. दारूमुळे उध्वस्त झालेली आजूबाजूची कुटुंबं पाहिली व सुमनच्या मनात या दारूविषयी प्रचंड चीड निर्माण झाली. तिने इतर महिलांनाही दारूबंदीच्या मागणीसाठी संघटीत केलं.
अखेर तिच्या पुढाकाराने दारूचा नायनाट करण्याच्या ठरावासाठी पाथरी गावच्या ग्रामपंचायतच्या पटांगणात स्त्री-पुरुषांची भव्य सभा भरली. ज्यात संपूर्ण महिला गटानं अध्यक्ष म्हणून मातंग समाजाच्या सुमनची निवड केली. काही लोक विरोधात बोलू लागले. पण सुमनची व तिच्या गटाची मागणी कायम होती. अखेर गावात दारूबंदीचा ठराव संमत झाला.
दारूबंदीचं काम करताना सुमनला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. काही काळ लोकांनी तिच्यावर बहिष्कार टाकला. काही लोक तिला जातीपातीवरून हिणवत, अपमानित करत. पण सुमन खंबीरपणानं गावाच्या भल्याचं काम करीत राहिली.
आपलं गाव दारूमुक्त करण्यासाठी धडपडणारी निर्भय सुमन पुढे गावातून एकमतानं दारूबंदी समितीची अध्यक्षा झाली. नुसत्या बचतगटाच्या उपक्रमांनी परिस्थिती बदलेल असं वास्तव नव्हतंच. हेच ताडून सुमनने उचललेला दारूबंदीचा विडा यशस्वी झाला होता.
आता सुमनचा नवराही दारू पिऊन तिच्यासमोर येऊ शकत नाहीे. गावातल्या महिलांनी दारूबंदीसाठी दिलेल्या लढय़ानं व सुमनच्या धाकानं आता गावातली दारूची दुकानंही बंद झालीत. तिच्या नवऱ्याचीही दारू सुटलीय. पुरुष बचतगटात तो सक्रिय असतो. हा बदल घडवून आणलाय सुमनने!
बचतगटाच्या कामानिमित्त सुमनचं इतर गावात जाणं झालं. लोकांशी संपर्क वाढला, सुमनला शिक्षणाचं महत्त्वही कळू लागलं. गावात साक्षरता अभियान सुरू होणार होतं. सुमनने त्यासाठी प्रवेश घेतला. आता तिला अक्षरओळख झाली आहे. ‘शिकणं लई मोलाचं हाय’ असा नारा देऊन तिने आणखी चार जणींनाही या वर्गाला प्रवेश घ्यायला भाग पाडलं.
मात्र, एका प्रसंगाने सुमनचं आयुष्य कायमचं बदललं. गावात एकदा दुर्गादेवी उत्सवात एक माणूस बिचवा घेऊन सुमनला मारायचा प्रयत्न करू लागला. धीटपणे सुमन त्याला म्हणाली, ‘‘तू मले नाही मारू शकत. बाईले मारनं सोप्पं नाही. कारन माहे हात कायद्यापर्यंत लंबे हायेत.’’ इतर वेळी सौम्य असणाऱ्या सुमनमध्ये त्यावेळी दुर्गेचा अवतार संचारला होता. आपलं रक्षण आपणंच केलं पाहिजे, याचा तिला साक्षात्कार झाला. आता तर सुमन इतकी निर्भय झाली आहे की प्रसंगी रात्री हातात सोटा घेऊन गस्तही घालते.
सुमन म्हणते, ‘‘माझं बोलनं अडानी. मी साधी मजूरबाई. दरिद्री सासर आन दारुडय़ा नवरा यांच्या जंजाळात फसली होती, पण ‘चेतना विकास’ या संस्थेनं मले मार्ग दाखवला. हिंमत देऊन मले बोलतं केलं. आता तर गावातले लोक मले थर्रा भितेत.’’ सुमनमध्ये बदलाची ठिणगी पेटवण्याचं काम केलं ते ‘चेतनाविकास’ या संस्थेने. या संस्थेच्यावतीने महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न केले जातात. खेडय़ातील अशिक्षित महिलांना शेती व गृहउद्योगाचे प्रशिक्षण त्यांच्यामार्फत दिले जाते.
‘चेतनाविकास’च्या उपक्रमात सहभागी झाल्याने सुमनच्या व्यक्तीमत्त्वाचा खरंच कायापालट झाला. सुमन आता बेडर झाली आहे. कुणाही पुरुषाची कॉलर पकडून त्याला दारू आणि जुगारापासून धीटपणे दूर ठेवते. तिच्या सहकार्यानंच गावात पुरुष बचतगटाचं काम सुरू आहे. म्हणूनच गावाच्या संपूर्ण विकासात सुमनचा सिंहाचा वाटा आहे.
    मीटिंग असली की घरोघरी जाऊन स्त्री-पुरुषांना जास्तीतजास्त संख्येत बोलावून आणण्याचं काम नेहमी सुमनच्या पुढाकारानं होते. सहा लेकरांचा सांभाळ करूनही मीटिंगमध्ये पहिली हजेरी सुमनची असते. सुमनच्या नेतृत्वात गावात खेळला जाणारा जुगारही बंद झालाय. हिंदी बऱ्यापैकी बोलणारी आणि मराठी जेमतेम बोलू शकणारी ही सुमन आता गावाला सेंद्रिय शेतीचं मार्गदर्शन करतेय.
तिचा सामजिक सहभागही वाढलाय. एकदा पित्याच्या रागानं गावातल्या मुलीनं विहिरीत जीव दिला. सुमनच्या नेतृत्वाखाली महिलांनी त्या घरावर मोर्चा नेला. त्याला अटक करविली. अशा प्रसंगांमधून सुमनच्या मनातली गावाबद्दलची तळमळ लोकांना दिसायची. म्हणूनच तिचं म्हणणं हळूहळू लोकांना पटू लागलं.
     आपण नाहक मतलबाचे राजकारण करतो आणि गावात तंटे वाढतात. अगोदरच गरिबी, त्यात होणारी भांडणं विकोपाला जाऊन मारामारीची प्रकरणं पोलीस चौकीत नोंद होतात. गावकऱ्यांना कोर्टाच्या चकरा मारण्यात रोजी बुडते, प्रवासखर्च होतो. वकिलाची फी तर कंबरडंच मोडते. सुमनने ग्रामसभेत धीटपणे उभं राहून यावर उपाय सांगितला. ‘‘आपल्यात काही कारणानं भांडण-तंटा झाला तरी गावकुसाबाहेर नाही जाऊ द्यायचा. घरातली भांडणं आपण घरात मिटवतो तशी गावातली भांडणं गावातच मिटवायची. गावागावात मैत्री केंद्रं आहेत चेतना विकासची. आपण त्यांची मदत घेऊन आपली भांडणं आपण मिटवू. घराची आब्रू तशी गावाची आब्रू सांभाळू. गाव तंटामुक्त करू आणि असं पाहा आपल्या हाताची ही पाच बोटं सारखी आहेत का? पण काम पाच बोटांनी होते. घरात काय अन् गावात काय वेगवेगळ्या स्वभावाची माणसं राहणारच. आपण एकमेकांना समजून आपलं मानू तर भांडण्याचा प्रश्नच नाही.’’ सुमनचं म्हणणं गावकऱ्यांना योग्य वाटतंय. आता दादागिरी करणाऱ्या गावप्रमुखालाही मोलाचा सल्लाही देतेय.
बचतगटाची सक्रिय सदस्या झाल्यापासून सुमनची आर्थिक स्थिती सुधारलीय. दुसऱ्याच्या शेतात दहा-बारा तास राबणाऱ्या सुमनने आता सहा एकर जमीन खरेदी केलीय. बहिणीच्या मुलीचं लग्न करून दिलं. बचतगटाने या लग्नात धान्याची मदत केली आणि गावपंगत झाली. बदलत्या आर्थिक परिस्थितीनं सुमनचं राहणीमान बदलंय. मैत्री केंद्राचं काम ती पाहतेय. आता सुमनला दुसऱ्या गावांतून दारूबंदी कार्यक्रमाची आमंत्रणं येतात. तहसील आणि जिल्हा पातळीवर ती मीटिंगला हजेरी लावते.
आज ती खंबीरपणे तिच्या कुटुंबाचे, गावाच्या हिताचे निर्णय घेऊ शकतेय. आजूबाजूच्या गावात हिरीरीची कार्यकर्ता म्हणून तिची ओळख होऊ लागली आहे. २००६ साली वध्र्यातील प्रसिद्ध साहित्यिक दि. ग. कावळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने तिला गौरवण्यात आलं. ग्रामीण भागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या धडाडीच्या महिलांना हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारामुळे सुमनचा हुरूप आणखी वाढलाय.
    गावात आता प्रयोगशील शेतीचे वारे वाहतायत. सामूहिक शेतीचा प्रयत्नही गेल्या वर्षीपासून सुरू झालाय. गावातील काही महिलांनी फूड प्रोसेसिंगचं प्रशिक्षण घेतलंय. गावात आज जे बदलाचे वारे वाहू लागलेत त्यासाठी सुमनचे कष्ट कारणीभूत आहेत.
खेडय़ातली एक सामान्य स्त्रीदेखील प्रसंगी किती खंबीर व निर्भय होऊ शकते याचं उदाहरण म्हणजे पाथरीची ही सुमन गवळी. बकऱ्या चारणारी, उपाशीपोटी कष्ट करणारी व आता सहा एकर जमिनीची मालकीण झालेली. एक सामान्य स्त्री ते झुंजार सुमन हा तिचा प्रवास खचितच प्रेरणादायी आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो