र. धों.च्या निमित्ताने : आता उठवू सारे रान
मुखपृष्ठ >> लेख >> र. धों.च्या निमित्ताने : आता उठवू सारे रान
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

र. धों.च्या निमित्ताने : आता उठवू सारे रान Bookmark and Share Print E-mail

डॉ. मंगला आठलेकर , शनिवार , २१  जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

जन्माला येणाऱ्या मुली भाग्यवान म्हणायच्या की गर्भातच मारल्या गेलेल्या भाग्यवान म्हणायच्या, असा प्रश्न पडावा इतकं आजचं वर्तमान भयानक आहे. हे सगळं थांबवायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन त्या विरोधात रान उठवायला हवंय..
र. धों. कर्वे स्त्री-स्वातंत्र्याबद्दल, स्त्री-पुरुष समानतेबद्दल आणि प्रामुख्यानं ‘सुखानं जगणं’ हा पुरुषाप्रमाणेच स्त्रीचादेखील हक्क आहे. याविषयी ‘समाजस्वास्थ्या’तून लिहीत होते.स्त्रीच्या स्वास्थ्याविषयी तळमळीनं लिहिणाऱ्या आणि बोलणाऱ्या र. धों.च्या काळात या प्रश्नाला जितके कंगोरे होते, त्यापेक्षा आज हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.

स्त्री हा सहज अत्याचार करता येईल असा, सहजपणे कोणत्याही फसवणुकीला बळी पडेल असा एक समाजघटक आहे. यात तिच्या शारीरिक दौर्बल्याचा भाग मोठा आहेच, पण तिच्या भावनांशीही कोणी सहज खेळ करू शकतो. म्हणूनच शारीरिकदृष्टय़ा ती किती सक्षम होते यापेक्षा मानसिकदृष्टय़ा ती किती खंबीर होते हे अधिक महत्त्वाचं आहे. तिला स्वसंरक्षणासाठी कराटे शिक्षण देता येईल, पण समाज आपल्याला ‘माणूस’ म्हणून कसं वागवतो यावर तिची आत्मशक्ती निर्भर होत असते. आणि त्या अर्थानं र. धों.चा काळ उलटून आज पाऊणशे वर्षे झाली तरी परिस्थितीत कोणताही फरक पडलेला नाही. तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न तेव्हा होता तितकाच आजही गंभीर आहे.
स्त्रीकडे नकारात्मक नजरेनं पाहायला समाज सुरुवात करतो तो ती गर्भावस्थेत असल्यापासूनच. या जगात येण्यापूर्वीच तिला नाहीसं कसं करता येईल याचा विचार करणारी माणसं आज एकविसाव्या शतकातही भरपूर आहेत. त्यासाठी गावठी उपचारांपासून अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत सर्व मार्गाचा वापर केला जातो. ती जन्माला येऊ घातल्यापासून तिच्यावरच्या अत्याचारांना प्रारंभ होतो आणि तोही तिच्या जन्मदात्यांकडून! मग बाहेरच्या जगात ती सुरक्षित कुठून असणार?
स्त्रीवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रकारही अनेक आणि मार्गही अनेक. जन्मापासून ते नैसर्गिक मृत्यूपर्यंत कोणत्याही वयात तिच्या शरीराशी संबंधित असं कोणतंही संकट तिच्यावर कोसळू शकतं. स्त्री भ्रूणहत्येचं प्रमाण, डॉक्टरांचा यातला सहभाग, पुरुषपालकांचा मुलीच्या जन्माकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन, गर्भजलचिकित्सा यावर सातत्यानं झोड उठवली जात असतानाही आजही गर्भातच किती स्त्री भ्रूण मारले जातात!.. पुढचे भोग भोगायला मुलगी शिल्लकच राहत नाही हे एका परीनं ठीकच म्हणायचं.
जन्माला येणाऱ्या मुली भाग्यवान म्हणायच्या की गर्भातच मारल्या गेलेल्या भाग्यवान म्हणायच्या असा प्रश्न पडावा इतकं आजचं वर्तमान मुलींच्या जगण्याचं एक भयानक रूप घेऊन आपल्यासमोर उभं आहे. आपल्या आजूबाजूला मजेत जगणाऱ्या चार मुलींकडे बघून मुलींच्या जगण्याविषयी कुठला प्रातिनिधिक निष्कर्ष काढण्यात अर्थ नाही. या चार मुली म्हणजे अख्खी स्त्री जात नव्हे. त्यामुळे स्त्री जातीच्या दु:खांविषयी बोलताना विषण्ण सूर लागला तर नाइलाज आहे.
स्त्रियांना ज्या शारीरिक, मानसिक हिंसेला तोंड द्यावं लागतं ती हिंसा आज आपल्या संस्कृतीचाच एक भाग होऊन बसली आहे. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांच्या संदर्भात आपण इतके बधिर, संवेदनाहीन झालो आहोत की स्त्रीच्या वाटय़ाला येणाऱ्या आत्यंतिक क्रूर छळाच्या घटना आपल्या वाचनात किंवा आपल्या कानावर आल्या तरी त्याचा धक्का आता आपल्याला बसेनासा झाला आहे. विशेष म्हणजे ही ज्याची त्याची खाजगी बाब म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्याइतके आपण निर्ढावलेले आहोत. म्हणूनच शेजारच्या घरात नवऱ्यानं आईवडिलांच्या मदतीनं आपल्या बायकोला पेटवून दिलं तरी आपल्यासारखे शेजारी फक्त बघ्याची भूमिका घेतात. जळून मरणाऱ्या त्या बाईला वाचवणं त्यांना सहज शक्य असतं. कारण प्रत्यक्ष जळून मरण्याआधी तिच्यावर झालेल्या अनेक अत्याचारांचे ते साक्षी असतात. तिला मारहाण होत असताना, तिचा छळ होत असताना त्याची कुणकुण शेजाऱ्यांना नसते असं होऊच शकत नाही. शेजाऱ्यांना सारं काही आधीपासूनच माहीत असतं. पण जिच्यावर अत्याचार होतायत तिला वाचवणं हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे याची शिकवणच त्यांना दिली गेलेली नसते.
ज्या घरात ती फार सुरक्षित आहे असं तिला वाटत असतं, त्या घराच्या चार भिंतीतच प्रथम तिला अत्याचाराला तोंड द्यावं लागतं. घरच्या माणसांच्या मनाविरुद्ध वागण्याचा थोडा जरी तिनं प्रयत्न केला तरी ज्यांच्यावर तिनं फार विश्वास टाकलेला असतो ते तिचे वडील आणि भाऊच तिला मारायला सर्वात आधी पुढे येतात. मुलगी म्हणून मुळातच अनेक निर्बंधांना लहान वयापासून तिला सामोरं जावं लागतं. असेच कपडे घाल, अशीच बस, जोरानं खिदळू नकोस, मुलीच्या जातीला हे शोभत नाही आणि मुलीच्या जातीला ते शोभत नाही.. अशा सूचना तर तिला सदैव केल्या जातातच, पण ऐकलं नाही तर राग, मार, उपाशी ठेवणं, कोंडणं अशाही अनेक शिक्षा तिच्या वाटय़ाला येतात.
आज कुठे मुली असलं काही ऐकून घेतात?.. असा प्रश्न कोणीही करू नये आणि दोन-चार बंडखोर मुलींचं किंवा पाच-दहा समंजस पुरुषपालकांचं उदाहरणही देऊ नये. मुलींना जरबेत ठेवल्याशिवाय कालही पालकांना चैन पडत नव्हतं आणि आजही पडत नाही. विल्सन कॉलेजसारख्या मुंबईतल्या चांगल्या वस्तीतल्या कॉलेजमध्ये शिकवत असताना, ‘आमच्या घरात मुलींनी मोठय़ानं हसलेलं वडिलांना आवडत नाही’ किंवा ‘सिनेमा-नाटकाला जाण्यासाठी वडिलांकडे परवानगी मागताना भीती वाटते,’ असं सांगणाऱ्या मुली मी पाहिलेल्या आहेत. पालकांची अशी दहशत असलेली घरं आजही आजूबाजूला आहेत हे वास्तव आहे.
मुलींच्या साधं मोठय़ानं, मनमोकळं हसण्यावर बंदी घालणारे पालकच पुढे जाऊन परजातीतल्या मुलांवर प्रेम करणाऱ्या आपल्या मुलींची प्रतिष्ठेच्या भंपक कल्पनांपोटी हत्या करतात. आपल्या हक्कांसाठी थोडाही आवाज उठवू न शकणाऱ्या, स्वसंरक्षणाच्या बाबतीत थोडाही आत्मविश्वास नसलेल्या या मुली घराबाहेर वावरतानाही भित्र्या, असहाय असतात. घरापासूनच बिचकत जगायची सवय लागलेल्या या मुलींना म्हणूनच शाळेत बलात्कार करणारा शिक्षक भेटतो, नोकरीच्या ठिकाणी त्यांचा वरिष्ठ त्यांचा विनयभंग करतो, त्या विरोधात दाद मागायला जावं तर नोकरीतून काढून टाकण्याची धमकी या मुलींना मिळते. रस्त्यानं चालत असताना गुंड त्यांची छेड काढू शकतात. पोलिसांत तक्रार करायला जावं तर पोलीसही त्यांच्याशी अर्वाच्य भाषेत बोलत त्यांची अब्रू मातीमोल करून टाकतात. मित्र म्हणून ज्याच्यावर विश्वास टाकलेला असतो, तोच चार-दोन साथीदारांशी संगनमत करून तिला पळवून नेतो आणि सामूहिक बलात्कार करून तिला अर्धमेल्या अवस्थेत कुठंतरी टाकून देतो. कधी नात्यातलेच नालायक पुरुष त्यांच्या शरीराशी मिळेल तेव्हा घसट करतात. पण केविलवाणा विरोध करण्यापलीकडे त्या काही करू शकत नाहीत. त्यांना लहानपणापासूनच दहशतीत ठेवून त्यांच्या पालकांनी त्यांची प्रतिकाराची ताकदच काढून घेतलेली असते.
कायद्यानं न्याय मिळेल ही बाब फार दूरची झाली. तिची वाटणारी माणसंच तिच्यावर केवढा अन्याय करतात! त्यांच्या तिच्याशी असलेल्या नात्यात मायेचा गंध तरी असतो? असते ती फक्त जरब! पोटच्या पोरीबद्दल प्रत्येक बापाला अधिक माया वाटायला हवी. जिच्यावर दहा दिशांनी संकटं येऊ शकतात, अशा या काळजाच्या तुकडय़ासाठी त्यांनी जिवाचा कोट करायला हवा. पण ते तर तिच्या मनात स्वत:बद्दल फक्त दशहत निर्माण करतात. मुलींवर होणाऱ्या अत्याचारांना म्हणूनच सर्वात आधी तिची विश्वासातली माणसं जबाबदार ठरतात.
ओळखीच्याच माणसांकडून मुलींचा घात कसा होत असतो याला नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोनं केलेले सव्‍‌र्हे साक्ष आहेत. दर तासाला देशभरात दोन स्त्रियांवर बलात्कार होत असतो. यात पालक, शिक्षक, बॉस, घरातले नोकर, मित्र, नातेवाईक आणि जनतेचे राखणदार पोलीस अशा भरवशातल्या लोकांचीच संख्या मोठी असते. सेंटर फॉर सोशल रिसर्चनं २०१०-११ मध्ये केलेला सव्‍‌र्हे सांगतो की, देशाच्या राजधानीतल्या बलात्काराच्या अठ्ठावन्न (त्याही फक्त एफ. आय. आर दाखल झालेल्या) केसेसपैकी एक्कावन्न केसेसमध्ये ओळखीच्या पुरुषांकडून बलात्कार झालेले आहेत. त्यात २२ टक्के मुली दहा वर्षांखालच्या आहेत, तर ६६ टक्के मुली २० वर्षांखालच्या आहेत.
असंख्य मुलींना आयुष्यातून उठवणाऱ्या बलात्कारासारख्या घटना, कायद्यातल्या पळवाटा, बलात्काऱ्यांचं मोकळं सुटणं, पैशांसाठी खटले फिरवणं आणि हे सारं थांबायचं असेल तर हवेत शिक्षेत आवश्यक असलेले बदल! .. सगळ्यांनी आता एकत्र येऊन रान उठवायलाच हवं.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो