स्त्री. पु. वगैरे वगैरे : लग्न कशासाठी?
मुखपृष्ठ >> स्त्री. पु. वगैरे वगैरे >> स्त्री. पु. वगैरे वगैरे : लग्न कशासाठी?
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

स्त्री. पु. वगैरे वगैरे : लग्न कशासाठी? Bookmark and Share Print E-mail

alt

महेंद्र कानिटकर , शनिवार , २१  जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
लग्न का करायचं, या प्रश्नाचं उत्तर जसं प्रत्येकाचं वेगळं असू शकतं तसंच लग्नाच्या नात्यातून मला काय हवंय, या प्रश्नाचंही उत्तर वेगवेगळं असू शकतं. आपलं वैवाहिक आयुष्य कसं घालवायचं हे प्रत्येकाच्या हातात असतं, त्यासाठी फक्त गरज असते ती नवरा-बायकोंनी एकमेकांनी संवाद साधण्याची..
कोणतंही लग्न परफेक्ट नसतं, या माझ्या आवडत्या सिद्धांतावर नेहमीच वाद होतो. ‘‘तुमचा सिद्धांत सपशेल चूक आहे,‘‘म्हणत भांडणारेही कमी नसतात. एका गृहस्थांनी तर कमालच केली.’’ ते म्हणाले, तुमच्याकडे येणारी मंडळी काहीतरी समस्या असलेली असतात.

म्हणून तुम्ही आणि या विषयावर लिहिणारे इतर समुपदेशक लिहीत असतात..’’ पुढे तर त्यांनी या विषयावर लिहिणाऱ्या सर्वासाठी एक बॉम्ब टाकला.’’ तुम्हाला माहिती आहे? महात्मा गांधींनी असे म्हटले आहे की जे विपरीत असतं त्याचाच इतिहास लिहिला जातो. जे साधं-सुरळीत असतं त्याची इतिहासात नोंद होत नाही. त्यामुळे तुमचं लेखन इतिहास लिहिणाऱ्या माणसांसाठी उपयोगी आहे. आमचं त्यातून मनोरंजन होते. जणू काही आम्ही टीव्हीवरच्या मालिका बघतो असं वाटतं. एपिसोड संपला की विषय संपला. आम्ही पुन्हा आमच्या चारचौघांप्रमाणं आमच्या रुटीनमध्ये अडकून जातो.’’
त्यांच्या म्हणण्यात तथ्य नाही, असा माझा दावा नाही. माझ्या मनात प्रश्न इतकाच आहे की जे जे चारचौघे करतात तेच सुरळीत, हे आपण मान्य करायचं का? मी चारचौघांसारखं सहजीवन म्हणजे नेमकं कसं असतं बुवा याचा शोध घेतला. आणि यात मला सात महत्त्वाचे मुद्दे सापडले. (अजून असतील त्यांनी यादी वाढवावी किंवा कमी करावी.)
१. सामान्यत: पतिराजांना राजासारखं वागवलं जाते. (अपवादात्मक ठिकाणी हा मान पत्नीला असतो)
२. पत्नीची भूमिका व्यवहारात दुय्यम असते.
३. पत्नीच्या मते आधी मुलं मग नवरा.
४. पतीला काहीही मनाप्रमाणं करायचं स्वातंत्र्य असते. पत्नीला मात्र प्रत्येक गोष्टीची परवानगी लागते.
५.पतीचे आई-वडील हे नेहमीच पत्नीच्या आई- वडिलांपेक्षा महत्त्वाचं.
६. पत्नीची चेष्टा-मस्करी करण्याची तिच्या परोक्ष-अपरोक्ष पतीला आयुष्यभर मुभा.
७. सेक्स ही पुरुषांची मक्तेदारी. पत्नीच्या भावनांचा विचार अंमळ कमीच.
हे सगळं किंवा यातलं बरंच काही घराघरांत असतं आणि त्याला सर्वसाधारण सहजीवन म्हटलं जातं. यातल्या प्रत्येक कलमाला ‘बाबा आदम के जमाने से’ परंपरा आहे. काळ बदलला तरी  मुळामध्ये प्रॉब्लेम आहेत ते सुटलेले नाहीत. किंबहुना हे सारं आपल्या इतकं अंगवळणी पडलं आहे की त्यात काही जाणीवपूर्वक बदल करावा असे वाटणारे थोडे. आणि आम्हाला इतिहास घडवायचा नाही म्हणणारेच जास्त.
आपल्याला समाजमन, परंपरा मोडता येत नसतील पण किमान आपण दोघे प्रयत्न करून सामान्य सहजीवनापेक्षा अधिक चांगलं सहजीवन जगूया, असं आम्हा दोघांसारखं वाटत असेल तर काही अनुभव, काही माझे मांडायला मला आवडेल. इथेही हेच लागू. आपल्या सहजीवनात सगळं काही आलबेल होणार नाही पण गेल्या दिवसापेक्षा आपण आजचा दिवस मागच्या चुका परत न करता अधिक आनंदी आणि समृद्ध सहजीवन अनुभवू शकतो.  
आमच्या कार्यशाळेसाठी आम्ही सात पायऱ्यांचा एक कार्यक्रम केला आहे. त्याच्या प्रेझेंन्टेशनच्या या काही स्लाइडस्.
त्या प्रथम स्लाइड, मग स्पष्टीकरण आणि शेवटी विवेचन अशी मांडणी आहे-
एक : सहजीवनाचे उद्दिष्ट निश्चित हवं
नोट्स : आम्ही लग्न का केलं? याच माणसाशी का केलं. या लग्नातून आपल्या काय साध्य करायचं आहे? केवळ प्रथा म्हणून आम्ही लग्न केलं का? असे प्रश्न जेव्हा आपण स्वत:ला विचारू तेव्हा आपल्या लग्नाचं उद्दिष्ट निश्चित होऊ शकेल.
विवरण : आपल्याकडे धर्मकार्य करण्यासाठी, समाजमान्य कामजीवन आणि वंशवृद्धीसाठी लग्न ही परंपरा आहेच. या सगळ्या गोष्टींसाठी वेगळं काही करावं लागतच नाही. त्या यथा काळ होताच राहतात. अशा वेळी मला आमच्या एका मित्रमत्रिणीचं उदाहरण द्यावंसं वाटतं. ती एका बँकेत काम करते. रंगकर्मी आहे पण तिचा िपड व्यवस्थापनाचा आहे. तिचा नवरा एका शाळेत शिक्षक आहे स्वत: चांगला लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आहे. बाकी सगळ्या बाबतीतही त्यांचं चांगलं जमतं. पण त्या दोघांचं उद्दिष्ट मला वाटतं ते असं आहे. ते दोघे परस्परपूरक आहेत. बघायला गेला तर ती खूप वर्चस्व गाजवणारी वाटते. पण ती मनानं इतकी साधी आहे की त्याच्या पारितोषिकांची ती भागीदार असते आणि तिच्या कार्याचं त्याला कौतुक असते. ते दोघे भरपूर प्रवास करतात, अनेक नाटके पाहतात, सिनेमे एन्जॉय करतात. जगण्यातले सगळे सुंदर अनुभव एकत्र घेतात. एकमेकांच्या सहवासात सबंध जीवन सुंदर करणं, हे त्यांचे उद्दिष्ट आहे. आणि हे असं करणं प्रत्येकाला शक्य आहे.
दोन : जोडीदार : गरज की जरुरी?
नोट्स: जोडीदार ही फक्त शारीरिक आणि व्यावहारिक गरज असेल तर सहजीवन हे सकस  होण्याची शक्यताच संपते. याउलट दोघांनाही एकमेकांची जरूर वाटत असेल तर ते अधिक एकमेकांना सांभाळून घेतात.
विवेचन : माझ्या एका मित्राचे लग्न खूपच उशिरा झाले. तेव्हा तो ४७ वर्षांचा होता आणि त्याची पत्नी ४२ वर्षांची. सुरुवातीला त्यांना मूल होईल असं वाटलं पण काही वैद्यकीय कारणांमुळे ती आई होणं संभवनीय नव्हतं. घरात हे दोघेच. बरं वय वाढल्यामुळे ते दिसण्यात खूप अनुरूप वगरे काही नव्हतं. या त्याच्यापेक्षा ती दिसायला डावीच होती. पण दोघांना एकमेकांच्या भावनिक आधाराची गरज होती. गेली अनेक र्वष ते एकाकी जीवन जगले होते. तो नेहमी म्हणतो ती माझ्या जीवनात आल्यापासून माझं आणि तिचं जीवन बदलून गेलं आहे. आम्ही दोघे एकमेकांच्या आवडीनिवडी सांभाळून घेतो आणि एकमेकांच्या सहवासात राहण्यासाठी वेळ काढत असतो. थोडक्यात दोघांना एकमेकांची जरूर वाटते. एकटय़ाने वेळ काढणं वगरे त्यांना जमत नाही.  
याउलट समीरचं. सकाळी उठतो, नाश्ता करतो. भरभर आवरून कमाल जातो. संध्याकाळी घरी आला की चहा पितो आणि जिमला जातो. घरी आला की रात्री अकरा वाजेपर्यंत टीव्ही. वाटलं तर सेक्स. पण बहुतेक वेळा पाच मिनिटांत घोरायला लागतो. ‘आमचा संवाद चार चार दिवस होत नाही. बोलणं होतं ते व्यवहारापुरतं. या पशाचं काय करायचं वगरे. माझ्या कुठल्याही मागणीला त्याची ना नसते. मी काय कपडे-दागिने आणते, ते त्याच्या दृष्टीने महत्त्वाचं नसतेच मुळी. समारंभाला गेलो तर गेलो. आठवडय़ातून एकदा जेवायला बाहेर जातो. तिथेही फक्त मुलांशी बोलणं. मला अनेकदा वाटतं या माणसाने माझ्याशी लग्न का केलं?’ असं त्याची बायको विचारते.
असे प्रश्न जोडीदाराला पडणं म्हणजे ते लग्न केवळ सामाजिक गरज म्हणून केलेलं असतं, असं मला वाटतं. जर एखाद्या जोडीदाराला धर्म, अर्थ, काम आणि वंशवृद्धी या गरजांपुरतं लग्न करावंसं वाटत असेल तर नातं चांगलं होण्याची शक्यता शून्य. जर दोघांनाही एकमेकांची भावनिक ओढ वाटत असेल, एकमेकांचा भावनिक आधार घ्यावा असं वाटत असेल तर त्या लग्नात एकमेकांबद्दल आस्था वाढू शकते.
तीन : प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात, त्या समजून घ्यायला हव्यात.
नोट्स : प्रत्येक माणसा-माणसाची प्रेम व्यक्त करायची रीत वेगवेगळी असे. अनेकदा पत्नीला वाटतं पती असं काही वागला तरच प्रेम. त्याने गजरा आणावा, दोघांनीच कुठेतरी लांब रोत्रीच जेवायला जावं, त्याने कधी उंची सेंट द्यावा, वाढदिवसाला अनपेक्षित भेट द्यावी वगरे वगरे. पण तो काहीच म्हणत नाही. किंवा यापकी काहीच करीत नाही. याचा तिला त्रास होतो. ती तो बोलूनही दाखवत नाही आणि त्रास करून घेते, आणि स्वत:च्या नशिबाला दूषणं देत बसते.
विवेचन : शर्मिला विराजवर नेहमी वैतागत असे. तिला नेहमीच वाटे की विराजचं तिच्यावर प्रेम नाही. त्याच्या वागण्यात अजिबात रोमान्स नाही. लग्नाला दहा र्वष झाली पण त्याने न एकदाही सरप्राइज भेट दिली नाही, मधुचंद्रानंतर ते कुठे दोघेच ट्रीपला गेले. प्रत्येक ट्रीपला त्याला कुणाची न कुणाची कंपनी हवी असायची. मी विराजला विचारलं, ‘‘तुला शर्मिला आवडत नाही का? असं का वागतोस तिच्याशी?’’
तो म्हणाला, ‘‘कमाल आहे. माझी प्रेम व्यक्त करायची पद्धत वेगळी आहे. ती झोपेतून उठण्यापूर्वी सगळं स्वयंपाकघर आवरून मस्त आल्याचा चहा करून मी तिला बेड टी देतो. तिचा डावा पाय अधूनमधून दुखतो म्हणून रोज मसाज करतो. माझ्या बाईकबरोबर तिची स्कूटर धुऊन-पुसून ठेवतो. तिच्या आई-वडिलांच्या प्रत्येक आजारात रजा घेऊन त्यांना दवाखान्यात नेतो, भेटतो. मुलं ऐकत नसतील तर जरी तिचे विचार मला योग्य वाटले नाहीत तरी मी तिची बाजू घेऊन मुलांना दटावतो. इतकंच काय तिची बँकेची परीक्षा होती तेव्हा दहा दिवस तिला घरात इकडची काडी तिकडे करू दिली नव्हती. माझी एक प्रेमाची व्याख्या आहे. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याची विनाअट काळजी घ्यावी आणि त्याला जमेल तेवढी मदत करावी.
मी म्हटलं, घोटाळा तुमच्या व्याख्येत आहे. तुम्ही दोघेही एकमेकांवर प्रेम करता. पण तिचा दृष्टिकोन वेगळा, तुझा वेगळा. बोलाना या विषयावर. जो प्रश्नच उद्भवलेला नाही, त्याच्याबद्दल तक्रारी कशाला?

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो