ग्रंथविश्व : लोकसंख्याशास्त्र आणि लोकशाही
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

ग्रंथविश्व : लोकसंख्याशास्त्र आणि लोकशाही Bookmark and Share Print E-mail

ज. शं आपटे, शनिवार, २१ जुलै २०१२
डेमोग्रॅफी अँड डेमोक्रसी
एसेज ऑन नॅशनॅलिझम, जेंडर अँड आयडियॉलजी
हिमानी बॅनर्जी, ओरिएंट ब्लॅकस्वॉन, दिल्ली. पृष्ठे २७४, किंमत रु. ५९५/-

लेखिका प्रा. श्रीमती हिमानी बॅनर्जी कॅनडातील ओंटॅरिओमधील यॉर्क विद्यापीठात समाजशास्त्राचे अध्यापन गेली काही वर्षे करीत आहे. ‘राष्ट्रवाद, लिंगभाव आणि विचारसरणी’ ह्य़ासंबंधी लिहिलेले सात लेख ह्य़ा पुस्तकात एकत्र केले आहेत. हे लेख कॅनडा, भारत, अमेरिका, ब्रिटनमधील नियतकालिकांमधून प्रकाशित झाले आहेत. राष्ट्रवाद हा विषय प्रस्तुत पुस्तकात विस्तारपूर्वक चर्चिला गेला आहे. चिकित्सक अभ्यासासाठी राष्ट्रवाद हा महत्त्वाचा विषय आहे. एकूण चार प्रकरणांमध्ये महिलांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासंबंधी विश्लेषण व विवेचन आहे.

सहाव्या प्रकरणात नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर ह्य़ांना अभिप्रेत असलेल्या विकास व राष्ट्रवादसंबंधीचे प्रतिपादन विस्ताराने मांडले आहे. शेवटच्या प्रकरणात ‘समाजशास्त्राची परंपरा व परंपरेचे समाजशास्त्र : आपले ज्ञान व ज्ञाननिर्मिती’ ह्य़ा संबंधी तात्त्विक वैचारिक, असे विवेचन केले आहे. पहिला लेख आहे ‘भारत हिंदू व पुरुष बनविण्याचा सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि समकालीन भारतातील उदयास येत असलेला वांशिक नागरिक’ ह्य़ासंबंधी २०व्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकांत जग राजकीय असंतोष व उलथापालथींनी गाजले होते. साम्राज्यवादी हल्ल्यांनी साम्यवाद व समाजवादाची फाटाफू ट झाली. मोठय़ा प्रमाणात विस्कळीतपणा आला. राष्ट्रीय उदारमतवादी प्रकल्पांचा वा उदारमतवादी लोकशाहीच्या अंताला तोंड द्यावे लागले, असे पहिल्या प्रकरणाच्या सुरुवातीस लेखिकेने मांडले आहे. ह्य़ा प्रकरणात भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना, प्रसार व भारतीय जनता पक्षाचा प्रभाव व सत्तासंपादन ह्य़ाचे चिकित्सक विवेचन केले आहे. संघाचा जातीय हिंसाचार इतिहासामुळे धर्म पाळणारे अनेक हिंदू संघाला पाठिंबा देण्यापासून दूर राहिले. ह्य़ाच प्रकरणात लेखिकेने संघ, भारतीय जनता पक्ष ह्य़ांच्या अल्पकाळच्या (शॉर्ट टर्म) व दूरवरच्या उद्दिष्टांचा विस्ताराने विचार, चिकित्सा केली आहे. मार्क्‍स व ग्रामची ह्य़ांचा नागरी समाज संस्कृतीचे राजकियीकरण ह्य़ाविषयी विवेचन केले आहे. बाबरी मशिदीचा पाडाव, २००२ मधील गुजरात राज्यातील भीषण नरसंहार व त्यामागील हेतू, उद्दिष्टे ह्य़ांची परखडपणे विस्ताराने चिकित्सा केली आहे. पुरुषसत्ताक कुटुंबाची विचारसरणी हिंदुत्ववादी, नागरी समाजाच्या संघटनांच्या, संस्थांच्या उभारणीसाठी एक नमुना (मॉडेल) पुरविते, उभा करते. ह्य़ा प्रकरणाच्या शेवटी टिपा, संदर्भ दिल्यामुळे पहिले प्रकरण समजून घेण्यास साहाय्य होते. ह्य़ामध्ये भारतीय व विदेशी लेखक आहेत.
नरसंहारातील स्त्रियांविरुद्ध झालेला हिंसाचार अथवा वांशिक सफाई (एथनिक क्लीनझिंग) ह्य़ासंबंधी विचार मांडताना लेखिकेने प्रामुख्याने गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या नरसंहाराची माहिती तपशिलात मांडली आहे. ह्य़ा नरसंहाराचा रोख होता गुजरातमधील मुस्लिम. राज्यांतील २४ जिल्ह्य़ांपैकी १६ जिल्ह्य़ांना त्याचा मोठय़ा प्रमाणावर फटका बसला. मृतांची संख्या ८५० ते १००० पर्यंत. अनधिकृत अंदाज आहे २०००. घरे, दुकाने, हातगाडय़ांची नासधूस, नुकसान तर मोठय़ा प्रमाणावर झाले. लेखिकेने ह्य़ा प्रकरणात लायबेरिया, खांडो, काँगो, बोस्निया येथील मानवताविरोधी हिंसक घटनांचा उल्लेख केला आहे. नरसंहार हा जगभर पोचला होता आणि आहे, हे लेखिकेस ह्य़ा प्रकरणात सिद्ध करायचे आहे. निरनिराळ्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वातावरणात नरसंहार / वंशसंहार वा वांशिक सफाई विशेष वैचारिक वा लाक्षणिक रचना वा आधाराचा स्वीकार करते हे लेखिकेस लक्षात आणून द्यावयाचे होते. लोकसंख्याशास्त्र व वंशवादामुळे राज्य स्थापनेस आधार मिळतो, असे उजव्या हिंदू गटांना वा हिंदू फॅसिस्टांना वाटत असते. सांस्कृतिक राष्ट्रवाद व स्त्रिया यांचा विचार राष्ट्राच्या संदर्भात तिसऱ्या प्रकरणात विस्ताराने मांडला आहे. पहिल्या व तिसऱ्या जगातील महिलांनी संपूर्ण नागरिकत्व मिळविलेले नाही हे लक्षात ठेवावयास हवे, असे लेखिका प्रकरणात शेवटी आवर्जून सांगते. त्यांना सर्व प्रकारच्या पुरुषसत्ताकाविरुद्ध लढायला हवे. पुढारीपणाचे प्रकल्प, स्त्रियांच्या प्रश्नासंबंधी विचार ह्य़ासंबंधी ५० पानांमध्ये विस्तारपूर्वक विवेचन, माहिती, विश्लेषण चौथ्या प्रकरणात लेखिकेने केले आहे. निर्वसाहतीकरणाच्या प्रश्नावरून प्रस्तुत प्रकरणाचा प्रारंभ झाला. राष्ट्रवादाचे अनुदार स्वरूप म्हणजे सांस्कृतिक राष्ट्रवाद हे ह्य़ा प्रकरणात लेखिकेने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदू वा अन्य कोणत्याही सांस्कृतिक राष्ट्रवादात स्त्रियांसंबंधी प्रभुत्व भावना ही पार्थ चॅतर्जी व दीपेश चक्रवर्ती ह्य़ांनी आपल्या लिखाणांतून टीकाटिप्पणीसह केवळ विशद केली नसून त्या भावनेस उपाययोजनेचा दर्जा दिला आहे. पुरुषसत्ता, हुंडापद्धत, बालिका हत्या ह्य़ाविरुद्ध आणि मुस्लिम महिला वैयक्तिक कायदा ह्य़ा स्त्रियांचे, स्त्रियांसाठी चालणारे विद्यमान संघर्ष ह्य़ामधून चिकित्सक आधुनिकतेची वृत्ती दिसून येते. हे ५० पानी प्रकरण मुळातूनच वाचावयास हवे. स्त्रिया व राष्ट्रवाद, विकास व राष्ट्रवाद ह्य़ासंबंधी रवींद्रनाथ टागोर यांच्या कादंबऱ्यांमधून झालेले विवेचन ह्य़ाविषयी लेखिकेने दोन प्रकरणांत विचार मांडले आहेत. तात्त्विक व राजकीय विचाराच्या पातळीवरील सर्व प्रकारचा मध्यमवर्गीय, राष्ट्रवादात खोलवर रुजलेला पुरुषसत्ताक दृष्टिकोन सामाजिक-राजकीय बाबतीत दिसून येतो. ह्य़ा दृष्टिकोनानुसार स्त्रिया ह्य़ा राष्ट्रमाता व वंशजननी म्हणून कल्पिल्या गेल्या आहेत.
विकासाचा पर्यायी दृष्टिकोन लेखिकेने ह्य़ा दोन प्रकरणांत विशद केला आहे. हा दृष्टिकोन विकासाची मानवी बाजू मांडणारा आहे, तांत्रिक-आर्थिक फायदा, नफा वाढविणाऱ्या दृष्टिकोनाच्या विरोधी आहे. रवींद्रनाथ टागोर यांचा दृष्टिकोन व छोटे व्यावहारिक प्रयोग ह्य़ांचा संयोग मार्क्‍सचा दृष्टिकोन, विश्लेषण व भांडवलशाहीविरोधी दुरीकरण यांच्याशी व्हायला हवा. रवींद्रनाथ टागोर यांनी सतत लक्षात ठेवले होते, की भारताचे वसाहतीकरण होत आहे व अशा वसाहतीकरणामुळे विकलता, विरूपता, विद्रूपता येत आहे. शेवटच्या प्रकरणाचे उपशीर्षक आहे ‘आपल्या ज्ञानाच्या मर्यादा आणि निर्मिलेले ज्ञान.’ प्रकरणाच्या प्रारंभी डोरोथी स्मिथ यांचे एक अवतरण दिले आहे. ‘‘ज्ञात करून घेणे हेच ज्ञाता व ज्ञान यामधील एक नाते आहे.. ज्ञात करून घेणे हे नेहमीच एका मर्यादेत समजून घेणे असते.’’ समाजशास्त्राची परंपरा आणि परंपरेचे समाजशास्त्र या शेवटच्या प्रकरणाची चर्चा, विवेचन डोरोथी स्मिथ ह्य़ांच्या अवतरणाच्या संदर्भात लेखिकेने केली आहे. परंपरेचे समाजशास्त्र ही वैचारिक शिस्त आहे.
वसाहतिक संदर्भ व वसाहतिक आशयाची.
 प्रस्तुत पुस्तक प्रभुत्वाच्या विविध बाजू, राष्ट्रवाद, नागरिकत्व व लोकशाहीचे निकष, ह्य़ांचा प्रामुख्याने विवेचन करते, मार्क्‍सवाद व वसाहतिक स्त्रीवाद ह्य़ांच्या दृष्टिकोनाच्या संदर्भात आधुनिक राष्ट्रवादाच्या गुंतागुंतीचे विश्लेषण करते. प्रस्तुत पुस्तक राष्ट्रवाद, मूलतत्त्ववादी राजकारण, उजवी विचारसरणींच्या अभ्यासकांनी वाचावे इतके ते महत्त्वाचे आहे.