चित्ररंग : हे सारे पत्ते हुकुमाचे!
मुखपृष्ठ >> चित्ररंग >> चित्ररंग : हे सारे पत्ते हुकुमाचे!
 

लाइफ स्टाईल-मनोरंजन-कला

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

चित्ररंग : हे सारे पत्ते हुकुमाचे! Bookmark and Share Print E-mail

सुनील नांदगावकर - रविवार, २२ जुलै २०१२

नाटय़कृती, कादंबरी यावर आधारित चित्रपट मराठीमध्ये खूप आले आहेत. त्यानंतर मूळ कलाकृती आणि त्याचा चित्रपट यामध्ये बरीच तफावत आहे, किंवा काहीच साम्य नाही, मूळ कलाकृतीमधील गाजलेल्या, लोकांना आवडलेल्या व्यक्तिरेखा पूर्णत: बदलल्या आहेत असे मत व्यक्त करण्यात येते. परंतु, मूळ कलाकृती मग ते नाटक असो की कादंबरी यापेक्षा चित्रपट ही स्वतंत्र कलाकृती आहे. एखाद्या कलाकृतीचे माध्यमांतर करताना लेखक-दिग्दर्शक स्वातंत्र्य घेतात, त्यांनी घ्यायलाही हवे अशीही चर्चा केली जाते. परंतु, मूळ कलाकृतीचा गाभ्याला, ढाच्याला मात्र कुठेही धक्का लावू नये अशी अपेक्षा केली जाते. ‘बदाम राणी गुलाम चोर’ या चित्रपटात दिग्दर्शकाने मूळ कलाकृतीमधील आशयाला जराही धक्का न लावता लेखकाला जे सांगायचेय तो आशय चित्रपटकृतीद्वारे पोहोचविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
प्रत्येक व्यक्तीरेखेचे खरे नाव नसलेला हा चित्रपट आहे. नाटकाप्रमाणेच यातील प्रमुख व्यक्तिरेखांना त्यांच्या स्वभाव, पिंडप्रकृती यानुसार नावे ठेवण्यात आली आहेत. चाकू (उपेंद्र लिमये), पुस्तक (पुष्कर श्रोत्री), पेन्सिल (मुक्ता बर्वे) आणि माकड (आनंद इंगळे) या चार प्रमुख व्यक्तिरेखा आहेत. यापैकी चाकू, पुस्तक, माकड हे तिघे जिवलग मित्र आहेत, एकत्र राहणारे. काहीही झाले, कोणतीही परिस्थिती ओढवली तरी वेगळे होणार नाही, मैत्री तुटणार नाही अशी यांची धारणा आहे. आपल्या घराच्या ‘अनब्रेकेबल्स’ या नावावरून त्यांना हेच सुचवायचे आहे. या तिघांच्या मैत्रीमध्ये चौथ्या व्यक्तिरेखेचा प्रवेश होतो आणि तिघांच्याही मनात चलबिचल होते, वागण्यात बदल व्हायला लागतो. चौथी व्यक्तिरेखा अर्थातच पेन्सिल ही आहे. पेन्सिल ही खरे तर चाकूची मैत्रीण म्हणून ‘अनब्रेकेबल्स’मध्ये येते. तिथे येईपर्यंत पेन्सिलचे खरे नाव घेऊनच ती जगते. परंतु, इथे आल्यानंतर तिची पुस्तक व माकड यांच्याशी ओळख होते आणि स्वभावानुसार नावे पाहून तीसुद्धा आपले नाव पेन्सिल असे घेते. आपण हे नाव का धारण केले हे सांगताना ती स्वच्छपणे सांगते की आधी काहीही लिहिले तरी ते खोडता येते. म्हणजेच आधी बोललेल्या कशाचीही जबाबदारी मी भविष्यात घेत नाही म्हणून मी पेन्सिल असे ती स्पष्ट करते. पेन्सिलला पाहिल्यावर चाकूसोबत पुस्तकही तिच्या प्रेमात पडतो. त्यामुळे अर्थातच चाकू आणि पुस्तक यांच्यात वितुष्ट येते.
माकड या दोघांच्यात समन्वय साधण्याच्या नावाखाली वितुष्ट कसे वाढेल, स्पर्धा कशी निर्माण होईल याची काळजी घेण्यासाठी क्लृप्त्या लढवितो. मग शेवटी पेन्सिल कुणाशी लग्न करते, चाकू-पुस्तक यांच्यातील मैत्री टिकते की ते एकमेकांचे दुश्मन बनतात, या सगळ्यामध्ये माकड काय करतो, चौघेही एकत्र राहतात का यावर हा सगळा चित्रपट आहे.
आता चाकू-पुस्तक यांच्यात मुळात मैत्री होऊ शकते का, पेन्सिल इतकी लवचिकता माकड-पुस्तक-चाकू स्वत:मध्ये आणू शकतात का हे प्रश्न प्रेक्षकाच्या मनात निर्माण होत राहतात. कारण ही फक्त व्यक्तींची नावे नाहीत. तर त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी स्वत:च धारण केलेली नावे आहेत आणि मूळ वस्तू डोळ्यासमोर आल्या तर प्रेक्षकाच्या सहजपणे लक्षात येईल की अशा चार वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती खूप काळ एकत्र राहणे कठीण असते.  
वस्तुत: मुलीला पटविण्यासाठी दोन तरुणांनी केलेले प्रयत्न यावर सरळसोट चित्रपट आहे असे वाटते. परंतु, त्याकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर चित्रपटामध्ये सुरू असलेली दुसरी गोष्ट खूप महत्त्वाची आहे, सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करण्याचा अप्रतिम प्रयत्न लेखकाने केला आहे.
पेन्सिलशीच आपलेच लग्न झाले पाहिजे असे चाकू आणि पुस्तक यांना वाटत असते. त्यामुळे त्यांच्या मैत्रीच्या मनोभूमिका एकदम बदलून जातात. त्याचप्रमाणे आजच्या राजकारणातही एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले नेते सत्तेत येण्यासाठी एकत्र येतात, जनतेसमोर मैत्री असल्याचे दाखवितात. महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कोणीही कोणत्याही थराला जाऊ शकतो असेही लेखक सुचवितो. रूढार्थाने मनोरंजन करणारा हा चित्रपट नक्कीच नाही. मनोरंजन करता करता विचार मांडण्याचा आणि ते प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न लेखक-दिग्दर्शकाने चित्रपटातून केला आहे.
चित्रपटात मुद्दामहून ओढूनताणून काहीही घुसविण्याचा प्रयत्न न करण्याचे चित्रपट बनविण्यापूर्वीच दिग्दर्शकाने ठरविलेले दिसते. त्यामुळे प्रमुख व्यक्तीरेखा कामधंदा काय करतात, कशा जगतात, त्यांच्या इच्छा-आकांक्षा काय आहेत, त्यांचे स्वभाव कसे आहेत हे सगळे फक्त क्लोजअप्समधून दाखविले आहे. कोणतीही व्यक्तिरेखा ‘लार्जर दॅन लाईफ’ नाही हेही कॅमेरा सुचवितो. क्लोअप्सद्वारे त्या त्या व्यक्तिरेखांच्या स्वभावातील बारकावे, चेहऱ्यावरच्या भावांमधून मनात काय चालले असेल याचा अंदाज प्रेक्षकाला येऊ लागतो. तरीही पेन्सिल शेवटी कायमची कुणाबरोबर राहणार या प्रश्नाची उकल चित्रपट पूर्ण पाहिल्यानंतरच होऊ शकते, किंबहुना ते या चित्रपटाचे रहस्य आहे. सर्व कलावंत यापूर्वीच त्यांच्या अभिनयासाठी गाजलेले आहेत. यातही या सर्वाची कामे चोख झाली आहेत.
पडद्यावर दिसणाऱ्या गोष्टीपेक्षा चित्रपटात सांगितलेली छुपी गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. ती प्रेक्षकाला समजली तर चित्रपटाचा हेतू सफल झाला असे म्हणता येईल. पटकथा-संवादाबरहुकूम चित्रीकरण करण्यावर दिग्दर्शकाने भर दिला आहे.
काही वेळा हे पडद्यावरचे नाटक आहे असे वाटते. पण लेखकाने सांगितलेल्या गोष्टी नेमकेपणाने पोहोचविणे यावरच दिग्दर्शकाचा प्रमुख भर असल्यामुळे ते अपरिहार्य ठरते.
आपण अनेकजण मनातल्या मनात समुद्रकिनाऱ्यावरच्या बंगल्यात राहायला जातो, लोकलमध्ये लोंबकळत असलो तरी कधीतरी कल्पनेच्या विश्वात मर्सिडीजमधून प्रवास करतो. कल्पनाशक्तीद्वारे दुसऱ्याच्या आयुष्यात काय चालले आहे हे आपण मनातल्या मनात ठरवू शकतो याचा वापर दिग्दर्शकाने अतिशय चपखलपणे केला आहे, ती गंमत पडद्यावर पाहण्यासारखी नक्कीच आहे.
अजित भुरे प्रस्तुत बदाम राणी गुलाम चोर
निर्माता - शेखर कुलकर्णी. दिग्दर्शक - सतीश राजवाडे, कथा-पटकथा-संवाद - विवेक बेळे, छायालेखक - सुरेश देशमाने, कलावंत - आनंद इंगळे, उपेंद्र लिमये, पुष्कर श्रोत्री, मुक्ता बर्वे, विनय आपटे, दीपक करंजीकर. 

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो