करिअरिस्ट मी : 'यशो' गाथा
मुखपृष्ठ >> करिअरिस्ट मी >> करिअरिस्ट मी : 'यशो' गाथा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

करिअरिस्ट मी : 'यशो' गाथा Bookmark and Share Print E-mail

 

alt

संपदा वागळे , शनिवार , २८ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
दंतवैद्यकी करीत असताना स्वत:मधल्या पाककलेचं उच्च श्रेणीतल्या व्यवसायात रूपांतर करणाऱ्या, स्वत:तल्या अभिनयकलेला मॉडेलिंगचं रूप देणाऱ्या चतुरस्र डॉ. यशोधरा पेंडसे यांची ही ‘यशो’गाथा..
एक मराठमोळी डॉक्टर, आपली प्रॅक्टिस सांभाळून चक्क केटरिंगचा व्यवसाय करते आणि तोही या श्रेणीतला की, बिर्ला, अंबानी, जिंदाल आदी उद्योगपतींच्या घरून तिच्या पदार्थाना मागणी असते, हे ऐकल्यावर तिच्याविषयी प्रचंड कुतूहल वाटलं.

त्याच तिरमिरीत ‘ब्रिज केनडी’ या उच्चभ्रू वसाहतीतील तिच्या दवाखान्यात जाऊन थडकले. तिथल्या हाय-फाय पेशन्ट्सची गर्दी ओसरल्यावर (अर्थात बाय अपॉइन्टमेन्ट ओन्ली) आमच्या गप्पा सुरू झाल्या.
डॉक्टरकी आणि केटरिंग हे दोन टोकाचे व्यवसाय तितक्याच समर्थपणे पेलणाऱ्या या जिगरबाज स्त्रीचं नाव यशोधरा धनंजय पेंडसे ऊर्फ यशो. ही मूळची कोल्हापूरची. आई संगीत विषय घेऊन एम.ए. झालेले, वडील यशस्वी वकील, आजोबा (आईचे वडील) कोल्हापुरातले पहिले एम.डी., एक पणजोबा बॅरिस्टर केशवराव देशपांडे हे गांधीजींचे अनुयायी. त्यांनीही देशासाठी आपल्या वकिलीवर पाणी सोडलं होतं तर दुसरे पणजोबा वामनराव पाटकर बडोदा संस्थानचे सरन्यायाधीश.. ही गाडी अशीच पुढे-पुढे (की मागे-मागे) जात राहिली.
मात्र यशोच्या रक्तातील पाककौशल्याचे जीन्स, ही तिला आजीकडून (वडिलांची आई) मिळालेली देणगी. मोदक, पुरणपोळ्या.. यांसारखे आव्हानात्मक पदार्थही ती दहाव्या-अकराव्या वर्षांपासूनच करू लगली. पुरणपोळ्याही कशा तर ओठांनी तोडाव्यात अशा. तिची आईही सासूच्या हाताखाली शिकून या विद्येचे क्लास घेण्याइतकी तरबेज झाली. घरात असा सुगरणींचा ताफा असल्यावर यशोचे वडील व दोन्ही भाऊ खवय्ये झाले नसते तरच नवल. तिच्या लहानपणी म्हणजे साधारण ४५ वर्षांपूर्वी त्यांच्या घरी रात्रीच्या जेवणात फ्रेंच क्रीश (द४्रूँी), इटालियन पास्ता, सूप, डेझर्ट.. असा थाट असे. दुपारी मात्र कांदा-खोबऱ्याचं वाटण लावलेलं टिपिकल सारस्वती जेवण. (यशो माहेरची सारस्वत, यशोधरा सबनीस.) त्या काळीही त्यांच्या घरी ‘लाइफ’, ‘वुमन अ‍ॅण्ड होम’, ‘गुड हाऊसकीपिंग’ अशी पाककौशल्याला वाहिलेली विदेशी मासिकं येत. तिचे वडील काही गोष्टींत आग्रही होते आणि त्यासंबंधीची आपली ठाम मते ते वारंवार बोलून दाखवीत. उदा. यशोला ते नेहमी सांगत, ‘भले तू लग्न कोटय़धीशाशी कर, पण तिथल्या नोकर माणसांकडून उत्तम जेवण बनवून घेण्यासाठी तुला ते पहिलं करता यायला हवं.’ यशोच्या केटरिंगच्या व्यवसायाचं बीज असं तिच्या लहानपणीच्या सुग्रास वातावरणात पेरलं गेलं.
तरीही शाळा-कॉलेजमध्ये शिकत असताना मेडिसिन हेच करिअर तिच्या मनात पक्कं होतं; परंतु मेडिकलची अ‍ॅडमिशन अवघ्या एका मार्काने हुकल्यावर वैफल्यग्रस्त होऊन या मुलीने चक्क एक वर्ष बॅडमिंटन खेळण्यात घालवलं. घालवलं का म्हणायचं? कारण त्यातही तिने एवढं नैपुण्य प्राप्त केलं की, महाराष्ट्राच्या टीममध्ये तिची निवड झाली. पण नंतर वडिलांनी जागं केल्यावर तिने दंतवैद्यक शाखेसाठी अर्ज भरला. मग मुंबईच्या गव्हर्न्मेंन्ट डेन्टल कॉलेजमध्ये पाच वर्षांचं शिक्षण, ८२ साली डिग्री मिळाल्यावर लगेचच म्हणजे ८३ मध्ये शुभमंगल आणि ८५ पासून दंतवैद्यकीच्या व्यवसायाचा शुभारंभ असा काळ सरकला. तेव्हापासून गेली २७ वर्षे आपला हा व्यवसाय एक व्रत मानून तिने अत्यंत निष्ठेने जपलाय. म्हणूनच आज अनेक कुटुंबांतील दुसऱ्या पिढीनेही आपल्या दातांची जबाबदारी तिच्यावर सोपवलीय.
दंतवैद्यकीत जम बसला तरी पाककलेची आवड यशोला स्वस्थ बसू देत नव्हती. सकाळी साडे नऊ ते दुपारी १ आणि संध्याकाळी ५ ते साडेसात या दवाखान्याच्या वेळांमधली दुपार तिच्या हाताशी होती. यशोचे प्रयोग सुरू झाले. तिच्या हाताची चव, तिचा उरक आणि पदार्थाची विविधता यांची कीर्ती पसरू लागली आणि ऑर्डर देण्या-घेण्यासाठी तिच्या घराबाहेर गाडय़ा थांबायला लागल्या. या गोष्टीलाही आता २० वर्षे उलटून गेली.
बिर्ला, अंबानी यशोला कसली कसली ऑर्डर देतात, हा माझ्या जिभेच्या टोकावरचा प्रश्न मी एकदाचा विचारून टाकला आणि त्यानंतर चॉकलेट मूस, अ‍ॅस्पारॅगस मूस, डबल चॉकलेट गनाश केक.. अशी नावं ऐकताना माझा बर्फ होत गेला. अनिल अंबानींना म्हणे यशोच्या हातचं चॉकलेट मूस हे डेझर्ट अत्यंत आवडतं. त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीच्या ऑर्डरमध्ये हा पदार्थ असतोच असतो. मंगेशकरांची तिसरी पिढीही यशोचे स्टार्टर्स व डिप्सच्या प्रेमात आहे. रचना खडीकर-शहा व बैजनाथ हृदयनाथ मंगेशकर यांच्या मध्यमातून ती आशाताई व लतादीदींपर्यंत पोहोचलीय. लतादीदींनी फोनवरून दिलेली जेवणाची ऑर्डर आणि वेगवेगळ्या रेसिपीजवर आशाताईंशी मारलेल्या पोटभर गप्पा हे तिने मनाच्या कुपीत जपून ठेवलेले अविस्मरणीय क्षण!
यशोचं मेनूकार्ड मनातल्या मनात वाचतानाही मला धाप लागली. त्यातील क्रेप्स (स्टफ) इन पॅपरिका सॉस, मेक्सिकन सेव्हन लेअर्स डीश विथ नॅचो चिप्स (Mexican seven layers dish with Nacho Chips), बर्मीज खौसुये (Burmese Khowsuey),  ग्रीक सॅलेड विथ फेटा चीज या तिच्या काही सिग्नेचर डिशेस. मी हे क्रेप्स करण्याची बेसिक कृती धीर करून विचारली खरी, पण ऐकत असतानाच ती डिश करून बघण्याचा विचार मी मनातून काढून टाकला होता. पदार्थाचं साहित्य आणि कृती ऐकताना मला सगळ्यात महत्त्वाची वाटलेली (खरं तर समजलेली) गोष्ट म्हणजे ती हे सॉसेस म्हणजे पॅपरिका सॉस, बर्गन्डी सॉस इ. एकदम बनवून डीप फ्रीजरमध्ये टाकत नाही तर ऑर्डरप्रमाणे त्या त्या दिवशी ताजे ताजे बनविते. त्याने चवीत फरक पडतोच. साधं आपल्या आलं-लसूण-मिरचीच्या गोळ्याचंच उदाहरण घ्या ना! ही पेस्ट फ्रीजमधली वापरण्याऐवजी आयत्या वेळी नुसती कुटून जरी टाकली तरी चव पॉइन्ट फायने का होईना वर सरकतेच ना!
आणखी एक मला स्तब्ध करणारा मुद्दा म्हणजे पाचजणांपासून १०० माणसांपर्यंतच्या ऑर्डरचा स्वयंपाक यशो स्वत:च्या ओटय़ावर करते. यासाठी सासू-सासऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्याचा तिने आवर्जून उल्लेख केला. अर्थात चिरणं, कापणं, मागचं आवरणं अशा मदतीसाठी तिच्याकडे दोन बायका आहेत (त्याही गेली १०-१२ वर्षे टिकवलेल्या), पण शेवटचा हात यशोचा. या सहा हातांबरोबर आणखी दोन हातही अत्यंत आवडीने व सफाईने काम निपटत असतात. त्या आधारवडाचं नाव धनंजय पेंडसे.
केटरिंगमध्ये पत्नीचा जम बसताना पाहून कोणताही स्वाभिमान न बाळगता स्वत:चा मार्ग बदलून तिला साथ देऊन एकत्रितपणे व्यवसाय फुलवणाऱ्या धनंजयांना मानायलाच हवं. सुरुवातीला शिकाऊ उमेदवार असणाऱ्या धनंजयांनी आता १०-१२ पदार्थावर स्वत:ची मोहोर उमटवली आहे. मुख्य म्हणजे डेकोरेशन, पॅकिंग तसंच घरातला स्टॉक तपासून त्यानुसार सामान भरणं ही कामं त्यांनी स्वत:कडे घेतल्यामुळे यशोचा भार खूपच कमी झालाय. हा चार जणांचा चमू चायनीज, फ्रेंच, इटालियन, बर्नीज, थाई, कॉन्टिनेन्टल, लेबनिज आणि अर्थातच भारतीय (यात अळूचं फतफतं आणि वालाचं बिरडं पण आलं) जेवण बनविण्यात वाकबगार आहे. बरं या रेसिपी शिकण्यासाठी तिने कुठलाही क्लास लावला नाही. ग्रंथ हेच तिचे गुरू. तिच्यापाशी पाककलेच्या दीडदोनशे पुस्तकांचा खजिना आहे. त्याचबरोबर थोरामोठय़ांकडे जेवण पाठविण्यासाठी तिने उत्तमोत्तम कटलरीदेखील जमविली आहे (उघड आहे- अंबानी, सिंघानिया यांच्या घरी थोडंच चिनीमातीच्या भांडय़ांतून जेवण पाठवणार?).
या व्यवसायात कसोटीचे क्षण अनेक. त्यातूनच धडे मिळत जातात. एकदा सकाळी दवाखान्यात पेशन्ट तपासत असताना एक ऑर्डर आली. (अशा वेळी ती फक्त नंबर टिपून घेते आणि मग सावकाश बोलते.) त्याच दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता चॉकलेट मूस केक हवा होता. नंतर पुढच्या पेशन्ट्सच्या नादात यशो ही गोष्ट पार विसरली आणि ५ वाजता फोन आला, ‘केक न्यायला ड्रायव्हरला पाठवू का?’ अक्षरश: आणीबाणीची वेळ. यशोने विनंती करून फक्त एक तासाची मुदत मागून घेतली आणि पती-पत्नींनी युद्धपातळीवर हालचाली करून काम फत्ते केलं. त्या दिवसापासून चॉकलेट मूस केक ही धनंजयांची खासियत झालीय.
एकदा तर एका अतिमहत्त्वाच्या व्यक्तीची फर्माईशी ऑर्डर तिने खूप मेहनत घेऊन बनविली आणि त्या दोन तयार डिशेश दोन हातात घेऊन किचनच्या बाहेर येत असताना अचानक तिचा पाय घसरला. पण ‘आधी लगीन कोंढाण्याचं’ या न्यायाने तिने हातातल्या वस्तूंना जराही धक्का लागू दिला नाही. या प्रयत्नात तिच्या गुढघ्याची वाटी मात्र तुटली. तोसुद्धा साधीसुधी क्रॅक नाही तर एक घाव आणि पाच तुकडे. परिणामी तिला मोठय़ा ऑपरेशनला सामोरं जावं लागलं. पण स्वस्थ बसणं यशोच्या रक्तातच नाही. या गोष्टीला जेमतेम १५ दिवस होतायत न होतायत तोच बाईसाहेबांचे दोन्ही व्यवसाय पूर्ववत सुरू!
व्यवसायासाठी आवश्यक अशी रत्नपारखी नजर यशोकडे उपजतच आहे. त्यामुळे स्वयंपाकासाठी लागणारा उत्तम दर्जाचा कच्चा माल जगाच्या पाठीवर कुठे मिळतो याची नोंद तिच्या मेंदूच्या संगणकात पक्की आहे. ती म्हणाली, ‘टर्कीचं मसाला मार्केट ही माझी फिरण्याची अत्यंत आवडीची जागा. तिथले वेगवेगळ्या मसाल्याचे, केशराचे, कुसकूसचे (तिथला भात), जेवणात घालायच्या फुलांचे ढीग पाहताना आणि तो गंध भरून घेताना वेड लागायचंच बाकी असतं.’ हे सांगत असतानाही ‘जणू ती आत्ताच त्या बाजारातून हिंडतेय’ असे भाव तिच्या चेहऱ्यावर होते.
बोलता बोलता जेव्हा मला यशोच्या मॉडेलिंग या तिसऱ्या करिअरविषयी कळलं. तिच्या या वेगळ्या वाटेची सुरुवात झाली ती निव्वळ एका योगायोगानं. १९७९ मध्ये तिच्या एका मैत्रिणीने ‘नेव्ही क्वीन कॉन्टेस्ट’साठी हिचा फॉर्म परस्पर भरून टाकला आणि केवळ एक वेगळा अनुभव घ्यावा म्हणून स्पर्धेला गेलेली यशो डोक्यावर मुकुट चढवूनच परतली. या यशाचा पदर धरून मॉडेलिंगच्या अनेक ऑफर चालत आल्या. त्यापैकी विमल साडी, झंडू बाम, सर्फ.. अशा एक-दोन नव्हे तर तब्बल २५ उत्पादनांच्या जाहिरातींत तिचा चेहरा झळकला. याबरोबर ‘इव्हज वीकली’, ‘फेमिना’ या मासिकांच्या मुखपृष्ठांवर तिला स्थान मिळालं. ‘फेमिना’ने तर ‘ब्युटी विथ ब्रेन’ असं घोषवाक्य देऊन तिला गौरवलं. पुढे १९८९ मध्ये एअर इंडियाने भारतातील विविध प्रांतांच्या नववधूंच्या चित्रांचे एक कॅलेंडर काढलं होतं. यात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याचा मान यशोला मिळाला. अशा तऱ्हेने सलग १० वर्षे प्रकाशझोतात राहिल्यानंतर घर व दंतवैद्यकीकडे जास्त लक्ष देण्यासाठी तिने या क्षेत्रात आहे तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला. परंतु आज पन्नाशीच्या तळ्यात-मळ्यात असतानाही तिच्या चेहऱ्यावरील ग्लॅमरच्या खुणा सहजी नजरेत भरतात.
आज यशोची दोन्ही करियर्स पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. ‘चवीनं खाणार त्याला यशो देणार’ अशी प्रसिद्धी हे तिचं स्वकष्टार्जित संचित आहे. तिचे पाठचे दोन भाऊही तिच्या पावलांवर पाऊल टाकीत मार्गक्रमण करीत आहेत. मधला डॉक्टर आहे, तर धाकटय़ाने कोल्हापुरात अस्सल कोल्हापुरी जेवणासाठी हॉटेल काढलंय. तिचा मोठा मुलगा भारतातील पहिला आणि एकमेव व्यावसायिक रग्बी खेळाडू आहे, तर धाकटा बारावीला आहे आणि केटरिंगला जाण्याच्या प्रतीक्षेत आहे.
असं म्हणतात की, ‘कोणतीही गोष्ट करताना त्यात इतर साहित्याबरोबर छटाकभर मन घातलं की ‘दाद’ मिळतेच मिळते.’ यशोची यशोगाथा ऐकताना वाटलं, ‘तिच्या यशाचं रहस्य हेच तर नसेल?’

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो