स्त्री समर्थ : फिनिक्स भरारी
मुखपृष्ठ >> स्त्रीसमर्थ >> स्त्री समर्थ : फिनिक्स भरारी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

स्त्री समर्थ : फिनिक्स भरारी Bookmark and Share Print E-mail

alt

शची मराठे , शनिवार , २८ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कमानी टय़ुब्ज लि.च्या अध्यक्ष कल्पना सरोज. अकोल्यातील रेपाट या छोटय़ाशा गावातील जेमतेम नववी पास झालेली मुलगी ते कमानी टय़ुब्ज लिमिटेड या कंपनीचं अध्यक्षपद हा प्रवास थक्ककरून सोडणारा आहे. या प्रवासातून घडते त्यांच्यातील समर्थ स्त्रीचे दर्शन..
‘क मानी टय़ुब्ज लिमिटेड ही कंपनी. ११६ कोटी रुपयांचं कर्ज असणारी, कंपनी दोन युनियन्सच्या वादात अडकली होती. सगळं निराशाजनक चित्र होतं. कोणे एके काळी १०० टक्केबोनस देणारी कंपनी, पण आज त्याच कंपनीच्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. असं असूनदेखील फक्त कामगारांच्या हितासाठी म्हणून मी यात उडी घेतली. तो एक भावनिक निर्णय होता. मार्केटिंग, तंत्रज्ञ लोकांची टीम तयार केली. कर्ज कसं फेडणार, याचा आराखडा तयार केला.  रोज १८-१८ तास काम करायचो आम्ही. खूप मोठी जबाबदारी होती. नाही जमलं तर असा विचारच करायचा नाही, असं ठरवलं होतं..ज्या कामगारांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांचे चेहरे डोळ्यांसमोर ठेवून काम केलं. अखेर आमच्या प्रयत्नांना यश आलं..आमचं कर्ज आणि पेनल्टी माफ झाली. मूळ मुद्दल आणि तीदेखील २५ टक्केसूट इतक्या मोठय़ा फरकानं आम्हाला परत करायची होती. मग प्रश्न होता तो दोन कामगार युनियन्सच्या वादाचा. त्यांच्याशी समझोता झाला. कामगारांचे पगार, पीएफचे पसे परत केले. कंपनी हळूहळू सावरत होती.’ कल्पना सरोज सांगत होत्या.
कल्पना सरोज. कमानी टय़ुब्ज लि.च्या अध्यक्ष. अकोल्यातील रेपाट या छोटय़ाशा गावातील जेमतेम नववी पास झालेली मुलगी ते कमानी टय़ुब्ज लि. या कंपनीचं अध्यक्षपद हा प्रवास थक्क करून सोडणारा आहे. पण ‘कमानी’चं काम करताना तो साराच प्रवासच त्यांच्या मदतीला आला, म्हणूनच त्यातून त्या बाहेर पडू शकल्या. त्या सांगतात, ‘‘ कमानीचं कर्ज फिटत आलं. जशी रिस्क कमी झाली तसं अनेक लोक त्रास द्यायला लागले. धमक्यांचे फोन यायचे, कंपनीच्या जागेवर ताबा सांगणारे अनेक लोक यायचे. त्यांच्याशी मुकाबला करत सगळ्या गोष्टी स्थिरस्थावर केल्या. मला जिवाची फिकीर नाही. तो तर मी फार मागेच (आत्महत्येचा एक प्रयत्न) दिला होता. लोकांसाठी काही करता आलं तर बरं वाटतं.. आता जवळपास सर्व कर्ज फिटलंय.. थोडंच बाकी आहे. ही कमानी टय़ुब्ज लि.ची सात मजली हेरिटेज बििल्डग आहे. तिथे हॉटेल काढण्याचा प्लॅन आहे.. कमानी टय़ुब्जचा पसारा वाढतोच आहे.’’  त्या समाधानाने सांगतात.  
 कल्पना सरोज दलित कुटुंबातून आलेल्या. वडील पोलीस हवालदार, आई, दोन बहिणी आणि दोन भाऊ अशा मोठय़ा कुटुंबातील सरोज ही मोठी मुलगी. आपल्या आयुष्याचा सुरुवातीचा काळ आठवत त्या सांगतात, ‘‘सातवीत असतानाच वडिलांनी मामाच्या दबावाला बळी पडून माझं लग्न लावून दिलं आणि मी मुंबईला आले. मुंबईचं नवखेपण आणि जोडीला सासरच्यांचा अतोनात छळ. वडिलांना हे सर्व कळताच ते मला घरी घेऊन आले. वडिलांचा पगार ३०० रुपये महिना. आणि खाणारी तोंडे अनेक. मला वडिलांवर भार बनून राहायचे नव्हते. नìसग, पोलीस, आर्मी अनेक नोकऱ्यांसाठी प्रयत्न करून झाले. परंतु कुठेच काम मिळेना. शिलाई मशीनवर काम सुरू केलं. घरी परत आलेली असल्याने गावातील, शेजारपाजारच्या लोकांनी टोमणे मारून मारून जगणं नकोसं करून टाकलं होतं. लोकवाट्टेल ते बोलायचे. ते सहन होईना म्हणून मग मी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पण वेळीच घरच्यांनी रुग्णालयात नेलं म्हणून वाचले. घरी सांगितलं की मला काम करायचंय, तुम्ही मला मुंबईला पाठवा नाहीतर मी रेल्वेखाली जीव देईन, तेव्हा कुठे मला मुंबईला काकांकडे पाठवण्यात आलं.. माझे काका दादरच्या बापट रोडवरच्या झोपडपट्टीत राहायचे आणि आसपास फिरून पापड विकायचे. त्यांना मला अशा वस्तीत ठेवणं खूप धोक्याचं वाटलं म्हणून मग त्यांच्या एका ओळखीच्या गुजराती कुटुंबात मला राहायला ठेवलं..तिथून एका होजिअरीच्या कारखान्याचं कपडे शिवायचं काम मिळालं. पहिल्या दिवशी तिथं पाहिलं तर मुलं-मुली एकत्र काम करत होते. माझी भीतीनं पायाखालची जमीनचं सरकली. माझे वडील कडक शिस्तीचे.. आम्हाला गावात मुलांशी बोलण्याची बंदी..वडिलांना जर कळलं की मी इथे मुलांबरोबरीनं काम करते तर ते माझा जीवच घेतील ही भीती होती. मी एक चांगली कारागीर असूनदेखील माझ्या हातून ते शिवणाचं मशीन चालेना.. सुपरव्हायजर मला तिथून हाकलून द्यायला लागला. मी त्याला गयावया केली तेव्हा मला धागे कापण्याचं काम मिळालं आणि मजुरी होती दिवसाचे २ रुपये. पण माझा आत्मविश्वास वाढला आणि मग मी मशीनवरचं काम मागून घेतलं. त्यानंतर मला महिन्याचे २२५ रुपये मिळायला लागले. आयुष्यात तेव्हा पहिल्यांदा मी १०० रुपयांची नोट पाहिली. खूप आनंद झाला. या मुंबईत आपण जगू शकतो, हे मनाने पक्कं केलं.
मग हळूहळू कल्याणला जागा घेतली आणि फíनचरचा बिझनेस सुरू केला. त्याच सुमारास वडिलांची नोकरी गेली आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली.. पण हळूहळू सगळं सावरत गेलं. त्यातच लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे ही ऊर्मी मला स्वस्थ बसू देईना. मी एक संघटना सुरू केली. सुशिक्षित युवक बेरोजगार संघटना. या संघटनेच्या माध्यमातून आम्ही तरुण मुलांना सरकारच्या  योजनांचा लाभ मिळवून द्यायचो. सरकारी अधिकाऱ्यांना भेटायचो. मुलांनी शिबिरं घ्या, त्यांना दुकानं, रिक्षासाठी लोन मिळवून द्या. अशातून संपर्क वाढत गेले. हळूहळू कल्याणमध्येच कन्स्ट्रक्शनचा बिझनेस सुरू केला.
माझे संपर्क, माझी माणसं हेच माझं मुख्य भांडवल आहे. मी जितक्या उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबते तितका वेळ माझा सगळा स्टाफ ऑफिसमध्ये थांबतो, माझा ड्रायव्हरदेखील कधी १०-१२ तास काम झालं तरी ओव्हरटाइम मागत नाही. त्यामुळे लोक नेहमी माझ्याकडे प्रश्न घेऊन यायचे. लोक म्हणायचे ताईंकडे जाऊयात त्या नक्की आपला प्रश्न सोडवतील. याच पद्धतीने कमानी टय़ुब्ज माझ्याकडे आलं. तिथले कामगार माझ्याकडे आले. त्यांनी खूप विनवणी केली की मी यात लक्ष घालावं. मी लक्ष घातलं आणि आज कमानी टय़ुब्जचा पसारा वाढतोय. आता आम्ही स्टील आणि कन्स्ट्रक्शनमध्येदेखील उतरतोय..’’
कल्पना सरोज यांच्या उद्योगाचा पसारा वाढतो आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत ‘बिझनेस आाऊटलुक’ या मासिकानं भारतातील दहा कर्तृत्ववान महिलांमध्ये त्यांची निवड केलीय. बीबीसीनं घेतलेल्या मुलाखतीत भारतातील यशस्वी उद्योजिका म्हणून त्यांचा गौरव करण्यात आलाय. राजीव गांधी वूमन अचिव्हर ऑफ द इयर, झल्कारी देवी पुरस्कार, दूरदर्शनचा हिरकणी पुरस्कार अशा २५-३० पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलंय. ‘डिकी’ या संघटनेच्या माध्यमातून दलित उदयोजक घडवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.
कामाच्या व्यस्ततेतून त्यांना फारच कमी वेळ घरासाठी मिळतो. त्या सांगतात, ‘‘घरी असले की स्वयंपाक करायला खूप आवडतं. घर सजवायला आवडतं. संसाराचा पुन्हा एकदा डाव मांडला मी. आज माझा मुलगा पायलट आहे तर मुलगी हॉटेल मॅनेजमेंटच्या क्षेत्रात. ज्यावेळी घरी असते. मोकळी असते तेव्हा एक साधी गृहिणी असते. आई असते. ’’
 ‘‘आता गाडीतून फिरताना कधीतरी दादरच्या बापट रोडवरून जाणं होतं.. आता ती झोपडपट्टी तिथं नाही. सगळं चकाचक झालंय..पण जुने दिवस विसरायला होत नाहीत.. ज्या मुंबईत मला जगायचं कसं ही भ्रांत पडली होती, लोकल ट्रेन्स कुठे जातात, कशा येतात याची साधी माहितीही नव्हती त्याच मुंबईत आज मी पाय घट्ट रोवून उभी आहे. मला जे जे लोक भेटले, ज्यांनी ज्यांनी मदत केली ते सगळे आजदेखील माझ्या  संपर्कात आहेत.. या मुंबईत मी दोन रुपयांनी सुरुवात केली होती आणि आज कोटी कोटी रुपयांचे हिशेब रोज करते.. खूप समाधान वाटतं इथपर्यंत पोहचल्याचं..पण हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता.’’
अर्थात तो तसा सोपा नसणारच होता...

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो