स्त्री जातक : बायकांची अक्कल!
मुखपृष्ठ >> स्त्री जातक >> स्त्री जातक : बायकांची अक्कल!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

स्त्री जातक : बायकांची अक्कल! Bookmark and Share Print E-mail

alt

डॉ. अनघा लवळेकर , शनिवार , २८ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
स्त्रियांना जरा अक्कल कमीच हे अनेक घरांच्या भिंतींनी ऐकलेलं वाक्य.. अगदी आजही ऐकू येणारं. स्त्री भावनिक जास्त असते. विचारापेक्षा भावनेनं निर्णय घेते असंही म्हटलं जातं, त्यात जैविक रचनेचा भाग किती आणि सामाजिक घडणीचा सहभाग किती?
पि ढय़ान्पिढय़ा ऐकलेला हा एक प्रसिद्ध विनोद! प्रख्यात ब्रिटिश विचारवंत जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्यापुढे एका देखण्या सिने अभिनेत्रीनं विवाहाचा प्रस्ताव ठेवला. शॉ हे दिसायला अतिशय सामान्य! त्या अभिनेत्रीनं म्हटलं, आपलं मूल तुमच्यासारखं बुद्धिमान आणि माझ्यासारखं देखणं व्हावं अशी माझी इच्छा आहे. शॉनं जरा उपहास आणि गमतीच्या स्वरात म्हटलं, ‘‘तुमची इच्छा रास्तच आहे, पण चुकून उलट झालं तर भलतीच पंचाईत व्हायची!’’ एकूणच देखणेपण आणि बुद्धिमत्ता किंवा ‘बाई आणि विचार करणं’ हे फार जवळून संबंधित नाही, असाच समज कैक वर्षे प्रचलित नव्हता का? ‘बायकांची अक्कल चुलीपुरती’ हे ब्रह्मवाक्य अनेक घरांच्या भिंतींनी ऐकलेलं नाही का?
आज ही ‘चुलीपुरती’ अक्कल पाताळशोधापासून अंतराळ प्रवासापर्यंत गवसणी घालत असली तरीही त्याबद्दल कितीतरी समज-गैरसमज अजूनही प्रचलित आहेत. मुद्दाम पसरवलेही जात आहेत. त्यातीलच एक म्हणजे स्त्रियांच्या मेंदूवरच्या पेशींच्या घडय़ा संख्येनं कमी असल्यामुळे तो कमी विकसित आहे असा एक जावईशोध मध्ये लावला गेला. अर्थातच तेवढय़ाच झटकन त्यावर प्रत्युत्तरेही दिली गेली. पण स्त्रियांच्या बौद्धिक क्षमतेविषयी आणि कार्यकर्तृत्वाविषयीची काही शंकेखोर प्रश्नचिन्हं आजही छुपेपणानं अनेकांच्या मनात घर करून असतात. याचा एक मजेदार प्रत्यय मीही घेते. अनेकदा कार्यशाळांमध्ये मी उपस्थितांना एक कोडं सोडवायला देते. ‘‘एका तरुण मुलाला गाडी चालवताना अपघात होतो. त्या मुलाचे वडील लहानपणीच निधन पावलेले असतात. त्याला बाकीचे लोक घाईघाईने एका प्रसिद्ध रुग्णालयात नेतात. तेथील प्रमुख शल्यचिकित्सक त्याला पाहून म्हणतात, ‘मी याची शस्त्रक्रिया करू शकणार नाही. हा माझा मुलगा आहे.’ आता त्या मुलाचं आणि त्या प्रमुख शल्यचिकित्सकांचं नातं काय असेल?’’ या प्रश्नाला चटकन मिळणाऱ्या उत्तरांमध्ये- काका, मोठा भाऊ, सावत्र वडील, मानलेले वडील हे नातेसंबंध सांगितले जातात. क्वचित ‘आई’ हे नातं नोंदवलं जातं. एखाद्या मोठय़ा प्रसिद्ध रुग्णालयातील प्रमुख शल्यचिकित्सक ‘स्त्री’ असू शकते, हे प्रथमदर्शनी डोक्यातच येत नाही, यातूनच मघाशी म्हटलेलं छुपं प्रश्नचिन्ह व्यक्त होतं.
याबद्दल संशोधन काय सांगतं? क्षमता असूनही ती फुलवण्याचा प्रयत्न केला जात नाही की मुळात स्त्री-पुरुषांच्या विचारप्रक्रियाच भिन्न असतात? यावर अनेक पुस्तकंही लिहिली गेली आहेत, पण गट म्हणून काही फरक दिसले तरी ते सरसकट स्त्री-पुरुषांना १०० टक्के लागू होत नाहीत, याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलेलं दिसतं. अगदी विशेष बुद्धिमत्ता असलेल्या मुलामुलींनासुद्धा सर्वसामान्य फरकांच्या तराजूतच बऱ्याचदा तोललं जातं असं दिसतं. विशेष बुद्धिमान मुलांबद्दलचं संशोधन प्रसिद्ध करणाऱ्या एका संशोधन नियतकालिकातील मुळात ‘गणिती’ क्षमता अतिशय उत्तम असणाऱ्या दोन कोरियन मुलींवर केलेल्या प्रदीर्घ अभ्यासाचा एक लेख वाचनात आला. या दोन्ही मुलींच्या आणि त्यांच्या संबंधित पालकांच्या संशोधकांनी चार टप्प्यांवर सविस्तर मुलाखती घेतल्या होत्या. (पाचवी, आठवी, दहावी आणि बारावी या शालेय वर्षांत) सुरुवातीला गणिताच्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्तम यश मिळविणाऱ्या ‘किम’ आणि ‘ली’चा गणितातील रस कसा हळूहळू कमी होत गेला आणि शेवटी त्यांनी अगदीच वेगळ्या क्षेत्राची करिअरसाठी कशी निवड केली याची सुरेख चिकित्सा त्या लेखात केली आहे. ‘मी खराब मूडमध्ये असले की गणितं सोडवून मला मस्त वाटतं’ असं पाचवीत म्हणणारी किम, आठवीत- ‘मी सगळ्या वर्गात मॅथ्समध्ये बेस्ट आहे’, असं अभिमानानं सांगणारी किम बारावीपर्यंत गेल्यावर हळूहळू ‘इंग्रजी’ कसं उत्तम करिअर आहे, डिप्लोमॅट होण्यासाठी ते कसं उपयोगाचं आहे हे संशोधकांना पटवून देताना दिसते. तीच गोष्ट ‘ली’ची! याचं विश्लेषण करताना पालकांबरोबरचा संवाद संशोधकांना मदत करतो. गणिती बुद्धीला प्रोत्साहन देण्यापेक्षा समाजमान्य करिअरला पालकांनी दिलेली पसंती, त्यांचं स्वत:चं गणिताविषयीचं अज्ञान आणि नावड, ‘मुलगी’ म्हणून गणितात मुलीच्या करिअरबद्दलची साशंकता अशा अनेक गोष्टी त्यांच्या मुलाखतीतून पुढे येतात.
दुसरीकडे, एका संशोधनात असं दिसतं की, एकूण बुद्धिमत्तेच्या चाचण्यांवरची कामगिरी तपासली तर शेकडय़ात सर्वात वरच्या दोन टक्क्य़ांत जितक्या मुली असतात, त्यांच्या दुप्पट संख्येनं मुलगे आढळतात. मुलग्यांमधील बुद्धिमत्तेची ही फूटपट्टी असल्याचा यातून सरळसरळ अर्थ कुणी काढला तर सुरुवातीच्या बर्नार्ड शॉ यांच्या कॉमेंटला पूरकच निष्कर्ष आहेत असं वाटेल. पण पुन्हा यामागची कारणं तपासताना असं लक्षात येतं की, मुळात मुलींचा अशा प्रकारच्या बुद्धिमत्ता चाचण्या सोडविण्यातला रसच कमी आहे, कारण सामाजिकीकरणाच्या प्रभावामुळे बुद्धिमत्तेपेक्षा व्यक्तिमत्त्वाच्या इतर गुणांवर त्या अधिक लक्ष केंद्रित करीत असतात.
एका विशेष बुद्धिमान मुलामुलींच्या शाळेत केलेल्या दीर्घ संशोधनातही अशीच मजेदार निरीक्षणं आढळतात. पाचवीमध्ये- आठवीमध्ये मुलामुलींच्या तार्किक बुद्धिमत्तेत बऱ्यापैकी फरक दिसतो, ज्यात मुलगे गणिती क्षमतेत जास्त चांगली कामगिरी करताना दिसतात. मात्र दहावीपर्यंत हे फरक पुसट होऊन जातात. तरीही मुली भाषिक क्षमतेत नेहमीच पुढे राहतात आणि मुलगे त्रिमितीय क्षमतेत पुढे राहतात. हेच फरक मग सामाजिकीकरणानं अधिक रुंदावतात आणि करिअरमध्येही प्रतिबिंबित होतात.
अर्थात ‘बुद्धिमत्ते’च्या अशा विशिष्ट संकल्पनेपल्याडही विचारप्रक्रियांचे अनेक प्रवाह दिसतात. स्त्रियांचे विचार पाहिले तर त्यात कल्पनारम्यता आणि भावनिकतेबरोबरच एका खास अशा अंत:प्रेरणेलाही महत्त्वाचं स्थान मिळालेलं दिसतं.
माझ्या एक सहकारी एकदा सांगत होत्या, ‘‘एका परिचितांच्या नवीन घेतलेल्या घरी मी गेले होते. तिथे मला काहीतरी खूप विचित्र,  अस्वस्थ वाटायला लागलं. मी काहीतरी कारण काढून उठून आले. नंतर मला कळलं की त्या घरात आधीचं जे कुटुंब राहत होतं त्यांच्यातील एका कुणी आत्महत्या केली होती!’’
अतिसंवेदनशील अंत:प्रेरणेचा हा एक अनुभव. एरवी मी विश्वास ठेवलाही नसता, पण ज्या मैत्रिणीनं हे सांगितलं, ती स्वत: अत्यंत विज्ञानवादी, तर्ककठोर! त्यामुळे या अनुभवावर विचार करावासा वाटला. सूक्ष्म अशी एक अंत:प्रेरणा बाईच्या मनात सतत जागती असते असं अनेक अभ्यासकांचं मत आहे. (तोच प्रसिद्ध सिक्स्थ सेन्स!) अर्थात तिला जाणिवेच्या पातळीवर आणण्यासाठी काही अधिक प्रगल्भता किंवा प्रसंगाची तीव्रता कारणीभूत ठरत असेल कदाचित!
स्त्रियांचं विचारविश्व जर पाहिलं तर त्यात स्वत:च्या अस्तित्वापेक्षाही जबाबदाऱ्या, मुलांचं- कुटुंबीयांचं भविष्य, त्यांनी मिळवलेले यश यांचेच विचार जास्त असतात असं दिसतं. स्वत:च्या मूळ बुद्धिमत्तेचा, क्षमतांचा शोध घेणं, त्याला अनुकूल वातावरण मिळवणं या सगळ्यांचा फार विचार ती करताना दिसत नाही. अर्थात संधी/ शिक्षण/ भूमिकांची रिजिडिटी या सर्वाचा त्यावर होणारा दीर्घकाळ परिणाम त्यामागे आहेच.
स्त्रीनं ठरवलं तर ती किती परखडपणे एखाद्या घटनेचा विचार करू शकते, याचं फार सुरेख दर्शन आपल्याला ‘स्त्रियांची शतपत्रे’ या ग्रंथातून होतं. १८५० ते १९५० या काळात विविध स्त्रियांनी तत्कालीन वृत्तपत्रांना लिहिलेल्या पत्रांचा हा संपादित संग्रह आहे. केवढी विचारांची ताकद तत्कालीन ‘तथाकथित अशिक्षित’ स्त्रियांमध्ये होती हे त्यातील काही पत्रे वाचताना लक्षात येतं. आसपास घडणाऱ्या घटनांचे अगदी सूक्ष्म पदरसुद्धा स्त्रियांनी त्यात नोंदवले आहेत. पुनर्विवाहाविषयी आपलं मत व्यक्त करताना एक अगदी सर्वसामान्य स्त्री कळकळीने म्हणते, ‘‘हल्ली बहुतेक स्त्रियांना व पुरुषांना विचारशक्ती आली आहे आणि जुन्या चालीच्या लोकांनी जरी बडबड केली तरी त्यांचे काहीएक चालायचे नाही. चांगल्या रूढी आम्हामध्ये हळूहळू पुन्हा सुरू होतील यात शंका नाही.’’
१९३६ साली ‘केसरी’मध्ये प्रकाशित झालेल्या राजकीय पत्रांमध्ये ‘स्त्री मतदारसंघाचे स्वरूप कसे असावे’ यावर अत्यंत परखड मते उमाबाई कुंदापूर यांनी मांडली आहेत. त्यात त्या म्हणतात, ‘‘हिंदुस्थानची प्रगती स्त्रियांच्या चळवळीवर अवलंबून असताना एक कोटी जनसंख्येतून एकच स्त्री प्रतिनिधी निवडून दिली तर त्यातून हवे ते कसे साधेल?’’
एकुणात असं दिसतं की, स्त्रियांच्या विचारात तर्ककठोरता कमी असली तरी ‘तर्कशुद्धता’ (म्हणजेच हेतू आणि साधन यांची स्पष्टता) नक्कीच जास्त आढळते. तो तर्क त्यांचा त्यांनी लढवलेला असतो. इष्ट/ अनिष्ट, चूक-बरोबर यापेक्षाही या विचारांतून काय पोचवायचं आहे, हे त्या ठामपणे सांगू शकतात.
स्त्रियांचे तर्क किंवा विचारात भावनिकता जास्त दिसते, असंही आढळतं. सर्वसाधारण भावनिक बुद्धिमत्तेत स्त्री-पुरुष भेद फार आढळत नसले तरी त्यातील टीकेचा स्वीकार, तदनुभूती (आस्था/ एम्पॅथी) आणि कमिटमेंट (निष्ठा? समर्पण? शब्दाला जागणं?) यावर स्त्रिया अधिक वरचढ आहेत असं दिसतं.
या सर्व घडणीमध्ये जैविक रचना, शारीरिक बदल (विशेषत: पौगंडावस्थेतील) यांच्याइतकाच वाटा सामाजिकीकरणाचासुद्धा आहेच.
आता सुरुवातीच्या किश्शावर जरा पुन्हा विचार केला तर स्त्रियांच्या विचारशक्तीबद्दल, त्यांच्या बुद्धिमत्तेच्या आवाक्याबद्दल स्त्रियांना आणि इतरांनाही पडणारी प्रश्नचिन्हं थोडी कमी झाल्यासारखी वाटतात का?

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो