बुक-अप : विषामृताचा डोह!
मुखपृष्ठ >> बुक-अप! >> बुक-अप : विषामृताचा डोह!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

बुक-अप : विषामृताचा डोह! Bookmark and Share Print E-mail

गिरीश कुबेर, शनिवार, २८ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

औषध कंपन्या, वेगवेगळे देश यांची आजारनिर्मितीतील भूमिका नेहमीच संशयास्पद राहिलेली आहे. आपण जिला प्रगती म्हणतो तिला दोन चेहरे आहेत. एक विकासाचा. म्हणजे माणसं जास्तीत जास्त कशी निरोगी जगू शकतील, वेगवेगळय़ा आजारांवर मात कशी करता येईल वगैरेसाठी संशोधन होत असतं तो. आणि दुसरा म्हणजे माणसं मारण्याच्या जास्तीत जास्त नवनव्या, सोप्या पद्धती कशा तयार करता येतील, हा. केवळ रशियाच जैविक रासायनिक शस्त्रास्त्रं तयार करत होता, असं नाही.

इतरांचे हे उद्योग जाणून घ्यायचे असतील तर जेन गुलिमिन याचं ‘बायोलॉजिकल वेपन्स’ हे पुस्तक वाचणं आवश्यक आहे. केन अलिबेकचं ‘बायोहझार्ड’ हे या क्षेत्रातले फक्त रशियाचेच उद्योग दाखवतं.  अमेरिकेसारख्या महासत्तेनं काळपुळी, प्लेग आदींसारख्या आजारांच्या जंतूंची        किती उत्तम मशागत केली आहे, हे  एड रेगिस यांच्या ‘द बायोलॉजी ऑफ डूम’या पुस्तकातून सहज समजून घेता येतं..
पावसाळा मध्यावर आला की पूर्वी दोन-तीन आजारांच्या साथी यायच्याच यायच्या. एक म्हणजे ताप.जो फॅमिली डॉक्टर नावाच्या कायम पांढऱ्या शर्टातल्या माणसाकडच्या लाल रंगाच्या औषधानं बरा व्हायचा. हे लाल रंगाचं औषध बहुगुणी असावं बहुधा. कोणत्याही आजारावर डॉक्टर त्या लाल द्रवाला कामाला लावायचे आणि तेही बापडं आज्ञाधारकपणे आपलं काम चोख करायचं. असो. आता ते डॉक्टर गेले आणि लाल रंगाचं औषधही गेलं. मग या कधी तापाच्या आगेमागे पोट बिघडायचं. त्या वेळी आजी पायाच्या अंगठय़ाला घोंगडीचं सूत बांधायची किंवा दोन-चार वेळा ओवा वगैरे देऊन ती पोटदुखी बरं करायची. पायाच्या अंगठय़ाला अंगठीसारखं घट्ट सूत बांधलं की पोटदुखी कशी जाते हा प्रश्न तेव्हा कधी पडायचा नाही. आता पोटं अशी साध्या उपायानं बरी होत नाहीत. या साध्या उपायांमुळे डॉक्टर आणि औषध कंपन्यांच्या पोटावर बहुधा पाय आल्यामुळे आपल्या पोटांनी सोप्या उपायांना दाद देऊ नये.अशीच एकंदर व्यवस्था झाली पुढच्या काळात. तेही असो.
आता या जोडीला आणखी एक नवा आजार आलाय. स्वाईन फ्लू. यात ताप येतोच फ्लूसारखा. पण औषध साध्या फ्लूचं चालत नाही म्हणे. एकाच कंपनीचं एकच औषध या आजारावर चालतं असं सांगितलं जातं. ते औषध म्हणजे टॅमी फ्लू नावाची गोळी. मध्यंतरी आपल्याकडे या स्वाईन फ्लूची साथ आली होती तेव्हा रेशनवर तांदूळ-तेल घ्यावं किंवा जागृत वगैरे देवाचा प्रसाद घ्यावा तसं लोक या गोळय़ा घेण्यासाठी रांगा लावत होते आणि वेळ पडली तर असू दे.म्हणून या गोळय़ांचा साठा करत होते.
लोकांचा काय दोष? ते बिचारे प्रसारमाध्यमं जे काही छापतात, सांगतात त्यावर विश्वास ठेवतात. आता लोकांना काय माहीत असतं का हे औषध बनवणाऱ्या कंपनीत अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री डोनाल्ड रम्सफेल्ड यांची मालकी आहे ते? आणि ही कंपनी डब्यात गेली असताना ती वर येण्यासाठी बुश यांनी विशेष आरोग्य योजना आखली होती आणि त्यात हजारो कोटी डॉलर्सची तरतूद करण्यात आली होती? कल्पनाही करता येणार नाही इतकी आर्थिक ताकद असलेल्या महासत्तेचे प्रमुख असल्यामुळे बुश यांचा प्रभाव इतका की त्यांनी तरतूद केल्या केल्या त्यांना हवा तसा आजार बरोब्बर उपटला आणि त्यांच्या सहकाऱ्याच्या कंपनीत तयार होणारंच औषध बरोब्बर लागू पडलं. हा योगायोग इतका की ही रम्सफेल्ड यांची कंपनी इतकी फायद्यानं फळफळली की त्यांनी ती लगेच रोश या बडय़ा औषध कंपनीला विकूनही टाकली. एका रात्रीत रम्सफेल्ड बहुअब्जाधीश झाले. आता असं होणारच ना की नवनवे आजार येणार आणि या नवनव्या आजारांवर औषध करणाऱ्या कंपन्यांना त्याचा फायदा होणार.
पण असे योगायोग इतिहासात भरपूर आहेत. काही वर्षांपूर्वी क्युबानं जाहीर आरोप केला होता, अमेरिकी कंपन्यांनी आमच्या देशात बर्ड फ्लूची ठरवून लागण घडवली. त्यानंतर क्युबात कोंबडय़ा, बदकं, एवढंच काय गाई वगैरेंचीही कत्तल झाली. आपल्याकडेही थोडय़ा फार प्रमाणात असंच नाही का घडलं? आपल्याकडे क्युबातल्या फिडेल कॅस्ट्रोइतकं वेडपट कोणी नसल्यामुळे या कंपन्यांच्या विरोधात आपल्याकडे इतके गंभीर आरोप कोणी केले नाहीत. पण औषध कंपन्या, वेगवेगळे देश यांची आजारनिर्मितीतील भूमिका नेहमीच संशयास्पद राहिलेली आहे. ‘युद्ध जिवांचे’ या पुस्तकासाठी संदर्भऐवज गोळा करत असताना या सगळय़ाबाबत माहितीचा साठाच हाती आला. या सगळय़ातून जाणवत राहिलं ते हेच की आपण जिला प्रगती म्हणतो तिला दोन चेहरे आहेत. एक विकासाचा. म्हणजे माणसं जास्तीत जास्त कशी निरोगी जगू शकतील, वेगवेगळय़ा आजारांवर मात कशी करता येईल वगैरेसाठी संशोधन होत असतं तो. आणि दुसरा म्हणजे माणसं मारण्याच्या जास्तीत जास्त नवनव्या, सोप्या पद्धती कशा तयार करता येतील, हा.
हा दुसरा चेहरा ठसठशीतपणे समोर आला तो केन अलिबेक यांचं ‘बायोहझार्ड’ हे पुस्तक हाती पडलं तेव्हा. भयानक नवं जग त्यातून समोर आलं. केन अलिबेक मूळचा सोविएत रशियातला. सूक्ष्मजीवशास्त्र हा विशेष संशोधनाचा विषय. त्यात डॉक्टरेट वगैरे केल्यावर रशियाच्या लष्करात हा रुजू झाला. रशियाचा बायोप्रेपरात नावाचा एक विभाग होता, त्यात. काय काम? तर जैविक अस्त्रं तयार करायची? म्हणजे काय? तर वेगवेगळय़ा आजारांच्या जंतूंना खायला घालून लाडाकोडात पोसायचं, चांगले धष्टपुष्ट झाले की प्राण्यांवर किंवा प्रसारमाध्यमांच्या प्रभावाखाली नसलेल्या प्रदेशातल्या माणसांवरच थेट त्यांच्या चाचण्या घ्यायच्या.ते प्राणी/माणसं मेली की आपलं काम फत्ते झाल्याचा आनंद साजरा करायचा आणि शत्रुदेशात अशी जैविक अस्त्रं कशी सोडता येतील.याच्या योजना हाती घ्यायच्या. वरकरणी हे सगळं असंस्कृत, अमंगळ वाटतं. पण जगाच्या राजकारणात हे असंच चालत आलंय. ‘युद्ध जिवांचे’ पुस्तकात हे सगळं विस्तारानं मांडता आलंच आहे. पण त्याची मूळ प्रेरणा केन अलिबेक. ते वाचलं की भीतीनं शहारा येतो अंगावर. अमेरिकेच्या विरोधात वापरता येतील म्हणून सोविएत रशियानं मोठय़ा प्रमाणावर जैविक, रासायनिक अस्त्रांची निर्मिती चालवली होती. त्यातल्या एका शाखेत केन अलिबेक काम करीत होता. या सगळय़ाचा ताण आल्यामुळे म्हणा किंवा अन्य काही कारणांमुळे म्हणा तो १९९२ साली अमेरिकेला फितूर झाला. त्याच्या फितुरीच्या आधी काही काळ इंग्लंडच्या पंतप्रधान आयर्न लेडी मार्गारेट थॅचर आणि बोरिस येल्त्सिन यांची भेट झाली होती आणि बाईंनी एकंदरच रशियाला या बैठकीत फैलावर घेतलं होतं. केन या सगळय़ाचा साक्षीदार होता. देशांतर करून अमेरिकेत तो गेला आणि तिथं ‘बोयाहझार्ड’ हे पुस्तक लिहून त्यानं आपल्या मायदेशाची कृष्णकृत्यं उघड केली.
समस्त विज्ञानजग हादरलं होतं त्या वेळी. पण त्याच्या पुस्तकानं एकच बाजू पुढे आली. पाश्चात्त्य जगाच्या नजरेतनं.म्हणजे इंग्लंड, अमेरिकेच्या नजरेतनं.जगाकडे बघणाऱ्यांना इतर देशांचे दोष मोठे होऊन दिसतात. त्यामुळे कम्युनिस्ट रशिया किती निर्दयी आहे.वगैरे वृत्तान्त छापून आले. परंतु पाश्चात्त्य जगही या सगळय़ात इतरांच्या इतकंच गुंतलेलं आहे. हे पाश्चात्त्यसुद्धा किती दांभिक असावेत? तर १९८१ साली इराकची सूत्रं सद्दाम हुसेन याच्या हाती आली तेव्हा त्याच्या जाहीर सत्कारात एका अमेरिकी व्यक्तीनं एक खास खोकं सद्दामला भेट दिलं. त्याच्या खोक्याच्या मदतीनं सद्दामनं पुढे नृशंस हत्या केल्या.
सद्दामला ही भेट देणाऱ्या व्यक्तीचं नाव डोनाल्ड रम्सफेल्ड. पुढे ते संरक्षणमंत्री झाले. पण त्या वेळी अमेरिकी सरकारचे खास प्रतिनिधी म्हणून सद्दामला भेटायला ही खास भेट घेऊन ते गेले होते. आणि ही खास भेट होती जीवघेण्या जिवाणूंची. तिच्याच आधारे सद्दामनं पुढे जैविक अस्त्रं बनवली आणि आपल्याच देशातल्या कुर्द बंडखोरांना लाखांनी ठार केलं. मग याच सद्दामची गरज संपल्यावर अमेरिकेला त्याच्या या क्रूरतेची जाणीव झाली आणि २००३ साली त्याच्या विरोधात कारवाई केली गेली. तेव्हा एकटा रशियाच जैविक रासायनिक शस्त्रास्त्रं तयार करत होता, असं नाही. इतरांचे हे उद्योग जाणून घ्यायचे असतील तर जेन गुलिमिन याचं ‘बायोलॉजिकल वेपन्स’ हे पुस्तक वाचणं आवश्यक. केन अलिबेकचं ‘बायोहझार्ड’ हे या क्षेत्रातले फक्त रशियाचेच उद्योग दाखवतं. पण गुलिमिनचं ‘बायोलॉजिकल वेपन्स’ सगळय़ाच देशांचा आढावा घेतं. त्याची मांडणीही सोपी आहे. म्हणजे एका देशावर एक प्रकरण असा साधा मामला आहे. त्यामुळे अमेरिकेनं किंवा जपाननं काय केलं हेच वाचायचं असेल तर तेवढीही सोय आहे. एकटय़ा अमेरिकेनं काय केलं एवढंच जाणून घ्यायचं तर द ‘बायोलॉजी ऑफ डूम’ हे एड रेगिस यांचं पुस्तक उत्तम आहे. या महासत्तेनं काळपुळी, प्लेग आदींसारख्या आजारांच्या जंतूंची किती उत्तम मशागत केली आहे, हे यातून सहज समजून घेता येतं. वेगवेगळय़ा औषधांसाठी विख्यात असलेल्या बडय़ा औषध कंपन्याही जीवघेण्या विषनिर्मितीतही कशा गुंतलेल्या असतात, हेही समजतं. या तीनही पुस्तकांत सगळय़ात मोठा सांस्कृतिक धक्का बसतो ते जपानच्या उद्योगांचा तपशील वाचून. ‘युद्ध जिवांचे’ वाचूनही सगळय़ात जास्त प्रतिक्रिया येतात त्या जपानबद्दल.
हे असं होतं याचं कारण आपण इतिहासाकडे काळय़ापांढऱ्या नजरेतनंच पाहतो. काळय़ा रंगातला खलनायक आणि पांढरा नायक. पण प्रत्येक माणसात नायक आणि खलनायक दोन्हीही असतात आणि नायक कुठे संपतो आणि खलनायक कुठे सुरू होतो याची विभागणी वाटते तितकी सोपी नसते. आपल्या नजरेला विन्स्टन चर्चिल म्हणजे फक्त नायकच आणि अमुकतमुक म्हणजे खलनायक इतकीच मांडणी असते. पण भारत-अफगाणिस्तानच्या सीमेवर बेलाशक रासायनिक अस्त्रांची चाचणी घ्या..आधुनिक परिभाषेत नागरिक नसलेले मेले तर काही बिघडत नाही.अशी भूमिका चर्चिल यांनी जेव्हा घेतली तेव्हा अनेक खलनायक क्षितिजावरसुद्धा नव्हते. तेव्हा मुद्दा हा की माणसांतल्या चांगल्या-वाईटांच्या सीमारेषा तशा अंधुकच असतात.
जाणवतं हेही की कायमस्वरूपी विष किंवा अमृत असं काहीच नसतं. आपलं जगणं हे विषामृताचा डोह आहे. कसा हे समजून घ्यायचं असेल तर ही पुस्तकं वाचायला हवीत.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो