रुजुवात : फडके घराणं
मुखपृष्ठ >> रुजुवात >> रुजुवात : फडके घराणं
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

रुजुवात : फडके घराणं Bookmark and Share Print E-mail

मुकुंद संगोराम, शनिवार, २८ जुलै २०१२
mukund.sangoram@expressindiacom

सुधीर फडके यांच्या निधनाला उद्या (२९ जुलै)  दहा र्वष होतील. भावसंगीतातल्या या घराणेदार स्वरपुरुषाचं स्मरण याचसाठी करायचं की त्यानं आपल्या सगळय़ांमध्ये शब्द-स्वरांचं एक अतूट नातं निर्माण केलं. त्या नात्यानं आपण इतके घट्ट बांधले गेलो, की आजच्या धावपळीच्या आणि भावनिक कल्लोळाच्या काळातही हे नातं आपलं आयुष्य आणखी संपन्न करतं..

पाच दशकांहून अधिक काळ आपली प्रतिभा ताजीतवानी ठेवणाऱ्या सुधीर फडके यांनी मराठी माणसावर अनंत उपकार केले आहेत. उपकार अशासाठी म्हणायचं, की त्यांनी सतत नव्याचा शोध घेताना मराठी माणसाच्या मनातली स्पंदनं जाणली होती. नुसतं चकाकणारं आणि क्षणार्धात संपून जाणारं, त्याचा मागमूसही न राहणारं जे ललित संगीत आज आपण ऐकतो आहोत, त्यापेक्षा खूप वेगळं आणि ताकदीचं संगीत त्यांनी निर्माण केलं. ललित संगीतातल्या या फडके घराण्याच्या खाणाखुणा आजही तरळतात, तेव्हा हरखून जायला होतं. चित्रपट संगीत आणि भावगीतांच्या दुनियेतील सुधीर फडके यांची सफर प्रत्येकाला पुरेपूर आनंद देणारी ठरली. आपलं प्रत्येक गीत ही एक नक्षीदार कलाकृती व्हावी, यासाठी आपली सारी प्रतिभा पणाला लावणाऱ्या बाबूजींनी त्या प्रत्येक गीतात मराठी माणसाचं मराठीपण असं काही ठासून भरलं, की त्याच्यासाठी ते गीत हृदयस्थ होऊन गेलं. काहीच दशकं आधी सुरू झालेल्या या ललित संगीताच्या नव्या परंपरेत त्यांनी केलेली कामगिरी म्हणूनच अपूर्वाईची झाली आणि कीर्तन, भजन, अभंग, लावणी या दीर्घ परंपरेतल्या संगीताला अभिजातता मिळवून देणाऱ्या परंपरेचे सुधीर फडके हे नायक ठरले.
अण्णासाहेब किलरेस्करांनी ‘शाकुंतल’ या संगीत नाटकात रागदारी अभिजात संगीताचं भरजरीपण जराही हरवू न देता ललित संगीताचा जो प्रयोग केला, तो किती वरच्या दर्जाचा होता, याच्या खुणा आजही सहजपणे सापडतात. त्यानंतरच्या काळात तंत्रज्ञानाच्या आविष्कारातून निर्माण झालेला मूकपट भारतात तरी बोलण्यापेक्षा गायलाच लागला. त्याच काळात मराठी मातीत निर्माण झालेला भावगीत हा प्रकार मराठीपणाचं खास लक्षण सांगणारा ठरला. शब्दांची भावगर्भ कविता होते, तेव्हा त्याला स्वरांचंही अस्तर लाभतं, याची जी प्रचीती मराठी माणसाला आली, ती नंतरच्या काळात जगातल्या सगळय़ा संगीतातील एक अतिशय प्रभावी खूण ठरली. स्वरशब्दांच्या या उत्सवात सुधीर फडके यांचं महत्त्व असाधारण म्हणावं असं आहे. इथल्या मातीतून उपजलेल्या लोकसंगीताच्या खाणाखुणा शास्त्रीय संगीताच्या मुशीतून बाहेर येताना, त्याला या मातीचा अप्रतिम गंध कसा प्राप्त होतो, याचं एक ठसठशीत उदाहरण बाबूजींच्या संगीतानं पुढे आलं. त्यांच्या स्वररचनेतले असे अनेक स्वरपुंज संगीतातल्या सगळय़ांना सतत मोहवत आले आणि त्याचा प्रभाव नकळतपणे पडत गेला. प्रत्येक स्वर सगळीकडेच सारखा असला आणि रागाचं स्वरूप सर्वमान्य असलं, तरीही जेव्हा त्याचे स्वरपुंज तयार होतात, तेव्हा त्यामध्ये संस्कृतीचीही मिसळण होते, याचं देखणं उदाहरण सुधीर फडक्यांच्या संगीतात ठायीठायी दिसून येतं. संगीत नाटकांच्या पन्नास वर्षांच्या अफाट कामगिरीनंतर, जी. एन. जोशी आणि गोविंदराव टेंबे यांच्यापासून दोन वेगळय़ा वाटांना प्रारंभ झाला. ललित संगीतातील भावगीत आणि चित्रपट गीत हे प्रयोग दोन स्तरांवर आपापलं वेगळेपण जपत आले होते. चित्रपट संगीतावर अभिजात संगीताचा पगडा होता आणि भावगीतं नाटय़संगीताच्या आधारानं फुलत होती. बाबूजींनी या दोन्ही प्रवाहांना एकत्र आणून त्याची महानदी निर्माण केली आणि त्यातून जगभर मराठी माणसाचं भावविश्व समृद्ध करणारी परंपरा निर्माण झाली. ही परंपरा म्हणजेच फडके घराणं!
शब्द आणि संगीत यांनी फार पूर्वीच एकत्र यायचं ठरवलं होतं. म्हणजे भाषेच्या निर्मितीपाठोपाठ असं घडणं स्वाभाविकच होतं असं नाही. माणसाच्या मेंदूतून जेव्हा अनेकविध कल्पना साकारायला सुरुवात झाली, तेव्हा त्यानं आधीच निर्माण केलेल्या संगीतात शब्दाचा उपयोग करण्याचा प्रयोग केला असणार. नंतरच्या काही हजार वर्षांमध्ये तो उपयोग माणसाच्या कलासंस्कृतीचा अविभाज्य भाग बनेल, असं भाकीत तेव्हा कुणी केलं असेल की नाही कुणास ठाऊक. पण शब्द आणि स्वरांचा हा संकर शुभ ठरला एवढं मात्र नक्की! हा शुभसंकर स्थानिक संस्कृतीचं प्रतिनिधित्व करतो. ही संस्कृती केवळ भाषेतून व्यक्त होत नाही, तर तिला तिथल्या मातीत मिसळलेल्या सांगीतिक प्रवाहांची साथ मिळते. केवळ हिंदी गीत आहे, म्हणजे त्याच्यावर केलेले स्वरसंस्कार हिंदूी असतात, असं नाही. हे स्वरांचे साज तिथल्या शतकानुशतकाच्या परंपरांचं एक टोकदार रूप बनतात, तेव्हाच ते त्या गीताला प्रवाही बनवतात आणि स्वरांवर आरूढ झालेल्या त्या गीतातील अर्थ अगदी विनासायास आपल्यापर्यंत पोहोचवतात. इटलीमधलं किंवा आफ्रिकेतलं संगीत कन्नड भाषेतील गीतामध्ये गायलं, म्हणून ते कन्नड होत नाही, याचं भान संगीतातल्या प्रत्येक सर्जनशील कलावंताला असतं. शब्द संगीताच्या क्षेत्रात महाराष्ट्रानं नाटय़संगीताच्या रूपानं मुहूर्तमेढ रोवली. रागदारी संगीतातील बंदिशी म्हणजे कविता किंवा गीतं नव्हेत, मात्र ठुमरी, गज़्‍ाल, नाटय़संगीत हे प्रकार शब्दांचं संगीतातलं स्थान वाढवणारे होते, यात शंकाच नाही. भावगीतांनी शब्द आणि स्वर यांचं जे कलात्मक मिश्रण घडवून आणलं, त्यानं वेगळय़ाच मानसिक आणि बौद्धिक आनंदाच्या संमिश्र अनुभूतीला सामोरं जाण्याची क्षमता रसिकांमध्ये निर्माण झाली.
सुधीर फडके यांना स्वरांची जी तालीम मिळाली, ती अस्सल घराणेदार होती. वडील वकील असल्यानं घरातलं वातावरणही वेगळं होतं. आईच्या निधनानंतर ओढवलेल्या अशक्य कोटीतल्या संकटांना सामोरं जाताना प्रत्येक वेळी फक्त स्वरांनी त्यांना संगत केली. कुणावरही येऊ नयेत, असे अनेक अनवस्था प्रसंग बाबूजींवर ओढवले. गाणंच करायचं ही जिद्दही गळून पडावी, अशा या प्रसंगांचा जराही ओरखडा त्यांनी आपल्या संगीतावर उमटू दिला नाही. केवळ परिस्थितीनं त्यांना अभिजात संगीताच्या क्षेत्रात राहू दिलं नाही. पण त्यावर मात करत राम फडके यांचं सुधीर फडके असं नवं रूप जगासमोर आलं. बालगंधर्व हे त्यांचं सुखनिधान होतं. ललित संगीतातील एक चमत्कार म्हणावा, अशा बालगंधर्वाचं सततचं स्मरण बाबूजींनी आपल्या संगीतात केलं. आपल्या संगीतात त्यांनी बालगंधर्वाची इतकी रूपं साकारली आहेत, की त्यामुळे कुणाही मराठी माणसाला ते गाणं क्षणार्धात आपलं, खास आपलंच वाटावं. गोड आवाज, स्वच्छ शब्दोच्चार, अर्थाला प्रवाही करणारी स्वररचना आणि सादरीकरणातील कमालीचा आत्मविश्वास ही सुधीर फडके यांची वैशिष्टय़ं म्हणजे मराठी भावगीत परंपरेचीच खूण बनली.  
जे. एल. रानडे, गजानन वाटवे, बबनराव नावडीकर यांनी भावगीताच्या क्षेत्रात केलेली कामगिरी वादातीतच आहे. पण त्या काळातील या शैलीतून बाहेर पडून स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण करायला कमालीची प्रज्ञा हवी होती. सुधीर फडके यांना हे वरदान मिळालं होतं. त्यांनी बालगंधर्वाचा जो स्वरसंस्कार घेतला, तोच मुळी या भावगीत परंपरेपासून वेगळं होण्याचा एक मार्ग ठरला. रसाळपणा आणि भावनांचा उत्सव साजरा करण्याची क्षमता ही त्यांच्या गायनाची खरी गुणवत्ता ठरली आणि त्यामुळे त्यांचं प्रत्येकच गीत अतिशय सुंदर अशा अनुभवापर्यंत नेणारा पूल ठरलं. कवितेतल्या स्वरांचं अस्तर हुकमी सापडत नाही. त्यासाठी शब्दांचीही आराधना करावी लागते. सुधीर फडके असे नशीबवान की त्यांना ग. दि. माडगूळकरांसारख्या शब्दप्रभूची साथ मिळाली. स्वरांच्या होडीत बसून गदिमांच्या शब्दसंपदेनं रसिकांच्या हृदयापर्यंत जो प्रवास केला, त्यानं तो सारा काळ मोहरून गेला. अभिजात संगीतात शैलीला फार महत्त्व असतं. स्वतंत्र शैली निर्माण करण्यासाठी अचाट सामथ्र्य लागतं. ग्वाल्हेर, दिल्ली, आग्रा, इंदोर, किराणा, जयपूर ही घराण्यांची नावं शैलीसाठी महत्त्वाची ठरली. स्वर तेच, राग तेच, तालही तेच, परंतु त्यातून भाव व्यक्त करण्याची शैली वेगवेगळी. भावगीतांच्या क्षेत्रातही अशी घराणी आपोआप निर्माण झाली. फडके घराण्यानं या क्षेत्रात जवळजवळ अर्धशतक अधिराज्य गाजवलं.  
स्वरांचा नेमकेपणा आणि त्यातून व्यक्त होणारे भाव याबाबत अतिशय दक्ष असणाऱ्या या कलावंताला आपली सर्जनशीलता आयुष्यभर टिकवून ठेवता आली. मराठी मन आणि त्याची संस्कृती यांची ओळखच फडके यांनी जगाला करून दिली. परदेशी राहणाऱ्या कुणाही मराठी माणसाच्या घरात त्यांची गाणी नाहीत, असं घडत नाही. ती गाणी तिथल्या सगळय़ांना त्यांच्या घरापर्यंत थेट घेऊन जातात आणि काही काळ का होईना, स्मरणरंजनाचा देखणा अनुभव मिळवून देतात. सुधीर फडके यांच्या निधनाला आता दहा र्वष होतील. आणखी सात वर्षांनी त्यांची शताब्दीही होईल. भावसंगीतातल्या या घराणेदार स्वरपुरुषाचं स्मरण याचसाठी करायचं की त्यानं आपल्या सगळय़ांमध्ये शब्द-स्वरांचं एक अतूट नातं निर्माण केलं. त्या नात्यानं आपण इतके घट्ट बांधले गेलो, की आजच्या धावपळीच्या आणि भावनिक कल्लोळाच्या काळातही हे नातं आपलं आयुष्य आणखी संपन्न करतं. आज ऐकू येत असलेल्या चित्रपट संगीतात कधी तरी चुकूनमाकून सुधीर फडके यांनी स्थापित केलेला स्वरपुंज ऐकायला मिळाला, तरी कुणाही मराठी माणसाचे कान चटकन टवकारतात. डोळे लकाकतात आणि मनात एक सुखद लहर पसरते.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो