‘मुखी शिवनाम । सुखी सर्व धाम।’
मुखपृष्ठ >> लेख >> ‘मुखी शिवनाम । सुखी सर्व धाम।’
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

‘मुखी शिवनाम । सुखी सर्व धाम।’ Bookmark and Share Print E-mail

राजमाता सुमित्राराजे भोसले ,रविवार, २९ जुलै २०१२
अध्यक्षा, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे षष्टय़ब्दीपूर्ती समिती, सातारा

।। श्री आदिशक्ती तुळजाभवानी।। ।। जय शिवराय।।
।। स्वस्ति श्री शिवराज्य शके ३१० श्रावण शुद्ध एकादशी शुक्रवार ।।
अखंडित लक्ष्मी अलंकृत सकलगुणालंकरण राजमान्य राजश्री श्रीमंत शिवयोगी शिवशाहीर बळवंतराव मोरेश्वरराव तथा बाबासाहेब पुरंदरे यांसी
शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीने आनंदलेली ही भूमी. क्रांतिकारकांच्या इतिहासाने तेजोमय बनलेली ही भूमी. या भूमीच्या पराक्रमधर्माचा इतिहास म्हणजेच राष्ट्राचा इतिहास. याच इतिहासातल्या चैतन्यमयी शिवगंगेचे आपण भगीरथ झालात. शिवयोगी झालात. रानोमाळी शिवप्रेम फुलविलेत. याच श्रावण शुद्ध पंचमीला आपल्या जीवनगाथेची एकसष्ट पाना पूर्ण झाली. याच गौरवशाली पानात अखिल महाराष्ट्रच्या वतीने आज अजिंक्यतारा मानाचे पान गुंफीत आहे. आपल्या शिवकार्याचा मानपत्र अर्पण करुन गौरव करीत आहे.
बाबासाहेब, आपणास पुरंदरे कुलाची, पुण्यश्लोक पुरुषोत्तमांची आणि पुण्याची पुण्याई लाभली. आपल्या घरीच शिवकथातून शिवाई भेटीला आली. सरस्वतीपुत्रापुढे सरस्वती प्रकट झाली. धार्मिक वातावरणात आनंदली, आपल्या बालरुपाला शिवरुपाच्या हजारो चित्रांत ती दिसू लागली. भविष्यात हजारो पानांचे शिवगान तयार करून आपणास तिने महान बनविले. ‘भाग्याशी काय उणें रे। यत्नावाचूनि राहिले’ हे आपण लक्षात घेतलेत.
‘उत्कट भव्य तेचि घ्यावे’ या बरोबरच ‘अभ्यासे प्रगट व्हावे’ ह्य़ा समर्थसूत्रानुसार आपण साधना केलीत. शिवधनाचे शिवधनुष्य ‘बलवंत’ हाताने पेललेत. ‘फोडिले भांडार धन्याचा हा माल । मी तव हमाल भारवाही।’ ही नम्रत्वाची उदात्त नि उन्नत भूमिका घेतलीत. शिवरायांचे सारे गडकोट किल्ले प्रत्यक्ष पाहिलेत. आग्रा ते राजगड असा ८५ दिवसांचा पायी प्रवास केलात. पन्हाळा ते विशाळगड अशी भरपावसात इतिहासातल्या त्याच तिथीला दौड केलीत.
संशोधन, चिंतन, मनन आणि प्रत्यक्ष दर्शन यामधूनच आपले लेखन घडत राहिले. ‘जाळत्या ठिणग्या’, ‘मुजऱ्याचे मानकरी’, ‘दख्खनची दौलत’,‘प्रतापगड’, ‘लोहगड’, ‘शिवनेरी’,‘आग्रा’, ‘पुरंदऱ्यांची नौबत’, ‘शिलंगणाचे सोने’, ‘महाराजा’, ‘शेलारखिंड’, ‘राजा शिवछत्रपति’ इत्यादी आपली २५ ग्रंथांची निर्मिती महाराष्ट्र शारदेच्या दरबारास भूषण ठरली आहे.
आपल्या लेखणीने आणि वाणीने लाखमोलाचे कार्य केले आहे. शिवचरित्रातून लोकजागृती नि लोकशिक्षण करून आपण राष्ट्रीयत्व, समत्व, बंधुत्व, मित्रत्व आणि ममत्व वाढीस लावलेत. पाच हजारावर व्याख्याने दिलीत. साऱ्या हिंदुस्थानातल्या दऱ्याखोऱ्यांनी, देवदैवतांनी आपले शिवगान ऐकले, महाराष्ट्ररसातली अमृतमयता अनुभवली. आजवर या कार्यातून २१ लाखांचे धन जमा झाले. हे सारे लोकधन आपण लोकार्पण केलेत. लोकराजाची परंपरा राखलीत. शिवरायांचे आजोबा मालोजीराजे यांनी भूमीमध्ये सापडलेले धन लोककार्याला खर्च केले. छ. शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्यावरचे धन स्वराज्यासाठीच अर्पण केले. याच भावनेने आपण महाराजा शिवछत्रपति प्रतिष्ठान, तसेच ५०० वर सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांना लाखमोलाची मदत केलीत. आपली मती सदैव शिवशक्तीच्या नीतीशी नाते जोडते. या नीतीने गती साधते. या गतीने शिवप्रीती निर्माण होते. ही शिवप्रीतीच राष्ट्रनिर्मितीस उपयुक्त ठरते. हीच भावना वसंतरावदादा पाटील यांनी जाणली आणि १९७१ साली आपल्या शिवचरित्रावरील व्याख्यानांचा सरकारी कर सत्वर माफ केला. शिवगंगेला मुक्तपणे लोकगंगेपर्यंत नेले. ही शिवगंगा राष्ट्रीय एकात्मभावाची गंगोत्री आहे. राष्ट्र म्हणजे लोकगंगेचा प्रवाह. शिवगंगेला मुक्तपणे लोकगंगेपर्यंत नेले. ही शिवगंगा राष्ट्रीय एकात्मभावाची गंगोत्री आहे. राष्ट्र म्हणजे लोकगंगेचा प्रवाह. या प्रवाहाचे पावित्र्य चारित्र्यात आहे आणि चारित्र्य पावित्र्यात आहे. येथे निर्भय, स्वाभिमानी, संस्कारसंपन्न आणि राष्ट्रासाठी प्राणांची कुरवंडी करणारा माणूस महत्त्वाचा.माणसातला माणुसकीचा झरा कायम ठेवणे, देवाची, धर्माची आणि देशाची, सामाजिक ऋण जाणून कर्तव्यभावाने सेवा करणे यातच खरा पुरुषार्थ आहे. विविध कार्यातून आपल्या पुरुषार्थाचे सार्थ दर्शन घडले आहे.
आपण १९५४ साली गोमंतक लढय़ात भाग घेतलात.दमणगंगेच्या काठी आपल्या ज्ञानयज्ञाचा शुभारंभ केलात. महाराष्ट्राच्या अस्मितेचे दर्शन घडविणारे, मराठी मनाला नि मराठी मातीला सुगंधित करणारे आपले शिवज्ञा नयज्ञ कार्य अखंड सुरूच आहे. याच कार्याचा भाग म्हणून १९७८ साली आपण युरोपच्या दौऱ्यावर गेलात. इंग्लंड, फ्रान्स, प. जर्मनी, स्वित्र्झलड, इटली, बेल्जियम, हॉलंड, ऑस्ट्रिया इत्यादी देश पाहिलेत. तेथील ऐतिहासिक वास्तू, किल्ले आणि प्रदर्शनामधील अप्रतिम व्यवस्था पाहून आपले मन आनंदले. तेथील ऐतिहासिक परंपरेचा अभिमान आणि प्रेम पाहून आपले अंतर्मन म्हणाले, ‘आपल्या महाराष्ट्रातल्या ऐतिहासिक वास्तूंना आणि किल्ल्यांना हे महत्भाग्य प्राप्त झाले तर, राष्ट्राच्या इतिहासाला आनंदसागराचे भरते येईल!’
आपल्या हृदयी शिवरायांचे वसतिस्थान असल्यामुळे शिवभक्ती हेच आपले जीवन झाले आहे. याच जीवनकार्याचा भाग म्हणून ‘शिवसृष्टी’ हे एक आपले स्वप्न बनले आहे.
१९७४ साली मुंबईस शिवाजीपार्कवर ‘शिवसृष्टी’ उभी करून आपण शिवकार्याचे हिमालयीन दर्शन घडविले होते.
अमेरिकेतील ‘डिस्ने लँड’ च्या धर्तीवर आपणास ‘शिवसृष्टी’ तयार करावयाची आहे. हा संकल्पही ‘श्री’ कृपे सिद्धीस जाणार आहे. जगाच्या स्फूर्तीचे तीर्थस्थान बनणार आहे. आपल्या परिश्रमांची गरुड-झेप अलौकिक शिवकार्याला दिगंत कीर्ती प्राप्त करून देत आहे, याचा आम्हांस अभिमान वाटतो. बाबासाहेब, आपले सारे जीवन गंगेच्या प्रवाहाप्रमाणे वाहते आहे. पवित्र आहे. या जीवनगंगेत ध्येयाचे, धर्माचे, सत्याचे, निष्ठेचे, निश्चयाचे, विनयाचे, विवेकाचे, कर्तव्याचे, कृतज्ञताभावाचे, संयमाचे, शिस्तीचे, त्यागाचे नि राष्ट्रप्रेमाचे सतत दर्शन घडत आहे.
‘मुखी शिवनाम । सुखी सर्व धाम।’
हा आपला मंत्र आहे. या मंत्राचे तंत्र आहे. ‘शिवचरित्राचे गुणरत्न भांडार’ या रत्नांची उधळण करीत आपली शाहिरी चालली आहे. ती अखंड चालणार आहे. आपल्या या शाहिरीचा शाहूनगरीने गौरव केला. १९६३ साली आपणास ‘शिवशाहीर’ ही पदवी दिली.
राजघराण्याचा अक्षय आशीर्वाद म्हणून आपण तिचा स्वीकार केलात. आज हीच ऐतिहासिक शाहूनगरी आपल्या कर्तृत्वसंपन्न ऐतिहासिक कार्याचा, सामाजिक कर्तव्य भावनेने सन्मान करीत आहे. या समयी आपल्या सत्कार्यरुपी जीवनवेलीला ‘निर्मल’ आधार लाभला. ‘अमृत’मय ‘प्रसादा’ची ‘माधुरी’ लाभली. वंशवेल बहरली. शिवगाने देहभान हरपली हेही लक्षात घेतले पाहिजे. आपणा सर्वास ‘श्री’ कृपेने उत्तम प्रतीचे आरोग्य लाभो.उदंड आयुष्य मिळो, अशी आदिशक्ती चरणी प्रार्थना करीत आहोत.
। जय शिवराय । जय सातारा । जय महाराष्ट्र । जय भारत ।

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो