वर्षभराचे लंडनवास्तव्य
मुखपृष्ठ >> रविवार विशेष >> वर्षभराचे लंडनवास्तव्य
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

वर्षभराचे लंडनवास्तव्य Bookmark and Share Print E-mail

 रामचंद्र गुहा  - रविवार, २९ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
अनुवाद :  अनिल पं. कुळकर्णी

शनिवार, ३० जून   रोजी मी नॅटवेस्ट बॅंकेच्या शाखेत ‘ वेस्टमिन्स्टर सिटी कौन्सिल ’च्या  नावे  ४३ पाऊंड, ९४ पेन्स  भरले  आणि जगातील अतिशय रम्य आणि आकर्षक शहराचा  खऱ्या अर्थाने करदाता नागरिक म्हणून  औपचारिकपणे माझे  वर्षभराचे तेथील वास्तव्य  संपले.  लंडनला जगातील सर्वात रम्य आणि सुंदर शहर संबोधल्याला कदाचित न्यू यॉर्ककरांचा आक्षेप असेल, तथापि लंडन आपली शान सर्वार्थाने आजही टिकवून आहे हे मान्य करावेच लागेल.

लंडनमधील इमारतींची रचना,जडण-घडण, आकार, वास्तुसौंदर्य, हे मनाला भुरळ घालणारे आहे. ह्य़ा इमारती आपल्याशी जणू अशा काही बोलतात की मन मोहून जाते. येथील इमारतींच्याही आपण प्रेमात पडतो. जगात  इतरत्र  असलेल्या गगनचुंबी इमारती कोणाशी अशा बोलतात का ?  लंडनमधील चंद्रकोराकार  वळणदार रस्ते , घुमटाकार इमारती  एक वेगळाच आनंद, समाधान देतात, तो आनंद मॅनहटनमधील रस्ते आणि इमारती देऊ शकत नाहीत.या व्यतिरिक्त लंडनमध्ये वेगवेगळ्या आकाराचे जलाशय,बगीचे सुद्धा आहेत.
 सामाजिकदृष्टय़ा विचार करता, लंडन हे सौंदर्य आणि वैविध्यात  न्यू यॉर्कच्या तुलनेत खूपच उजवे आहे हे निश्चित. लंडनच्या  हमरस्त्यांवर आणि  भुयारी मार्गावर  अरबी आणि हिंदी भाषिकांबरोबरच इंग्लिश आणि फ्रेंच  आणि आता पोलिश (पोलंडचे नागरिक) यांचीही गर्दी दिसते. याउलट न्यू यॉर्कमध्ये एकभाषी लोकच जास्त आढळतात. इतर देशांतून अमेरिकेत आलेले लोक घरी मातृभाषेत तर बाहेर मात्र बहुतांश लोक इंग्लिशच बोलतात. लंडनमध्ये मात्र  कृष्णवर्णीय,श्वेतवर्णीय आणि इतरांचे संयुक्त गट उद्याने,उपहारगृहे आणि अन्यत्र दिसतात. मॅनहॅटनच्या उपहारगृहांमध्ये असे चित्र दिसत नाही.
  alt

तसे तर लंडनमधील वास्तव्य मला आवडणारच होते, परंतु मला ते अधिक भावले ते ज्या ठिकाणी मी राहात होतो, त्या ठिकाणामुळे. मी मेदा व्हेलमध्ये घर भाडय़ाने घेतले होते. क्रिकेटची काशी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानापासून  हे ठिकाण अगदी जवळच आहे. पुढे काही अंतरावर रिजण्ट्स पार्क आहे. माझ्या मूळगावी म्हणजे बंगळुरूमध्ये पदपथ हे मोटारींनी व्यापून टाकले आहेत. ‘पार्किंग’ची शिस्तच नाही. कसेतरी वाट काढत जावे लागते. याच्या अगदी  उलट अनुभव मी लंडनमध्ये वर्षभर घेतला. लॉर्ड्स मैदानापासून   रिजण्ट्स  पार्कपर्यंत  सकाळी छान फेरफटका  मारायचो ,तलावाला  तीन-चार गोल फेऱ्या मारून  दुसऱ्या अधिक चांगल्या आणि आकर्षक रस्त्याने घरी परतायचो. हा तासाभराचा फिरण्याचा व्यायाम असे. फिरतांना आयपॉडवर  हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  ऐकण्याची मजा काही औरच असे. माझे भाग्य असे की मला राहाण्यासाठी मिळालेली जागा आणि कामासाठीचे ठिकाण दोन्ही  जागा सुखकारक होत्या. मी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (एल एस इ ) मध्ये अध्यापनाचे (शिकविण्याचे ) काम करीत होतो . ही संस्था  शैक्षणिक  लौकीक आणि    प्राचिनत्वाच्या  संदर्भात  ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठाच्या खालोखाल  तसेच हार्वर्ड,प्रिन्स्टन, कोलंबिया, स्टॅनफर्ड  आणि एमआयटी यांच्या तोडीची मानली जाते.   एलएसइ ही संस्था जगाच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शहरात  वसली असल्याने तिला आणखी वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. याठिकाणी आफ्रिका आणि आशियातील,उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील, तसेच  युरोप खंडातील विद्वान अभ्यासक वरचेवर हजेरी लावत असतात. एखाद्या मोझांबिक इतिहासकाराला  ब्राझिलमध्ये जायचे असेल,तर  लंडनमार्गे जाणेच त्याला श्रेयस्कर  ठरते. एखाद्या  भारतीय समाजशास्त्रज्ञाला  सॅन फ्रान्सिस्कोला ,अमेरिकन  राज्यशास्त्रज्ञाला  कोंगोच्या अभ्यासासाठी जायचे असेल,तर या सर्वाना लंडनमार्गे जाणे सोयीचे ठरते अशा ठिकाणी ‘एलएसइ’ ही संस्था वसली आहे. आदर्श ठिकाणी वसली असल्याने या संस्थेचे महत्व अधिक वाढले आहे. विभागीय चर्चासत्रे, जाहीर व्याख्यानांसाठी  हार्वर्ड आणि कोलंबिया विद्यापीठांमध्ये गर्दी होत असेल, तथापि एलएसइ मध्ये  सत्रकाळात  दररोज किमान चार निरनिराळी व्याख्याने  असतात.  आमचे बंगळुरू शहर तसे शांत, आणि  बौद्धिक जीवनाच्या संदर्भात काहीसे उदासीन,उत्साहहीन असे आहे.  त्यामुळे लंडनमधील वास्तव्यादरम्यान मी ही कसर भरून काढली. पुरेपूर आनंद घेतला. या वर्षभराच्या काळात मी  अनेक चांगली व्याख्याने ऐकली.बंगळुरूमध्ये असतांना १० वर्षांच्या काळात किंवा त्यापेक्षाही जास्त वर्षांच्या काळात  ऐकली नसतील एवढी व्याख्याने -आणि तीही अत्यंत उद्बोधक, ज्ञान वाढविणारी  अशी मी या एक वर्षांच्या काळात ऐकली. अरबी वसंतऋतु या विषयावरील अनेक व्याख्याने ऐकली. लॅटिन अमेरिकन राजकारणावरील  चर्चेत सहभागी झालो.
 लंडन हे अांतरराष्ट्रीय शहर तर आहेच, त्याशिवाय  लौकिकार्थाने ते एक भारतीय शहरही आहे. लंडनमध्ये येऊन गेलेल्या आणि वास्तव्य करून गेलेल्या भारतीयांमध्ये  १७ व्या आणि १८ व्या शतकातील अनेक दर्यावर्दी खलाशी,शिपाई आणि  घरेलू कामगारांचा समावेश आहे. त्यानंतरच्या काळात राजे-महाराजे,नवाब, आणि १९ व्या शतकापासून विद्यार्थी आणि व्यावसायिक यांनी लंडनला भेटी दिल्या आणि काहीकाळ तेथे वास्तव्यही केले.
 आधुनिक भारताच्या इतिहासकारांच्या दृष्टीने लंडनला वेगळे आणि विशेष महत्व आहे. राजा राममोहन राय, रवींद्रनाथ टागोर, यांचे बराच काळ लंडनमध्ये वास्तव्य होते.पितामह दादाभाई नौरोजी हे तर काही दशके येथे वास्तव्य करून होते.लंडनच्या फिन्सबरी  विभागातून ते संसद सदस्य (खासदार) म्हणून निवडून गेले होते.
 ज्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मी  अध्यापन कार्य करीत होतो,त्या संस्थेत  व्ही.के.कृष्ण मेनन, के.आर.नारायणन,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्यांनी  शिक्षण घेतलेले आहे. संस्थेच्या उत्तरेस होलबोर्न आहे.या ठिकाणी फारपूर्वी एक शाकाहारी उपहारगृह होते आणि  तरूण मोहनदास करमचंद गांधी  (महात्मा गांधी) तेथे सतत येत असत. विद्यार्थी असतांना गांधी बरीच वर्षे लंडनमध्ये होते आणि पुढे १९०६,१९०९ आणि १९१४ मध्ये ते लंडनमध्ये येऊन गेले.प्रत्येकवेळी  दक्षिण आफ्रिकेतून आले.  १९३१ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या  मागणीचा आग्रह  धरण्यासाठी गांधीजी लंडनमध्ये आले- ती त्यांची शेवटची लंडनभेट  !
 प्रत्येक लंडनभेटीच्यावेळी गांधीजी तेथे काहीकाळ वास्तव्य करीत. अनेकांशी चर्चा करीत,त्यांना या शहराचा लळा लागला होता आणि तेथे त्यांचा मित्रपरिवारही मोठा होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या माणसांकडून वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे चर्च आणि संसदगृहाची मोडतोड,नासधूस होत असल्याच्या बातम्या ऐकल्यावर गांधीजींना अतिशय वाईट वाटले.वास्तविक त्यावेळी गांधीजींनी  ‘भारत छोडो’ च्या निर्णायक लढय़ाची तयारी चालविली होती,तरीही वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे चर्च आणि संसदगृहाची  मोडतोड होत असल्याचे ऐकल्यानंतर त्यांना अनावर दु:ख झाले.
  एल एस ई मध्ये मी अध्यापनकार्य करीत असतांना माझे कार्यालय कोलंबिया हाऊसमध्ये होते.तेथून जवळच इंडिया हाऊस असून त्यात युनायटेड किंगडममधील  भारतीय उच्चायुक्तांचे  कार्यालय आहे. गेल्या प्रजासत्ताक दिनी ( गुरुवार,२६ जानेवारी २०१२)  मला इंडिया क्लबमध्ये माझ्या एका मित्राबरोबर दुपारी भोजनासाठी जायचे होते. इंडिया क्लब हा कृष्ण मेनन यांनी स्थापन केलेला असून १९३०-१९४० च्या दरम्यान  बराच काळ  मेनन यांनी तेथे वास्तव्यही केले.  क्लबपर्यंत जाण्यासाठी मला इंडिया हाऊसवरून जाणे  क्रमप्राप्त होते. त्याठिकाणी दाढीधारी वयस्कर  लोकांचा एक गट  ‘‘ खरा दहशतवादी कोण आहे ? भारतच आहे,भारतच आहे.भारतीय  लष्कराने काश्मीरमधून  माघारी फिरावे ’’ अशा घोषणा देत  होता. मी तेथून पुढे गेलो तेव्हां एक छायाचित्रकार  वेगाने छायाचित्रे घेतांना दिसत होता. ही छायाचित्रे वृत्तपत्रांकडे पाठविली जाणार, तसेच  नेटवरही टाकली जाणार हे स्पष्टच होते. मी घोषणा देणाऱ्यांना टाळून  छोटय़ा बोळातून इंडिया क्लबकडे निघालो.तेथे मला जवाहरलाल नेहरू यांचा नुकताच उभारलेला अर्धपुतळा दिसला. खरेतर पूर्वीपासूनच तो तेथे होता,पण  श्रीलंकेतील  राजकीय पेचाच्या वेळी भारताने घेतलेल्या भूमिकेचा निषेध म्हणून मध्यंतरी  श्रीलंकेच्या  काही तामिळींनी त्याची नासधूस केल्याने  आता तो पुन्हा उभारण्यात आला आहे. तात्पुरती जागा देऊन उभारण्यात आलेल्या भारतीय  वकिलातीच्या  एका बाजूला नेहरूंचा पुतळा आहे,तर दुसऱ्या बाजूस भारतविरोधी घोषणा दिल्या जात आहेत. काश्मीरमधून भारतीय फौजांना मागे फिरण्याचे फर्मानच जणू दिले  जात आहे  ही अत्यंत क्लेशकारक बाब म्हणावी लागेल. जवाहरलाल नेहरू हे मूळचे काश्मिरीच होते ही वस्तुस्थिती नजरेआड करून कसे चालेल .. ?

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो