नाट्यरंग : ‘आता आपणच!’
मुखपृष्ठ >> लेख >> नाट्यरंग : ‘आता आपणच!’
 

लाइफ स्टाईल-मनोरंजन-कला

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नाट्यरंग : ‘आता आपणच!’ Bookmark and Share Print E-mail

दहशतवाद आपल्या दाराशी!
रवींद्र पाथरे - रविवार, २९ जुलै २०१२

नव्वदच्या दशकात जागतिकीकरणाबरोबरच जागतिक दहशतवादही फोफावत गेला. आपल्यापुरतं बोलायचं झालं तर पूर्वी पाक-प्रशिक्षित काश्मिरी अतिरेक्यांपुरत्याच सीमित असलेल्या दहशतवादाची व्याप्ती पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणाऱ्या शीख अतिरेक्यांपर्यंत पसरत गेली. इंदिरा गांधींनी ऑपरेशन ब्लू स्टार कारवाई करून खलिस्तानी दहशतवादाचा म्होरक्या भिंद्रनवाले याला कंठस्नान घातल्यावरच धगधगत्या दहशतवादी ज्वाळांमध्ये होरपळून निघालेला  पंजाब शांत झाला. त्यानंतर पाकिस्तानने लष्कर-ए-तोयबा आणि तालिबानी अल् कायदाचे प्रशिक्षित अतिरेकी पाठवून भारतात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. संसद व अक्षरधाम मंदिरावरील दहशतवादी हल्ले, १९९३ साली मुंबईत लोकल ट्रेन्स व इतरत्र घडवलेले बॉम्बस्फोट आणि त्यानंतर पुनश्च २००८ साली ताज हॉटेल, ओबेराय, नरिमन हाऊस, सीएसटी रेल्वेस्टेशन या ठिकाणी झालेले भीषण दहशतवादी हल्ले.. अशी दहशतवादी हल्ल्यांची मालिका ठराविक अंतरानं भारतात घडवली जात आहे. आजही हा धोका कायम आहे. यापैकी काही दहशतवादी हल्ल्यांचे धागेदोरे पोलीस यंत्रणांना सापडले. या हल्ल्यांमध्ये सहभागी असलेले काही आरोपी सापडलेही; परंतु त्यांच्यामागचे खरे सूत्रधार अद्यापि पाकिस्तानात राजरोसपणे उजळ माथ्याने वावरताहेत. भारताने या दहशतवादी कारवायांबद्दलचे ढीगभर पुरावे देऊनही पाकिस्तानने मात्र आपल्या कानांवर हात ठेवले आहेत. आपला या हल्ल्यांशी काहीच संबंध नाही, एवढं एकच पालुपद पाक राज्यकर्ते पुन: पुन्हा लावून आहेत. भारत सरकारही राजनैतिक दबाव आणण्याव्यतिरिक्त पाकचं काहीच वाकडं करू शकलेला नाही.  
आपली मराठी रंगभूमी नेहमीच वर्तमानाशी नातं सांगत आलेली असल्यानं प्रचलित विषयांवर व्यक्त होणारी नाटकं इथं प्रत्येक काळात उन्मेखून येत असतात. दहशतवादाचा वडवानल आपल्याला ग्रासत असताना त्याला स्पर्श न करील तर ती मराठी रंगभूमी कसली? ‘आरडीएक्स’ ही एकांकिका, ‘तिची १७ प्रकरणे’ हा दीर्घाक, योगेश सोमण यांचं ‘अचानक’ आणि पुरुषोत्तम बेर्डेचं कसाब खटल्यावरचं नाटक, तसंच अलीकडेच रंगमंचावर आलेल्या ‘भारत भाग्यविधाता’सारख्या नाटय़कृतींतून दहशतवाद, तो घडविण्याच्या पद्धती आणि त्यामागच्या मानसिकतेचा शोध, तसंच त्या अनुषंगानं देशभक्ती व मानवतेच्या तत्त्वज्ञानाचा घेतला गेलेला मागोवा.. हे सारं मराठी रंगभूमीवर येऊन गेलेलं आहेच. दहशतवाद आता दूर राहिलेला नाही, तर तो आपल्या घरापर्यंत, नव्हे- अगदी घरातही शिरला आहे. कारण या दहशतवादी कारवायांत बहुतेकदा आपल्या देशातल्याच सामान्य लोकांना हाताशी धरलं गेलेलं आहे. सामान्य पापभीरू माणसं दहशतवाद्यांचं लक्ष्य कशी होतात, यामागचं तर्कशास्त्र साध-सोपं आहे. ज्यांना गुन्हेगारी पाश्र्वभूमी नाही अशा माणसांकरवी या कारवाया घडवून आणल्यास पोलिसांच्या डोळ्यांत धूळ झोकणं सहज शक्य होतं. तसंच धर्माधांकरवीही अशा प्रकारचे हल्ले करवणं सोपं जातं, हे दहशतवाद्यांच्या सूत्रधारांना ठाऊक आहे. त्यामुळे ते स्वत: नामानिराळे राहतात आणि त्यांचा कार्यभागही सहज साधला जातो. अत्यल्प मोबदल्यात परिस्थितीनं नाडलेल्या चेहराविहीन माणसांना हाताशी धरणं पाक दहशतवादी म्होरक्यांना फायद्याचं ठरतं. त्यामुळेच भारतीय पोलीस तसंच गुप्तचर यंत्रणांना हे दहशतवादी पुरून उरतात.
दहशतवादावर नमनाला एवढं घडाभर तेल ओतण्याचं कारण हे की, महाराष्ट्र रंगभूमी निर्मित ‘आता आपणच!’ हे दहशतवाद आणि त्यामागील कार्यप्रणालीचं चित्रण करणारं नवं नाटक अलीकडेच रंगभूमीवर आलं आहे. सचिन नारकर लिखित व प्रशांत विचारे दिग्दर्शित या नाटकात सामान्य लोकांना दहशतवादी कशा प्रकारे आपल्या जाळ्यात ओढतात आणि त्यांचा वापर करतात, याचं चित्रण केलेलं आहे. मात्र प्रॉब्लेम इतकाच आहे, की मनोरंजनाच्या अवगुंठनातून दहशतवाद या विषयाला हात घालण्याच्या अट्टहासापायी त्यातलं गांभीर्य बरंचसं पातळ होतं. आणि शंकितही!
एका चाळीतील भाडय़ाच्या खोलीत विविध सामाजिक पाश्र्वभूमी असलेले, परंतु यथातथा आर्थिक स्थितीशी झुंजणारे सात तरुण एकत्र राहत असतात. त्यांच्यातला एकजण पदवीधर असूनही बेकार, तर कुणी शिक्षणाअभावी मिळेल ती नोकरी करून कसंबसं पोट भरणारा, एकजण कॉलेज करणारा, तर एक चाळमालकाच्या वेंधळ्या मुलीशी फ्लर्ट करून ती खोली भविष्यात आपल्या मालकीचा होण्याची इच्छा बाळगणारा. प्रत्येकाचे स्वभाव वेगळे. तऱ्हा वेगळ्या. कुणी परिस्थितीचं रडगाणं गाणारा, तर कुणी त्यावर स्वार होऊ बघणारा. कुणी आतल्या आत कुढणारा, तर कुणी ‘खाओ, पिओ, मजा करो’ स्टाईलीत जगणारा. भिन्न प्रवृतीच्या या सर्वामध्ये एक बंध मात्र चिवट असतो.. मैत्रीचा! त्या जोरावरच ते एकमेकांना सांभाळून घेत, भांडत आणि पुन्हा एकत्र येत आला दिवस ढकलत असतात. विजय पदवीधर असूनही गेली दोन वर्षे तो नोकरीसाठी अनेक ऑफिसांचे उंबरठे झिजवतोय. आता तर तो पार मेटाकुटीला आलाय. गावाकडे आई-वडिलांच्या त्याच्यावर असलेल्या आशा आता कोमेजून गेल्यायत. मित्रांच्या जीवावर आपण किती काळ पोट जाळायचं, असा प्रश्न त्याला पडलाय. शेवटी तो नाक्यावरच्या गुंड विकीभाईचा आश्रय घेतो आणि एका जुगाराच्या अड्डय़ावर मनाविरुद्ध चाकरी पत्करतो. त्याचं हे वागणं कृष्णाला अजिबात आवडत नाही. विकीभाईच्या या उद्योगामुळे विजयचं आयुष्य बरबाद होणार, हे कृष्णा समजून चुकतो. (एकेकाळी कृष्णानंही हेच धंदे केलेले असतात.) एका चांगल्या मुलाच्या आयुष्याचं मातेरं झालेलं न बघवल्यानं संतापाच्या भरात कृष्णा विकीभाईचा हाफ मर्डर करतो. पोलीस कृष्णाला पकडून नेतात. त्याला सोडवण्यासाठी दहा लाखाचा जामीन द्यावा लागणार असतो. फाटक्या खिशाच्या या तरुणांना आला दिवस ढकलण्याची मारामार; तिथं दहा लाख कुठून आणणार?
याचदरम्यान त्यांच्या चाळीत राहायला आलेली सिमरन नावाची एक फटाकडी तरुणी यतीनशी मैत्रीचं नातं जोडू बघत असते. तिच्यावर फिदा असलेला यतीन तिच्या जाळ्यात सहजपणे अडकतो. या लोकांना कृष्णाच्या सुटकेसाठी मोठय़ा रकमेची गरज आहे, हे समजल्यावर ती आपल्या अंकलकरवी त्यांना दहा लाख रुपये देऊ करते. या बदल्यात तिच्या काकांचं काही सामान निरनिराळ्या ठिकाणी नेऊन ठेवण्याचं काम त्यांना करावं लागणार असतं. वर त्याचा घसघशीत मोबदलाही मिळणार असतो. नव्हे, तो त्या प्रत्येकाच्या घरी परस्पर पोचताही होतो. मात्र, कसलं सामान पोचवायचं, याचं उत्तर सिमरनचे अंकल देत नाहीत. कृष्णाला यात काहीतरी काळंबेरं असल्याचा आधीपासूनच संशय असतो. पाक दहशतवादी म्होरक्यांनी या सर्वाची परिस्थिती हेरून त्यांना पद्धतशीरपणे आपल्या जाळ्यात अडकवलेलं असतं. या तरुणांच्या हालचालींवर त्यांची सख्त नजर असते. त्यांनी हे काम करायचं नाकारल्यास त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी सिमरनचे अंकल देतात. त्यांचं काम करण्याखेरीज यांच्यापुढं आता दुसरा पर्यायच उरलेला नसतो.
..काय होतं पुढे? या प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्ष नाटकातूनच मिळवणं उचित ठरेल.
लेखक सचिन नारकर यांनी दहशतवादासारखा आजचा ज्वलंत विषय घेऊन त्यावर नाटक करायचं ठरवलं यातून त्यांचं सामाजिक भान प्रतीत होत असलं तरीही गंभीर पद्धतीनं हा विषय हाताळण्याऐवजी त्यांनी त्याला रंजनाची फोडणी दिली आहे. परिणामी दहशतवादाबद्दल जाणीवजागृती करण्याचा नाटकाचा हेतू काहीसा मागे पडतो. त्यातही उत्तरार्धात पोलीस दहशतवाद्यांना पकडतात आणि नाटक घाईघाईनं गुंडाळलं जातं. सर्वसामान्य माणूस नकळतपणे दहशतवाद्यांच्या हातचं बाहुलं कसं बनू शकतो, हा संदेश या नाटकातून ज्या प्रकर्षांनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला हवा, ती तीव्रताच त्यामुळे हरवते. याहूनही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे- या नाटकातला नेमका काळ कोणता, हे कळत नाही. चाळसंस्कृती, तिथं एकाच खोलीत राहणारे अनेकजण वगैरे गोष्टी आता दुर्मीळ झाल्या आहेत. शिवाय नाटकात ज्या प्रकारचा मोठा रेडिओ घरात दाखवलेला आहे, त्यावरून हा काळ साठ-सत्तरच्या दशकातला वाटतो. परंतु तेव्हा असा दहशतवाद कुठं फोफावला होता? नाटय़ांतर्गत काळाचा हा घोटाळा अक्षम्यच आहे. त्यामुळे संपूर्ण नाटकच खोटं ठरतं. असो. नाटकातली पात्रंही साचेबद्ध आहेत. त्यांच्या लकबी, त्यांचं वागणं-बोलणं हेही जुन्या मराठी नाटकांतल्या ‘स्टॉक’ पात्रांप्रमाणे आहे. साठ-सत्तरच्या दशकांतला मराठी नाटकाचा ठरीव फॉम्र्युला आज वापरण्याचं प्रयोजन काय? ‘मालवणी’ विजयला अस्खलित मालवणी बोलणं जमलेलं नाही. वेगवेगळ्या प्रांतांतली वेगवेगळ्या बोली बोलणारी पात्रं एकत्र दाखवण्याचा हा अट्टहास कशासाठी? एक मात्र खरंय, की या नाटकात ज्या तऱ्हेनं दहशतवाद आज आपल्या घरात घुसू मागतोय त्याचं वास्तव चित्रण केलेलं आहे. पण ते करताना ‘स्वस्त’ मनोरंजनाचा घाट घालण्यामागचं कारण मात्र आकळत नाही.
नाटकात अशा काही महत्त्वपूर्ण त्रुटी व दोष असले तरी सादरकर्त्यांची नाटक करण्यामागची तळमळ सच्ची आहे, हेही नाटक पाहताना सतत जाणवतं. दिग्दर्शक प्रशांत विचारे यांनी संहितेतील वरील दोषांचा विचार केलेलाच नाही, की त्यांचं त्याकडे दुर्लक्ष झालंय, हे कळायला मार्ग नाही. काळाचा विचार दिग्दर्शकाच्याही ध्यानी येऊ नये? अर्थात त्यांनी रंगमंचावर जे सादर केलंय त्यात त्यांची मन:पूर्वकता दिसते. काळाच्या संदर्भाची ही मोठीच गडबड नेपथ्यकार रवी सावंत आणि अंकुश कांबळी यांच्याही लक्षात आलेली नाही. त्यांचं नेपथ्य संहितेला धरून व वास्तवदर्शी आहे. यातलं एकमेव गाणं (गीत- डॉ. महेंद्र कठाडे) झालंयही चांगलं आणि ते रंगमंचावर सादरही होतं बेधुंद! संगीतकार नयन जाधव व निखिल ठक्कर यांना त्याचं श्रेय जातं. (अर्थात कलाकारांनाही!) विजय गोळे यांनी प्रकाशयोजनेतून तणावपूर्ण प्रसंग ठळक केले आहेत. मुकेश गायकवाड यांनी रंगभूषेतून, तर रमेश चाळके यांनी वेशभूषेद्वारे पात्रांना यथार्थ ‘चेहरा’ दिला आहे.
सगळ्याच कलाकारांनी झोकून देऊन केलेली रसरशीत कामं हा या नाटकाचा विशेष होय. भूषण घाडी (कृष्णा), सागर खेडेकर (विजय), हरी ठमके (यतीन), प्रदीप वेलोंडे (मया), सचिन नारकर (नितीन), गणेश जेठे (सचिन), तुषार कठाडे (बारक्या), श्वेता बोराटे (तृप्ती), रचना विचारे (सिमरन), नरेश वाघमारे (दूधवाला व इन्स्पेक्टर), शोण भोसले (भाई व पोलीस) आणि हरेश मयेकर (पंटर) या सर्वानीच आपापल्या भूमिका समजून-उमजून साकारल्या आहेत.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो