नरेन्द्र मोदी लोकप्रिय पण,
मुखपृष्ठ >> रविवार विशेष >> नरेन्द्र मोदी लोकप्रिय पण,
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नरेन्द्र मोदी लोकप्रिय पण, Bookmark and Share Print E-mail

 

उद्याचा नेता अद्याप ठरलेलाच नाही!
संकलन : संजय बापट, प्रसाद रावकर - रविवार, २९ जुलै २०१२

नरेन्द्र मोदी यांना कुणी पुढे आणतेय आणि कुणी नको म्हणतेय अशी परिस्थिती नाही. अटलजींसारखे नेतृत्व कुणाकडेच नाही. मोदी लोकप्रिय आहेत. अडवाणीही लोकप्रिय होते, त्यांनी अयोध्येचा संघर्ष केला, पण नेता वाजपेयी झाले. त्यामुळे उद्याचा नेता कोण होईल ते अद्याप ठरलेले नाही. लोकसभेपूर्वी तसे होईल असे वाटत नाही.  नेतृत्व ही परिस्थितीच्या ओघात होणारी गोष्ट आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या, त्यापूर्वी मनोहर जोशी मुख्यमंत्री होणार असे कुणी सांगितले असते तर खरे वाटले असते का?

‘लोकसत्ता- आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमातील गोपीनाथ मुंडे यांचे मुक्तचिंतन..
मुद्दा, जो तुम्हा-आम्हा सर्वाच्याच मनात आहे, तो जाणून घेणे सर्वानाच आवडेल. तो म्हणजे, सध्या भाजपचे आणि तुमचे  काय चालले आहे?
मुंडे - भारतीय जनता पक्ष हा या देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. आजच्या भाजपचे विश्लेषण करायचे झाले तर थोडे मागे जावे लागेल. १९७७ साली आणीबाणीनंतर पहिल्यांदा देशात बिगर काँग्रेसी असे जनता पक्षाचे सरकार आले. १९८० साली भाजपची स्थापना झाली आणि जवळजवळ एक दशक म्हणजे १९९० पर्यंत भाजपने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली. पण त्यात यश आले नाही. अयोध्येच्या आंदोलनानंतर भाजपला जनाधार मिळाला आणि आज भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत, सर्वाधिक राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे. आता नजीकच्या भविष्यकाळात आपला देश द्विपक्ष लोकशाहीकडे चाललेला आहे. या परिस्थितीत काँग्रेसची वा भाजपची एकटय़ाची  येत्या १०-१५ वर्षांत तरी देशात सत्ता येईल, असे वाटत नाही. एक काळ असा होता की अटलजी, अडवाणीजी यांचे नेतृत्व भाजपकडे होते. पण आता सामुदायिक नेतृत्व आहे आणि भाजप या देशातला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून लोकसभेत आहे.  भाजपची शक्ती वाढत आहे. लोकसभेच्या निवडणुका २०१४ मध्ये असल्या तरी गुजरात, हिमाचलच्या निवडणुका त्याआधी आहेत आणि या निवडणुकीनंतर भाजपचे खरे मूल्यमापन होईल. दुसरे म्हणजे दक्षिणेत कर्नाटक वगळता इतर राज्यांत आमचा परफॉरमन्स जवळपास नाही आणि केरळ, आंध्र, तामिळनाडू या राज्यांमध्ये आमच्या परफॉरमन्समध्ये फार काही सुधारणा होईल असे चित्र नजीकच्या काळात दिसत नाही. ओरिसा आणि हरियाणात आम्ही एकला चलो रेची भूमिका घेतली, ती हितावह ठरली नाही. बिजू पटनाईक यांच्याबरोबर गेलो असतो तर त्याचा लाभ झाला असता. तेथे आमचे सहा खासदार, ३० आमदार होते. पण आता तेथे आमचा एकही खासदार नाही. जो डाव खेळलो तो यशस्वी झाला नाही.  
गिरीश कुबेर - यूपीए गोंधळलेले आहे, हे नक्कीच आहे. अशा वेळी सक्षम विरोधी पक्ष असणे आणि एकमुखाने चेहरा पुढे ठेवणे आणि आपण पर्याय आहोत असे विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यात भाजप अपयशी ठरला आहे का?
मुंडे - मुळात लोकशाहीत विरोधालाही मर्यादा आहेत. सध्या देशातील महागाई, भ्रष्टाचार आणि

दहशतवाद या तीनही मुद्दय़ांवर भाजप आक्रमक आहे. दोन वेळा महागाईवर कपात सूचना आणली. त्यावेळी समाजवादी पार्टी आणि मायावती यांनी पाठिंबा दिला नसता तर सरकार कोसळले असते. आता भाजपची समन्वयाची भूमिका आहे. संसदेत डावे आणि भाजपने तीनवेळा एकत्र मतदान केले. डावे आणि भाजपने एकाच वेळी ‘भारत बंद’ केला. एका आवाजात सरकारविरोधात लढलो. हे तीन मुद्दे निवडणुकीपर्यंत राहणार आहेत. १५-२० वषार्ंपूर्वी जनसंघाला मत देणारा एक वर्ग होता. समाजवादी विचारांचे अनेक पक्ष होते. त्यांच्या ध्येय-निष्ठेबद्दल कुणालाही अनादर नव्हता. तेव्हा मतदारही कमिटेड होते. पण आता मतदाराची  भूमिकाही बदलत आहे. ‘लेजिस्लेचर विंग’वर आम्ही प्रभावी आहोत, पण रस्त्यावर उतरून लढण्यासाठी जेवढे प्रयत्न करायला हवे होते ते केले गेले नाहीत. पुढच्या दोन वर्षांंत ते करावे लागतील. जी भूमिका विधानसभेत, लोकसभेत मांडता त्याला कृतीची जोड हवी. त्यासाठी संघर्ष, प्रयत्न करायला हवेत. ते होत नाहीत. यात काही मूलभूत अडथळे आहेत. या देशात सहा महिने असे नाहीत की कुठल्या ना कुठल्या राज्यांत  निवडणुका नाहीत. त्यामुळे मूलभूत प्रश्नांवर चर्चा करायला, अभ्यास करायला, जनआंदोलन करायला उसंत मिळत नाही. भाजपने भारत बंद केला, जेलभरो आंदोलन केले. पण ही हत्यारे वापरून बोथट झाली आहेत. देशभर मान्य होईल असे आंदोलन आम्हाला सापडलेले नाही, सापडले तर नक्कीच आंदोलन करू. अलीकडे महागाई लोकांच्या अंगवळणी पडली की काय असे वाटू लागले आहे. एकेकाळी महागाईची आंदोलने ही मध्यमवर्गीयांची आंदोलने समजली जायची.
दिनेश  गुणे- लोकांमध्ये जागृती का होत नाही?
मुंडे - आताच्या तरुण पिढीला स्वातंत्र्याची चळवळ माहीत नाही; जयप्रकाशजींची चळवळ माहीत नाही. मूल्याधिष्ठित राजकारणापासून ते दूर आहेत. या सगळ्या पिढीला हे इश्यू आपले वाटतात की नाही माहीत नाही. तरुणांना राजकीय पक्षांबद्दल, नेत्यांबद्दल आदर राहिलेला नाही. दुसरं म्हणजे, आता राजकारणात येताच लोकांना तिकीट हवे असते, मंत्रीपद हवे असते. राजकीय पक्षाचा कार्यकर्ता संधिसाधू झालेला आहे. काही काळ उमेदवारी करावी अशी भावनाच राहिलेली नाही. ही चिंतेची बाब आहे. दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते फोडून आपल्या पक्षाचे कार्य वाढविण्याची स्पर्धा सुरू आहे. पण आपणच आपले कार्यकर्ते घडवावे यासाठी वेळ द्यावा लागतो, ट्रेनिंग द्यावे लागते.उमेदवारीचा काळ घेऊन राजकारण करावे अशी अवस्था नाही. अशी अवस्था निर्माण करावी लागते.
गिरीश कुबेर - तुमचा पक्ष कार्यकर्ता आधारित असताना असा प्रश्न तुम्हाला पडावा याचे आश्चर्य वाटते. रा. स्व. संघाचं पण काही चुकतंय का?
मुंडे - भाजप हा कॅडर-बेस्ड पक्ष आहे. भाजपमध्ये समर्पितपणे काम करणारे कार्यकर्ते आहेत. परंतु त्यांचा जनतेशी गुणाकार झाल्याशिवाय यश मिळत नसते. भाजपमध्ये दोन वेळा मोठी भरती झाली. पहिली आणीबाणीच्या काळात आणि दुसरी म्हणजे संघ आणि विद्यार्थी परिषदेची भरती. आणीबाणीच्या काळात मोठय़ा संख्येने कार्यकर्ते आले. आता मोठय़ा भरतीसाठी पुन्हा एकदा जनआंदोलन करावे लागेल. भाजपमध्ये अनेकांना घेत आहोत. पण जेव्हा दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांना घेतले जाते तेव्हा पक्षातील कार्यकर्ते दुखावतात. संघाचे काम संघ करीत आहे. वडिलांनी भांडवल दिले आहे, कसे वापरायचे ते आम्ही ठरवायचे आहे. त्या भांडवलावर यशस्वी झालो की नाही याचे मूल्यमापन करा. वडील आणखी भांडवल द्यायला तयार आहेत. पण वडिलांच्या भांडवलावर चालणार नाही, आपल्याला आपले भांडवलही निर्माण करावे लागेल.
गिरीश कुबेर - संघाला कधीच घाई नसते. ५० वर्षांनंतरचा ते विचार करीत असतात. या सर्वात कुठेतरी मोठा विसंवाद आहे. तो कमी करण्यात नेतृत्व कमी पडते असे वाटत नाही का?
मुंडे - देशाच्या, समाजाच्या जशा आमच्याकडून अपेक्षा आहेत, तशा संघाच्याही आहेत. उद्याच आम्ही सत्तेत जावे अशी संघाला घाई नाही. शेवटी संघाची आणि भाजपची काही गणिते आहेत. संघ भाजपच्या दैनंदिन कामात भाग घेत नाही. यश-अपयशासाठी भाजपलाच स्ट्रॅटेजी ठरवावी लागेल. ती भाजप करीत आहे. त्याला यश येतंय की नाही हे भविष्य ठरवेल. मला वाटते आम्ही यशस्वी होऊ. रणनीतीचे दोन भाग असतात. एक जनतेपुढे प्रगट होते आणि पुढचे यश मिळविण्यासाठी जी रणनीती असते ती आधी जाहीर केली जात नाही.
विनायक परब - राजकारणी आणि राजकीय पक्षांबद्दल तरुणांना आदर राहिलेला नाही. त्याला नेतेच जबाबदार आहे असे वाटत नाही का?
मुंडे - होय, आपला मतदार प्रचंड गोंधळलेला आहे. आमचे सरकार होते तेव्हाही, यश आपल्याकडे घ्यायचे आणि अपयश दुसऱ्याच्या माथी मारायचे ही चढाओढ होती आणि तशीच आताही आहे. यूपीए सरकारचा रेल्वेमंत्री दरवाढ करतो आणि ममता बॅनजी विरोध करतात. ही राजकीय अपरिहार्यता आहे. एका पक्षाचे सरकार असताना कोणतेही निर्णय घेऊ शकता येतात. आम्ही तुम्हाला पाच वर्षांसाठी निवडून दिले आहे, तेव्हा आमच्यासाठी काही तरी करून दाखवा अशी लोकांची भावना आहे. आमच्या सरकारमध्ये त्यावेळी २४ पक्ष होते तर त्यांच्या आघाडीत आता २१ पक्ष आहेत.  एकमेकांच्या विरोधी विचारसरणीचे असलेले राजकीय पक्ष केवळ राजकीय अपरिहार्यतेतून सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत. हे दोन्ही वेळचे वास्तव आहे. सत्तेसाठी एकत्र आलेले लोक जेव्हा लोकांना कबूल केलेल्या गोष्टी करू शकत नाहीत हे लोकांना जेव्हा कळते, तेव्हा लोकांमध्ये नैराश्य येणे साहजिकच आहे. आता आणखी एक चिंतेची बाब आहे, ती म्हणजे प्रादेशिक पक्ष यशस्वी होताहेत आणि राष्ट्रीय पक्ष अपयशी होताहेत.
गिरीश कुबेर - ही चिंता असेल तर मग शिवसेनेचे काय?
मुंडे- चिंता आहे म्हणूनच तर त्यांना बरोबर घेतोय.
 दिनेश  गुणे- एनडीए ही अँन्टी काँग्रेस विचारसरणीची म्हणून एकत्र आहे. पण एखाद्या महत्त्वाच्या मुद्दय़ावर तुमच्या आघाडीतच तीव्र मतभेद दिसतात. कधी काही पक्ष प्रो-काँग्रेसही वागतात. तेव्हा ही आघाडी टिकवून ठेवण्याची कसरत कशी करता ?
मुंडे- मुळात एनडीएमध्ये भ्रष्टाचार, दहशतवाद या मुद्दय़ांवर कोणतेही मतभेद नाहीत.  सभागृहातही या चारही घटकपक्षांनी विसंवादाची भूमिका कधीच मांडलेली नाही. राष्ट्रीय प्रश्नांवरही आमचा कार्यक्रम एक आहे. येणारी लोकसभा निवडणूकही कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवरच लढली जाईल. त्यामुळे एनडीएत विरोधाभासाचे चित्र आहे असे काही नाही. राष्ट्रपतीची निवडणूक याला अपवाद असली तरी, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सेनेचा आम्हाला पाठिंबा आहे. समान विचारांवर एकत्र असणाऱ्या पक्षांनी सर्वच मुद्दय़ांवर समान भूमिका घ्यावी , अशी अपेक्षा करणे योग्य नाही. सर्वच गोष्टींवर समान भूमिका असाव्यात असे म्हटले तर मग वेगळ्या अस्तित्वाची गरजच काय?
मधु कांबळे- विरोधी पक्ष म्हणून आपण सभागृहात आणि सभागृहाबाहेरही प्रभावी होता. पण आज केवळ अधिवेशनकाळातच विरोधी पक्षाचे अस्तित्व दिसते. भ्रष्टाचार हा भाजपाचा प्रमुख मुद्दा आहे आणि राज्यात विरोधी पक्षनेतेपदही भाजपकडे आहे. पण सध्या राज्यात भ्रष्टाचाराची एवढी प्रकरणे गाजत असून विधिमंडळात केवळ चर्चेपुरती ही प्रकरणे येतात. पण त्यानंतर विरोधी पक्षाचे अस्तित्वच दिसत नाही.
मुंडे- एक गोष्ट लक्षात घ्या. आज तुम्ही मांडताय ती गोष्ट तुमच्यापर्यंत आली कुठून? भ्रष्टाचाराची ही सगळी प्रकरणे भाजपानेच काढलीत. आज या राज्याच्या विधिम्ांडळात सरकारच्या भ्रष्टाचाराची लक्तरे भाजपच्याच आमदार वा नेत्यांनी काढलेली आहेत. एकेकाळी विरोधकांनी एखादी गोष्ट मांडली की तिला नाही म्हटले जात नसे. शरद पवारांच्या विरोधात मी लढलो. त्या काळात जे योग्य ते मान्य केले जात असे. मंत्रालय जळाल्याप्रकरणी न्यायालयीन अथवा सीबीआय चौकशी करण्याची विरोधकांची मागणी सरकारने मान्य केली नाही. तेव्हाची सरकारे असे वागत नव्हती.  दुसरं असं की शरद पवार मुख्यमंत्री असताना आम्ही दोन वेळा राजदंड पळविला. विखे पाटलांचा खटला आला तेव्हा बारा दिवस विधानसभा बंद पडली. मलाही तेव्हा विरोधी पक्षनेता म्हणून यातून कसे बाहेर पडायचे हे कळत नव्हते. कारण सरकार ऐकायला तयार नव्हते आणि आम्ही रोजच सभागृह बंद पाडीत होतो. तेव्हा हे विनाकारण विधानसभा चालू देत नाहीत असा मीडियाचा दबाव निर्माण झाला होता. शरद पवारांचा राजीनामा घेतल्याशिवाय विधानसभेत कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका मी घेतली होती तर मी उच्च न्यायालयात गेलो असून न्यायालय निर्णय घेईल अशी भूमिका पवार यांनी घेतली होती. तेव्हा तर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात टॉकिंग टर्मही नव्हत्या. शेवटी मी अडवाणी यांना फोन केला आणि यातून बाहेर पडण्यासाठी काय करावे असे विचारले. त्यावर लोकशाहीत आपण जे करतो त्याचे आपल्याला समाधान आहे का हे प्रथम तू ठरव. तू बारा दिवस भांडलास, मग अजून बारा दिवस भांडल्यानंतर तुम्हाला न्याय मिळेल असे वाटते का, असे त्यांनी विचारल्यावर मी नाही म्हटले. तेव्हा याचा काही तर लॉजिकल एन्ड करा असे त्यांनी सुचविले.  तेव्हा प्रतिसाद देणारे सरकार आणि योग्यवेळी माघारही घेणारे विरोधक होते. त्यावेळी एक किंवा दोन दिवसांपेक्षा अधिक काळ सदस्यांना सभागृहाबाहेर ठेवले जात नसे. आता मात्र दोन- तीन वर्षांची शिक्षा केली जाते. सभागृहात आता वेलमध्ये गेले तरी शिक्षा केली जाते. विरोधी पक्षाचेच सोडा, सत्ताधारी पक्षाच्या राम पडांगळे यांनाही अधिवेशन संपेपर्यंत शिक्षा करण्यात आली. त्यामुळे आता  सदस्यांनाही कारवाईची भीती वाटू लागली आहे. तुम्ही नुसते सभागृहात काही मांडले तरी तुमचे सदस्यत्व रद्द केले जाऊ लागल्यामुळे विरोधकांवरही मर्यादा येऊ लागल्या आहेत. विरोधक का आक्रमक होत नाहीत, याचे हेही एक कारण असल्याचे मला वाटते.
गिरीश कुबेर - सत्तेने भाजपला शांत केलेय का?  सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील सीमारेषा अत्यंत अस्पष्ट होऊ लागली आहे. त्यामुळे केवळ दाखविण्यापुरता विरोध आणि बाकी सगळे एकत्र असे वातावरण असून यात भाजपचा नक्की वाटा काय?
मुंडे- अविवाहितांना विवाहितांच्या समस्या समजू शकत नाहीत. आम्ही जेव्हा विरोधी पक्षात होतो तेव्हा अनेक गोष्टी मांडल्या. असं करू, तसं करू.. मात्र सत्ता आल्यानंतर कळते ही या गोष्टी करणे पॉसिबल नाही. एकेकाळी विरोधी पक्षाने सत्तेचा लवलेशही पाहिला नव्हता. तेव्हा आम्ही बोलत होतो त्याला धार होती. पण केंद्रात सत्तेवर आलो. महाराष्ट्रात सत्तेवर येऊन गेलोय, काही राज्यांत सत्तेत आहोत. पण सत्तेत जाऊन आले की विरोधाची धार थोडी कमी होते. आम्ही सरकार चालवून बघितलेले आहे. म्हणून आम्ही त्या काळात काही भूमिका मांडल्या होत्या, त्या आता मांडत नाही. आता कोकणात जैतापूरला विजेचा प्रकल्प येतोय. त्याला भाजप विरोध करीत नाही. ही प्रगल्भता आता सत्तेत जाऊन आली आहे. सत्तेत नसताना आपण अनेक गोष्टी मांडतो पण सत्तेत गेल्यावर त्या गोष्टी करता येत नाहीत याची अनुभूती येते. त्यांनाही आता विरोधकात राहून विरोधकांच्या अडचणी काय असतात हे कळले आहे.
दिनेश  गुणे- त्यावेळी एन्रॉनला विरोध केला, त्याबद्दल आज तुम्हाला काय वाटते?
मुंडे- एन्रॉनला विरोध केला तो आजही योग्यच वाटतो. विरोधाचे कारण वीज नको हे नव्हते. तर एन्रॉनच्या कराराला विरोध होता. एन्रॉनचा करार हा निविदा न काढता दोघांनी सामंजस्याने केला होता. एन्रॉनची कॅपिटल कॉस्ट ही ९ हजार ८० कोटींेची होती. कोणत्याही प्रकल्पाची कॅपिटल कॉस्टच जेवढी जास्त असते तेव्हा त्यातून निर्माण होणाऱ्या विजेचा दरही जास्तच असतो. ती कमी करा हीच माझी मागणी होती. माझी मागणी एन्रॉन रद्द करा अशी नव्हती तर एन्रॉनचा दर घोषित करा अशी मागणी होती. पण आम्ही म्हटले की फेकून द्या एन्रॉनला अरबी समुद्रात. पण हे मी जर बोललो नसतो तर आम्ही निवडणूक जिंकून सत्तेत आलो नसतो.
संजय बापट- बीओटी प्रकल्पांच्या माध्यमातून तुमच्या सरकारने टोल सुरू केला. पण आता टोलला विरोध आहे.
मुंडे- नाही, टोलला विरोध नाही. मुळामध्ये आपण ज्या गोष्टींचा वापर करतो, त्याचा मोबदलाच द्यायचा नाही ही कन्सेप्ट मला योग्य वाटत नाही. आज पगारावरच ६० टक्के पैसे
उचलायचा नाही हे होऊच शकत नाही. सरकारने पैसे द्यावे म्हणजे कुठून द्यावेत. महापालिका म्हणतात राज्याने मदत द्यावी, राज्ये म्हणतात केंद्राने मदत द्यावी. मग केंद्राने कोठून पैसे आणायचे. त्यामुळे खरोखरच प्रभावी सशक्त देश व्हायचा असेल तर आपण जे उड्डाणपूल वापरतो त्याचा भार जनतेने उचललाच पाहिजे. त्यामुळे टोलला भाजपचा विरोध नाही. पण एक रुपयाचा पूल असताना त्याची किंमत १० रुपये दाखवून  टोलच्या माध्यमातून २० रुपये गोळा करणे, अधिक टोल वसूल करणे अयोग्य आहे. एकादा पूल बांधला तर त्याची किंमत वसूल होईपर्यंत टोल लावा, अशी आमची भूमिका आहे.
रोहन टिल्लू- महाजनांचा भाजप आणि त्याच्या नंतरचा भाजप यात तुम्हाला फरक काय वाटतो. कारण तुम्ही महाजनांच्या जवळचे होतात.
मुंडे- मुळात, भाजप महाजनांचा नव्हताच. पक्ष कोणा एका व्यक्तीचा नसतो. पण महाजन भाजपचे एक प्रभावी नेते होते. महाजन आणि माझी मैत्री होती. कारण आम्ही दोघेही एकाच गावचे -अंबाजोगाईचे. एकाच कॉलेजमध्ये शिकलो. पुढे महाजनांच्यामुळेच या विचारांशी मी ओढला गेलो आणि मैत्रीचे नात्यात रूपांतर झाले. नाते आधी होऊन महाजन माझ्या बाजूला आले असे नाही. १८ वर्षांंचा होतो तेव्हापासून दोस्त होतो. माझे २९ व्या वर्षी लग्न झाले. काहीजण म्हणतात की राजकारणात यशस्वी होण्यासाठीच मी महाजनांच्या बहिणीशी लग्न केलं. पण असं काही झालं नाही.  महाजन हा एक दूरदृष्टी असलेला नेता होता. त्यांचा केंद्रीय राजकारणावर प्रभाव होता. अटलजी आणि अडवाणीजींचे नेतृत्व लोकाभिमुख होते. मात्र आता नेतृत्वात एक गॅप आहे.  ती गॅप भरून काढणारी टीम आता पक्षात आहे. गडकरी आहेत, सुषमाजी, जेटली आहेत. हे दोन पिढय़ांमधील अंतर आहे.  त्याच कर्तृत्वाचे लोक आजही आहेत. पण लोकांमध्ये एक अशी भावना असते की पूर्वीचेच चांगले होते. महाजन क्षमतावान होते तसे नेते आजही भाजपात आहेत. पण क्षमता सिद्ध करायला त्यांना संधी मिळाली. तशी संधी आम्हाला आता मिळालेली नाही. संधी मिळाली तर महाजनांसारखे सिद्ध करणारे नेतृत्व भाजपात बोटावर मोजता येण्याइतक्या संख्येने आहे.
प्रशांत दीक्षित- तुम्हाला असं वाटतं का, तुमच्याकडे लोक नवीन नजरेने बघत नाहीत, जुन्या पद्धतीनेच तुमच्याकडून अपेक्षा करताहेत? अरबी समुद्रात सरकारला बुडविणारे मुंडे लोकांना हवे आहेत.  तुम्हाला मात्र रिअ‍ॅलिटी कळलेली आहे..
मुंडे- दोन पिढय़ांत अंतर असतं असे मी म्हणालो, म्हणजे मी मधल्या पिढीतील आहे. दोन पिढय़ांत अंतर असते हे बेसिक तत्त्व मी मानतो. तेव्हा आम्ही विरोधी पक्षातच होतो. अटलजींइतका सरकारवर टीका करणारा माणूस मी पाहिलेला नाही. कारण त्यांनी ३०-३५ वर्षे विरोधी पक्षातच काम केले. पण सत्तेत आल्यावर त्यांनाही काही गोष्टींची अडचण आलीच असेल. सत्तेत जाऊन आल्यामुळे अनेक गोष्टी समजल्या हे म्हणण्यात मला  कमीपणा वाटलेला नाही. काही गोष्टी तासभर भाषण करून पटत नाहीत, पण काही गोष्टी लगेच पटतात. विरोधी पक्षनेता असताना मी शरद पवारांना विचारले होते, पवारजी तुमचे राज्य कुठे आहे. उल्हासनगरला पप्पू कलानीचे, वसईला भाई ठाकूरचे, भिवंडीला सूर्यारावचे राज्य आणि मुंबईत दाऊदचे राज्य आहे. तुमचे राज्य कुठे आहे? याची हेडलाइन झाली. लोकांनी भिंती लिहिल्या आणि त्या काळात तीही एक फ्रेझ झाली. समाजमनावर प्रतिबिंबित होण्यासाठी कधी चांगल्या शब्दांचा, म्हणीचा वापर करावा लागतो. त्यामुळे ही गोष्ट खरी आहे की स्वातंत्र्यासाठी लढलेली पिढी वेगळी, अटलजींची पिढी वेगळी आणि आम्ही वेगळे आहोत.
गिरीश कुबेर- पवार कसे सहिष्णू होते असं मत तुम्ही मांडलंत. म्हणजे पुतण्याशी लढण्यापेक्षा काकाशी लढणे सोपे होते का?
मुंडे-  मी माझ्याच पुतण्याशी लढतोय तेव्हा दुसऱ्याच्या पुतण्याशी लढायला वेळच मिळत नाही अजून. मी राष्ट्रीय पातळीवर असल्यामुळे आता कोणाशी माझी लढाई नाही. पण पूर्वीचे सरकार सूडबुद्धीने वागणारे नव्हते. शरद पवारांच्या विरोधात इतका लढलो पण त्यांनी आमच्या एकाही संस्थेविरोधात कारवाई केली नाही. मात्र यांनी तर आमची बँकच बरखास्त केली. तेव्हाची लढाई वेगळी होती आणि आत्ताची लढाई वेगळी आहे. आता तुम्ही विरोधात गेला की तो तुमचा शत्रू आहे आणि त्याला फिनिश केले पाहिजे अशी भावना आहे. ती तेव्हा नव्हती. हे अंतर आहे.
संतोष प्रधान- बीडमध्ये तुम्हाला कॉर्नर करण्याचा प्रयत्न अजितदादांकडून होतोय का?
मुंडे- मी कॉर्नर होत नाही. असं खूप जणांना  वाटलं की आता माझा पुतण्या आणि भाऊ माझ्यासोबत नाहीत, तर मी संपलो. माझ्या जिल्हा परिषदेत कमी जागा येऊनही सत्ता होती. बॅकेतही तीन खासदारांच्या जोरावर माझी सत्ता होती. कारण राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहाचा फायदा घेऊन मी हे करीत होतो. राजकारणात हे नॅचरल आहे. पण आता सर्व गोष्टी विरोधात असूनही माझ्या २२ जागा आल्या.
संतोष प्रधान - धनंजय मुंडे का नाराज झाले?
मुंडे - विधानसभा निवडणुकीत आपण उमेदवार असावे, असे त्यांना वाटत होते. त्यांनी १२ - १५ वर्षे जिल्हा परिषद चालवली. धनंजयला विधान परिषदेवर घ्या आणि पंकजाला विधानसभा निवडणुकीत उभे करा अशी लोकांची भावना होती. धनंजयशी बोललो तेव्हा त्याने ते मान्यही केले. पंकजा निवडून आली आणि तोही विधान परिषदेवर गेला. त्यानंतर तो विरोधात गेला. त्यामुळे मला मोठा धक्का बसला. विधानसभेची उमेदवारी दिली नाही याची नाराजी त्याच्या मनात रुजली होती म्हणूनच तो गेला,  असा माझा अंदाज आहे. शेवटी तोच खरे काय ते सांगू शकेल.
संजय बापट - नव्या पक्षाशी युती करीत आहात, पण शिवसेनेपासून तुम्ही लांब जात आहात..
मुंडे- मला असे वाटत नाही.  शिवसेना-भाजप हीच युती लोकसभा निवडणूक लढवणार. शिवसेना आणि भाजपचे २० वर्षांपूर्वी नाते होते तेच आज कायम आहे आणि तेच कायम राहील
गिरीश कुबेर - मनसेचे काय?
मुंडे - भाजप-शिवसेनेबरोबर मनसे यावा अशी इच्छा यापूर्वीच व्यक्त केली आहे. दोन वर्षांपूर्वी औरंगाबादला भाजपची कार्यकारिणी झाली होती त्यावेळीही हे मत मी व्यक्त केले हेते.  २०१४ ला आम्ही एकत्र येऊ असा विश्वास व्यक्त केला होता, तो खरा ठरताना दिसतोय. मी भविष्य वर्तवतो तसे घडते,  हे यावरून स्पष्ट होईल.
गिरीश कुबेर - महाजनांचे अस्तित्व शारीरिकदृष्टय़ा पुसले गेले. त्यावेळी भाजपची काही मंडळी महाजनांबाबत कृतघ्न वागली. अशा परिस्थितीत जमवून घेणे कितपत शक्य झाले?
मुंडे - हा प्रश्न खूपच अवघड आहे. त्याबद्दल बोलणे अवघड जाते. प्रत्येक माणसाच्या भूमिका वेगवेगळ्या असतात. महाजनांचा मी सच्चा मित्र होतो. मृत्यूनंतर साथ सोडणे तेव्हाही मान्य नव्हते आणि आजही नाही. राजकारणात यश मिळो अथवा अपयश मिळो, त्याचे परिणाम काहीही होवोत, पण महाजनांचा वारसा मला नव्हता असे म्हणूच शकत नाही. महाजन नाहीत त्यावेळी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी माझी आहे, असे मी मानतो. याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. आजही मी त्यांच्या कुटुंबाचा प्रमुखच आहे. आठ वर्षे पायात चप्पल नसताना मी शिक्षण घेतले. मी ऊसतोडणी कामगाराचा मुलगा आहे. घरात कुणी शिकलेले नव्हते. अशा परिस्थितीत एका सामान्य मुलाला उपमुख्यमंत्रीपदापर्यंत नेले. माझ्या आयुष्यात ते आले नसते तर मी राजकारणात आलो नसतो.  मी केवळ महाजनांच्या जवळ होतो म्हणून माझ्याशी सूडाने वागणे योग्य नाही. ज्यांना वागायचे ते वागले त्याची मला पर्वा नाही. महाजन जिवंत असताना त्यांचे राजकारण योग्य होते आणि मृत्यूनंतर त्यांचे राजकारण अयोग्य होते असे म्हणणारे संधिसाधू आहेत. ते तेव्हाही योग्य होते आणि मृत्यूनंतरही योग्य होते, असे म्हणताना मला काही मिळाले नाही तरी चालेल. ते होते तेव्हा त्यांचा झेंडा खांद्यावर उचलायचा आणि ते गेल्यावर लगेच पाठ फिरवायची, हे योग्य नाही. महाजन माझ्या जीवनात आल्यामुळेच आज मी इथे आहे. महाजन आणि मी वेगळेच होतो. त्यांनी केलेली प्रत्येक चूक मी बरोबर म्हणणार नाही. त्यांचे राजकारण, माझे राजकारण एक आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही. परंतु कुणाचे राजकीय यश-अपयश त्याच्या कर्तृत्वावर असले पाहिजे. महाजनांचे कुटुंब संकटात होते तेव्हा जितकी साथ देता येईल तेवढी दिली. पुढेही या कुटुंबाची साथ देणे माझे कर्तव्य आहे. संधीचे राजकारण मला करायचे नाही.
प्रशांत दीक्षित - वाजपेयींचा चेहरा आणि महाजनांची स्ट्रॅटेजी यातून चांगले राजकारण झाले. काँग्रेससमर्थक पक्षांना भाजपच्या बाजूला वळवले. या नेत्यांनी एनडीएवरचे संघाचे सावट दूर केले होते. आता युतीच्या राजकारणात संघ ही समस्या वाटते  का?
मुंडे - महाजन हे विलक्षण बुद्धिमान नेतृत्व होते. संकटाच्या काळात ते अधिक चांगल्या पद्धतीने काम करत असत. महाजनांची कमतरता भाजपला जाणवते आहे. हे माझे मत आहे, पार्टीचे नसेल. संघ परिघाच्या पलीकडे जाऊन वाजपेयींना लोकमान्यता होती. अशी लोकमान्यता अनेक वर्षांच्या सातत्याने, प्रयत्नाने, प्रामाणिकपणाने आणि सार्वजनिक जीवनातील उपलब्धीनेच येत असते. असे नेते भाजपमध्ये आहेत. अडवाणी असेच आहेत. पुन्हा वाजपेयी, महाजन होणे नाही. आताचे नेते तेवढेच गुणवान आहेत. पण त्यांची तुलना वाजपेयी आणि महाजन यांच्याबरोबर करणे योग्य नाही.
गिरीश कुबेर - महाजन आणि मुंडे यांना घडवणारे वसंतराव भागवत आज नाहीत. त्यांनी अनेक नेत्यांना घडवले, तशी यंत्रणा आता दिसत नाही.
मुंडे - वसंतराव भागवत हे महाजनांपेक्षा ग्रेट होते. प्रमोदजी आणि मी पडद्यावर काम करणारे कलाकार होतो. पण भागवतांनीच आम्हाला भूमिका दिल्या. त्यांनी एकेक नेता घडवला. आज मी महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाबद्दल बोललो तर मला कुणीही विरोध  करीत नाही. त्याला मोठे सँक्शन आहे. हे घडविण्याचे श्रेय भागवतांचे आहे. एखाद्या कार्यकर्त्यांचे गुण ओळखून त्याला दिशा देणारे नेते आज भाजपमध्ये नाहीत.
गिरीश कुबेर - समवयस्क नेत्यांची एक फळी तयार होताना दिसत आहे. त्यात श्रेष्ठ कोण कळत नाही. या पाश्र्वभूमीवर नरेंद्र मोदी सगळ्याच्या वरती जाणारे आहेत, असा प्रचार केला जात आहे. मोदींचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर आणणार की नाही? याबाबत तुमचे मत काय?
मुंडे - या प्रक्रियेत मी कुठेच नाही. पण व्यक्तिगत मत म्हणून भाजप निवडणुकीपूर्वी कुणालाही नेता म्हणून घोषित करेल असे वाटत नाही. मोदी यांना कुणी पुढे आणतेय आणि कुणी नको म्हणतेय अशी परिस्थिती नाही. अटलजींसारखे नेतृत्व कुणाकडेच नाही. मोदी लोकप्रिय आहेत. अडवाणी लोकप्रिय होते, त्यांनी अयोध्येचा संघर्ष केला, पण नेता वाजपेयी झाले. त्यामुळे उद्याचा नेता कोण होईल ते अद्याप ठरलेले नाही. लोकसभेपूर्वी तसे होईल असे वाटत नाही.  नेतृत्व ही परिस्थितीच्या ओघात होणारी गोष्ट आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या, त्यापूर्वी मनोहर जोशी मुख्यमंत्री होणार असे कुणी सांगितले असते तर खरे वाटले असते का? लोकशाहीत बहुमत ज्या पक्षाचे आहे त्यांचा नेता नसेल तर सरकार चालणार नाही. यूपीएच्या जास्त जागा असतील तर काँग्रेसचे आणि एनडीएकडे अधिक जागा असतील तर भाजपचा नेता होईल.
मधु कांबळे - ओबीसींच्या प्रश्नावर भुजबळ यांच्याबरोबर, दलितांच्या प्रश्नावर रामदास आठवले यांच्याबरोबर आहे असे सांगता. पण भाजप तुमच्या बरोबर आहे का?
मुंडे - भाजप माझ्याबरोबर आहे आणि मी भाजपबरोबर आहे. सामाजिक न्यायासंदर्भात माझ्या भूमिका स्पष्ट आहेत. मंडल आयोगाचे आंदोलन मी केले. ३० राज्यांचा दौरा मी केला. भाजपची भूमिका असल्यामुळेच ते केले. १९३१ नंतर ओबीसीची जनगणना होत नाही हा मुद्दा मी मांडला. त्यावेळी संघ आणि भाजपची काय भूमिका यावर आरडाओरडा झाला. संसदेत गोपीनाथ मुंडे यांनी सामाजिक न्यायाची भूमिका मांडली आहे तीच भाजपची आहे, असे पत्रच सुषमा स्वराज यांनी दिले आहे. त्यामुळे सामाजिक न्यायाची भूमिका माझी नव्हे तर भाजपची आहे. समाजरचनेत मागासलेल्यांना न्याय द्यायला हवा ही माझी भूमिका आहे. ती भाजपलाही मान्य आहे. मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण द्यावे अशी चळवळ सुरू आहे. ओबीसीला शैक्षणिक, नोकरी आणि राजकारणात आरक्षण आहे. राजकारणात मराठा समाजाला संधी मिळत नाही असे आहे का? ओबीसींना संधी नसल्यामुळे त्यांना आरक्षण दिले आहे. मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत सवलत द्यायला हरकत नाही. राजकीय क्षेत्रात आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. तोच भुजबळांचा आहे.
दिनेश  गुणे - वाजपेयी-अडवाणी यांच्यापासून गडकरी-जेटली यांच्यापर्यंत दोन पिढय़ांचे नेतृत्व तुम्ही अनुभवले आहे. नव्या-जुन्यांत जाणवणारे  अंतर अस्वस्थ करत नाही का? त्यामुळे घुसमट वाटते का?
मुंडे - राजकारणात घुसमट या शब्दाला अर्थ नाही. माझी कसलीही घुसमट होत नाही. मी जे काम करतोय ते प्रामाणिकपणे करीत राहणार. मी लोकप्रतिनिधी आहे. मला पक्षात संधी मिळाली आहे. मला माझा मतदारसंघ आहे. जुने-नवे असे काही नसते. गडकरी आणि माझ्यात काही विसंवाद नाही. त्यांचा माझा परिसर, मतदारसंघ एक नाही. मला अध्यक्ष व्हायचे नाही. त्यांचे माझे क्षेत्र निराळे आहे. त्यामुळे वाद होण्याचा प्रश्नच नाही. त्यांची भूमिका काय आहे, हा प्रश्न त्यांना विचारला तर बरे होईल.
प्रशांत दीक्षित - राहुल गांधींच्या मर्यादा काय वाटतात?
मुंडे - राहुल गांधी कधी संसदेत बोलले नाहीत. त्यामुळे त्यांची गुणवत्ता कळली नाही. उत्तर प्रदेशची जी निवडणूक त्यांनी लढवली, आपल्या जीवनाचे करिअर त्यांनी या निवडणुकीत पणाला लावले आणि त्यात त्यांना अपयश आले आहे. त्यामुळे काँग्रेस अडचणीत असताना सक्षम नेतृत्व देण्याची त्यांची क्षमता आहे, असे वाटत नाही.
मधु कांबळे - सध्या एटीएम बंद पडले आहे त्याचे काय?
मुंडे - तुमच्याजवळ एटीएम कार्ड नसेल. आठवले, ठाकरे आणि मुंडे एकत्र आहेत. एटीएम चांगले आहे. कार्ड टाकून पाहा, पैसे मिळतील.
निशांत  सरवणकर - महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा येणार का?
मुंडे - माझी इच्छा नाही, पण येणार की नाही हे पक्षावर अवलंबून आहे.

*  विधिमंडळात सभागृहाच्या वेलमध्ये गेले तरी शिक्षा केली जाते. त्यामुळे आता  सदस्यांनाही कारवाईची भीती वाटू लागली असून छोटय़ा कारणांसाठी सदस्यांना वर्ष दोन वर्ष निलंबनाची शिक्षा हे लोकशाहीविरोधी आहे. आपल्याकडे हत्या केल्यास जन्मठेप, पाकीट मारल्यास चार महिन्यांची शिक्षा आहे. पण  सभागृहात एक घोषणा देण्याची शिक्षा जर दोन आणि तीन वर्षे असेल तर कसली ही लोकशाही?

* भाजपने भारत बंद केला, जेलभरो आंदोलन केले. पण ही हत्यारे वापरून बोथट झाली आहेत. देशभर मान्य होईल असे आंदोलन आम्हाला सापडलेले नाही, सापडले तर नक्कीच आंदोलन करू.

* संघाचे काम संघ करीत आहे. वडिलांनी भांडवल दिले आहे, कसे वापरायचे ते आम्ही ठरवायचे आहे. वडील आणखी भांडवल द्यायला तयार आहेत. पण वडिलांच्या भांडवलावर चालणार नाही, आपल्याला आपले भांडवलही निर्माण करावे लागेल.

* मी केवळ महाजनांच्या जवळ होतो म्हणून माझ्याशी सूडाने वागणे योग्य नाही. महाजन जिवंत असताना त्यांचे राजकारण योग्य होते आणि मृत्यूनंतर त्यांचे राजकारण अयोग्य होते असे म्हणणारे संधिसाधू आहेत. ते तेव्हाही योग्य होते आणि मृत्यूनंतरही योग्य होते, असे म्हणताना मला काही मिळाले नाही तरी चालेल.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो