खाणे पिणे आणि खूप काही : ‘केका’वली
मुखपृष्ठ >> खाणे, पिणे नि खूप काही >> खाणे पिणे आणि खूप काही : ‘केका’वली
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

खाणे पिणे आणि खूप काही : ‘केका’वली Bookmark and Share Print E-mail

सई कोरान्ने-खांडेकर ,शनिवार, ४ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आजकाल विविध स्वादांतले, आकारांतले केक मिळतात. केकवर तुमचे फोटोदेखील छापता येतात. खाण्याचा रंग भरलेले िपट्रर असतात. तुम्हाला कधी सुचणार नाहीत असे रंग आता केकवर उतरू शकतात. या सगळ्या जादूत आपण हे विसरतो की, व्यावसायिक पातळीवर केल्या जाणाऱ्या बहुसंख्य केकमध्ये ग्लिसरीन, इतर रसायन आणि जेल घातले जातात ते केक अधिक मऊ करण्यासाठी. हे समजल्यानंतर माझ्यातल्या आईची हिम्मत झाली नाही कधी दुकानात जाऊन केक विकत घेण्याची..
आ मच्या घरी कधीच केक विकत आणल्याचे मला आठवत नाही. आमच्या वाढदिवसाला आई कायम केक घरीच बनवत असे. आठवडाभर घरचे ताजे पांढरे लोणी साठवून ती चविष्ट केक करत असे. एक-दोन सवयीच्या पाककृती वापरून, त्यात थोडेफार बदल करून, उत्सवमूर्तीच्या फर्माईशीप्रमाणे रंग आणि फ्लेवर घालून, जुन्या ओटय़ावर ती केक बनवत असे. माझ्या भावासाठी तर निरनिराळ्या आकारांचे केक करायचे आव्हान ती लीलया पेलायची!
 तो साधारण ५ ते ६ वर्षांचा असताना त्याला हॉट व्हिल्सच्या गाडय़ांचं वेड लागलं होतं. त्यावेळच्या वाढदिवसाला, त्याला उभ्या गाडीच्या आकाराचा केक हवा होता तोसुद्धा थ्रीडी. आईने बरेच दिवस त्याचा विचार केला. कागदावर स्केच काढून, डोक्यातले विचार केकमध्ये कसे उतरवावे याचा अंदाज घेत तिने शेवटी तो केक केलाच. खिडक्या आणि झरोखे दाखवायला तिने चॉकलेटचे वेफर चिकटवले. चाकं आणि त्याच्या आऱ्या थर्मोकोल आणि लाकडाच्या काडय़ांपासून केल्या. सबंध केक एकत्र आल्यावर गाडी पुढे मागे चालवता येत होती. त्या दिवशी माझ्या भावाच्या आणि त्याच्या मित्रांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी कधीच विसरू शकणार नाही. पुढचा एक दात पडलेला असला तरी त्याच्या आजपर्यंतच्या फोटोंमधला त्याचा तो फोटो मला सर्वात जास्त आवडतो!
त्या मानाने माझ्यासाठी केक बनवणे फार सोपे होते. साधा, व्हॅनिला केक मुलींना आवडतात त्या रंगात आणि आकारांमध्ये बनवणे सोपे होते. माझ्या वाढदिवसाला नेहमी वापरलं जाणारं बदामाच्या आकाराचं केकचं भांडं आता माझ्याकडे आहे. त्याचं बूड जरा वेडंवाकडं झालं असलं तरी त्यात केलेले केक नेहमी चांगले होतात! लहान असताना मात्र मी एकदा हट्ट केला आणि आईला गावातल्या बेकरीमधून केक मागवायला सांगितले. त्या काळात केकची दुकानं नसत. गावात एखादी बेकरी असे. त्यांच्याकडे खारीबिस्किटे, नानकटाई, पाव, इत्यादी मिळत असत व त्याच बरोबर गुलाबाची बटबटीत फुले लावलेले केकदेखील मिळत असत. जाल त्या वाढदिवसाला तसेच केक खायला मिळत असत - परीकथेच्या पुस्तकातल्यासारखे केक. (अजून कार्टून हा प्रकार आमच्या आयुष्यात आला नव्हता - मिकी-डोनाल्डच्या पलीकडे मला कुणी माहीत नव्हतं.) ५ वर्षांच्या मुलीच्या वाढदिवसाला असा परीकथेतला केक नाही म्हणजे काय! शेवटी माझ्या हट्टासमोर हात टेकवून आईने बेकरीत ऑर्डर दिली. आता मला वाटतं की, आईला तेव्हाच कळलं असावं की बाहेरून आलेला हा पहिला आणि शेवटचा केक असणार!
मातकट रंगाच्या पुठ्ठय़ाच्या डब्यात तो शेवटी आला. नारंगी-गुलाबी रंगाची गुलाबाची फुलं केकवर लावलेली होती. जगातल्या कुठल्याही गुलाबाला नसतात अशी लांबट, पोपटी पानेदेखील होती. चुकून जागा राहिली असेल तिकडे बारक्या चांदीच्या गोळ्या पेरल्या होत्या. ५ वर्षांच्या मुलीच्या डोळ्यात तो केक अप्रतिमाच दिसत होता. वाढदिवसाचं गाणं सुरू झालं, आणि मी केक आनंदाने कापला. मझ्या मित्रमत्रिणींच्या तोंडाला पाणी सुटलं. त्यांना तो केक आवडलादेखील असावा. पण मला मिळालेल्या गुलाब कळीच्या तुकडय़ाचा मी एक घास जेमतेम घेतला आणि माझ्या डोळ्यात पाणी यायचं फक्त बाकी राहिलं. आयुष्यातली पहिली निराशा. बेकरीतला केक अतिशय कोरडा होता. अतिगोड होता. वनस्पती तुपात नको तेवढी साखर घालून केलेलं आयसिंग होतं. तोंडात तुकडा घालताच, वनस्पती तूप टाळूला चिकटायचं. तो केक गिळायला काहीतरी पिणं अगदी गरजेचं होतं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, आईने केलेले घरगुती केक हे खरे केक होते.
काही र्वष गेली आणि आम्ही शहराच्या आणखीन जवळ आलो. त्याच सुमारास केकच्या दुकानांची नवीन चेन निघाली. ‘फ्रेश क्रीम’चे त्यांचे केक प्रसिद्ध होऊ लागले, आजही लोकप्रिय आहेत. परंतु अशा दुकानांमध्ये वापरलं जाणारं हे ‘फ्रेश क्रीम’ खरं म्हणजे ना ताजे असते, ना क्रीम असते. क्रीम म्हणजे दुधावरची साय. ही साय महाग असल्या कारणाने व खराब व्हायच्या भीतीने ती मोठय़ा प्रमाणावर वापरणं शक्य नसते. म्हणून हल्ली सोयाचे दूध काढून, त्यात तेल घालून त्याचे क्रीम बनवले जाते. हल्ली केकवर तुमचे फोटोदेखील छापता येतात. खाण्याचा रंग भरलेले िपट्रर असतात. तुम्हाला कधी सुचणार नाहीत असे रंग आता केकवर उतरू शकतात. या सगळ्या जादूत आपण हे विसरतो की, या केकमध्ये ग्लिसरीन आणि इतर रसायन आणि जेल घातले जातात ते केक मऊ करण्यासाठी. हे समजल्यानंतर माझ्यातल्या आईची हिम्मत झाली नाही कधी दुकानात जाऊन केक विकत घेण्याची. मग तो केक अगदी पंचतारांकित हॉटेलमधला असला तरीही. मला जुन्या विचारांची म्हणालात तरी हरकत नाही, पण माझ्या मते, घरी केलेल्या केकसमोर जगातला कुठलाही केक फिकाच.
घरी केलेल्या केकमध्ये आपण काय साहित्य घालतोय हे आपल्याला ठाऊक असते. तो केक आपण आपल्या माणसासाठी प्रेमाने करतो, त्याची सर विकतच्या केकला  कशी येणार?
खालील पाककृती माझी अगदी आवडीची आहे. बनवायला सोपी आणि चवीला सगळ्यांना आवडण्यासारखी. सजावटीसाठी हवे तितके पर्याय आहेत. आज मी सोनेरी गोळ्या वापरल्या आहेत पण चिक्कीची भरड, ताजी फळे, चॉकलेट इत्यादी वस्तू वापराव्यात. हा केक सर्वाना हमखास आवडतो आणि हा हा म्हणता म्हणता संपून जातो.     
    
किमान आठ जणांसाठी
  व्हॅनिला केकसाठी साहित्य :
* २ अंडी
* १०० ग्रॅम मदा
* १०० ग्रॅम बारीक साखर
* १०० ग्रॅम लोणी (पांढरे लोणी वापरल्यास चिमूटभर मीठ घालावे.)
* पाव कप दूध
* अर्धा लहान चमचा बेकिंग पावडर
* अर्धा लहान चमचा व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट किंवा १ व्हॅनिला शेंगेचा गर

चॉकलेट केकचे साहित्य
* २ अंडी
* ७५ ग्रॅम मदा
* ३० ग्रॅम कोको
* १०० ग्रॅम ब्राऊन शुगर
* १०० ग्रॅम लोणी (वरीलप्रमाणे)
* पाव कप घट्ट ताक
* अर्धा लहान चमचा बेकिंग पावडर
* अर्धा लहान चमचा व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट  किंवा १     व्हॅनिला शेंगेचा गर

सजावटीचे साहित्य
* ३ कप चांगल्या प्रतीचे चॉकलेट चिरून
* अर्धा कप क्रीम किंवा होल दूध
* दीड मोठा चमचा लोणी
* सोनेरी गोळ्या
केक बनवण्याची कृती (दोन्ही केक करायला एकच कृती) :
प्रथम ओवन तापवण्यास लावावे (१८० डिग्री सेंटीग्रेट).  
८ इंच गोलाकार बेकिंग डिशला तूप लावावे व हवे असल्यास त्याच्या तळाला कागद लावावा म्हणजे केक सहजरीत्या निघून येतो.
सर्व कोरडे साहित्य (मदा, बेकिंग पावडर, कोको) एकत्र चाळून घ्यावे व मोठय़ा भांडय़ात काढून ठेवावे.  
मिक्सरमध्ये अंडी, लोणी आणि साखर घालून एकत्र होईपर्यंत चालवावे. पांढरा रंग होईपर्यंत चालवावे.
यात व्हॅनिला आणि दूध/ताक घालून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यावे.  
ओले साहित्य कोरडय़ात घालून हलक्या हाताने एकजीव करावे. फार फेसल्यास केक दडस होतो.
केकचे हे तयार पीठ बेकिंग डिशमध्ये घालावे आणि ४० -४५ मिनिटे बेक करावे.
केक तयार होईपर्यंत सॉस तयार करावा चॉकलेट, क्रीम/दूध आणि लोणी एकत्र करून मायक्रोवेव्हमध्ये एक ते दीड मिनिटे ठेवावे ज्यामुळे ते विरघळेल (किंवा एका पातेल्यात पाणी तापवून, त्यावर आणखीन एक भांडं ठेवून, त्यात सगळे साहित्य वितळून घ्यावे.) एकदा ढवळून बाजूला ठेवावे.
केक तयार झाला आहे की नाही हे पाहायला त्यात सुरी किंवा टूथपिक घालावी. ती स्वच्छ बाहेर आली तर केक तयार झाला असे म्हणायचे. केक भांडय़ातून उलटून घ्यावा व चांगला गार होऊ द्यावा.
प्रत्येक केकचे दोन आडवे भाग करावेत. पांढऱ्या केकचा एक तुकडा डिशवर ठेवावा. त्यावर २ मोठे चमचे  सॉस ओतावे व पसरावे. त्यावर  केकचा एक भाग ठेवावा. त्यावरही सॉस घालावा. अशा रीतीने सगळे भाग एकावर एक चिकटवावे. उरलेला सगळा सॉस केकच्या वर व बाजूला सुरीच्या पसरवावा. सुरुवातीला सल वाटले तरी पसरता पसरता ते घट्ट होत जाते.
सोनेरी गोळ्या वापरून (किंवा आवडेल तसे) सजवावे.
थंड करण्यास फ्रिजमध्ये ठेवावा आणि खायला देण्या आधी २० मिनिटे बाहेर काढून ठेवावा.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो