धनसंपद : मुलांसाठी गुंतवणूक
मुखपृष्ठ >> धनसंपदा >> धनसंपद : मुलांसाठी गुंतवणूक
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

धनसंपद : मुलांसाठी गुंतवणूक Bookmark and Share Print E-mail

धनश्री राणे ,शनिवार, ४ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मुलाच्या भविष्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी नियोजन करताना दीर्घकालीन गुंतवणुकीचे ध्येय असल्याने इक्विटी फंड व म्युच्युअल फंड्समधील गुंतवणुकीचा पर्याय उत्तम ठरतो. यासह राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र व आवर्ती ठेव योजना हे पर्यायही आहेतच.
आपल्या मुलांना जगातले सर्व काही सर्वोत्तमच मिळावे, अशी आपली पालक म्हणून भाबडी इच्छा असते. मात्र पैशाअभावी साऱ्या इच्छा पूर्ण होत नाहीत. म्हणूनच मुलांनाही लहानपणापासून पैशाची किंमत कळायला हवी. मुलांना दिल्या जाणाऱ्या पॉकेटमनीसारख्या छोटय़ाशा गोष्टीतूनही बचतीचे बाळकडू देता येणे शक्य आहे. असे केल्याने मोठेपणी त्यांना आर्थिक जबाबदाऱ्या हाताळणे सोपे जाईल.
शैक्षणिक खर्च
आर्थिक नियोजनातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे मुलांच्या आत्ताच्या व भविष्यातील शिक्षणासाठीच्या खर्चाची तरतूद करणे. मुलांच्या शिक्षणावरील खर्च आता तर मुलं ‘प्लेग्रुप’ किंवा ‘डे-केअर सेंटर’ला जाऊ लागल्यापासून सुरू होतो. पुढे मुलांच्या उच्चशिक्षणापर्यंत हा खर्च उत्तरोत्तर वाढतच जातो. इतर क्षेत्रांप्रमाणे महागाईचा परिणाम शिक्षणावरही दिसू लागला आहे. म्हणूनच मुलं मोठी झाल्यावर त्यांच्या शिक्षणासाठी पुरेशी जमा आपल्या गाठीशी असावी, यासाठी पालकांनी आतापासून बचतीकडे व गुंतवणुकीकडे लक्ष दिले पाहिजे. कारण ‘थेंबे थेंबे तळे साचे!’ हे विसरता कामा नये.
एक उदाहरण पाहूया. विनय (३७) व त्याची पत्नी आकृती (३५) दोघेही कमावणारे, त्यांना श्यामला व आनंद ही दोन मुले. त्यांचे छोटे व सुखी असे चौकोनी कुटुंब. श्यामला यंदा तिसऱ्या इयत्तेत असून आनंद नुकताच प्लेग्रुपमध्ये जाऊ लागलाय. शाळेची वार्षिक फी त्यांनी शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीलाच भरली आहे. मात्र मुलं मोठी झाल्यावर, त्यांची फी फक्त पगारातून भरणे शक्य होणार आहे का? तीसुद्धा एकरकमी? नक्कीच नाही, कारण नंतर फीची रक्कम कित्येक पटीने वाढणार आहे. कदाचित शैक्षणिक फीच्या ओझ्यामुळे आकृती व विनयच्या राहणीमानावरही परिणाम होऊ शकतो. त्यातच गृहकर्जाचा व कारचा हप्ता असल्याने आणखी ओढाताण होऊ शकते.
मग पालकांनी काय करावे ?
 बजेट आखून घ्या- असे गृहीत धरूयात की येत्या १० वर्षांत श्यामला व आनंद दोघेही उच्चशिक्षणाकडे वळतील. आत्ताच पदव्युत्तर शिक्षण तसेच व्यावसायिक कोर्स यांची फी लाखोंच्या घरात आहे. म्हणूनच आता साधारण ५ लाख रुपये फी असणाऱ्या कोर्सच्या प्रवेशासाठी दहा वर्षांनी काय चित्र असेल याचा अंदाज काढूया. दहा वर्षांनी फीमध्ये ५ टक्के जरी वाढ झाल्याचे पकडले तरी दोन्ही मुलांसाठी मिळून त्यांना अंदाजे १५-१७ लाख रुपयांची जमा ठेवावी लागेल.
गुंतवणुकीला लवकर सुरुवात करा- दीर्घकालीन गुंतवणुकीची मात्रा अधिक गुणकारी ठरते, म्हणूनच आपला दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर असला पाहिजे. मुद्दलावरील व्याज अधिक व्याजावरील व्याज या सुविधेमुळे दीर्घकाळासाठी गुंतवून ठेवलेला पैसा अधिक परतावा देतो. म्हणूनच आकृती व विनयने दर महिन्याला काही रक्कम फक्त मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून वेगळी काढून ठेवली पाहिजे. जर विनयच्या पगारातून घरगुती खर्च व शाळेची फी वगैरे भरली जात असेल तर आकृतीने कुटुंबाच्या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हातभार लावला पाहिजे. अशी आखणी केली तर दोघेही मुलांच्या भवितव्यासाठी बचत तसेच गुंतवणुकीचे ध्येय गाठू शकतात.
३. खर्चाचा अंदाज घ्या- सगळ्या इच्छा-आकाक्षांना मुरड घालून किंवा कुटुंबाचा खर्च आटोक्यात आणावा, असे अजिबात म्हणणे नाही. मात्र काही अनावश्यक खर्चाला कात्री लावून ही रक्कम आपण निश्चित गुंतवणुकीकडे वळवू शकतो. उदा- दर महिन्याला इक्विटी फंडमध्ये तुम्ही २५०० रुपये (एसआयपी) गुंतवले तर वर्षांअखेर अंदाजे दहा टक्क्य़ांनी परतावा मिळतो व त्यामुळे दहा वर्षांनी पाच लाख रुपयांची राशी जमा होते.
पोर्टफोलिओचा आढावा घ्या- मुलांच्या शिक्षणासाठीची गुंतवणूक नेहमीच दीर्घकालीन असते. म्हणूनच आपला पोर्टफोलियो व स्थिती वेळोवेळी तपासून बघणे गरजेचे आहे. दर तीन ते पाच वर्षांनी आपल्या पोर्टफोलियोचा आढावा घेतला पाहिजे. जर नियोजित गुंतवणुकीतून आपले नियोजित लक्ष्य गाठणे शक्य झाले नसेल तर गुंतवणूक वाढवली पाहिजे. गुंतवणुकीचा कालावधी जवळ आला असेल तर कमी कालावधीच्या मुदत ठेव योजनांमध्ये हा पैसा वळवून घेता येईल. यामुळे गुंतवणुकीचा समतोल राखता येईल. यामुळे गरजेच्या वेळी पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होईल.
शैक्षणिक कर्ज- अर्थातच तुमच्या मुलाच्या उच्चशिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी मुलाच्या नावे शैक्षणिक कर्ज काढू शकता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी मिळाल्यावर हे शैक्षणिक कर्ज फेडायचे असते. कुठल्याही कारणाने एखाद्या कुटुंबाला जर उच्चशिक्षणाचा खर्च परवडणारा नसेल तर शैक्षणिक कर्ज हा पर्याय त्या कुटुंबासाठी अगदी वरदान आहे. शैक्षणिक कर्जावरील व्याज ८० जी कलमाद्वारे आयकरातून सवलतीस पात्र आहे.
गुंतवणुकीचे पर्याय-
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट )- आयकर कायद्याच्या ८० सी कलमाअंतर्गत, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) योजनेतील एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर व त्यावरील व्याजावर करसवलत मिळते. यातील गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. जर दहा हजार रुपयांची रक्कम एनएससीमध्ये गुंतवली असेल तर पाच वर्षांनी त्या रकमेचे १५,२३५ रुपये मिळतात.(एनएससी-५ वर ८.६ टक्के व्याज मिळते) किंवा दहा वर्षांनी २३,८८७ रुपये मिळतात.(एनएससी ९ वर्षे साठी ८.९ टक्के व्याज मिळते). थोडक्यात दहा वर्षांत यातील गुंतवणुकीची रक्कम जवळपास दुप्पट होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदर कमी झाले आहेत. तसेच राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रातील गुंतवणुकीच्या रकमेवर कर्जही घेता येते, मात्र व्याजाची रक्कम व कर्जासाठी त्याचा काहीही संबंध नसतो. जर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रधारकाचे दुर्दैवाने निधन झाले तर नॉमिनीला सगळी रक्कम मिळते. ही रक्कम नॉमिनीच्या नावे हस्तांतरित करता येते. मात्र करदात्याच्या टॅक्स स्लॅबनुसार त्यावर कर आकारला जातो.
म्युच्युअल फंड- मुलाच्या भविष्यासाठी दीर्घकालीन गुंतवणुकीचे ध्येय असल्याने इक्विटी फंड व म्युच्युअल फंड्समधील गुंतवणुकीचा पर्याय आहेच. अंदाजे १०-१५ वर्षांच्या कालावधीसाठी मिडकॅप म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करणे हितावह ठरेल. मात्र बॅलन्स्ड म्युच्युअल फंड किंवा डायव्हर्सिफाइड इक्विटीमधील गुंतवणुकीच्या तुलनेत मिडकॅप फंड्समधील गुंतवणुकीत अधिक जोखीम असल्याने परतावा अधिक असतो. म्हणूनच जोखीम घेण्याच्या प्राधान्यावरून म्युच्युअल फंड निवडता येतील. अगदी साधारण एक हजार रुपयांची एसआयपी सुरू करून या गुंतवणुकीला सुरुवात करता येईल.
आवर्ती ठेव योजना (आरडी)- म्युच्युअल फंड्सव्यतिरिक्त आवर्ती ठेव योजनांमधून आपण गुंतवणुकीला प्राधान्य देऊ शकतो. सध्या पोस्टाच्या आरडी योजनांवरील व्याजदर ८.४ टक्क्य़ांच्या आसपास आहे. दर महिन्याला या ठेव योजनेत एक हजार रुपये जरी टाकले तरी पाच वर्षांनी ७४,६५१ रुपये देऊ शकते.
(लेखिका वित्त नियोजिका असून ही लेखिकेची वैयक्तिक  मतेआहेत.)

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो