करिअरिस्ट मी : आकाश पेलताना-
मुखपृष्ठ >> करिअरिस्ट मी >> करिअरिस्ट मी : आकाश पेलताना-
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

करिअरिस्ट मी : आकाश पेलताना- Bookmark and Share Print E-mail

उत्तरा मोने ,शनिवार, ४ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

स्मिता तळवलकर, त्यांची लेक आरती आणि सून सुलेखा या तिघींचं घट्ट नातंच आज त्यांना आयुष्यातले आव्हानात्मक प्रसंग पेलण्याची ताकद देत आहे. दूरचित्रवाणी क्षेत्रातली  आव्हानं असोत की स्मिताताईंना अचानक सामना करावा लागलेल्या कर्करोगाचं आव्हान असो त्या तिघींनी आव्हानाचं हे आकाश लीलया पेललं आणि म्हणूनच आता कर्करोगातून बाहेर पडलेल्या स्मिताताईंसह स्वत:च्या स्टुडिओमध्ये त्यांच्या करिअरचा संसारही डौलाने उभा आहे.. करिअर आणि घर यांच्यातला तोल सांभाळणाऱ्या या तिघींविषयी..  
सध्या ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवरील ‘सुवासिनी’ या मालिकेत सावी या नायिकेच्या मागे ठामपणे उभी राहणारी माई आणि सावीच्या जिवावर उठलेली मंदा या दोन व्यक्तिरेखा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. एकमेकींसमोर अशा नकारात्मक भूमिकेत उभ्या ठाकलेल्या स्मिताताई आणि सुलेखा प्रत्यक्ष जीवनात सासू-सुनेच्या भूमिकेत मात्र एकमेकींच्या बाजूने ठामपणे उभ्या आहेत. मुळात स्मिताताईंच्या मैत्रिणीची मुलगी असलेली सुलेखा स्मिताताईंची मुलगी आरती हिची मैत्रीण. त्यामुळे त्यांचा मुलगा अंबरशी लग्न झाल्यानंतर आजही स्मिताताई तिच्या काकी आहेत आणि आरती तिची घट्ट मैत्रीण. त्याचं असं हे एकमेकींसाठी असण्यातूनच त्यांना आयुष्यातली आव्हानं पेलण्याची ताकद मिळालेली आहे आणि त्यातूनच तिघी आपलं कुटुंब आणि करिअर समर्थपणे पेलताहेत.
       आज मराठी नाटय़-चित्रसृष्टीत स्मिता तळवलकर या नावामागे यशस्वी अभिनेत्री, दिग्दíशका, निर्माती आणि वितरक त्याचबरोबर एक चांगली व्यक्ती अशी प्रतिमा आहे, जी घरच्या पातळीवरही त्यांनी मनापासून जपलेली आहे. म्हणूनच अभिनेत्री असलेली सून सुलेखा आणि संकलक असलेली मुलगी आरती अशा एकाच घरातल्या तिघी जणी एकमेकींना समजून घेऊन एकाच क्षेत्रात यशस्वीपणे वावरत आहेत. अर्थात व्यक्ती म्हणून आणि नात्यात आवश्यक असलेला समंजसपणा हा तिघींच्या स्वभावाचा भाग असल्यामुळे आणि प्रत्येकीला एकमेकींच्या कामाची पूर्ण कल्पना असल्यामुळे त्यांना नेहमीच एकमेकींची मदतच होते. स्मिताताई सांगतात, ‘‘ शूटिंगच्या ठिकाणी सुलेखाचे तीन सीन करायचे राहिलेत असं जेव्हा कळतं तेव्हा तिला घरी यायला किमान सहा तास लागणार हे माझ्या लक्षात येतं किंवा माझी एखादी मीटिंग असेल तर ती किती महत्त्वाची आहे हे सुलेखाला माहीत असतं. अशा वेळी घरच्यांसाठी एकमेकींच्या वेळा जुळवून आणणं हे आम्हाला अधिक सोयीस्कर पडतं.’’
आज स्मिताताईंच्या घरात चार पिढय़ा एकत्र राहतायत. स्मिताताईंचे वडील नाना, स्मिताताई, त्याचा मुलगा अंबर, सून सुलेखा आणि त्यांची नातवंडे आर्य आणि टिया. घरचा संसार सांभाळतानाच ‘अस्मिता चित्र’चा संसारही गेली २३ वर्ष स्मिताताई सांभाळत आल्या आहेत. मुळात लग्नानंतर तळवलकरांच्या ४० जणांच्या एकत्र कुटुंबात वावरल्यामुळे सगळय़ांना बरोबर घेऊन पुढे कसं जायचं याची त्यांच्या आईने दिलेली शिकवण त्यांनी प्रत्यक्षात आणली.      तसंच पुढे सुलेखाचंही झालं. लग्नानंतर एकत्र कुटुंबच असावं, अशी तिची इच्छा होती त्याप्रमाणे घडलंही. यालाच जोडून आरती म्हणाली, ‘‘ सुलेखा ज्याप्रमाणे आमच्या घरात आल्या आल्या रुळली हे माझ्यासाठीही एक चांगलं उदाहरण होतं. त्यामुळे माझ्या लग्नानंतर सासरी, मोये कुटुंबात कसं अ‍ॅडजेस्ट व्हावं हे मी तिच्या उदाहरणाने शिकले. मुळात आम्ही चांगल्या मैत्रिणी होतो आणि तिच्या आणि अंबरच्या लग्नानंतरही आमचं नातं तसंच राहिलं. आम्ही अगदी सुरुवातीला जेव्हा भेटलो तेव्हा मला आठवतंय, माझी दुसऱ्या दिवशी परीक्षा होती. आदल्या रात्री आम्ही साधारणपणे तीन-साडेतीनला घरी आलो. त्यानंतर मी झोपले असते तर परीक्षेला जाऊच शकले नसते पण सुलेखा माझ्यासाठी जागी राहिली. आम्ही रात्रभर गप्पा मारल्या, अभ्यास केला आणि मी सकाळी परीक्षेला गेले. त्यामुळे सुरुवातीपासूनच आमचे सूर चांगलेच जुळले.’’
एक वेगळा प्रोजेक्ट म्हणून जेव्हा श्रावणी देवधरांनी ‘सुवासिनी’ ही मालिका स्मिताताईंकडे सोपवली तेव्हाच याच्या निर्मितीचीही जबाबदारी आता आरतीने घ्यावी, असं स्मिताताईंना वाटत होतं. त्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आरती ही जबाबदारी पार पाडते आहे. पण आज एक डेलीसोप करायचा तर काम तसं सोपं राहिलेलं नाही. म्हणूनच स्मिताताईंनी हे इतकी र्वष यशस्वीपणे कसं केलं याचं तिलाही अप्रूपच वाटतं.
आजपर्यंत व्यक्तिगत जीवनात किंवा व्यावसायिक पातळीवरही कितीही आव्हानात्मक प्रसंग आले तरी ठामपणे उभं राहून त्या प्रसंगावर मात करणं हे स्मिताताईंचं कसब. मग अगदी त्यांच्या वयाच्या ४०व्या वर्षी पती अविनाश तळवलकर यांचा अकाली मृत्यू असो किंवा अगदी अलीकडे त्यांना झालेल्या कर्करोगाचं निदान असो. हसतमुखाने मिश्कीलतेने त्याला सामोरं जायचं हे ठरलेलं. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली तेव्हा त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेताना डॉक्टर समजावून सांगत होते की, तुम्ही कसलीही काळजी करू नका. नििश्चत राहा. पण त्याही परिस्थितीत स्मिताताईंनी मिश्कीलपणे म्हटलं, ‘‘डॉक्टर, ऑपरेशनचं टेन्शन मला नाही, तुम्हाला आलं पाहिजे. कारण एकदा भूल दिल्यावर मला काय कळणार आहे?  त्यामुळे माझं ऑपरेशन नीट होतंय की नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे.’’ किंवा त्यांच्या एका ऑपरेशनच्या वेळी त्यांना भूल देणारे डॉक्टर भूल देता देताच गाणंही म्हणत होते. बरं गात होते तेही इतकं बेसूर की स्मिताताईंना ते ऐकवेना. स्मिताताई त्यांना पटकन म्हणाल्या, ‘अहो खूप त्रास होतोय.’ डॉक्टर म्हणाले, ‘‘हो हो. थोडं सहन करा. खूप वेदना होतायत का?’’ त्यावर स्मिताताई म्हणाल्या, ‘‘अहो, शरीराच्या वेदना मी सहन करतेय. पण तुमचं बेसूर गाणं मी कसं सहन करू? इतकं बेसूर गाताय की मला भूलही चढत नाहीए..’’  याच्याच उलट कोणत्याही परिस्थितीत डगमगून न जाता धीराने तोंड देणं म्हणजे काय? ते त्यांच्या आयुष्यातल्या कितीतरी प्रसंगात दिसून येतं. अविनाश यांचं निधन झाल्यानंतर सहाव्या दिवशी त्या नाटकाच्या प्रयोगाला उभ्या राहिल्या. त्यांचं म्हणणं  ‘‘एक तर रविवारची दुपार, एनसीपीएला प्रयोग लागलेला. तीन महिन्यातून एखादी अशी चांगली तारीख निर्मात्याला मिळते. ८० हजार रुपयांचा गल्ला त्या दिवशी त्या नाटकाला मिळाला. मी जर गेले नसते तर त्या निर्मात्याचं किती नुकसान झालं असतं. मला उभं राहायलाच हवं होतं.’’
आरतीच्या मते आईने इतक्या कणखरपणे सगळय़ा प्रसंगांना तोंड दिलं. म्हणूनच मीही माझ्या आयुष्यात काही करू शकले. माझ्यासाठी करिअर निवडण्यापासून अगदी माझा नवरा म्हणून कपिलची निवड करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर तिचा सल्ला मला मोलाचा वाटतो आणि तो तितकाच योग्यही असतो याचा अनुभवही मला आहे. कामाची आणि विचारांचीही तिची क्षमता जबरदस्त आहे. म्हणूनच माझ्यासाठी ‘संकलक’ या क्षेत्राची तिने केलेली निवडही तितकीच योग्य आहे. मी एका जागी बसून संकलनाचं कितीही काम करू शकते. हे तिला माहीत होतं.  त्यावेळी ‘अस्मिता चित्र’ची निर्मिती जोरात चालू होती. पुण्याला एडिटिंगचा सेटअप तयार होता. दोन संकलक काम करीत होते. आरतीने एक छोटासा कोर्स केला आणि ती पुण्याला राहून तिथल्या एडिटर्सकडून शिकू लागली. तेव्हा ‘अवंतिका’, ‘नूपुर’ या त्यांच्या मालिका चालू होत्या. आठवडय़ातून एकदा मालिका असल्याने आजच्या इतकी घाई नव्हती. पुरेसा वेळ मिळत होता. त्यामुळे चुका करीत त्यातून तिला शिकता आलं. एकदा तर ‘नूपुर’चा एक भागच चुकून तिच्या हातून पुसला गेला. पण तो दुसऱ्या दिवशी दय़ायचा असल्याने रात्रभर बसून तो पुन्हा तयार करून देता आला. हळूहळू तिने त्यात नैपुण्य मिळवलं आणि तिचं त्यातलं कौशल्य सिद्ध होत गेलं. ‘रेशीमगाठी’ करताना एकदा शूटिंग पूर्ण होऊन हातात टेप्स आल्या आणि नंतर लक्षात आलं की तो भाग अपेक्षेपेक्षा छोटा झालाय. शूटिंग तर पुन्हा होऊ शकत नव्हतं. आरती म्हणाली, ‘‘ स्लो मोशन इफेक्ट्स किंवा म्युझिक वापरून एपिसोड कसा वाढवायचा ते शिकले. अठ्ठेचाळीस तास काम केलं आणि तो एपिसोड तीन मिनिटांनी वाढवला होता.’’
आता गेली १० र्वष आरती संकलनाचं काम सातत्याने करते आहे. अर्थात आरती म्हणते, ‘‘तेव्हा तेवढा वेळ हाताशी होता. आता तेवढा वेळही नसतो. आज या क्षेत्रात ग्लॅमर आहे, प्रसिद्धी आहे, पैसाही आहे पण तो मिळालेला पैसा एन्जॉय करायला वेळच नाही, अशी परिस्थिती आहे. पण कामाचं समाधान आहे म्हणूनच आज ‘सुवासिनी’ करताना अनुभव म्हणून निश्चितच एक वेगळा मार्ग मला अनुभवता आला. पण याहीपेक्षा एखादं नाटक किंवा सिनेमाची निर्मितीव्यवस्था बघायला मला जास्त आवडेल.’’
याबाबतीत कामाचं वेड असणं हेच महत्त्वाचं आहे, असं स्मिताताईंना वाटतं. आजही दिलेला शब्द आणि वेळ पाळायची म्हणून अंगात ३ डिग्री ताप असताना स्वत:चंच प्रॉडक्शन हाऊस असतानाही त्या जाऊन ‘सुवासिनी’चं शूटिंग करून आल्या किंवा कॅन्सरमधून बाहेर पडल्यावर आता पुन्हा नव्याने सुरुवात करताना ‘सुवासिनी’सारखी मालिका तर केलीच, पण त्याचबरोबर ८० लाख रुपये भांडवलावर स्वत:चा स्टुडिओ त्यांनी दहिसरला उभारला. हे निश्चितच धाडसाचं पाऊल होतं.
स्मिताताई म्हणाल्या की, ‘‘वयाच्या सतराव्या वर्षांपासून मी काम करत्येय. दूरदर्शनवर बातम्या देता देता नाटकातली कामं सुरू झाली. स्वत:चा स्टुडिओ असावा, हे माझं स्वप्न होतंच. स्टुडिओ म्हणजे वैभव असतं कलाकारांसाठी. जेव्हा जयप्रभासारखे स्टुडिओ बंद पडले तेव्हा मलाच रडू यायचं. त्यामुळे स्टुडिओचं स्वप्नं पूर्ण झालं याचा आनंद वेगळाच आहे.’’
स्मिताताईंच्या या स्वप्नामुळे ‘अस्मिता चित्र’चं शूटिंग आज स्वत:च्या स्टुडिओत होतं, हे खूप महत्त्वाचं आहे.
 स्मिताताईंच्या कुटुंबाचा आणखी एक खांब म्हणजे त्यांची सून सुलेखा. एक उत्तम अभिनेत्री असलेल्या सुलेखाला रसिकांनी अत्यंत निवडक, मोजक्या अशा भूमिकांमध्ये नेहमीच पाहिलंय. स्टार प्रवाहवरच्या ‘सुवासिनी’, ‘चारचौघी’, ‘दोन किनारी दोघी आपण’, ‘अग्निहोत्री’ तर झी टिव्हीवरच्या ‘असंभव’, ‘ऊनपाऊस’, ‘रेशीमगाठी’, ‘अवंतिका’ अशा गाजलेल्या मालिकांमधून सुलेखाने साकारलेल्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात राहिल्या. तसंच काही गाजलेल्या िहदी मालिका, ‘कदाचित’, ‘आई’सारखे काही महत्त्वाचे मराठी चित्रपट किंवा जाहिराती यातून सुलेखाने आपलं करिअर पुढे नेलं आहे. आपल्या भूमिकांची निवड ती अत्यंत विचारपूर्वक करते. ‘ती केवळ ग्लॅमरच्या मागे धावणारी नाही तर घर आणि करिअरचा विचार करतानाही अत्यंत समतोल विचार करणारी आहे,’ असं स्मिताताईही आवर्जून सांगतात.
सुलेखा लग्न होऊन जेव्हा घरी आली तेव्हा ती अभिनयाच्या क्षेत्रात फार काम करीत नव्हती. एकत्र कुटुंबातली तिची घडी हळूहळू बसत होती. मुलंही मोठी होत होती. त्या दिवसांत स्मिताताईंचं काम मात्र खूप जोरात चालू होतं. त्यामुळे अगदी नानांच्या पथ्यपाण्याच्या जेवणखाणापासून घरातली बरीचशी जबाबदारी सुलेखानेच उचलली. पण नंतर जेव्हा एखादय़ाच प्रोजेक्टचं काम करताना काही दिवस घराबाहेर राहावं लागायचं तेव्हा मुलांची जबाबदारी आरतीवर असायची. आणि सुलेखा सांगते त्याप्रमाणे ‘‘आरती मुलांना खूप छान सांभाळायची. त्यामुळे माझे दौरे असले तरी एकत्र कुटुंबामुळे मला मुलांची काळजी नव्हती. काकी, नाना आणि आरती यांच्याकडे मुलं सुखरूप असायची. मला आठवतंय, टिया जेव्हा लहान होती तेव्हा नेमकं मी मुंबईत नसताना तिला काहीतरी व्हायचं. म्हणजे आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला मी आणि अंबर दरवर्षी पाच-सहा दिवस गोव्याला जातो. एका वर्षी आम्ही तिकडे असताना, पडल्याने टियाला खोप पडून टाकेही घालावे लागले होते. एकदा तिच्या गळय़ातला खंडोबाचा ताईत तिने गिळला होता. आता अशा वेळी मला काळजी वाटू नये म्हणून सगळय़ा गोष्टी निस्तरल्यानंतर मला आरतीचा फोन येतो की असं असं घडलं होतं. खरं तर घरातून हा सपोर्ट आहे. आम्ही एकत्र कुटुंबात राहतोय मुलांची जबाबदारी पूर्णपणे माझ्यावर नाही. त्यामुळेच आज मी माझ्या करिअरचा विचार करू शकते.’’
एकमेकींबद्दलची ही काळजी त्या तिघींच्याही वागण्यातून सहजच येते. म्हणूनच जेव्हा स्मिताताईंचं कर्करोगाचं निदान झालं तेव्हा ‘त्यांना बरं वाटेपर्यंत काम करणार नाही,’ असा निर्णय सुलेखाने घेतला. तिच्या मते, आपण हे सगळं कशासाठी करीत असतो? अभिनयासाठी मिळणारी संधी आणि पैसा हे केव्हाही मिळू शकतं , पण आपली माणसं मात्र त्या त्या वेळीच जपावी लागतात, असं मला वाटतं. काकींना मी सांगितलं होतं की, ‘तुम्ही यातून बाहेर पडून काम करायला सुरुवात केलीत की मीही काम सुरू करेन.’
सुलेखाने आपला शब्द पाळला. आरतीची साथ लाभली आणि आज कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर मात करून स्मिताताई पुन्हा एकदा जिद्दीने उभ्या राहिल्यात. कुटुंबाचा भक्कम आधार असला की, आयुष्यातल्या आव्हानाचं आकाश लीलया पेलू शकते, एवढं मात्र निश्चित.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो