स्त्री समर्थ : ‘अन्नपूर्णा’ एक्सप्रेस
मुखपृष्ठ >> स्त्रीसमर्थ >> स्त्री समर्थ : ‘अन्नपूर्णा’ एक्सप्रेस
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

स्त्री समर्थ : ‘अन्नपूर्णा’ एक्सप्रेस Bookmark and Share Print E-mail

प्रा. हेमा गंगातीरकर ,शनिवार, ४ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

वयाची अडुसष्ट वर्षे पूर्ण केलीय, आर्थिक घडीही स्थिर होतेय तरीही आयुष्यभर पै पै जोडण्यासाठी प्रचंड कष्ट करण्याची सवय झालेल्या सुनीता खाडिलकरआजी रोज सकाळी साडेपाचला घरून निघतात. कोयना एक्स्प्रेसमधून रोज प्रवास करणाऱ्या चाकरमानी स्त्रियांना गरमागरम नाश्ता विकतात आणि तृप्त झालेले त्यांचे चेहरे पाहून दुसऱ्या दिवशीच्या कष्टांसाठी ऊर्जा मिळवतात. त्या खाडिलकरआजींविषयी..
कोल्हापूरहून मुंबईला जाणारी कोयना एक्स्प्रेस प्लॅटफॉर्मला लागली आहे.. हातातले सामान सावरत डब्यात चढण्याची गडबड आणि जागा मिळाल्याचा आनंद प्रवाशांच्या चेहऱ्यावर दिसतोय.. नोकरीनिमित्त रोजच या ट्रेनने प्रवास करणारे लोक आपापल्या सहकाऱ्यांचा नजरेने शोध घेत डब्यात स्थानापन्न होताहेत.. बाजूच्या लेडीज डब्यात चिवचिवाट वाढलाय.. धावतपळत ट्रेन पकडल्याने लागलेली धाप, चेहऱ्यावरचा घाम पुसत जिंकला आजचा दिवस असा भाव धारण करणाऱ्या रोजचे सहप्रवासी तारांबळ विसरून गप्पा मारू लागलेत.. वाढत्या गर्दीत फिरते विक्रेते खेळणी, रबर, कंगवे, बांगडय़ा, कानातले, हातरूमाल घेऊन प्रवाशांसमोर फिरत आहेत.. याच गर्दीत एक आजी आपल्या हातातील दोन मोठय़ा अवजड पिशव्या सावरत सराईतपणे महिला डब्यात शिरल्या आणि बसण्यासाठी नजरेनेच जागा शोधू लागल्या.. इतक्यात ‘अहो, मावशी, इकडं या, तुमची जागा इथे धरली आहे, आणा त्या पिशव्या इकडं’, असा एक स्त्री आवाज आला. आजी आपल्या सीटवर बसतात.. हातातल्या पिशव्या बाजूला ठेवत चेहऱ्यावरचा घाम पुसतात.. गाडी सुटते, हळूहळू वेग घेते आणि पाचच मिनिटात महिला डब्यातील नोकरदार महिला आजींनी आणलेला गरमागरम नाश्ता खाऊ लागतात..
गेली सहा वर्षे अविरत सुरू असणारा हा नित्यपाठ, नेहमीचे दृश्य. कोयना एक्स्प्रेसच्या महिला डब्यात नोकरदार आणि प्रवासी महिलांना ताजा, रुचकर, गरम नाश्ता पुरविण्याचे काम अडुसष्ट वर्षीय सुनीता पांडुरंग खाडिलकर आनंदाने करतात. ठरलेली वेळ, ठरलेला डबा आणि गाडी. दमूनभागून पहाटेपासून पळापळ करत नोकरीच्या ठिकाणी जाणाऱ्या महिलांना बसल्या जागी त्यांच्या ऑर्डरप्रमाणे नाश्ता पुरविण्याचे काम इमानेइतबारे खाडिलकर आजी करत आहेत.
खाडिलकर आजींचा दिनक्रम अगदी आखीव-रेखीव. आळस, कंटाळा नाही. पहाटे चारला उठणे, रोजची आन्हिके आटोपून साडेपाचला आंघोळ. त्या दिवशीच्या मेनूनुसार इडली, आप्पे, ढोकळा, कांदापोहे जो पदार्थ असेल तो करणे. डब्यात भरून चटणी, बरणीत भरून कागदी डिश, चमचे सारा जामानिमा सोबत घेऊन रिक्षा करून कोयना एक्स्प्रेसच्या लेडीज डब्यात जायचे. कोयना एक्स्प्रेसला महिलांचे दोन डबे असतात. या डब्यातून नोकरी करणाऱ्या, कामानिमित्त प्रवास करणाऱ्या महिलांना नाश्ता पुरविण्याचे काम खाडिलकर आजी करतात. कुटुंबासाठी पहाटे उठून स्वयंपाक, पोळी-भाजी करून नोकरीचे ठिकाण गाठणाऱ्या महिलांना कपभर चहावर घर सोडावे लागते. रोजच्या धबडग्यात नाश्ता करायला, खायला वेळच नसतो. बरोबर घेतलेला डबा खायला दोन-अडीच होतात. अशा महिलांची खाडिलकर आजींच्या नाश्त्यामुळे छान सोय झाली आहे. बाई कुटुंबासाठी राबते, पोराबाळांच्या करिअरसाठी नोकरी करते, पण या धकाधकीत तिला स्वत:कडे बघायला वेळ नसतो. अशा स्त्रियांना रेल्वेच्या डब्यात बसल्या जागी मनपसंद नाश्ता मिळतो.
खाडिलकर आजींच्या नाश्त्यात व्हरायटी असते. इडली, आप्पे, ढोकळा, पुरी-भाजी, शिरा, कांदेपोहे, डाळींब, शेंगदाणे, ओला नारळ घातलेले कांदाविरहित शाही पोहे, दडपे पोहे, जैन पोहे, गहू पोहे, पातळ पोहे, गुलमोहर पोहे यांचा चिवडा, मक्याचा चिवडा, डाएट चिवडा, भडंग, डिंक लाडू, हाळीव लाडू, रवा लाडू, भाजणीचे थालीपीठ, वरी, साबुदाण्यापासून बनविलेला उपवासाचा ढोकळा, खिचडी, कढी गोळे भात, पुरणपोळी, कटाची आमटी, मूग डाळ  व उडीद डाळ यांची भजी, राजगिरा लाडू असे वैविध्यपूर्ण, तोंडाला पाणी सुटणारे पदार्थ खाडिलकर आजी रेल्वेच्या डब्यातून विकतात. कोयना एक्स्प्रेसने हातकणंगल्यापर्यंत जाणे, तेथे अर्धा तास स्टेशनवर थांबून सव्वानऊ वाजता कोल्हापूरकडे येणारी सातारा पॅसेंजर पकडणे, स्टेशनवरून चालत चालत दहा वाजता घरात. दोन तासाची नोकरी. रोज २०० ते ४०० रुपयांपर्यंत विक्री. महिन्याचा ११५ रुपयांचा पास, कच्चा मालाचा खर्च जाऊन महिना चार-पाच हजार सुटतात. महिला बसल्या जागेवरून डिश घेऊन जातात. रोजच्या महिलांपैकी एकजण नाश्त्याचे पैसे गोळा करते. गर्दीच्या वेळी डिश भरायला पण मदत करतात. कोणी फसवत नाही, पैसे चोरत नाही. नाश्ता खाल्ल्यानंतरचे महिलांचे समाधानी चेहरे आणि उत्स्फूर्त प्रतिक्रिया,  ‘‘आजी, तुमच्यामुळे आम्हाला गरमागरम नाश्ता मिळतोय. आम्ही घरीसुद्धा एवढा चांगला, शिवाय दररोज वेगळा नाश्ता करू शकणार नाही. तुमच्या नाश्त्यामुळे ऑफिसात आम्ही दोन-अडीचपर्यंत आरामात काम करू शकतो.’’ महिलांच्या या उत्स्फूर्त प्रतिक्रियेमुळे खाडिलकर आजींना या वयातही काम करण्यास हुरूप येतो. दुपारी भोजनोत्तर विश्रांती घेऊन खाडिलकर आजी दुसऱ्या दिवशीच्या नाश्त्याच्या तयारीला लागतात. कुणी दिलेली लाडू, चिवडय़ाची, तिखट पुऱ्यांची ऑर्डर पूर्ण करण्याच्या कामाला लागतात.
 प्लॅटफॉर्म आणि रेल्वेचा डबा याच्याशी आजीचे हे असे जवळकीचे नाते आहे. जीवनाच्या प्रवासासाठी त्यांना रोजच हा  प्रवास करावा लागतो. रेल्वेबरोबर धावावे लागते.
खाडिलकर आजींचे (सुनीता) लग्न १९६२ साली हुबळीच्या पांडुरंग खाडिलकर यांच्याशी सांगली येथे मुरलीधर कार्यालयात झाले. लग्नानंतर आठ-पंधरा दिवस हुबळीला दिरांकडे राहून दोन महिन्यांतच कोल्हापूर येथे बिऱ्हाड केले. यजमानांची नोकरी कोल्हापूरच्या शाहू मिलमध्ये. शिक्षण बेताचे त्यामुळे पगारही बेताचा. मधल्या काळात दोन मुलांचा जन्म. एक मुलगा, एक मुलगी. आजींची दोन्ही मुले पदवीधर असून, दोघांचीही लग्ने झालेली आहेत. पतीची नाजूक तब्येत, बेताचा पगार आणि कुटुंबाचा वाढता खर्च. धडपडय़ा स्वभावाच्या सुनीतांबाईंना दिवसभर घरी बसून राहाणे बरे वाटेना. आपण काहीतरी करावे, वाढत्या कुटुंब खर्चाला आपला हातभार लागावा, ओढग्रस्तीच्या संसारात आपणही चार पैशाची भर घालावी असे सुनीताबाईंनी मनाने ठरवले. त्यांचे शिक्षण जुनी अकरावी. या शिक्षणावर चांगली नोकरी कशी मिळणार? जीवनात काहींच्या वाटेला संघर्ष, कष्ट अटळ असतात. त्या शिवाय काही मिळत नाही हेच खरे. स्त्रियांच्या धडपडीच्या मार्गाचा मागोवा घेतल्यास एक म्हणजे पोळपाट-लाटणे हाती घ्या, नाहीतर मिळेल ते काम स्वीकारून पुढे सरकत रहा. गरजूंना चॉईस असतोच कुठे? असा अनुभव सुनीताबाईंच्या पण वाटय़ाला आला. शाहूपुरीत राहायचं आणि पहाटे पाचला उठून भवानी मंडपातल्या दूध केंद्रावर नोकरी करायची. ऊन, पाऊस, अडचणीची वेळ. तीन-चार तास उभं राहून पूर्वी बाटल्या नंतर दूध पिशव्यांची देवघेव करायची. पैशाचा हिशेब नीट ठेवायचा. चूक झाली, चुकून गिऱ्हाईकाला पैसे चढ गेले तर भरुदड ठरलेला. दूध केंद्रावरची ही कसरतीची नोकरी सुनीताबाईंनी ३५ वर्षे इमानेइतबारे केली. सुरुवातीला एक लिटर दुधाला पाच पैसे कमिशन मिळत असे. नंतर ते कमिशन एक रुपये वीस पैसे झाले.
गाठीला गाठ बांधावी, पैशाला पैसा जोडावा असे म्हणतात. हाच हेतू मनात धरून सुनीताबाईंनी बारा वर्षे घरघंटी-पिठाची गिरण चालवली. ग्राहकांना उत्तम भेसळविरहित पिठे दळून दिली. या व्यवसायात बरे पैसे मिळत. सुनीताबाईंसारख्या चळवळ्या स्त्रीला अनेक वाटा साद घालत असतात. एका वेळी अनेक गोष्टी करण्याची ऊर्मी त्यांच्यात असते. जीवनात कोणतीच वाट सोपी-राजरस्त्याप्रमाणे नसते. या वाटेवर खाच-खळगे, काटे-कुटे असतातच. घर चालवायचं असेल तर वाटा निवडण्याचं स्वातंत्र्य बाईला असतंच कुठे? अशाच धडपडीतून सुनीताबाई चौथीपर्यंतच्या वर्गातील मुलांच्या शिकवण्या घेत. मुलांच्या घरी जाऊन शिकवत. राजारामपुरीतील श्रीराम विद्यालयात प्राथमिककडे सुनीताबाईंनी दोन वर्षे नोकरीही केली. मिळालेल्या चार पैशाची संसारात भर घालून मुलांचे शिक्षण, हौस-मौज केली. सुनीताबाईंची कन्या बी.ए. तर चिरंजीव बी.कॉम. आहेत. सध्या जळगाव येथे घाटगे पाटील इंडस्ट्रीत नोकरी करत आहेत.
स्त्री शिकली तर तिच्या आर्थिक स्वावलंबनाची वाट सुकर होते. परंतु सुनीताबाईंचा काळ- साठच्या दशकाचा विचार करता त्याकाळी स्त्री शिक्षणाचा आग्रह कुटुंबीय फारसा धरत नसत. याचा नकळत परिणाम स्त्रीच्या विवाहोत्तर जीवनावर, आर्थिक स्वावलंबनावर होत असतो. सुनीताबाईंनी सात वर्षे घरगुती खानावळ चालविली. त्याचे असे झाले अमरावतीकडचे शिक्षक कोल्हापूरच्या बी. टी. कॉलेजमध्ये बदलून आले. या शिक्षकांना खानावळीतील तिखट, मसालेदार जेवण सोसेना. त्या वेळी बी. टी. कॉलेजच्या प्राचार्या लीलाताई पाटील होत्या. त्यांच्या सूचनेवरून सुनीताबाईंनी या स्टाफसाठी घरगुती खानावळ सुरू केली. सुनीताबाई घरीच रुचकर गरमागरम जेवण करून या बी. टी. कॉलेजच्या स्टाफला वाढू लागल्या. त्या काळी जेवणाचा मासिक दर तीनशे रुपये प्रति महिना होता. नोकरी सोडून गावी जाणाऱ्या स्टाफला सकाळी दहाला आणि रात्री आठला घरगुती रुचकर जेवण मिळू लागले. महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आलेल्या त्यांच्या बायका हॉटेलात राहात पण नाश्ता आणि जेवणासाठी सुनीताबाईंकडे येत. सुनीताबाईंच्या सुग्रास भोजनाचा आस्वाद घेऊन त्या महिला म्हणत, ‘‘आम्हाला माहेरी आल्यासारखं वाटतंय.’’ हा खानावळीचा उद्योग सुनीताबाईंनी सात वर्षे केला. लीलाताईंशी ओळख झाल्याने कॉलेजच्या मागणीनुसार सुनीताबाईंनी ऑर्डरनुसार चाळीस-पन्नास प्लेट नाश्ता बी. टी. कॉलेजमध्ये पुरविला आहे.
सुनीताबाईंची ९३ वर्षांची आई मनोरमा माधव लिमये त्यांच्यासमवेत राहाते. त्यांचे पती शिक्षक असल्याने त्यांना पेन्शन आहे. आईची पेन्शन आणण्यासाठी माय-लेकी रेल्वेने सांगलीच्या महाराष्ट्र बँकेत जातात. असा रेल्वेने प्रवास करत असताना विक्रेते आपला माल कसा विकतात. प्रवाशांची गरज काय आहे, आपणही राजगिरा लाडू, चिवडा, कोरडे पदार्थ विकू शकू का, हा विचार खाडिलकर आजींच्या मनात आला आणि या विचाराला मूर्त रूप येऊन गेली आठ वर्षे खाडिलकर आजी रेल्वेत सकाळी दोन तास डय़ुटी करून चार पैसे मिळवतात. आज आजींचे वय ६८. मुलगा-मुलगी दोघेही दूर. वृद्ध आईची सोबत आणि आधार. जोडीला खाडिलकर आजींना हृदयरोग, शुगर, बी.पी. आहेच. गोळ्या घेऊन आजारांना थोपविण्याचे काम आजी करतात. आई म्हणते, ‘‘अगं, थांबव ही धडपड, माझ्या पेन्शनमध्ये आपल्या दोघींचं भागतंय. किती राबतेस?’’ पण खाडिलकर आजींचा आत्मविश्वास जबरदस्त. त्याला उत्साहाची साथ. या वयातही चौदा-चौदा तास काम करण्याची तयारी. कच्चा माल आणणे, पदार्थ बनविणे सुरूच. या नव्या उद्योगातून आजींना घरात गॅस, वॉशिंग मशीन, फ्रीज, लागणाऱ्या मोठय़ा कढया, पातेली खरेदी केली. स्वपैशातून दक्षिण भारत ट्रीप करून आल्यात.
खाडिलकर आजी स्वयंसिद्धाच्या मेंबर आहेत. स्वयंसिद्धाच्या कांचनताई परुळेकरना त्यांनी जेवणाचा डबाही दिला आहे. रेल्वेबरोबर धावणाऱ्या हसतमुख खाडिलकर आजी म्हणतात, ‘अहो, मला होतंय तोवर मी हा उद्योग करणारच. रोजच्या धावपळीत मला आनंद वाटतो. नोकरीला जाणाऱ्या महिलांना मी नाही गेले तर नाश्ता कोण देणार? उलट या धावपळीमुळे, रोज भेटणाऱ्या नव्या चेहऱ्यामुळे माझे आरोग्य चांगले आहे. माझ्या जगण्याला अर्थ आहे.’
 सुनीताबाईंची ही जिद्द आणि आत्मविश्वास धडपडणाऱ्या महिलांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या हातचा नाश्ता ज्यांना खायचा आहे, तर मग चला कोयना एक्स्प्रेसच्या लेडीज डब्यात!   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो