र.धों.च्या निमित्ताने.. : बलात्काऱ्याला भय कोणते ?
मुखपृष्ठ >> लेख >> र.धों.च्या निमित्ताने.. : बलात्काऱ्याला भय कोणते ?
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

र.धों.च्या निमित्ताने.. : बलात्काऱ्याला भय कोणते ? Bookmark and Share Print E-mail

डॉ. मंगला आठलेकर ,शनिवार, ४ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

बलात्कारासारख्या गुन्ह्य़ासाठी आपल्याकडे देण्यात  आलेल्या काही शिक्षा म्हणजे बलात्काराच्या गुन्हेगारांना अभयच आहे, असं म्हणावं लागेल. बलात्कार करणाऱ्या नराधमाला नोकरीतून काढून टाकणं यात या स्वरूपाच्या गुन्ह्य़ांची पुनरावृत्ती होऊ नये अशी कोणती जरब आहे? आणि शरीर-मनाच्या अपमानानं तळमळणाऱ्या मुलींच्या आयुष्याची कोणती भरपाई आहे? म्हणूनच बलात्काराचा तिरस्कार करणाऱ्या प्रत्येकानं बलात्कारासाठी ठरवल्या गेलेल्या शिक्षेचा पुनर्विचार करायला एकत्र यायलाच हवं.
गुवाहाटी, उस्मानाबाद आणि चंद्रपूरमध्ये नुकत्याच घडलेल्या मुलींवरच्या अत्याचारांच्या घटना- गुवाहाटीत रात्री क्लबमधून आपल्या मित्रमत्रिणींसह बाहेर पडलेल्या एका अल्पवयीन मुलीला वीस जणांच्या जमावानं घेरलं आणि तिचे कपडे ओरबाडून तिच्याशी अश्लील वर्तन केलं, उस्मानाबादमध्ये लखन आढावनं एका चौदा वर्षांच्या मुलीची छेडछाड केल्यानं आणि त्याच्या सततच्या मागे लागण्यातून स्वतची सुटका होण्याचा उपाय न सापडल्यानं त्या मुलीनं स्वतला जाळून घेतलं, तर चंद्रपूरमधल्या इंदिरानगरमध्ये फिरायला नेण्याच्या बहाण्यानं एका मुलीवर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आली.
पहिल्या घटनेत क्लबमध्ये जाऊन दारू पिणाऱ्या, अल्पवस्त्रात बाहेर पडणाऱ्या मुलीला म्हणे धडा शिकवण्यात आला, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या घटनेत आपल्याला हवी असलेली मुलगी आपल्याला मिळालीच पाहिजे हा ‘पुरुषार्थ’ दाखवला गेला. दोन्ही ठिकाणी स्त्री ही आपल्याच अखत्यारीतली वस्तू, तिनं आपल्या मर्जीनुसारच वागलं पाहिजे, या पुरुषी अरेरावीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
  शारीरिक दुबळेपण ही स्त्रीची सर्वात मोठी उणीव, ज्यामुळे असंस्कृत, रानटी पुरुष स्त्रीवर बलात्कार करू शकतो. स्त्रीवर होणारा बलात्कार प्रत्येक वेळी फक्त शारीरिकच नसतो. तिच्या शरीरावर बलात्कार करणारे पुरुष जसे तिला भेटतात, तसेच तिच्यावर मानसिक बलात्कार करणारे पुरुषही तिला भेटतात. वास्तविक दोन्हीही तिच्यासाठी सारखेच क्लेशकारक.. तिला जगणं नकोसं करणारे. पण तिच्यावर होणाऱ्या शारीरिक बलात्काराशी सगळ्या घराण्याची प्रतिष्ठा जोडलेली असल्यानं घराण्याची प्रतिष्ठा, अब्रू धुळीत मिळवणारा हा बलात्कार मात्र तिला जगणं नुसतं नकोसंच करत नाही, तर जगण्यातूनच उठवतो.
बलात्कार करणाऱ्या पुरुषाची मनोवृत्ती, त्याच्यात असलेली संभोगसुखाची वासनांध लालसा, नराचं सारं काही नसíगक.. म्हणून त्याला कुठलाही अनाचार करण्याची निसर्गदत्त मान्यता देणारे, त्याच्या या पाशवी कृतीचं ‘नसíगक’ म्हणून समर्थन करणारे महाभाग, हा सगळाच खूप गांभीर्यानं घेण्याचा विषय आहे.
    बलात्काऱ्याला कशाचाच धाक नसतो. बस, त्याक्षणी फक्त त्याची भूक भागायला हवी. या विकृतीबरोबरच त्याच्या वाटय़ाला येणारं नराश्य, त्याची भूक, अतृप्ती, त्याचं अपयश, त्यातून त्याला येणारी प्रचंड चीड, या साऱ्याचा सूड काढण्यासाठी त्याला समाजात सहजगत्या उपलब्ध असलेलं, त्याच्या अगदी हाताशी असलेलं साधन म्हणजे स्त्री! घरातली कामवाली, रस्त्यावरून जाणारी एकटी-दुकटी, शेजारच्या अंगणात खेळणारी छकुली, पाळण्यात निरागसपणे झोपलेली तान्हुली, रिक्षासाठी रस्त्यावर उभी असलेली सात- आठ महिन्यांची गरोदर स्त्री, घरात एकटी असलेली सत्तर वर्षांची वृद्धा.. विकृत पुरुषातल्या जनावराला यातली कोणीही चालते. असं पशुवत वर्तन करणारा फक्त कुणी अशिक्षित, झोपडपट्टीत राहणारा, मजूर अथवा घरादारावरनं ओवाळून टाकलेला गुंड असतो? अजिबात नाही. बलात्कार करणाऱ्याला जात नसते, धर्म नसतो, आíथक, सामाजिक फरक दाखवणारे स्तर नसतात, वर्ग नसतो, तो जसा कुणी खालच्या वर्गातला गुंड असतो तसाच तो उच्चविद्याविभूषित, उच्चभ्रू समाजातलाही असतो. तो प्राध्यापक असतो, तो राजकारणी असतो, अभिनेता असतो आणि आपल्या साऱ्याचं रक्षण करण्याची जबाबदारी घेतलेला पोलीसही असतो. तो कुणाशी कुठल्या नात्यानं बांधला गेलाय हे इथं महत्त्वाचं नसतंच. जिच्यावर जो बलात्कार करतो तिचा तो काका असतो, मामा असतो, मित्र असतो, शेजारी असतो, कधी आजोबा असतो आणि कधी बापही असतो. त्याला फरक पडत नाही. त्याची भूक भागवणारा देह एका स्त्रीचा आहे हे त्याला पुरेसं असतं.
     खरंतर अशा नराधमाला, मुली-नातीलाही न सोडणाऱ्या बलात्काऱ्याला शिक्षा एकच.. िलगविच्छेदाची.  पुन्हा म्हणून बलात्काराचं कृत्य करायला तो सक्षमच राहणार नाही. पण न्यायालयीन प्रक्रियेतील पळवाटांतून अनेकदा बलात्कारी सुटत राहतो. काही उदाहरणांत तर हे बलात्कारी शिक्षा होत नाही तोपर्यंत उन्मत्तासारखं जगत रहातात आणि शिक्षेची वेळ येते तोपर्यंत त्याच्या गोवऱ्या स्मशानात पोहोचलेल्या असतात. कायद्याचा धाक वाटत नाही, शिक्षेची भीती वाटत नाही म्हणूनच अशा कृत्यांची पुनरावृती घडत राहते.
समाजाचं हे निर्ढावलेपण संपायलाच हवं. आज जी काही घरं अशा संकटांपासून दूर आहेत त्यांनाही ही झळ लागण्याची भीती आहेच. गेल्या दहा वर्षांत ज्या वेगानं बलात्काराच्या संख्येत वाढ होतेय, ती पाहिल्यानंतर या सत्याची भयानकता प्रत्ययाला येईल.
अगदी ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’पासून भारतातल्या अनेक सामाजिक संस्थांनी केलेले  विविध सव्‍‌र्हेक्षणं आणि त्यांचे आकडे हे सत्य नजरेसमोर आणण्यासाठी पुरेसे आहेत. २००५ मध्ये नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोनं जो अहवाल प्रसिद्ध केला त्यानुसार त्या एका वर्षांतल्या एकटय़ा महाराष्ट्रात स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराच्या संदर्भातल्या पोलीस दफ्तरी दाखल झालेल्या १३,३७० प्रकरणांपकी ६२३३ प्रकरणं नवरा आणि नातेवाईकांनी केलेल्या क्रूर छळाची आहेत. ८५१ अपहरणाची आहेत, ३२२८ स्त्रियांशी केल्या गेलेल्या असभ्य वर्तनाची आहेत आणि १५४५ बलात्काराची आहेत.
यापकी बलात्काराच्या प्रकरणांमधल्या सर्वाधिक केसेस या दिल्ली, पुणे, मुंबईसारख्या सुसंस्कृत मानल्या गेलेल्या शहरात घडलेल्या आहेत. त्यातही ज्यांनी रक्षण करायचं अशा पोलिसांकडून आणि ज्यांच्यावर विश्वास टाकायचा अशा ओळखीच्यां कडूनच हे बलात्कार व्हावेत ही मोठी शोकांतिका आहे.
२१ एप्रिल २००५मध्ये मरीन ड्राइव्हवर आपल्या मित्राबरोबर फिरणाऱ्या एका सतरा वर्षांच्या कॉलेजकन्येला सुनील मोरे नावाच्या कॉन्स्टेबलनं चौकशीसाठी पोलीस स्टेशनात घेऊन तिच्यावर केलेला बलात्कार, ८ मे २००५ ला सुनील सावंत आणि सुभाष मोरे नावाच्या दोन कॉन्स्टेबल्सनी ठाणे रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नं. २ इथं एका बेचाळीस वर्षांच्या विवाहितेच्या शरीराशी तिचा नवरा आणि मुलीच्या समोर केलेले असभ्य चाळे, १६ मे २००५ मध्ये नागपूर येथील आर्मीच्या भरती कार्यालयाच्या कंपाऊंडमध्ये एका छोटय़ा मुलीवर आर्मी जवानानं दोन स्थानिकांच्या साथीनं केलेला बलात्कार, अशा एक ना दोन किती बलात्काराच्या केसेस सांगायच्या? त्यातही राजस्थानमध्ये घडलेली, अंगावर अक्षरश काटा आणणारी घटना तर पोलिसांवरील विश्वासाच्या पार चिंध्या करणारी घटना आहे.
राजस्थानमधील सीमा सिंग नावाच्या एका चोवीस वर्षांच्या मुलीनं आपल्या मत्रिणीचं अपहरण झाल्याची तक्रार पोलिसस्टेशनात नोंदवली. तिला चौकशीसाठी म्हणून पोलिस चौकीत बोलावून तिनं तक्रार मागे घ्यावी म्हणून पोलिसांनी तिला जबरदस्त मारहाण केली. मारहाणीला ती जुमानत नाही म्हटल्यावर पोलिसांनी तिला नग्न करून तिच्या योनिमार्गात बोटं खुपसली. आत्यंतिक भयानं आणि वेदनेनं ती कळवळत असताना त्यांनी तिच्यावर सामुदायिक बलात्काराचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी तिला परत चौकशीसाठी बोलावलं असताना तिनं तिथं जाण्याऐवजी धावत्या रेल्वेसमोर उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला. त्यातून ती वाचली. पण शरीर-मनाच्या भग्नावस्थेत ती आज हॉस्पिटलच्या बेडवर पडून आहे.
जिथं पोलिसांनाच कायद्याचा धाक वाटत नाही, शिक्षेचं भय वाटत नाही तिथं इतरांची काय कथा?
 पोलिस खात्यातल्या अशाच काही विकृतांमुळे विकृती वाढते आहे. अपराध्याला अभय असतं हेच पाहात इथले गुंड मोकाट वागतात. म्हणूनच इथं बापही पोटच्या पोरीवर बलात्कार करायला धजावतो. जानेवारी २०१० मध्ये बेचाळीस वर्षांच्या एका लॅब असिस्टंटनं आपल्याच चौदा वर्षांच्या मुलीला घरात कोंडून सलग पाच दिवस तिच्यावर केलेला बलात्कार, सांगवीत खुद्द वडिलांनीच आपल्या दोन मुलींना दम देत त्यांच्यावर केलेला बलात्कार, पुण्यात एका सत्त्याहत्तर वर्षांच्या म्हाताऱ्यानं आपल्या अपंग बायकोच्या सेवेसाठी ठेवलेल्या नातीच्या वयाच्या दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून नंतर तिचा केलेला खून.. या साऱ्या घटना कसलाच विधीनिषेध राहिलेला नाही हे सिद्ध करायला पुरेशा आहेत.
इतके निर्घृण अपराध करणाऱ्या या पुरुषांना त्यांच्या गुन्ह्य़ाबद्दल कोणती शिक्षा झाली? तर कुणाला नोकरीतून काढून टाकलं, कुणावर केस चालू आहे, कुणाला पाच-सात वर्षांचा तुरुंगवास झाला, कुणाला पशाच्या स्वरूपात त्या मुलीला भरपाई द्यावी लागली. बलात्कारासारख्या गुन्ह्य़ांना इतक्या सौम्य शिक्षा म्हणजे बलात्काराच्या गुन्ह्य़ांना अभयच आहे, असं म्हणावं लागेल.
बलात्कारित मुलींच्या मनांची तडफड कायद्याला, समाजाला कधी कळणार? बलात्कार करणाऱ्या नराधमाला नोकरीतून काढून टाकणं यात या स्वरूपाच्या गुन्ह्य़ांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी कोणती जरब आहे? आणि शरीर-मनाच्या अपमानानं तळमळणाऱ्या मुलींच्या आयुष्याची कोणती भरपाई आहे?
आज र. धों. असते तर त्यांनी या संदर्भात कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेला किती धारेवर धरलं असतं? बलात्काराचा तिरस्कार करणाऱ्या प्रत्येकानं बलात्कारासाठी ठरवल्या गेलेल्या शिक्षेचा पुनर्वचिार करायला एकत्र यायलाच हवं.
आणि शिक्षेच्या तात्काळ अंमलबजावणीसाठी तर समाजाच्या दडपणाइतकं दुसरं मोठं हत्यार नाही.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो