अनघड अवघड - संवादसेतू
मुखपृष्ठ >> अनघड.. अवघड >> अनघड अवघड - संवादसेतू
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अनघड अवघड - संवादसेतू Bookmark and Share Print E-mail

आई - बाबा तुमच्यासाठी
मिथिला दळवी ,शनिवार, ४ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आपले ‘लूक्स’ नॉर्मल आहेत ना, आपण पुरेसे चांगले-आकर्षक दिसतो आहोत ना, हे मुलांसाठी फार महत्त्वाचे मुद्दे असतात. या मुलांच्या शरीरात होणारे बदल हे त्यांच्यासाठी मोठं चिंतेचं कारण असू शकतं. स्वत:ची बॉडी इमेज हा त्यांच्यासाठी हळवा कोपरा बनत जातो. मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये आपण स्वीकारले जातो आहोत ना, याची काळजी कायम कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात असते.
मुलगा वयात येताना त्याच्यात होणारे शारीरिक बदल आणि त्या अनुषंगाने त्याच्या भावविश्वात होणाऱ्या बदलांबद्दल आपण मागच्या लेखात बोललो. वयात येताना मुलांची आणि मुलींची लैंगिक भूमिका (जेण्डर रोल) अधिकच ठळक होते. मुलीकडे ठराविक परंपरागत स्त्रीविशेष असणे आणि मुलाकडे तसे पुरुषविशेष असणे, या गोष्टी समवयस्कांमध्ये स्वीकारलं जायला आवश्यक होऊन बसतात. त्यामुळे आपले ‘लूक्स’ नॉर्मल आहेत ना, आपण पुरेसे चांगले-आकर्षक दिसतो आहोत ना, हे त्यांच्यासाठी फार महत्त्वाचे मुद्दे असतात. या मुलांच्या शरीरात होणारे बदल हे त्यांच्यासाठी मोठं चिंतेचं कारण असू शकतं. स्वत:ची बॉडी इमेज (स्वत:च्या शरीराबद्दल आपल्याला स्वत:ला काय वाटतं) हा त्यांच्यासाठी फार हळवा कोपरा बनत जातो. मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये आपण स्वीकारले जातो आहोत ना, याची काळजी कायम कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात असते.
चांगलं दिसणं, (विशेषत: भिन्नलिंगी व्यक्तीला) आणि ‘टू बिलाँग’ हे या वयात खास असतं. त्यामुळे वजन कमी करणारी असंख्य औषधं, यंत्र-तंत्रं नेमकं याच मानसिकतेवर बोट ठेवतात. या मानसिकतेमागचा लैंगिकतेचा पैलू ठळक असतो. गोरेपणा मिळवून देणारी क्रीम्स, स्त्रियांना आकर्षित करणारी तथाकथित पुरुषांची डिओडरंड्स आणि सोडय़ाच्या ‘मर्द की पहचान’ अशा केलेल्या जाहिराती- या खरं तर लैंगिकतेच्याच वेगवगळ्या पैलूंना स्पर्श करत असतात. सगळ्या प्रकारच्या माध्यमांमधून आपल्यावर अशा जाहिरातींचा अखंड मारा होत असतो. त्यातून मुलांच्या मनावर या गोष्टी वारंवार बिंबवल्या जातात. त्यातून पोहोचणारे संदेश अनेकदा अनुचित लैंगिक भूमिका पुढे आणणारे असतात. हे सगळ्याच आईबाबांना कळत नकळत त्रस्त करणारं असतं. पण यावर सहसा बोललं जात नाही. काळजी मात्र वाटत राहते.
अशा वेळी संदर्भाकडे संवादाची दारं किलकिली करण्याची संधी म्हणून पाहता आलं तर अशा जाहिराती, टीव्हीवरचे कार्यक्रम, चित्रपटसृष्टी आणि सोशल मीडियातल्या चांगल्या आणि खटकणाऱ्या प्रसंगांच्या संदर्भात अनेक छोटय़ा मोठय़ा संधी आपल्या आजूबाजूला नेहमीच असतात. सुरुवात इथून करता येईल.
मात्र सुरुवात करता आली, तरी ते संभाषण निभावून नेता येईल का, याचं दडपण अनेक आईबाबांना वाटतं. असं होणं हे स्वाभाविकच आहे. कारण प्रत्येक मूल वेगळं, त्याचे प्रतिसाद वेगळे. त्यामुळे संवाद कुठे कोणत्या वळणावर अडखळेल याचा आधी अंदाज करणं अवघड. यात आधी प्रॅक्टिस करून ठेवली, असंही फारसं होत नाही. त्यामुळे एकदोन गोष्टींची खूणगाठ मनाशी बांधून ठेवयची-
* कोणताही संवादाचा छोटय़ातला छोटा प्रयत्न हाही एक प्रकारचा संवादच असतो. आणि वरकरणी तो कितीही विचित्र वाटला तरी तो फुकट जात नाही. त्यातून एक पाया घातला जातो, ज्याचा पुढच्या वेळी बोलताना उपयोग होऊ शकतो. आणि
* संवाद सुरू करण्याइतकंच केव्हा थांबायचं याचं भान असणं हेही महत्त्वाचं. खूप साऱ्या माहितीचा एकदम डोस मुलांना पचणं अवघड जाऊ शकतं. ते त्यांना त्यांच्या खाजगीत्वावर आक्रमण करणारंही वाटू शकतं.
जाहिरातींवर (किंवा तत्सम गोष्टींवर) थेट नकारात्मक प्रतिक्रिया देणं, उपरोधिक बोलणं, एका वाक्याच्या फटकाऱ्यासरशी त्या गोष्टीला निकालात काढणं, या गोष्टी टाळणं अगदी महत्त्वाचं. नाहीतर त्यातून फक्त शेरेबाजी होते, संवाद होत नाही. गोरेपणाची क्रीम्स आणि तत्सम प्रॉडक्ट्सबद्दल बोलताना, ‘असं काही नसतं, खरं सौंदर्य व्यक्तिमत्त्वात असतं,’ अशी उपदेशात्मक सरसकटीकरण करणारी वाक्यं (ती कितीही खरी असली तरीही) टाळणंही जरुरी असतं. अशा वेळी तुला काय वाटतं? किंवा त्या प्रसंगातल्या (किंवा, सिनेमातल्या, जाहिरातीतल्या) व्यक्तीला कसं वाटत असेल, अशा संवादाला वाव ठेवणारी वाक्यं पालकांकडून आली तर बोलणं पुढे सरकरण्याची शक्यता असते. अनेकदा आपण सुरुवात करूनही मूल काही बोलत नाही, किंवा नुसताच कोरा चेहरा ठेवून बसतं. असा प्रकार मुलग्यांच्या बाबतीत होण्याची शक्यताही जास्त असते. आपण डिओडरंटच्या एका जाहिरातीबाबत हा संवाद कसा होऊ शकतो ते पाहू.
आई : तुला वाटतं का एखाद्या मुलग्याने विशिष्ट डिओडरंट वापरला, की अशा चारी बाजूंनी मुली त्याच्या भोवती गोळा होत असतील?
मुलगा : ‘छट्, असं काही नसतं.’
आई : ‘मग का दाखवत असतील जाहिरातीत हे असं सगळं?’
मुलगा : ‘जाहिरातीत दाखवलेलं सगळंच काही खरं नसतं! बऱ्याचदा जाहिरातीत गोष्टी अतिशयोक्ती केलेल्या असतात.’
संभाषण इथपर्यंत आलं, आईला हा विषय आता थांबवता येईल. खरं तर या छोटय़ाशा संवादातून खूप काही साध्य झालेलं आहे. इथं हे संभाषण आणखी अनेक वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकलं असतं. आता हेच पाहा.
आई : तुला वाटतं का एखाद्या मुलग्याने विशिष्ट डिओडरंट वापरला, की अशा चारी बाजूंनी मुली त्याच्या भोवती गोळा होत असतील?
मुलगा : असतीलही!
आई : मला नाही वाटत असं काही होत असेल.
मुलगा काहीच बोलत नाही, फक्त खांदे उडवतो. इथेही विषय थांबणं योग्य. बऱ्याचदा अशा विषयाच्या स्वरूपावरून अवघडलेपणा येतो. आई किंवा बाबा यापुढे काय बोलतील, याबद्दल प्रचंड दडपणमिश्रित उत्कंठा, अशा सगळ्या मिश्र भावनांमधूनही मुलं काही बोलत नाहीत, विचारत नाहीत.
इथे एक गोष्ट (पुन्हा) सांगावीशी वाटते. बहुतेक वेळा लैंगिकतेविषयी काही गोष्टी मुलं आपणहून आईबाबांशी का बोलत नाहीत? अमेरिकेत २००२ साली झालेल्या एका सर्वेक्षणात तब्बल ८३ टक्के मुलांनी हे कारण नोंदवलं- लैंगिकतेविषयी काही बोललं तर आईबाबांची त्यावरची प्रतिक्रिया फार तीव्र असेल असं वाटतं! (या संदर्भात बऱ्याचदा अमेरिकन सर्वेक्षणाचा आधार घ्यावा लागतो, कारण या बाबतीतली व्यापक सर्वेक्षणं आपल्याकडे तेवढय़ा प्रमाणात नाही होत.) आपल्याकडेही अनेक मुलींना असा अनुभव येतो.
-आपल्या मैत्रिणीच्या स्टेडी बॉयफ्रेंडबद्दल आईला सांगितलं की, ‘तुझं नाही ना असलं काही सुरू?’ ही आईची प्रतिक्रिया असते. खरं तर आई मनात कायमची काळजी वागवत असते आणि अशा घटनांमधून ती काळजी सटकन बाहेर येते. बऱ्याचदा आईच्या स्वत:च्या नकळतही ती काळजी निसटून-सुटून आलेली असते. हे समजण्याची मुलांची मात्र मन:स्थिती नसते, आणि कुवतही नसते.
मुलं आणि संवादाच्या संदर्भात अनेकदा अनेक आईबाबांनी एक गोष्ट बोलून दाखवली आहे- ‘कायम काय चुचकारून बोलायचं मुलाशी? आईबाबांचा म्हणून घरात एक अधिकार असतो, त्या अधिकाराचा वापर करायचाच नाही का? त्यांना अनेक गोष्टींत सरळ आपल्या घरात हे चालणार नाही, अशा छापाचं काही सांगायचंच नाही का?’
आईवडिलांकडे नेहमीच घरात एक नकाराधिकार असतो. फक्त तो केव्हा वापरायचा याचं तारतम्य राखलं तरच त्याची किंमत टिकून राहते. आणि संवाद सुरू राहून त्यातून मुलाला योग्य तो निर्णय घेता येणं किंवा मग संवाद खुंटणं, ताणाताणी होणं- यातलं कुटुंब म्हणून आपल्याला काय हवं आहे, हे ज्या त्या कुटुंबानं ठरवायचं आहे.
अशा छोटय़ा संवादामधून पालक म्हणून आपण कुठे आहोत हे तपासून पाहायची संधीही आपल्याला मिळत राहते. पालकांनाच जर गोरेपणाचं किंवा पुरुषार्थाचं खूप कौतुक असेल, तर संवाद अर्थातच असा होणार नाही. लैंगिकता आणि मूल्यव्यवस्था याचं फार घट्ट नातं असल्यामुळे आपलं कुटुंब जी मूल्यं मानतं, ती तपासून पाहायला आणि अधोरेखित करायलाही या संधीचा उपयोग होऊ शकतो.
मुलीच्या जन्मानंतर ऐश्वर्या रॉयच्या वाढलेल्या वजनाचा माध्यमांनी प्रचंड गाजावाजा केला. अनेकांनी त्यावर भुवया उंचावल्या, काहीबाही शेलक्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या. घरातले मोठेही हा विषय चघळत असतील, तर बॉडी इमेजबद्दल मुलांना काय संदेश जातो?
मात्र बाळाच्या जन्मानंतर वजन वाढू शकतं, हे असं होणं नैसर्गिक आहे, अशा प्रकारच्या जाहीर चर्चा अनुचित वाटतात, आशयाचं बोलणं आई-बाबांकडून झालं तर बॉडी इमेजबद्दल एक खणखणीत संदेश मुलांना जातो. आपण प्रत्येकजण वेगळे असतो - दिसतो, आपल्या प्रत्येकाच्या शरीराची ठेवणही वेगवेगळी असते, हे नॉर्मल आहे. वाढत्या वयानुसार त्यात बदल होऊ शकतात, हे मुलांपर्यंत पोहोचणं अतिशय गरजेचं असतं. आपलं मूळ शरीर जसं आहे तसं स्वीकारता येणं, हे आत्मसन्मान टिकून राहण्यासाठी आणि पर्यायाने निकोप दृष्टी तयार होण्यासाठी फार गरजेचं आहे.
मुलांबरोबर अवघड विषयावर बोलताना अशा छोटय़ा छोटय़ा अनेक संधींचा खारीचा वाटा असतो. मुलांसोबत लांब दीर्घकालीन पक्के सेतू बांधण्यासाठी मात्र त्या सिंहाचा वाटा ठरतात.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो