लालकिल्ला : कुरघोडीची रिले शर्यत
मुखपृष्ठ >> लाल किल्ला >> लालकिल्ला : कुरघोडीची रिले शर्यत
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लालकिल्ला : कुरघोडीची रिले शर्यत Bookmark and Share Print E-mail

 

सुनील चावके - सोमवार, ३० जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

शरद पवार आणि अण्णा हजारे या दोघांची प्रवृत्ती भिन्न असली तरी त्यांच्यातील साम्यस्थळे भल्याभल्यांना चकवून जातात. महाराष्ट्राच्या दोन बडय़ा नेत्यांनी ‘दिल्लीकरा’ंना आपल्या सामर्थ्यांची चुणूक दाखवून दिली आहे. यूपीए सरकारवरील त्यांचा दबाव सशक्त करण्यासाठी आता बाबा रामदेव सामील होऊ पाहात आहेत.

सरकारवर कुरघोडी करण्यासाठी चाललेल्या या रिले शर्यतीच्या अंतिम टप्प्यात निर्णायक भूमिका कुणाची असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, कारण यापैकी कोणीही मैदान सोडण्याच्या मनस्थितीत नाही..
शरद पवार आणि अण्णा हजारे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणातील दोन ध्रुव. दोघेही समवयस्क आणि लौकिकार्थाने एकमेकांचे कट्टर ‘शत्रू’. डावपेच, कुरघोडी आणि ग्रामीण बेरकेपणाच्या बाबतीत त्यांच्यात डावेउजवे करणे तसे कठीणच. प्रतिकूूल परिस्थितीत विरोधकांवर बाजी उलटवून आपले वर्चस्व आणि माहात्म्य टिकवून ठेवणारे बाजीगर. दोघेही अतिमहत्त्वाकांक्षी. राजकारणात आणि समाजकारणातील सर्वोच्च शिखर गाठण्यासाठी जवळचे महत्त्वाकांक्षी सहकारी आणि माध्यमांचा पुरेपूर वापर करून घेण्यात तरबेज. अिहसेचे पुजारी महात्मा गांधींचे दोघेही ‘अनुयायी’ असले तरी रक्तपात न घडविणाऱ्या ‘िहसक’ डावपेचांचा अवलंब करणारे. संपर्कात नसले तरी एकमेकांविषयीचा बारीकसारीक तपशील ठेवणारे. अधूनमधून परस्परांच्या सोयीने गुप्त बैठकी होत असल्या तरी जाहीरपणे विस्तवही जाणार नाही, एवढी टोकाची कटुता बाळगणारे. परस्परविरोधी रणनीतीतून आपापली ताकद वाढविण्याचे कसब आत्मसात केलेले. राज्याच्या राजकारणात पवार लोकप्रिय, तर पवारविरोधकांच्या मनातील असंतोष काबीज करणारे अण्णाही तेवढेच लोकप्रिय. देशाचे सत्ताकेंद्र असलेल्या दिल्लीत दोघांचाही जम बसलेला.
तेव्हा राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीच्या मागेपुढे पवार आणि अण्णा यांनी मनमोहन सिंग सरकारला गोत्यात आणायचे ठरविल्यामुळे दिल्लीच्या राजकीय आकाशात संकटांचे गडद ढग दाटणार हे स्वाभाविकच होते. परस्परांशी समन्वय न ठेवता पवार आणि अण्णांसारख्या दोन मातब्बर मराठय़ांच्या सैन्याने एकाच वेळी आक्रमण केल्याने दिल्लीचे तख्त डळमळीत होणार हे अपेक्षितच होते. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर होण्याआधीच शरद पवार आणि अण्णा हजारे यांनी मनमोहन सिंग सरकारविरुद्ध रणशिंग फुंकण्याची तयारी साधारण दीड-दोन महिन्यांपूर्वीच केलेली होती. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदान संपत नाही तोच शरद पवार यांनी मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची नाराजी व्यक्त करणारे पत्र धाडले. नव्या राष्ट्रपतींच्या शपथविधीच्या मुहूर्तावर जंतरमंतरवर उपोषण सुरू करण्याची घोषणा टीम अण्णाने आधीच केली होती. आता राष्ट्रपती २५ जुलैला शपथ घेणार हे आम्हाला माहीत नव्हते, असा साळसूदपणाचा आव आणणाऱ्या टीम अण्णाला गेल्या ३५ वर्षांपासून नवनिर्वाचित राष्ट्रपतींचा शपथविधी २५ जुलैलाच होत आला आहे हे ठाऊक नसेल यावर विश्वास ठेवता येणार नाही. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार राष्ट्रवादीच्या नाराजीचे पर्व १९ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदान संपताच सुरू झाले आणि नवनिर्वाचित राष्ट्रपतींनी शपथ घेतल्यावर पवार आणि कंपनीचे बंड निकाली निघण्यापूर्वीच जंतरमंतरवर अण्णांच्या सहकाऱ्यांचे आंदोलन सुरू झाल्यामुळे यूपीए सरकारवर कुरघोडी करण्याच्या या रिले शर्यतीत ‘बॅटन एक्सचेंज’ व्यवस्थित पार पडले होते. अण्णांचे जंतरमंतरवरील आंदोलन ८ ऑगस्टला संपताच या रिले शर्यतीचा तिसरा टप्पा ९ ऑगस्टपासून रामलीला मैदानावर बाबा रामदेव यांच्या आंदोलनाने सुरू होणार असून ३० ऑगस्टपर्यंत चालणार आहे. त्यानंतर मनमोहन सिंग सरकारवरील दबावाच्या रिले शर्यतीचा समारोप पुन्हा पवारच करतील की यूपीएचा आणखी कुणी घटक पक्ष, हा उत्सुकतेचा भाग ठरणार आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी आघाडीला खिंडार पाडून सत्ताधारी यूपीएच्या बाजूने ७० टक्के मते पडल्यामुळे तीन वर्षांपासून केंद्रात अपयशी कारभार करणाऱ्या काँग्रेसचे मनोबल काहीसे उंचावणार होते. पण या एकतर्फी विजयाचा आनंद एक क्षणही टिकला नाही. मतदान संपताच पवारांच्या बाहेरून समर्थन देण्याच्या धमकीमुळे काँग्रेसच्या गोटात सुतक पसरले. पवारांच्या नाराजीमुळे यूपीए सरकारला तडे जातील, अशी हवा तयार झाली. सरकार आणि काँग्रेसचे ‘संकटमोचक’ प्रणब मुखर्जी आता बघ्याच्या (आणि प्रसंगी पंचाच्या) भूमिकेत पोहोचले होते. त्यांच्या अनुपस्थितीत सरकार आणि काँग्रेसला कोण तारणार, हा प्रश्न सर्व विरोधी पक्ष, यूपीएतील घटक पक्ष आणि प्रसिद्धी माध्यमांना पडला होता. त्यांच्या अनुपस्थितीत बौद्धिकदृष्टय़ा विकलांग झालेला काँग्रेस पक्ष पवार आणि अण्णांचे आक्रमण कसे परतावून लावतो, याकडे सर्वाचे लक्ष लागलेले होते. राजकीय दौर्बल्याचे पितळ उघडे पडलेल्या मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना गनिमी काव्याने खिंडीत गाठून ‘विवश’ करण्याची पवार यांची रणनीती परिणामकारक ठरणार असे चित्र माध्यम व्यवस्थापनातून तयार केले जात होते. पण काँग्रेसने पवारांची नाराजी आणि संभाव्य बंडखोरीची पुरेशा ‘संवेदनशीलते’ने दखलच घेतली नाही. ‘संकटमोचक’ उपलब्ध नसल्याचे पाहून काँग्रेसला शह देणारे राजकीय बुद्धिबळाचे ग्रँडमास्टर शरद पवारच स्वत:च्या चालीने अडचणीत आले आणि हा डाव कसाबसा बरोबरीत सोडविण्याची त्यांच्यावर नामुष्की आली.
गेल्या वर्षी लोकपाल आंदोलनाला लाभलेल्या अभूतपूर्व यशामुळे िझग चढलेल्या टीम अण्णाने निम्मे २०१२ या नशेच्या हँगओव्हरमध्येच काढले. सरकारविरोधात देशातील सव्वाशे कोटी जनतेचे स्वयंघोषित प्रतिनिधी बनलेल्या टीम अण्णाच्या भ्रष्ट सरकारविरोधातील ‘रिअ‍ॅलिटी शो’चे देशातील तमाम वृत्तवाहिन्यांनी हजारो तासांचे जे अखंड प्रक्षेपण केले, त्याला भारतीय वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात तोड नाही. दिल्लीतल्या सर्व राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये अण्णा हजारेंच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढय़ाला रकानेच्या रकाने भरून जी न भूतो न भविष्यती प्रसिद्धी मिळाली ती स्वातंत्र्यलढय़ात देशाचे नेतृत्व करणाऱ्या महात्मा गांधींच्या किंवा बॉलीवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्नाच्याही वाटय़ाला आली नसेल. पण २०१२ मध्ये अण्णांच्या आंदोलनांना गर्दीची ओहोटी लागली. सत्याग्रहाच्या आंदोलनाचे अस्त्र वारंवार उपसल्यामुळे ते बोथट होते. त्यातील नावीन्य संपुष्टात येते आणि गंभीर मुद्दय़ांवर सरकारला निर्णय घेण्यास बाध्य करण्यास अपयशी ठरलेल्या आंदोलनाबद्दल जनतेला आकर्षण आणि सहानुभूती वाटेनाशी होते, याचे अण्णांचे भाषणबहाद्दर सहकारी अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण, किरण बेदी, मनीष सिसोदिया आणि उथळ, भडक विधाने करून स्वत:ला समाजात प्रस्थापित करू पाहणाऱ्या कुमार विश्वास आणि संजय सिंहसारख्यांना भान राहिले नाही. तरीही आधी ठरल्यानुसार २५ जुलैपासून टीम अण्णाचे त्यांच्या आवडत्या जंतरमंतरवर बेमुदत, आमरण उपोषण सुरू झाले. या आंदोलनाचा प्रभाव पडेनासा झाला.
२४ तास कॅमेरे तैनात ठेवून अण्णांच्या दिल्लीतील प्रत्येक आंदोलनाला उचलून धरणारा मीडिया या वेळी ‘वस्तुनिष्ठ’ होता. संधी मिळताच आंदोलनाला मिळणाऱ्या अल्प प्रतिसादावरून ती टीम अण्णाला लक्ष्य करू लागली. मीडिया विकला गेला, अशी टीका मग इतके महिने मीडियाच्या गळ्यातील ताईत बनलेले अण्णांचे सहकारी करू लागले. पण रातोरात मिळालेल्या यशाच्या हँगओव्हरमध्ये सापडलेली टीम अण्णा आत्मपरीक्षणापासून दूर राहिली. अण्णा हजारे यांच्या २०११च्या आंदोलनांमागे संघ, भाजप, अभाविपसह संघ परिवारातील विविध संघटनांची संघटन शक्ती एकवटली होती. अण्णांनी भ्रष्टाचाराविरुद्ध पुकारलेल्या राष्ट्रव्यापी लढय़ात आमचेही योगदान आहे, असे सांगणारे सरसंघचालक मोहन भागवत यांचा दावाही गर्दीची झिंग चढलेले अण्णा हजारे झिडकारू लागले. रामलीला मैदान किंवा जंतरमंतरवर जमलेली गर्दी ही आपल्या निर्विवाद लोकप्रियतेची पावती आहे, असा त्यांचा भ्रम झाला. काँग्रेसचे प्रॉडक्ट समजले जाणारे शरद पवार जसे आपल्याच पूर्वाश्रमीच्या पालक संघटनेवर कुरघोडी करू पाहत आहेत, तसाच पवित्रा भ्रष्ट सरकारविरुद्ध लढण्याचे बळ देणाऱ्या संघ परिवाराविरुद्ध अण्णांनी घेतला. सहकार्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणे तर दूरच, संघाबद्दलची अस्पृश्यतेची भावनाही ते लपवू शकले नाही. या अहंकाराचा दंड टीम अण्णाला लगेच मिळाला. अण्णांच्या आंदोलनाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेनासा झाला, कारण संघ परिवाराच्या शिस्तबद्ध कार्यकर्त्यांनी त्यांच्या आंदोलनाकडे पाठ फिरविली. लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेले अण्णांचे आंदोलन वारंवार तोंडावर आपटू लागले. दिल्लीवर नियोजनबद्धपणे चाल करून गेल्यानंतरही पवार आणि अण्णांची फसगत झाली. काँग्रेसने पवारांना हिसका दिला आणि संघाने अण्णांना. परिणामी, दोघांचाही दिल्लीत विचका झाला. एक मोहीम फसली आणि दुसरी अधांतरी लटकली आहे. अण्णा हजारेंनी स्वत: उपोषण सुरू केल्यानंतर रविवारी जंतरमंतरवर नेहमीची उत्स्फूर्त गर्दी जमली असली तरी त्याने काहीही साध्य होणार नाही. कारण आंदोलनाचे पहिले चार दिवस दबाव बनला नाही आणि सोमवारपासून पुन्हा गर्दीचा तुटवडा जाणवल्यास नवल वाटायला नको. देशापुढचे सर्व ज्वलंत प्रश्न गर्दीच्या माध्यमातून सुटू शकत नाही, याची उपरती आता अण्णांनाही झाली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर बघायला मिळालेल्या दबावतंत्रातून टीम अण्णा किती पाण्यात आहे, याचा अंदाज मनमोहन सिंग सरकारला आला आणि पवार किती पाण्यात आहेत, याची जाणीव सोनिया गांधींना झाली. आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली; ती म्हणजे ‘ट्रबलशूटर’ प्रणब मुखर्जी यांच्याशिवायही मनमोहन सिंग सरकार नीट चालू शकते हे या दोन लागोपाठच्या इष्टापत्तींमुळे स्पष्ट झाले. महाराष्ट्राच्या दोन बडय़ा नेत्यांनी दिल्लीच्या राजकारणात आपला दम दाखवून दिल्यानंतर आता यूपीए सरकारवर दडपण आणण्याची जबाबदारी बाबा रामदेव यांना पार पाडावी लागणार आहे. सरकारवर कुरघोडी करण्यासाठी चाललेल्या या रिले शर्यतीच्या अंतिम टप्प्यात निर्णायक भूमिका कुणाची असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पहिल्या दोन टप्प्यांत पवार आणि अण्णांना धाप लागली याचा अर्थ मनमोहन सिंग सरकारची सरशी होणार असा मुळीच होत नाही. प्रारंभिक अपयशाची परतफेड करण्याची संधी पवार आणि अण्णांना पुन्हा मिळू शकते. कारण सहज मिळणारे यश पचविण्याची कुवत मनमोहन सिंग आणि सोनिया गांधींनाही दाखवता आलेली नाही.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो