आकलन : सुवर्णपदकांची अर्थव्यवस्था
मुखपृष्ठ >> आकलन >> आकलन : सुवर्णपदकांची अर्थव्यवस्था
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

आकलन : सुवर्णपदकांची अर्थव्यवस्था Bookmark and Share Print E-mail

प्रशांत दीक्षित - मंगळवार, ३१ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

भारतात क्रीडा संस्कृती नाही असे म्हटले जाते. पण क्रीडा संस्कृती म्हणजे फक्त क्रीडांगणे वा अन्य सुविधा नव्हेत. क्रीडा संस्कृती बहरण्यासाठी आधी अर्थव्यवस्था भक्कम असावी लागते. ऑलिम्पिक पदकांचा मार्ग अशा अर्थव्यवस्थेतून जातो..
ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविण्यासाठी अत्यावश्यक गोष्टी कोणत्या? खेळाडूची क्षमता की सदृढ अर्थव्यवस्था? क्षमतावान खेळाडू नसतील तर स्पर्धेत उतरताच येणार नाही.

यामुळे खेळाडूची क्षमता ही अत्यावश्यक गोष्ट आहे यात शंकाच नाही. पण केवळ क्षमतेने भागत नाही. क्षमतेला जोड लागते ती सुदृढ अर्थव्यवस्थेची. देशातील आर्थिक व सामाजिक व्यवस्था निकोप असेल तर खेळाडूंचा दर्जा उंचावतो आणि अशा देशांकडे सुवर्णपदकांचा ओघ वाढतो.
इतकेच नाही तर एक वेळ क्षमता थोडी कमी असली तरी चालते. आर्थिक व्यवस्था उत्तम असेल तर क्षमतेमधील कमी भरून काढता येते. पण अर्थव्यवस्थेचा भक्कम आधार नसेल तर क्षमता नेहमीच कमनशिबी ठरते. केवळ क्षमतेवर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळत नाही. क्षमतेचे रूपांतर नैपुण्यात व्हावे लागते. असे रूपांतर करण्यासाठी सुव्यवस्थित इन्फ्रास्ट्रक्चर उभारावे लागते. त्यासाठी अर्थातच पैसा लागतो. विकास होत असलेल्या अर्थव्यवस्थेतून तो येतो.
अर्थात हे वरवरचे निरीक्षण झाले. निरीक्षणाला ठोस माहितीचा आधार नसेल तर निरीक्षणे फसवी ठरतात. म्हणून सतत माहिती जमा करावी लागते, त्याचे वर्गीकरण करावे लागते. माहिती जमा करण्याची, त्या माहितीचे व्यवस्थित वर्गीकरण करण्याची सवय भारताला नाही. म्हणून भारतीयांची बहुतेक निरीक्षणे फसतात. माहिती जमा करण्याची व त्यावर काम करण्याची कटकट करण्यापेक्षा नशिबावर हवाला ठेवून दिशाहीन जगत राहणे भारतीयांना आवडते.
पाश्चात्त्य देश मात्र माहितीवर कमालीचा भर देतात. पदके व अर्थव्यवस्था यांचा संबंध आहे का, हे निश्चित करण्यासाठी माहिती जमा केली गेली. अँड्रय़ू बर्नार्ड यांनी यावर प्रथम काम केले. १९६० ते १९९६ या काळातील ऑलिम्पिकमध्ये देशांनी मिळविलेली पदके आणि त्या देशांची अर्थव्यवस्था यांचा परस्परसंबंध तपासला. त्यामध्ये आश्चर्यकारक संगती दिसून आली. विकासाचा दर आणि पदके यांचा एकमेकांवर परिणाम होतो. विकासाचा दर वाढला की त्या प्रमाणात पदकांची संख्याही वाढते. देशाचे राष्ट्रीय उत्पन्न दुप्पट झाले की ऑलिम्पिकच्या एकूण पदकातील त्या देशाचा वाटा एक ते दीड टक्क्यांनी वाढतो.
बर्नार्डच्या मते दोन घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. लोकसंख्या व जीडीपी. लोकसंख्या जास्त असली की क्षमतावान खेळाडू अधिक मिळतात. पण त्याने भागत नाही. खेळाडूच्या क्षमतेला अर्थव्यवस्थेच्या क्षमतेची जोड मिळावी लागते. प्रत्येक खेळाडूवर खर्च करण्याची क्षमता हा महत्त्वाचा घटक ठरतो. दरडोई उत्पन्नाचा स्तर वाढता असेल तर खेळाडूवर खर्च करणे समाजाला परवडते. १९९६ मधील आकडेवारी पाहिली तर जगातील लोकसंख्येत चीन, भारत, इंडोनेशिया, बांगलादेश यांचा वाटा खूपच मोठा होता. पण जगाच्या एकूण उत्पन्नात या देशांचा वाटा जेमतेम पाच टक्के होता. आश्चर्य म्हणजे ऑलिम्पिक पदकांमध्येही या देशांचा वाटा पाच टक्केच होता.
लोकसंख्या व ठोस राष्ट्रीय उत्पन्न याबरोबर आणखी दोन घटक महत्त्वाचे असतात. पहिला म्हणजे यजमान देशाचा प्रभाव. ऑलिम्पिकचे आयोजन करणाऱ्या देशाची पदकसंख्या नेहमीच वाढते. यामागे बरीच कारणे असतात. खेळाडूंना घरचे वातावरण मिळते. आपल्या खेळाडूंना अनुकूल अशी क्रीडांगणांची बांधणी केली जाते. सरावावरील खर्च कमी होतो इत्यादी.
दुसरा घटक अधिक महत्त्वाचा असतो. तो म्हणजे वैचारिक निष्ठा. ऑलिम्पिक ही अनेकदा विचारवर्चस्वाची लढाई होते. ऑलिम्पिकमधील श्रेष्ठता ही आपल्या विचारसरणीतील सर्वोत्तम गुणांचा परिणाम आहे हे दाखविण्यासाठी प्रचंड पैसा व शक्ती खर्च केली जाते. सोविएत गटातील राष्ट्रांनी मिळविलेल्या पदकांमागे सरकारची प्रचंड यंत्रणा काम करीत होती. ऑलिम्पिकमधील विजय म्हणजे भांडवलशाहीवर विजय असे कम्युनिस्ट देशांत मानले जात होते. यातून खेळाडूंचे ‘उत्पादन’ सुरू झाले. त्यासाठी भरपूर पैसा पुरविण्यात आला. या देशांचे दरडोई उत्पन्न कमी असले तरी खेळाडूंवरील दरडोई खर्च खूप जास्त होता. चीनमध्ये आता दोन्ही प्रेरणा बलवान आहेत. विचारनिष्ठेला भक्कम आर्थिक पाठबळ मिळाले आहे. चीनचा जीडीपी उत्तम आहे, विचारवर्चस्वाची ईष्र्या आहे आणि लोकसंख्या भरपूर असल्याने क्षमतावान खेळाडू निवडणे सोपे आहे. खेळाडूंची लहान वयात पारख करून त्यांना ऑलिम्पिकसाठी तयार करणाऱ्या तीन हजार क्रीडाशाळा चीनमध्ये आहेत.
बर्नार्ड हा संशोधक असल्याने फक्त निरीक्षणे काढून थांबला नाही. मागील काळावरून काढलेले निष्कर्ष बरोबर आहेत की नाही हे पुढील काळाचा अचूक अंदाज बांधल्यानेच समजू शकते. म्हणून बर्नार्डने सिडनी ऑलिम्पिकसाठी पदकांचा अंदाज बांधला. तो कमालीचा बरोबर ठरला. त्यापुढील ऑलिम्पिकमध्येही अंदाज बरोबर ठरू लागले. पदके आणि देशातील परिस्थिती यांचा संबंध जोडणारी गणिताची बैठक तयार झाली.
संशोधनाचे नवे क्षेत्र लक्षात आले की त्यामध्ये अधिक संशोधन करण्याची परंपरा पाश्चात्त्य देशांत आहे. त्यानुसार अधिक संशोधन सुरू झाले. गोल्डमन सॅकसारख्या बडय़ा वित्तीय संस्थेने पैसा पुरविला आणि त्यातून विकासाभिमुख परिस्थितीचा निर्देशांक (ग्रोथ एन्व्हायर्न्मेंट स्कोअर, जीईएस) तयार करण्यात आला. या जीईएसमध्ये सहा घटक आहेत. १] राजकीय स्थिती (भ्रष्टाचार, सुव्यवस्था व राजकीय स्थैर्य) २] आर्थिक स्थैर्य (देशावरील कर्ज, महागाई, तूट) ३]आर्थिक परिस्थिती (गुंतवणूक, मुक्त कारभार) ४] मनुष्यबळ (आरोग्य, शिक्षण), ५] तंत्रज्ञान ६] आर्थिक वातावरण (व्यवसाय सुरू करण्यातील सुविधा, शहरीकरण, संशोधन इत्यादी) या प्रत्येक घटकाचा पदकांवरील परिणाम तपासण्यात आला असता राजकीय स्थिती व आर्थिक वातावरण यांचा सर्वाधिक परिणाम दिसून आला. हे दोन घटक उत्तम असतील तर पदकांची संख्या किमान पाचाने वाढते. मुक्त व चोख आर्थिक वातावरणातून उभ्या राहणाऱ्या संस्थांचे जाळे हे खेळाडूंचे नैपुण्य वाढविण्यासाठी आवश्यक असते. असे वातावरण राजकीय व्यवहारातून निर्माण होते. राजकीय नेते खेळांकडे पैशाचा ओघ वाढवून चीन, रशियाप्रमाणे पदके खेचून घेऊ शकतात, त्याचप्रमाणे योग्य आर्थिक वातावरण निर्माण करून खेळाडूंचा विकास स्वतंत्रपणे होईल असेही पाहू शकतात. अमेरिका हे याचे उदाहरण. मात्र अन्य देशांत, सरकारचा माफक पण योग्य हस्तक्षेप आणि पूरक अर्थव्यवस्था यांच्या एकत्रित परिणामामुळे पदकांची संख्या वाढते.
जीईएसशी देशाच्या लोकसंख्येशीही सांगड घालावी लागते. फिनलंडसारख्या देशाचा जीईएस अमेरिकेहून अधिक आहे, पण लोकसंख्या जेमतेम पन्नास लाख असल्याने क्षमतावान खेळाडू मिळत नाहीत. शून्य ते दहा या मोजपट्टीवर भारताचा जीईएस ३.९ आहे, तर अमेरिकेचा ७. ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दक्षिण कोरिया, कॅनडा, नेदरलँड, न्यूझीलंड या देशांचाही जीईएस सातच्या आसपास आहे. याच देशांमध्ये सर्वात जास्त पदके जातात. चीनचा जीईएस ५.४ आहे. त्याला बळकट अर्थव्यवस्था व राजकीय महत्त्वाकांक्षा यांची जोड मिळल्याने तो देश अमेरिकेच्या खालोखाल पदके मिळवितो. रशियाचेही तसेच आहे. केनियाचा निर्देशांक ३.६ हा भारताहून कमी असला तरी गुणवान धावपटू हे त्या देशाचे वैशिष्टय़ आहे. जीईएसच्या सर्वच घटकांमध्ये भारत खालच्या स्तरावर असल्यामुळे पाच पदकांच्या पलीकडे आपली मजल जाण्याची शक्यता नाही.
अमेरिकी सरकार अन्य देशांप्रमाणे खेळावर फार खर्च करीत नाही. भ्रष्टाचार वगळला तर तेथील ऑलिम्पिक समितीचा कारभार भारताप्रमाणेच भोंगळवाणा आहे. परंतु तेथील उद्योगक्षेत्र खेळाडूंना भरपूर पैसा मिळवून देते. एकच उदाहरण पुरेसे आहे. लोला जोन्स ही अडथळ्यांच्या शर्यतीमधील सुवर्णपदकासाठी तयारी करीत आहे. यामध्ये २२ संशोधक व तंत्रज्ञ तिला मदत करीत आहेत. ४० कॅमेऱ्यातून तिच्या प्रत्येक हालचाली टिपल्या जातात. ऑप्टोजम्प या नव्या तंत्रज्ञानातून तिचे प्रत्येक पाऊल कसे टेकते याची छाननी केली जाते. फॅन्टम फ्लेक्स कॅमेऱ्यातून तिच्या पळण्याच्या प्रतिसेकंदाला दीड हजार फ्रेम काढल्या जातात. प्रशिक्षकाबरोबर बायोमेकॅनिस्ट, फिजिओलॉजिस्ट, सायकॉलॉजिस्ट, न्यूट्रिशनिस्ट, स्ट्रेन्ग्थ कोच, रिकव्हरी एक्स्पर्ट आणि स्टॅटिस्टिक अॅनॅलिस्ट यांची टीम आहे. लोला जोन्स या एका खेळाडूसाठी गेली काही वर्षे हे सर्व जण काम करीत आहेत आणि त्यांचा सर्व खर्च अमेरिकी सरकारने नव्हे तर रेड बुल या कंपनीने उचलला आहे.
विज्ञान, तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या मदतीशिवाय ऑलिम्पिकमध्ये पदक मिळणे अशक्य आहे. या सर्वासाठी पैसा लागतो. तो एक तर सरकार पुरविते, उद्योगपती पुरवितात वा अर्थव्यवस्थेतून येतो. भारतात सरकारच्या पैशाला भ्रष्टाचाराची गळती आहे, उद्योग क्षेत्र उदासीन आहे व अर्थव्यवस्था दुबळी आहे. याला अपवाद एकच. क्रिकेट. तेथे बीसीसीआयचा पैसा खेळाडूंमधील क्षमता वाढवीत नेतो.
पण भारताच्या दुर्दशेला इतकेच कारण पुरेसे नाही. ‘फास्टर, हायर, स्ट्राँगर’ हे ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य. पाश्चात्त्य संस्कृती त्यावरच आधारलेली आहे. बाह्य जगात गतिमान होणे, उंच झेप घेणे, बलवान होणे हा तर खरा आर्याचा मूलमंत्र. वेदांमध्ये ठायी ठायी त्याचीच मागणी केली आहे. पण मूढ अध्यात्माची िझग चढल्याने या मूलमंत्राचे विस्मरण भारताला झाले. गती, बल व झेप ही त्रिसूत्री हवीशी वाटली तर सामथ्र्यवान माणसे तयार होतात. ती अर्थव्यवस्थेला सुदृढ करतात आणि त्यातून सुवर्णपदकांची टांकसाळ उघडता येते.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो