पसाय-धन : .. वागवितों मुद्रा नामाची हें
मुखपृष्ठ >> पसायधन >> पसाय-धन : .. वागवितों मुद्रा नामाची हें
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पसाय-धन : .. वागवितों मुद्रा नामाची हें Bookmark and Share Print E-mail

 

अभिजित घोरपडे, शुक्रवार ३ ऑगस्ट २०१२
address@epressindiacom
उच्चारायला अजिबात अवघड नसणारा ‘विठ्ठल’ हा तीनअक्षरी मंत्र संतांनी दिला आणि नामस्मरण-भक्तीची वाट सर्वच समाजघटकांना खुली करून दिली. ही भक्ती खर्चिक नव्हती की उच्चनीच भेद करणारीही नव्हती..


सर्वसमावेशकतेच्या तत्त्वाचा निव्वळ डांगोरा पिटून भागत नसते. ती सर्वसमावेशकता व्यवहारात उरण्यासाठी तशी ‘चॅनेल्स’ तयार करावी लागतात. मग ते क्षेत्र अर्थशास्त्राचे असो वा परमार्थशास्त्राचे! उद्दिष्ट आर्थिक विकासाचे असले काय अथवा आध्यात्मिक उन्नयनाचे असले काय, सर्वसामान्य माणसांना सहज अवलंबता येईल असे साधन अथवा ‘चॅनेल’ व्यवहारात रूढ केल्याखेरीज विकासाची ती प्रक्रिया अर्थपूर्ण बनत नाही. याच न्यायाने, भक्तीचे तत्त्वज्ञान कितीही सर्वसमावेशक असले तरी त्याचा व्यवहारात लाभ उठवायचा तर त्या सर्वसमावेशकतेला अर्थपूर्णता प्रदान करणारे माध्यम अथवा ‘चॅनेल’ आपण सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणून ठेवले पाहिजे, याची प्रगल्भ जाण आमच्या संतपरंपरेला खचितच होती. त्यामुळेच, भागवत पुराणामध्ये भक्तीचे भले नऊ विधी सांगितलेले असले तरी संतांनी त्यातील तिसऱ्या विधीवर म्हणजेच नामस्मरणभक्तीवर मुख्य भर एकवटला तो नामचिंतन या ‘चॅनेल’च्या सर्वसमावेशक स्वरूपाचे अवधान ठेवून. नामचिंतनाबाबत आपल्याकडे मुख्यत: विचार होतो तो या साधनाच्या आध्यात्मिक परिमाणाला अनुलक्षून. परंतु, या साधनाची सामाजिक आणि व्यावहारिक परिमाणेही तितकीच महत्त्वाची आहेत. या परिमाणांचा परिचय करून घेतला की संतांच्या समाजमनस्कतेचे सम्यक दर्शन आपल्याला घडते.
इथे सगळय़ात महत्त्वाचा ठरतो तो नामस्मरणाचा आपल्या दैनंदिन व्यवहाराशी असलेला अविरोध. समाजाच्या ज्या वर्गाच्या लौकिक-पारलौकिक उन्नयनाची ऊर्मी संतांच्या मनीमानसी दाटलेली होती ते सारे समाजघटक बहुश: कष्टकरी वर्गातील होते. त्यामुळे, भक्ती करण्यासाठी दिवसातला काही वेळ खास बाजूला काढणे, साधनेसाठी तयारी करणे, उपकरणे जमवणे.. या साऱ्या उपचारांसाठी त्यांच्यापाशी ना वेळ होता ना पैसा. नामस्मरण हे साधन असे आहे की त्याला या दोहोंचीही गरज नाही. ‘असोनी संसारी जिव्हे वेगु करी’, असा सुलभ उपाय ज्ञानदेव त्यांच्या ‘हरिपाठा’त सुरुवातीलाच सांगून टाकतात. प्रपंचातील रोजची कामे निपटत असताना जिभेने नामोच्चारण केले की बाकी कशाचीच गरज उरत नाही, हे बाहय़ा उभारून खुद्द वेदशास्त्रेच सांगत आहेत, असा दाखला देऊन ज्ञानदेव (कोणाला हवाच असेल तर!) नामचिंतनाच्या साधनाला शास्त्राधाराचा टेकूही पुरवतात. जपजाप्यासाठी खास वेळ आणि जागा हवी, बैठक हवी, एकांत हवा, त्यासाठी ब्राह्म मुहूर्तावर उठायला हवे, हे सगळे पथ्यपाणी ज्यांना पाळणे शक्य आहे त्यांनी जरूर पाळावे. पण, हे ज्यांना निगुतीने करणे शक्य नाही त्यांचीही सोडवणूक ज्ञानदेवांनी ‘हरिपाठा’तच, ‘काळवेळ नाम उच्चारितां नाही,’ असा नि:संदिग्ध निर्वाळा देऊन करून ठेवलेली आहे. ‘दळितां कांडिता तुज गाईन अनंता’ असे जनाबाई जे म्हणतात ते ‘नामस्मरण’ या ‘चॅनेल’ची व्यवहारातील सुलभ सर्वसमावेशकता अधोरेखित करण्यासाठी.
नामोच्चारण सोपे आहे, हे संतांच्या लेखी या ‘चॅनेल’च्या सर्वसमावेशकतेचे दुसरे मोठे गमक. तसे बघितले तर, यज्ञयागादी उपचारांनी आराध्य दैवताला प्रसन्न करून घेण्याची आपल्या भूमीतील परंपरा प्राचीन. मात्र, त्या साधनांदरम्यान करावयाच्या मंत्रोच्चारणाचा आद्य भर असतो संस्कृत उच्चारांच्या शास्त्रशुद्ध, आरोह-अवरोह सांभाळून केलेल्या शुद्ध पठणावर. उच्चार अशुद्ध वा चुकीचे झाले तर ईप्सित दूरच राहो, आराध्य दैवतही खवळण्याची भीती! आता, मंत्रोच्चारणाचे संस्कार ज्या जिभेवर झालेलेच नाहीत तिथे काय करायचे? भगवंताचे नाम उच्चारायला सोपे, हे संतांच्या लेखी या साधनाचे प्रधान मर्म. ‘तुका ह्मणें जपा। मंत्र ती अक्षरीं सोपा।।’, अशा शब्दांत तुकोबा नामोच्चारणाचे सोपेपण मनावर बिंबवतात. ‘विठ्ठल’ हा तीनअक्षरी मंत्र उच्चारायला जिभेच्या वळकटय़ा करण्याची गरज नाही, हाच तुकोबांच्या म्हणण्याचा इत्यर्थ! ज्ञानदेव याच्याही पुढे एक पाऊल जातात. नामाचा सरळ उच्चार न जमणाऱ्याने नामाचा उलटा, विपरीत उच्चार जरी केला तरी भक्तिप्रेमाला त्यामुळे बाधा उद्भवत नाही, हा त्यांचा सांगावा. त्यासाठी ज्ञानदेव साक्ष काढतात ती रामकथाकार महर्षी वाल्मीकींच्या पूर्वावताराची. ‘राम’ या अक्षराऐवजी वाल्या ‘मरा’ म्हणू लागला. यथावकाश ‘मरा’चे रूपांतर ‘राम’मध्ये होईल, असे सांगून ब्रह्मर्षी नारद आपल्या वाटेने निघून गेले, या कथेचा हवाला देऊन ‘उलटय़ा नामें तरला वाल्या’, असा आश्वासक दिलासा ज्ञानदेव तुम्हाआम्हांला देतात. ‘नामस्मरण’ या ‘चॅनेल’चे बलस्थान हे असे आहे.
भक्तीला आज सर्वत्र जे अतिशय मोठय़ा घाऊक प्रमाणावर बाजारू स्वरूप आलेले आहे, त्याला कारणीभूत आहे ते भक्तीचे अर्थकारण. उत्सव, यात्रा, दान, यज्ञयाग, पारायणे अशांसारख्या कथित आध्यात्मिक उपक्रमांमध्ये आज आपल्या समाजात मोठय़ा प्रमाणावर पैसा फिरतो. त्यामुळे, परमार्थातील या ‘अर्था’कडेच मुख्यत: आकृष्ट झालेले भाविक (?) आज उदंड दिसतात. नामचिंतनाला वस्तुत: या साऱ्या गदारोळाची काहीही आवश्यकता नाही. भक्ती खर्चिक बनली की तिथेच तिचे सर्वसमावेशक स्वरूप लयाला जाते, याचे उचित भान संतांना आहे. आर्थिकदृष्टय़ा निम्नस्तरीय, कष्टकरी वर्गाच्या हाती सुपूर्द करावयाचे ते भक्तीचे साधन खर्चिक असता कामा नये, या बाबत संतांचा कटाक्ष होता. नामसाधनाला कवडीचाही खर्च नाही. ‘नाम घेतां न लगे मोल। नाममंत्र नाहीं खोल।।’, असे तुकोबा म्हणूनच मुद्दाम बजावतात. सर्व साधनांचे सार असणारे नाम शब्दश: फुकट उपलब्ध आहे, त्यामुळे ‘फुकाचें तें लुटा सार। व्हा रे अमर सदैव।।’, असे उदार आवाहन तुकोबा केव्हापासून करत आहेत.
‘जिथे नाम तिथेच देव’ हे समीकरण असल्याने देवाच्या सख्यत्वासाठी मध्यस्थाची गरज भासत नाही. नामाचे साधन हाती आल्यामुळे देव आणि नामधारक साधक यांच्यादरम्यान कोणी मध्यस्थ असण्याचे प्रयोजनच उरत नाही. त्यामुळे, देवदेवाचाराच्या नावाखाली समाजामध्ये (तेव्हा आणि आजही) होणाऱ्या लुटालुटीला आयताच पायबंद बसण्याच्या वाटा रुंदावल्या. संपूर्ण मध्ययुगात फोफावलेल्या कर्मकांडांच्या बडिवारांवरच ज्यांची उपजीविका अवलंबून होती त्या देव आणि भक्तांदरम्यानच्या मध्यस्थांकडून या सगळय़ा स्थित्यंतराबाबत तीव्र अशी प्रतिकूल प्रतिक्रिया यावी, हे स्वाभाविकच ठरते. तुकोबांच्या शिष्या बहिणाबाई यांच्या एका आत्मकथनपर अभंगाच्या एका ओळीत, नामस्मरणाच्या संतप्रणीत ‘चॅनेल’द्वारा तत्कालीन समाजव्यवस्थेतील उच्चवर्णीयांच्या जन्मजात विशेषाधिकारांची सद्दी निकालात निघाल्याने समाजव्यवस्थेत काय परिवर्तन घडून येत होते, याबाबतचा एक विलक्षण सूचक संकेत मिळतो. बहिणाबाईंचा नवरा भिक्षुकी करत असे. आता, नामसंकीर्तनामुळे कर्मकांडाचे भार अप्रस्तुत ठरू लागले तर, दुसरीकडे नामचिंतनामुळे नामधारक अंतर्बाहय़ शुद्ध बनत असल्याने, ज्ञानदेव म्हणतात त्याप्रमाणे, ‘नाशिलें व्यवसाय प्रायश्चित्तांचें’, अशी परिस्थिती स्थिरावू लागली. त्यामुळे, व्यावहारिक पातळीवर कोंडी झालेल्या आपल्या नवऱ्याची या सगळय़ा स्थित्यंतराप्रतीची भूमिका वर्णन करताना बहिणाबाई म्हणतात, ‘नामाचा विटाळ आमुचिये घरी। गीताशास्त्र कुळी वैरी आह्मां।।’. नामामुळे जन्मजात विशेषाधिकार अप्रस्तुत ठरले. त्यामुळे झालेला नवऱ्याचा जळफळाट बहिणाबाईने शब्दांत पकडला आहे. सर्वसमावेशकतेबरोबरच नामाच्या माध्यमातून समतेचा होणारा सामाजिक प्रसव बहिणाबाई मार्मिकपणे सांगतात. आजच्या समाजात तरी हे घडताना दिसते का?
नामाची मुद्रा आपल्या अस्तित्वावर उमटवली की ‘आपण देवाचे सेवक आहोत,’ असे नामधारकाला प्राप्त होणारे लखलखीत आत्मभान, साधकाच्या मनात वसणारा त्याच्या लौकिक जीवनातील उपेक्षित, अवनत, वंचित अस्तित्वाचा सल पुसून टाकते, हा नामसाधनाचा तत्कालीन सामाजिक परिस्थितीत, परिघावर अथवा परिघाबाहेरच मोकलल्या गेलेल्या समाजघटकांना प्रकर्षांने आधार देणारा सर्वात महत्त्वाचा गुण. एखाद्या साध्या पटकुरावर राष्ट्रचिन्ह उमटवले की त्या पटकुराला राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा प्राप्त होते. त्या निशाणाच्या पाठीशी मग राज्यसंस्थेचे सामथ्र्य एकवटते. त्याच न्यायाने, लौकिक व्यवहारात आमची वर्णजाती काहीही असो, आम्ही नाममुद्रांकित आहोत, याचे जाज्ज्वल्य भान सर्वच समाजघटकांना नामसाधन प्रदान करते, हे संतांच्या लेखी या ‘चॅनेल’चे सर्वात मोठे बलस्थान. ‘तुका ह्मणें आहें पाईक चिं खरा। वागवितों मुद्रा नामाची हें’।।, या वचनात त्याच धगधगीत प्रत्ययाचा साक्षात्कार घडतो.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो