सारस्वतांचा उत्सव, साहित्यप्रेमी आणि चारचौघे ..
मुखपृष्ठ >> रविवार विशेष >> सारस्वतांचा उत्सव, साहित्यप्रेमी आणि चारचौघे ..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

सारस्वतांचा उत्सव, साहित्यप्रेमी आणि चारचौघे .. Bookmark and Share Print E-mail

alt

रविवार, ५ ऑगस्ट  २०१२
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि वर्तमानपत्र यांचा संबंध हा संमेलनाच्या निमित्ताने होणारे वाद छापणे आणि त्या वादाला तेलपाणी घालण्याचा असतो. वृत्तपत्रे ते काम करतही असतात. पण या वेळी  संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील सर्व दावेदारांना एका व्यासपीठावर बोलवावे आणि एकूणच साहित्य संमेलन, निवडणूक प्रक्रिया याविषयी जाणून घ्यावे, असे ‘लोकसत्ता’ परिवाराला वाटले आणि म्हणूनच या  कार्यक्रमाचे आयोजन केले. साहित्य alt
संमेलनाध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने होणाऱ्या वादामुळे नेमके साहित्य संमेलन लोकांपर्यंत पोहोचत नाही. म्हणूनही हा एक प्रयत्न. काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांची मुलाखत प्रसिद्ध झाली होती. त्यातील साहित्य संमेलने हवीत कशाला, ती बंद करा आणि साहित्य संमेलने ही चोरांची संमेलने झाली आहेत, ही त्यांची विधाने खूप गाजली. आता नेमाडे म्हणतात तसे असेल तर एकदा संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक लढविणाऱ्या सर्वांनाच एका व्यासपीठावर बोलवावे आणि एकूण साहित्य संमेलन यंत्रणा कशी चालते त्यावर चर्चा व्हावी, हा हेतूही या मागे होता. साहित्याशी संबंधित घडामोडी आणि साहित्याला महत्त्व देणारे वृत्तपत्र म्हणून आजही ‘लोकसत्ता’ची ओळख असल्याने हा सगळा प्रपंच..

माझी भूमिका
निवडणूक नको , निवड हवी
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे राहण्यामागे माझी कोणतीही विशिष्ट भूमिका नाही. संमेलनाच्या मांडवाखालून जावे, हीच भूमिका आहे. लग्न लागले तर होईल, नाहीतर ब्रह्मचारी राहू. निवडणुकीत मी पडलो तर या पुढे पुन्हा कधीही निवडणूक लढवायची नाही, असे मी मनाशी नक्की ठरवले आहे. मला या प्रकारची परीक्षा पुन्हा द्यायची नाही. नारायण सुर्वे, द.भि. कुलकर्णी, द. मा.मिरासदार आदी लेखकांनी दोन/तीन वेळा निवडणूक लढवली आणि त्यानंतर ते निवडून आले. मला हा धोका पुन्हा पत्करायचा नाही. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे सन्मानाचे मानले जाते. दुर्दैवाने आपल्याकडे निवडून येऊन हे अध्यक्षपद मिळवावे लागते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक नको तर निवड असावी, असे मला वाटते. अध्यक्ष म्हणून निवडून आलो तर मोठय़ा व्यासपीठावरून मी याचा नक्की प्रसार करेन. संमेलनाच्या अध्यक्षपदावरील व्यक्तीची सन्मानपूर्वक निवड व्हावी, निवडणूक टाळली जावी, अशी अपेक्षा आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले की ‘सेलिब्रेटी’चा दर्जा मिळतो. आणखी काही लोक ओळखायला लागतात. अध्यक्षपद जर मला मिळाले तर मराठी साहित्य आणि एकूणच साहित्य व्यवहारासाठी काही काम करायची इच्छा आहे. माझ्या मनात एक प्रकल्प राबविण्याचा विचार असून मी त्याविषयी आत्ताच काही सांगत नाही. अध्यक्षपद मला मिळाले तर मी हा प्रकल्प जाहीर करून त्यावर काम करेन. अर्थात या प्रकल्पासाठी खूप खर्च येणार असल्याने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एखादी धनाढय़ व्यक्ती किंवा विश्वस्त निधी (ट्रस्ट) ची मदत घ्यावी लागणार आहे. तशी ती मिळाली तर हा प्रकल्प अमलात आणणे सोपे जाईल.  
ह. मो. मराठे

साहित्य प्रसारासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर हवा
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. माझ्यासारख्या माणसाने अध्यक्षपदासाठी निवडणूक का लढवावी, असा प्रश्नही काहींना पडला. डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे माझे समवयस्क आहेत;  पण ह. मो. मराठे आणि डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. अशा मंडळींबरोबर मी निवडणूक लढवत आहे. ‘कवितांच्या गावा जावे’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी महाराष्ट्रातील अनेक खेडय़ापाडय़ांत गेलो. विविध ठिकाणी कार्यक्रम करत असताना नवी पिढी अशा कार्यक्रमांना येत नाही, हे लक्षात आले. नवी पिढी ही ‘टेक्नो-सॅव्ही’ आहे. माहिती-तंत्रज्ञानात अडकलेल्या या पिढीला साहित्याकडे या नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनेच वळवावे लागेल. अध्यक्षपदी निवडून आलो तर या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग साहित्य प्रसार आणि नव्या पिढीला पुस्तकांकडे वळविण्याचा विचार डोक्यात आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या बोली भाषा बोलल्या जातात. आज या बोलीभाषेत लेखनही केले जात आहे. मात्र म्हणावे त्या प्रमाणात ते वाचकांपर्यंत पोहोचत नाही. ते प्रमाण मराठी भाषेत आले तरच वाचकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे या दोन्हींचा समन्वय साधण्यासाठीही मी प्रयत्न करणार आहे. पाठय़पुस्तकातून विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट जगात कसे वागावे, याचेच शिक्षण दिले जात असून साहित्याचे संस्कार नव्या पिढीवर होत नाहीत. दिवंगत ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. त्यांचे घर आणि वस्तू जतन करणे, स्मारकात त्यांच्या कविता लावणे अशा पारंपरिक स्वरूपात त्यांचे स्मारक न करता ते वेगळ्या पद्धतीने व्हावे असे मला वाटते. हे स्मारक भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे संशोधन केंद्र व्हावे. महाराष्ट्र, देशातील किंवा परदेशातील अभ्यासक, विद्यार्थी यांना तेथे संशोधन व अभ्यास करता यावा, अशा प्रकारे ते उभारले जावे.           
अशोक बागवे

भावंडभावाची प्रतिष्ठापना व्हावी
मागल्यावेळी मी चंदूकाका धर्माधिकारी यांच्यासाठी माघार घेतली होती. आता मात्र तसे करून चालणार नाही. कारण मला जे काही सांगायचे आहे, ते आत्ताच सांगितले पाहिजे. आणखी उशीर करून चालणार नाही. आज आपल्या देशाची स्थिती देश कधीही कोसळून पडेल, अशी झाली आहे. आपल्या देशात जेव्हा जेव्हा भावंडभावाची प्रतिष्ठापना झाली तेव्हा तेव्हा आपला देश स्वतंत्र झाला आहे. आपण जात, पात, धर्म, पंथ यात गुरफटतो तेव्हा आपण गुलाम होतो. आज काही शक्ती देशात तोच भेद करण्याचा प्रयत्न करीत असून मला ते होऊ द्यायचे नाही. लोकमान्य, लोकशक्ती एकत्र आली तेव्हा देश एकत्र बांधला गेला. लोकमान्य टिळक ते महात्मा गांधी यांच्या रूपाने आपण ते पाहिले आहे. माझ्या लेखनाच्या माध्यमातून मी हा विचार लोकांपर्यंत पोहोचवला आहे. पण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मला मिळाले तर हा विचार हजारो/लाखो लोकांपर्यंत पोहोचवू शकेन. त्यासाठीचे व्यासपीठ म्हणजे साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आहे. मला जे सांगायचे आहे त्यासाठी अध्यक्षपद पाहिजे आणि अध्यक्षपद पाहिजे असेल तर निवडणूकजिंकावी लागेल आणि तीजिंकण्यासाठी लढावी लागणार आहे. अध्यक्ष होण्याची नुसती पात्रता असून काहीही होत नाही. आपल्याला जे सांगायचे आहे ते लोकांपुढे येण्यासाठी निवडून यावे लागणार आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि स्वातंत्र्य हा माझा संकल्प आहे. अध्यक्ष म्हणून निवडून आलो तर तो अमलात आणण्यासाठी मी प्रयत्न करेन.
डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे

जास्तीत जास्त लोकांचा सहभाग असावा
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ किंवा काही निवडक लोकांच्या हातात अध्यक्ष निवडण्याची सूत्रे देण्यापेक्षा या निवड प्रक्रियेत जास्तीत जास्त लोकांचा सहभाग असला पाहिजे, असे मला वाटते. काही थोडय़ा लोकांच्या हातात हा अधिकार देणे मला पटत नाही. दरवर्षी होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी साहित्य आणि संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी आजवर जे काही लिहिले, लेखनाच्या माध्यमातून जी काही वैचारिक भूमिका मांडली त्याविषयी आणि साहित्यविषयक चिंतन प्रकट केले आहे. अंबाजोगाईसारख्या छोटय़ा गावात जे साहित्य संमेलन झाले, त्यासाठी आजूबाजूच्या खेडय़ांतून अनेक माणसे आली होती. बैलगाडीतून आलेल्या या मंडळींनी आपल्याबरोबर घरून भाजी-भाकरी आणली होती. त्यामुळे साहित्य संमेलनाला स्वखर्चाने लोक येतात. साहित्य संमेलन म्हणजे वाङ्मयीन आणि सांस्कृतिक जीवनातील महत्त्वाची घटना आहे. संमेलनाच्या निमित्ताने आयोजित ग्रंथप्रदर्शनातून विद्यार्थ्यांकडून पुस्तके हाताळली, चाळली आणि विकत घेतली जातात ही खूप चांगली गोष्ट आहे. अध्यक्षपदी निवडून आलो तर साहित्यविषयक एखादा महत्त्वाचा विचार किंवा भूमिका त्या व्यासपीठावरून मांडता येईल का, हा अध्यक्षपदाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन आहे.
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो