आकलन : लाल सुवर्णामागील कृष्णछाया
मुखपृष्ठ >> आकलन >> आकलन : लाल सुवर्णामागील कृष्णछाया
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

आकलन : लाल सुवर्णामागील कृष्णछाया Bookmark and Share Print E-mail

प्रशांत दीक्षित  - मंगळवार, ७ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

चीनच्या सुवर्णपदकांची खरी किंमत काय, हा प्रश्न संवेदनशील मनाला अस्वस्थ करणारा आहे..!
ऑलिम्पिकमधील चीनची प्रगती थक्क करणारी आहे. १९८४ साली ऑलिम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक मिळवीत असतानाच चीन श्रीमंत होऊ लागला. त्याबरोबर खेळातही महासत्ता होण्याचे ध्येय चिनी राज्यकर्त्यांनी समोर ठेवले. ‘स्टेट रन स्पोर्ट्स सिस्टीम’ उभी राहिली आणि सर्वोत्तम खेळाडूंचे ‘उत्पादन’ सुरू झाले.


ध्येय समोर आले की द्विधा मन:स्थितीत राहायचे नाही हा चीनचा स्वभाव आहे. माओच्या चित्रविचित्र कल्पनांसाठी चीनने जसे स्वत:ला झोकून दिले तसेच डेंग यांच्या नव्या आर्थिक धोरणासाठी सर्वस्व दिले. खेळासाठीही कम्युनिस्ट पक्ष तसाच कामाला लागला. १९९६च्या ऑलिम्पिकमध्ये चीन चवथ्या क्रमांकावर आला. २०००मध्ये तिसऱ्या, २००४मध्ये दुसऱ्या आणि बीजिंग ऑलिम्पिकमध्ये चीनने पहिले स्थान मिळविले.
लंडन ऑलिम्पिकमध्येही चिनी ड्रॅगन पदकामागून पदके घेत सुटला आहे. चीनची ही दौड अनेकांना अचंबित करते. चीनच्या मेहनतीचे व ध्येयनिष्ठेचे कौतुक होते. पण काहीजणांना ही दौड संशयास्पद वाटते. सर्वोच्च स्थान मिळविण्याच्या अट्टहासापायी चीन भलतेसलते मार्ग अवलंबितो काय, अशी शंका व्यक्त होते.
यी शिवेन या चिनी महिला जलतरणपटूने दोन सुवर्णपदके मिळविल्यानंतर या शंकेचे रूपांतर जाहीर वादविवादात झाले. १६ वर्षांच्या शिवेनची शारीरिक क्षमता आश्चर्यचकित करणारी आहे. तिचा झपाटा तिच्या वयाशी व अनुभवाशी जुळणारा नाही. तिने उत्तेजक द्रव्य घेतले असावे असा संशय व्यक्त झाला, पण चाचणीअंती तो फोल ठरला. त्यानंतर एक नवीनच शंका घेण्यात आली. खेळाडूंची क्षमता वाढविण्यासाठी जीन्समध्ये फेरफार केले गेले असावेत, असा संशय घेतला गेला. चीनकडून त्याचा प्रतिवाद होत असला आणि ऑलिम्पिक समितीही चीनला साथ देत असली तरी शंकेखोरांचे समाधान नाही.
खेळाडूच्या जीन्समध्ये बदल करून क्षमता वाढविण्याचे विज्ञान माणसाच्या हाती आले आहे. ‘साल्क इन्स्टिटय़ूट ऑफ बायोलॉजिकल सायन्स’मधील रोनाल्ड इव्हान्स याने काही वर्षांपूर्वी उंदरांमधील जीन्स बदलले आणि उंदरांच्या क्षमता कित्येक पटींनी वाढविल्या. आता माणसातही असे बदल करता येतात. सिस्टिक फायब्रोसिस या आजारात जीन्स थेरपी वापरतात. बदल घडवून आणलेला डीएनए जंतूमध्ये ठेवून तो जंतू माणसाच्या शरीरात सोडायचा. हा जंतू माणसाच्या डीएनएच्या संपर्कात आला की दोन डीएनएमध्ये संयोग होतो व माणसाचा डीएनए बदलतो. शरीरातील विशिष्ट स्नायू किंवा प्राणवायू वाहून नेण्याची रक्ताची क्षमता अशा प्रक्रियेने वाढविता येते. सध्याच्या उत्तेजकता चाचणीमध्ये हे बदल टिपता येत नाहीत.
‘जेनेटिकली मॉडिफाइड प्लेअर्स’ या ऑलिम्पिकमध्ये खेळू शकतात ही शंका एप्रिल महिन्यातच लंडनमधील पत्रकार परिषदेत व्यक्त झाली होती. अशा खेळाडूंना रोखणारी यंत्रणा सध्या नाही, अशी कबुली त्या वेळीच ऑलिम्पिक समितीने दिली होती. खेळाडूंच्या क्षमता अशा अवास्तव वाढविल्या तर प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या अन्य खेळाडूंवर अन्याय होईल. ते टाळण्यासाठी प्रत्येक विजयी खेळाडूचा जैविक नकाशा तयार करण्याचे आता ऑलिम्पिक समितीने ठरविले आहे. तसेच प्रत्येक पदक विजेत्याचे रक्त आठ वर्षे जपून ठेवण्यात येणार आहे.
शिवेन अशी ‘मॉडिफाइड’ असेल का, असा प्रश्न करीत चीनच्या घोडदौडीमागे काहीतरी काळेबेरे आहे असे सूचित करण्यात येत आहे. पदके मिळविण्यासाठी चीन कोणत्याही थराला जाऊ शकतो हे माहीत असल्याने या संशयाला जोर येतो. तथापि, चिनी जलतरणपटूंना आठ वर्षे प्रशिक्षण देणाऱ्या एका ब्रिटिश प्रशिक्षकाने ‘गार्डियन’मध्ये निनावी लेख लिहून या आक्षेपांना उत्तर दिले. चीनमधील प्रशिक्षण कसे असते, सुविधा किती मिळतात याचे वर्णन त्याने केले आहे. या सुविधांना जोड असते ती चिनी खेळाडूंच्या मेहनतीची. हे खेळाडू कष्ट करण्यात अजिबात कमी पडत नाहीत. पदके मिळविणे हा एकच ध्यास त्यांनी घेतलेला असतो. अन्य कोणत्याही गोष्टी त्यांचे लक्ष विचलित करू शकत नाहीत. चिनी खेळाडूंचे हे गुणवैशिष्टय़ सांगितल्यावर युरोप सोडून चीनमध्ये का गेलो, याची तीन प्रमुख कारणे त्याने दिली आहेत.
१) सुविधा : ५० मीटर व २५ मीटरचे दोन स्वीमिंग पूल २४ तास सातही दिवस सरावासाठी उपलब्ध. त्यामध्ये कोणाचीही लुडबुड नाही. सरकारी कर्मचाऱ्यांचा त्रास नाही. कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही. हे तलाव फक्त सरावाकरताच राखीव.
२) खेळाडूंची निवड :  कुणाला निवडायचे, त्याला कसे व किती काळ प्रशिक्षण द्यायचे याचे प्रशिक्षकाला पूर्ण स्वातंत्र्य. खेळाडूंची सरावात झोकून देण्याची वृत्ती.
३) पैसा : प्रत्येक खेळाडूला पगार. सरावात चमक दाखविली की बोनस. देशांतर्गत खेळात कामगिरी सुधारली की खेळाडू व प्रशिक्षक दोघांनाही बोनस. काम तडीस नेणे महत्त्वाचे. सुवर्ण वा रौप्यपदक हीच काम तडीस नेल्याची खूण. यासाठी परदेशात प्रशिक्षण हवे असेल तर पैसा हजर. निरनिराळ्या ठिकाणी प्रशिक्षण हवे असेल, परदेशातून सहकारी प्रशिक्षक हवे असतील, नवी उपकरणे हवी असतील, नव्या सुविधा हव्या असतील. कशासाठीही पैसा लगेच हजर. पदके मिळविण्यासाठी पैशाची कमतरता नाही. लालफितीचा कारभार नाही.
ब्रिटिश प्रशिक्षकाने उल्लेख केला नसला तरी पदके मिळविण्यासाठी चिनी खेळाडूंवर प्रचंड दबाव टाकण्यात येतो. ‘मातृभूमी सर्वोच्च, सुवर्ण हेच ध्येय’, ‘एकमेकांवर दबाव टाका, स्वत:वर दबाव टाका’, असे फलक प्रशिक्षणाच्या ठिकाणी जागोजागी लावलेले असतात. पदक मिळाले की खेळाडूची जगण्याची विवंचना संपते. सुवर्णपदक विजेत्याला किमान दोन लाख डॉलर्स (अकरा कोटी रुपये) अशी घसघशीत रक्कम मिळते.
मात्र सुवर्णपदके मिळविण्याचा राज्यकर्त्यांचा हा अट्टहास नागरिकांना कितपत मानवतो याबद्दल खरोखरच शंका आहे. सुवर्णाचा हा सोस थांबवा, अशी भावना नागरिक व्यक्त करीत असल्याचे चिनी प्रसारमाध्यमेही दबल्या आवाजात मान्य करू लागली आहेत. नागरिकांच्या अनेक समस्या कायम असताना खेळावर इतका खर्च कशाला, असा सवाल करणाऱ्या बंडखोरांची संख्या वाढते आहे. लंडनमध्ये ऑलिम्पिक सुरू असतानाच बीजिंग जलमय झाले. मुंबईत सात वर्षांपूर्वी जे घडले तेच बीजिंगमध्ये, सांडपाणी वाहून नेणारी व्यवस्था कोलमडल्यामुळे घडले. त्यानंतर खेळावरील टीका आणखीनच वाढली.
दुसरी बाब म्हणजे खेळाडू मालामाल होत असले तरी कुटुंबे सुखी नाहीत. चवथ्या वा पाचव्या वर्षीच खेळाडूंना प्रशिक्षणासाठी निवडले जाते आणि त्यानंतर त्यांचा कुटुंबाशी संपर्क तुटतो. जलतरणात तीन सुवर्णपदके मिळविणाऱ्या वू या खेळाडूच्या पालकांची मुलाखत ‘शांघाय मॉर्निग पोस्ट’मध्ये प्रसिद्ध झाली. वूच्या पालकांना लंडनला नेण्यात आले, पण वूला भेटू देण्यात आले नाही. ती फक्त एसएमएस करते. आजीआजोबांचे निधन तिला सांगण्यात आले नाही. कारण तिची आजीशी जवळीक होती. आईला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे तिच्यापासून आठ वर्षे लपविण्यात आले. ‘सर्व काही ठीक आहे’, असे तिचे वडील वारंवार सांगतात आणि तिच्याशी खोटे बोलावे लागते म्हणून खंतावतात. ‘निवड झाली तेव्हाच मुलगी कुटुंबातून गेली हे आम्ही ओळखले. ती आमच्याबरोबर हसूनखेळून राहील अशी आशा करण्याचे ‘धाडस’ही मी करू शकत नाही,’ असे वूचे आईवडील सांगतात. तिच्या यशाने ते सुखावतात, पण या यशाला कौटुंबिक भावनेचा पदर नाही.
सुवर्णपदकासाठी चाललेल्या चढाओढीचा लोकांना वीट आला आहे हे ‘ग्लोबल टाइम्स’ हे सरकारी मुखपत्रही मान्य करते. मग पदकांची देशाला कशी गरज आहे हे अग्रलेखातून सांगण्यात येते. गरिबी आणि अलगता झटकून टाकण्यासाठी स्पर्धात्मक खेळामध्ये हिरिरीने सहभागी झाले पाहिजे, असा युक्तिवाद करण्यात येतो. परंतु लोकांना ते पटत नाही. चीनला सुवर्णपदके भरपूर मिळत आहेत, पण खेळाचा आनंद नाही. खेळाडू बनविणाऱ्या क्रीडाशाळा भरपूर आहेत. पण सर्वसामान्य लोकांचा खेळामध्ये सहभाग नाही. गल्लोगल्ली, क्लबमध्ये खेळ खेळले जात नाहीत. पदके आहेत, पण क्रीडासंस्कृती बहरलेली नाही. अमेरिकेत प्रत्येकजणाला खेळण्याचे स्वातंत्र्य आहे. चीनमध्ये कुणी खेळायचे, काय खेळायचे, कसे खेळायचे हे सरकार ठरविते. सरकारने ते एकदा ठरविले की खेळाडूची त्यातून सुटका नाही. पदके मिळवलीत तर भरपूर पैसा, पण अपयशी ठरलात तर वाळीत पडण्याची धास्ती. पदकांची प्रतिष्ठा महत्त्वाची. खेळाचा निरागस आनंद नाही.
अ‍ॅडम मिन्टर हा शांघायमध्ये बरीच वर्षे राहिलेला पत्रकार. दोन दिवसांपूर्वीचा त्याचा ट्विट चीनमधील परिस्थिती नेमकी सांगतो. ‘पदक मिळाल्यावर अन्य खेळाडूंप्रमाणे चिनी खेळाडूही हसतात. पण नीट पाहा. या हसण्यामागे विजयाचा आनंद नसतो, तर सुटका झाल्याची भावना असते..!’
चीनची सुवर्णपदके कवायतीतून येतात. आनंदातून नव्हेत. हे वास्तव पाहिले की चीनपेक्षा अमेरिकेचे मॉडेल अधिक आपलेसे वाटते. तसेच पदके मिळविण्याची भारताची गजगती, जरी चेष्टेचा विषय होत असली तरी, सुखकर वाटते. कारण इथे स्वातंत्र्य आहे आणि तेच मोलाचे आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो