रुजुवात : गायकांचे गायक
मुखपृष्ठ >> रुजुवात >> रुजुवात : गायकांचे गायक
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

रुजुवात : गायकांचे गायक Bookmark and Share Print E-mail

मुकुंद संगोराम, शनिवार, ११ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

इंदौर घराण्याचे जनक उस्ताद अमीरखाँ यांची कारकीर्द मुंबईत वाढली..  तालाच्या आवर्तनात गाण्याचा मजकूर भरण्यासाठी स्वरांच्या गणिती गुणाकारांच्या लडीवर लडी उलगडणं, आलापी आणि बोल-तानांसोबत सरगमलाही महत्त्व देणं आणि ख्याल-तराणा याच प्रकारांशी एकनिष्ठ राहून, गाण्यात स्वतच्या भावनाप्रदर्शनाऐवजी तटस्थता ठेवून अभिजात स्वरतत्त्वांशीच इमान राखणं.. ही
या घराण्याची जायदाद!  ती अमीरखाँ साहेबांनी घडवली आणि ते आजही गायकांचे गायक मानले जातात. त्यांचं हे स्मरण, १५ ऑगस्टला येणाऱ्या त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्तानं..


संध्याकाळच्या कातरवेळी अमीरखाँ साहेबांचा मारवा ऐकणं हा एक अपूर्व अनुभव असतो. शांत आणि गंभीर वातावरणात खाँसाहेबांची रागाची बढत आपल्याला अस्वस्थ करते आणि त्या सौंदर्यपूर्ण अनुभवाला साक्षीदार राहात असल्याच्या आनंदाने आपण स्वत:ला विसरून जातो. रागाच्या प्रत्येक स्वराला गोंजारत गोंजारत आणि त्यातून हळूहळू पुढे जात ते रागाचं जे चित्र नजरेसमोर उभं राहतं, त्यानं हरखून जायला होतं. घाई नाही, गडबड नाही. आपलं ज्ञान दाखवण्याची हौस नाही. चटपटीतपणा नाही, हरकती नाहीत की मुरक्या नाहीत. शांतपणे वाहणाऱ्या प्रदीर्घ नदीच्या प्रवाहासारखं सगळं कसं अतिशय संथ आणि तरीही अतिशय देखणं. ऐकणाऱ्याला लय अतिशय संथ वाटेल अशी, पण त्या लयीबरोबर लडिवाळपणे केलेला ‘रोमँटिक’ संवाद लाजवाब म्हणावा असा. अमीरखाँ साहेबांचं गाणं तेव्हाही म्हणजे स्वातंत्र्याच्या आणि भारतीय संगीतातील घराण्यांच्या संधिकालात असं स्वतंत्र, वेगळं आणि प्रभावी होतं.
आयुष्यभर केवळ संगीत आणि संगीतच करणाऱ्या अनेक कलावंतांना खाँसाहेबांच्या गायकीचं आकर्षण वाटलं. प्रत्येकानं आपापल्या परीनं त्यातलं सुंदर असं वेचून आपल्या गायकीत समाविष्ट केलं आणि आपली मूळची गायकी समृद्ध केली. भारतीय स्वातंत्र्याचा लढा तीव्र व्हायला लागल्यानंतर त्या काळातील राजे-महाराजे यांचंही आसन काही प्रमाणात डळमळीत होऊ लागलं होतं. त्यांचे सारे शौक हळूहळू मिटायला लागले होते आणि त्याचा थेट परिणाम रागदारी संगीतावर होत होता. राजाश्रय कमी होऊ लागल्याने कलावंतांना नव्या वाटा शोधण्यावाचून पर्यायच नव्हता. अमीरखाँ साहेब त्या काळात म्हणजे १९३२ ते ४२ मध्ये अक्षरश: फकिरासारखे देशभर हिंडत होते. आपलं गाणं ऐकवत होते आणि तरीही त्यांना आश्वासक स्थिरता मिळत नव्हती. एक मात्र घडत होतं की, त्याचा परिणाम गाण्यावर होत नव्हता. गीतेमध्ये स्थितप्रज्ञाची जी व्याख्या आहे, ती तंतोतंत लागू पडावी, असा या कलावंताचा स्वभाव. कुणाच्या पुढे पुढे करणं नाही, की गाणं व्हावं म्हणून विनाकारण तोंड वेंगाडणं नाही. आपण बरं की आपलं गाणं बरं. जे गायचं, ते अतिशय कलात्मक असेल, आणि त्यात अभिजाततेचा भरजरीपणा ओतप्रोत भरलेला असेल, याचं सततचं भान ठेवत गात राहणं ही त्या काळातील सामाजिक परिस्थिती पाहता अतिशय अवघड अशी गोष्ट. भारतीय संगीतातील अभिजाततेचे मानदंड टिकवून ठेवणाऱ्या या योगी कलावंताचं, त्याच्या शताब्दीनिमित्तानं होणारं स्मरण म्हणूनच अगत्याचं आणि महत्त्वाचंही.
घराणं म्हणजे शैली आणि शैली म्हणजे विचार मांडण्याची पद्धत. भारतीय संगीतात अशा ज्या शैली गेल्या काहीशे वर्षांत विकसित झाल्या, त्या टिकवून ठेवण्यात नंतरच्या पिढय़ांची फार दमछाक झाली. आपल्या घराण्याच्या अभिमानाचा अतिरेक होत असला, तरीही त्या काळातील सांस्कृतिक वातावरणात तसे करण्यावाचून बहुधा पर्यायही नसावा. आपली शैली आपल्या शिष्यपरंपरेतूनच टिकवण्याचा हा हट्ट इतका जबरदस्त होता की, त्यामुळे दुसऱ्या कलावंताचं गाणं ऐकायलाही बंदी होती. अमीरखाँ साहेब जेव्हा गाणं शिकत होते, तेव्हाही हा हट्ट होताच; पण ते विचारी कलावंत होते. बदलत्या सामाजिक, राजकीय आणि तंत्रसिद्ध वातावरणात स्वत:ला नवा आकार देण्यासाठी आवश्यक असणारी कमालीची प्रज्ञा त्यांच्याकडे होती. त्यामुळे भेंडीबझार घराण्याची म्हणून ओळखली जाणारी मेरुखंड पद्धत (गणिती पद्धतीने स्वरांचे गुणाकार) आपल्या गायनात सुंदर होऊन प्रकट करण्यासाठी त्यांनी ती प्रज्ञा उपयोगात आणली. त्याकाळात लोकप्रिय होत असलेल्या किराणा घराण्यातील स्वरशुद्धतेचा कस आपल्याही गाण्यात कसा उतरवता येईल, याकडे त्यांनी लक्ष दिलं. स्वरलयीचा संगम असणाऱ्या जयपूर गायकीतील वेगळेपणा आपल्या गळ्यात येण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. एका नव्या घराण्याचा जन्म झाला. इंदौर घराणं.
तालाचं आवर्तन जेवढं मोठं, तेवढं त्या संपूर्ण आवर्तनाच्या काळात गाण्यामध्ये मजकूर भरणं अवघड. दीर्घ आवर्तन कदाचित कंटाळवाणं होण्याची शक्यताही अधिक. तसं होऊ नये, म्हणून त्यातील लज्जत आणि खुमारी स्वरांच्या वेगवेगळ्या गणिती गुणाकारानं वाढवत न्यायची आणि त्या सगळ्याचा एक टिकाऊ असा रसपूर्ण आविष्कार करायचा. त्यासाठी मग आलापी, बोल-तानांबरोबर सरगमचा प्रयोग करायचा. सरगमही कलापूर्ण आणि रागाच्या चित्राला बाधा येऊ न देणारी आणि लयपूर्ण. अमीरखाँ साहेबांचं हे गाणं तेव्हा रसिकांना जेवढं आवडत होतं, त्यापेक्षा काकणभर अधिक पुढच्या पिढीतल्या कलावंतांना भावत होतं. गायकांचे गायक अशी त्यांची ख्याती होत होती. पण ते स्वत: स्थितप्रज्ञ होते. आपला विचार स्वरांच्या दुनियेत टिकवून ठेवण्यासाठी मोठी शिष्यपरंपरा निर्माण व्हायला पाहिजे, म्हणून त्यांनी मुद्दामहून प्रयत्न केले नाहीत, तरीही त्यांचं गाणं संगीताच्या अवकाशात आजही भरून राहिल्याचा अनुभव येतो. एका मैफलीत ठुमरी म्हणण्याची फर्माईश झाली, तर खाँसाहेब मैफल सोडून निघून आले. आयुष्यभरात फक्त ख्याल आणि तराणा या दोनच संगीतप्रकारांवर आपली सारी प्रतिभा केंद्रित करणाऱ्या या कलावंतानं हे दोन्ही प्रकार खूप-खूप श्रीमंत केले. बदलत्या जीवनशैलीने माणसाला शांततेकडे जाण्याची गरज अधिक वाटू लागली. ही शांतता कलांमधून मिळणे शक्य होते. पण कालानुरूप कलाही आपलं रूप बदलत होती. १८८० मध्ये सुरू झालेल्या संगीत नाटकांनी ललित संगीतात मोलाची भर घालायला सुरुवात केली होती आणि १९३२ नंतर चित्रपट संगीतानं आपली वेगळी चूल मांडायला सुरुवात केली होती. ठुमरी, होरी, कजरी, गजल, भावगीत या ललित संगीतातील सगळ्या प्रकारांमध्ये तोवरही अभिजाततेचा अंश टिकून होता. पण संगीताच्या सागरात उमटलेल्या एवढय़ाशा तरंगांनंतरही खऱ्या संगीताची ओढ असणाऱ्या प्रत्येकाला त्या गाभ्यातल्या शांततेची आस लागून राहिली. अमीरखाँ साहेबांनी ती पुरी केली. या तरंगांचा आपल्या गायकीवर जराही परिणाम होऊ न देता एखाद्या योगी पुरुषाप्रमाणे खाँसाहेब आपल्या प्रतिभेने स्वरांचं जग उजळून टाकत राहिले.
स्वरांचं अंतरंग उलगडताना त्यातल्या गणिती गुणाकारांना कलात्मक रूप देताना खाँसाहेबांनी स्वत:ची स्वतंत्र शैली स्थापन केली. रागातून व्यक्त होणाऱ्या भावांना तटस्थतेने सामोरं जाण्याची त्यांची ही शैली त्यांच्या अभिजाततेची खरीखुरी खूण आहे. कलात्मक तटस्थता हा त्यांचा स्थायीभाव असला तरी त्यांच्या स्वरांमधून ओथंबून राहणाऱ्या भावनांना रसिकांपर्यंत सहजपणे पोहोचता येण्यासाठी ही तटस्थताच उपयोगाची पडते, हे त्यांनी सिद्ध केलं. जन्माने खाँसाहेब महाराष्ट्रीय (जन्मगाव: अकोले) होते. निवासासाठीही त्यांनी मुंबई हेच शहर निवडलं. गाण्यासाठी देशभर केलेल्या भटकंतीमध्ये शिक्षणासाठी इंदूरला राहावं लागलं. म्हणून त्यांच्या घराण्याचं नाव इंदौर. खरंतर ते नाव मुंबई घराणं असंच असायला हवं होतं. (कोल्हापूरवासी उस्ताद अल्लादिया खाँ यांच्या जयपूर घराण्याच्या नावाबाबतही असंच घडलं!) हुकमी गाणं गाणारे कलाकार, म्हणून त्यांचा जो लौकिक झाला, त्याचं कारण मुंबईतलं वास्तव्य असू शकतं. ध्वनिमुद्रणाच्या आगमनानंतर अमीरखाँ साहेबांनी मोठय़ा प्रमाणात ध्वनिमुद्रिका काढल्या. त्या अतिशय लोकप्रिय झाल्या. ‘बैजू बावरा’ चित्रपटातील डी. व्ही. पलुसकरांबरोबर त्यांनी गायलेली ‘अजि गवस मन मेरो’ ही जुगलबंदी किंवा ‘झनक झनक बायल बाजे’ तेव्हा घराघरात वाजत होती. त्या काळात संगीताच्या क्षेत्रात नव्याने नाव कमावत असलेल्या पंडित भीमसेन जोशी यांच्यासारख्या अनेक कलावंतांच्या मनात अमीरखाँ साहेब हे एक उंचीचे कलावंत असल्याची भावना होती. आजही रशीद खाँ यांचं गाणं ऐकताना खाँसाहेबांच्या उस्तादी ढंगाची आठवण होते आणि मन पुन्हा एकदा मोहरून जातं!
पहिल्याच उस्तादी सुरात सारी मैफल काबूत आणण्याची ताकद असणारा हा कलावंत हजारो रसिकांसमोरही शांत मुद्रेनं, डोळे मिटून गात असे. हातवारे नाहीत की रसिकांकडून मिळणाऱ्या वाहवाकडे लक्ष नाही. आपल्या उस्तादी थाटात गाणं सुरू झालं की, संपेपर्यंत फक्त आत्ममग्नतेचा अनुभव. मग मालकंस असो की दरबारी कानडा. खाँसाहेबांनी आपल्या तंद्रीत एकदा का प्रवेश केला, की मग त्यांच्यासाठी भौतिक जगाचं अस्तित्व नष्ट झालेलं असायचं. एका वेगळ्या विश्वातला तो स्वरसुंदर प्रवास असे. ऐकणाऱ्याला चिंब करणारा. अमीरखाँ साहेबांच्या गायकीचा हा प्रभाव आज त्यांच्या निधनानंतर चाळीस वर्षांनीही तेवढाच टवटवीत आहे. वयाच्या विशीत गाणं सुरू केलेल्या खाँसाहेबांनी बराच काळ खाल्लेल्या खस्ता, त्यांच्या गाण्याच्या आसपासही फिरकत नव्हत्या. त्यांचा सौंदर्याचा ध्यास या कष्टांना कलेच्या प्रांतात यायला बंदी करत होता. सतत संगीतात डुंबत राहणाऱ्या त्यांच्या प्रेमीजनांना त्यांच्या ध्वनिमुद्रिका हाच एक मोठा आधार आहे. रसपूर्ण आणि अभिजात गायकीनं जीवन समृद्ध झाल्याचा अपूर्व अनुभव आलेल्या त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या जन्मशताब्दी (जन्म- १५ ऑगस्ट १९१२) निमित्त त्यांना कुर्निसात करणं आवश्यकच आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो