स्त्री जातक : तूच आहेस तुझ्या अवहेलनेस जबाबदार!
मुखपृष्ठ >> स्त्री जातक >> स्त्री जातक : तूच आहेस तुझ्या अवहेलनेस जबाबदार!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

स्त्री जातक : तूच आहेस तुझ्या अवहेलनेस जबाबदार! Bookmark and Share Print E-mail

डॉ. अनघा लवळेकर,शनिवार , ११ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

क्रिकेटच्या मैदानावर चीअर गर्ल्स, गणेशोत्सव उद्घाटनात लावणी नृत्य, धार्मिक कार्यक्रमांमधील प्रमुख आकर्षण आयटम साँग आणि यात टाळ्या वाजविणाऱ्यांमध्येही स्त्रियांचे हात कमी नाहीत, ही खेदाची बाब आहे.  नुसतीच बघ्यांची मागणी करणारं मनोरंजन फक्त तात्पुरती गुंगी आणते. त्यानं आपलं विचारविश्व ढवळून निघत नाही, हे कळणं खूप गरजेचं आहे.
सुनीता धावतपळत ऑफिसमधून घरी पोहोचली तेव्हा घराचा अवतार झालेला होता. पसारा-पसारा आणि पसारा! खरं तर तिला लवकर स्वयंपाक आटपून ‘थांब जरा सूनबाई’ या लोकप्रिय मालिकेचा पुढचा भाग शांतपणे बघायचा होता. नेहमीप्रमाणे अनेक उत्कंठावर्धक क्लायमॅक्सपैकी एक भाग आज सादर होणार होता. ती मालिका लागली की सुनीताचं कामात लक्षच लागायचं नाही. एक-दोनदा त्या नादात दूध करपलं, एकदा भाजीचा लगदा झाला, एकदा तर तिनं पुडिंगमध्ये पिठीसाखरेऐवजी मैदा घातला. तेव्हापासून तिनं ठरविलं होतं की, ‘थांब जरा सूनबाई’च्या आधी सगळं आवरून ओटा पुसूनच बसायचं. म्हणजे मग सीरियल निवांतपणे बघता यायची. पसारा बघून तिचा पार मूड ऑफ झाला. ‘आजचा एपिसोडही गेलाच म्हणायचा!’ ती स्वत:शीच तणतणली.
सुनीतासारख्या कितीतरी जणी या रंजनाच्या बाजारातील कायमस्वरूपी ग्राहक आहेत. स्त्री प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवूनच हल्ली कौटुंबिक मालिकांच्या कथा लिहिल्या जातात. स्त्री प्रेक्षकांच्या मागण्यावरून पात्रांच्या सुख-दु:खाचे हेलकावे बदलले जातात. मनोरंजनाच्या सुंदर- ऊर्जा देणाऱ्या प्रक्रियेचं एक सवंग, बाजारू रूप आपली अभिरुचीच दूषित करीत आहे, हे कळूनही वळत नाहीये.
रंजनाची गरज प्रत्येकालाच असते. दमलेल्या शरीर-मनाला प्रफुल्लित करण्यासाठी! पुन:श्च नवीन ऊर्जा मिळविण्यासाठी. कधी मनात साठलेल्या भावनांना वाट करून देण्यासाठी तर कधी आपल्याच प्रतिभाशक्तीला नवे धुमारे फुटण्यासाठी! मग स्त्रिया तरी कशा अपवाद असणार? विद्येची देवता सरस्वती ही सर्व कलांची धात्री. त्या कलांचं प्रमुख कामच मुळी रंजनाचं- मन रमविण्याचं आहे. पूर्वी कौटुंबिक चौकटीमध्येही स्त्रिया मनोरंजनाचे अनेक मार्ग शोधून काढीत. नागपंचमीला मेंदी काढण्याच्या निमित्तानं रंगलेली गप्पांची मैफल, कोजागरी जागविण्याच्या निमित्तानं, मंगळागौरीच्या रात्री आवर्जून खेळले जाणारे खेळ, यातून मन कापसासारखे हलकेफुलके व्हायचे. कधी स्वयंपाकातले केलेले विविध प्रयोग, एकमेकींच्या सोबत विणलेले क्रोशाचे किंवा दोऱ्याचे रुमाल, पण त्यांवरचं रंगकाम हे सगळं मनोरंजनासाठीही होतंच.
नाटकांचं युग आलं तरी प्रत्यक्ष नाटक बघायला जाण्याचं भाग्य तत्कालीन उच्चकुलीन किंवा सधन घरातील स्त्रियांनाच जास्त लाभायचं. माध्यमातील खरं मनोरंजन सामान्य स्त्रीपर्यंत नेलं ते तंबूतल्या आणि मग ‘टाकी’ किंवा ‘शिनमा थेटरातल्या’ चित्रपटांनी! तेव्हाही हमखास स्त्रियांची गर्दी खेचणारे चित्रपट म्हणजे ‘जय संतोषी माँ’ छापाचे किंवा ‘हळद रुसली कुंकू हसलं’ छापाचे! काही ठिकाणी तर स्त्रियांच्या अलोट गर्दीमुळे (कुठल्याही चळवळी- आंदोलनाशिवाय!) स्त्रियांसाठीचे खास जादा खेळ योजायला लागायचे. मला आठवतं, लातूरच्या आमच्या कामवाल्याबाईंना ‘सोबत’ म्हणून मी ‘जय संतोषी माँ’ का असाच कुठला तरी सिनेमा बघायला गेले होते. थेटराच्या निम्म्या भागात खुच्र्या नव्हत्याच. जाजमं-ताडपत्र्या पसरलेल्या होत्या आणि काठाचे पदर डोईवरून घेतलेल्या शेकडो ग्रामीण-कष्टकरी स्त्रिया त्यावर बसल्या होत्या. आमच्या बाईंबरोबर ताडपत्रीवर बसून मी तो सिनेमा पाहिला. अक्षरश: आपल्या घरात कथानक चालू असावं असे प्रतिसाद बायका देत होत्या. दुष्ट सासू-जावांना कडाकडा बोटं मोडत शाप देत होत्या. सोज्वळ नायिकेच्या करुण गाण्यांना धो-धो टिपं गाळत होत्या. मनावरच्या  संस्कारांचा चित्रपट माध्यमानं अचूक वेध घेतला होता. ‘बाजार हाऊसफुल्ल’ बनला होता.
अशा चित्रपटांइतकंच स्त्रियांना ‘आपलं’ वाटणारं मनोरंजन म्हणजे सण-उत्सवांचं. महाराष्ट्रात चैत्रगौरीचं पूजन असो, गुजरातेतला दांडिया रास, बंगालमधील दुर्गापूजा किंवा पंजाबमधील बैसाखी असो- सगळ्यात जास्त उत्साह वाढतो तो बायकांचा. त्यासाठी लागणारे सगळे पूर्वतयारीचे, सफाईचे, स्वयंपाकाचे कष्ट त्याच बहुतांशी उचलत असतात. पण त्यांचं लक्ष असतं ते त्या उत्सवातून मिळणाऱ्या आनंदाकडे.
साधारणपणे स्त्रियांचं मनोरंजन हे ‘रिस्क फॅक्टर’ कमी असलेलं दिसतं. मनोरंजनासाठी धोकादायक खेळ (उदा. रॅपलिंग, स्कीईंग किंवा भरधाव गाडय़ा चालवणं..) खेळणाऱ्या स्त्रिया हळूहळू- गेल्या काही दशकांत वाढत आहेत. पण एकूण त्यांचं प्रमाण नगण्यच. कॉलेजच्या दिवसांमध्ये आमच्या गावात एक मुलगी खूप प्रसिद्ध होती ती तिच्या ‘मोटारसायकल कसरतीं’मुळे! मुळात मोटारबाईक मुलीनं चालवणं हेच तेव्हा नवलाचं होतं तर केवळ ‘चूस’ म्हणून असल्या कसरती करणारी ती ‘फिअरलेस नादिया’ची कॉपीच वाटायची. आजसुद्धा ‘फिअर फॅक्टर’ वगैरेंसारख्या कार्यक्रमात शारीरिक/ मानसिक धोका असलेल्या क्रीडाप्रकारात स्त्रिया असतात पण त्या फारच अपवादानंच. त्याचं एक कारण एकूण स्त्रीविश्वात अशा खेळांना असलेली ‘कमी प्रतिष्ठा’ (फारच पुरुषी खेळ!) आणि स्वत:च्या शरीराबद्दलची- त्यातील मोडतोडीच्या संभाव्य परिणामांची असलेली सुप्त भीती! (तीही सौंदर्याच्या ठाशीव कल्पनांमुळे निर्माण झालेली.)
हे झालं व्यक्तींच्या आपापल्या रंजनाच्या निवडींविषयी, पण आज सामूहिक रंजनाची जी प्रचंड खुली बाजारपेठ स्त्रियांच्या मनोविश्वावर ताबा मिळवू पाहते आहे, तो खूप गंभीर मुद्दा आहे.
‘बॅण्डिट क्वीन’ हा चित्रपट आला तेव्हा त्यातील बलात्काराचं दृश्य बघून चित्रपटातील अनेक प्रेक्षकांनी त्याची वेगळीच ‘दखल’ घेतली. त्याचा निषेध करणारी पत्रं-प्रतिक्रिया अनेक महिलांनी व्यक्तिश: आणि सामूहिकपणेही दिल्या होत्या. आज १७-१८ वर्षांनंतर काय परिस्थिती आहे? अनेक दूरदर्शन मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये त्याहीपेक्षा जास्त किळसवाणी दृश्यं, अत्यंत उत्तान आणि बीभत्स नृत्यं मिनिटागणिक आदळत असतात. किती स्त्रियांना याचा खेद वाटतो? राग येतो? जणू काही आपलीच मानहानी होते आहे असं वाटतं? किती जणी ते व्यक्त करतात? वस्तुस्थिती अशी दिसते की, आयाच आपल्या मुलांना-मुलींना अशा प्रकारची नृत्य करण्यासाठी प्रोत्साहन देतात. त्यांना टीव्हीवर चमकविण्यासाठी ‘बॅले डान्स’च्या वर्गाना घालतात. खरोखर, हे पाहताना मन खेदानं भरून येतं. स्त्रीच्या अवहेलनेमध्ये स्त्रीलाच ‘मनोरंजना’च्या जागा दिसाव्यात? प्रत्येक आईला असं वाटलं पाहिजे की, काय वाट्टेल ते झालं तरी ‘मनोरंजनाच्या या मॉलमध्ये’ मी माझ्या मुलांना उतरू देणार नाही.
‘मनोरंजन आणि स्त्री’ म्हणजे सेक्स आणि स्त्री हे जणू समीकरणच बनून गेलं आहे. ‘मनोरंजनातील स्त्री’ किंवा ‘मनोरंजनासाठी स्त्री’ हेच सगळीकडे ठसतं आहे. (माझ्या आणि माझ्यासारख्या अनेकींच्या मनात ते ठसठसतं आहे. त्याला वाट कशी करून द्यावी?)
क्रिकेटच्या मैदानावर चीअर गर्ल्स, गणेशोत्सव उद्घाटनात लावणी नृत्य, धार्मिक कार्यक्रमांमधील प्रमुख आकर्षण आयटम साँग आणि यात टाळ्या वाजविणाऱ्यांमध्येही स्त्रियांचे हात कमी नाहीत, ही खेदाची बाब आहे.
मनोरंजन खरं तर पुन:श्च ऊर्जा देणारं असलं तरी ते सृजनशील हवं. नुसतीच बघ्यांची मागणी करणारं मनोरंजन फक्त तात्पुरती गुंगी आणते. त्यानं आपलं विचारविश्व ढवळून निघत नाही, आतून काहीच हलत नाही हे कळणं खूप गरजेचं आहे असं वाटतं. कितीतरी वेळा खूप सधन, सुस्थापित कुटुंबांतील स्त्रियांना वेळ कसा काढावा हाच प्रश्न असतो. मग अशा वेळी वेगवेगळ्या लोकांना बोलावून पाटर्य़ा देणं आणि स्वत: पाटर्य़ाना जाणं हेही मनोरंजनाचं एक साधन बनतं. ‘पेज थ्री’सारख्या चित्रपटांतून यांचा मार्मिक वेध घेतलेला आहे. कित्येकदा ‘खाणं’ हेसुद्धा एकटेपणा पुसून टाकण्यासाठी, उदासलेल्या मनाला गुंतविण्यासाठीचा एक मार्ग म्हणून स्त्रिया वापरताना दिसतात. ‘व्यसन’ हा त्याचा पुढचा टप्पा. चष्कीसाठी, धूम म्हणून, फंडा म्हणून दारू पिणं यालाही प्रतिष्ठा मिळत आहे, त्याचं रूप स्त्रियांच्या वाढत्या व्यसनाधीनतेत दिसतंच आहे.
मनोरंजनाच्या बाजारात स्त्रिया कळसूत्री बाहुलीप्रमाणे नाचविल्या जात आहेत. मॉडेल म्हणून, ग्राहक म्हणून, प्रेक्षक म्हणून आणि प्रसंगी निर्मात्या म्हणूनही!
निखळ-निर्भेळ मनोरंजन कशातून मिळतं? अभिजात साहित्याच्या वाचनातून, कृतिशील उपक्रमांतून, कलेच्या मन:पूर्वक केलेल्या साधनेतून, मनमोकळ्या संवादांतून आणि सवंगतेशी न केलेल्या तडजोडीतून! माझी एक मैत्रीण मला सांगत होती, ‘दोन्ही मुलांना वाढताना बघणं, त्यांना छोटय़ा-छोटय़ा  कृती-कौशल्यं शिकताना पाहणं, पालक म्हणून त्यात सहभागी होणं यातूनच माझी इतकी करमणूक होते ना की बाकीच्या वरवरच्या करमणुकींसाठी मनात जागाच शिल्लक राहत नाही बघा!’
मनात प्रश्न येतो की, बारा-बारा तास प्रॅक्टिस करणारी सायना नेहवाल मनोरंजन कशात शोधत असेल? मेरी कोमला कशानं प्रसन्न वाटत असेल? चंदा कोचर, किरण बेदी, शीला दीक्षित, मेधा पाटकर कशात मन रमवीत असतील? का त्यांना मनोरंजनाची गरजच नाही? तर माझ्या मते उत्तर एकच आहे- त्यांच्या कामातील त्यांची ‘खोल खोल बुडी’ हाच त्यांच्या मनोरंजनाचा मुख्य स्रोत आहे. जिला आपल्या आयुष्याची दिशा सापडते आणि त्या दिशेनं जाताना ती जे जे करते त्या सर्वात अगदी येणाऱ्या छोटय़ा-मोठय़ा अडचणी- संकटांशी लढतानाही ‘मनोरंजना’च्या - म्हणजे रिचार्जिगच्या जागा तिला नक्कीच सापडत असणार. कारण त्याशिवाय कामाची आणि ध्येयाची उंची गाठताच येणार नाही. प्रश्न आहे तो आपण ‘मनोरंजन फक्त आणि फक्त वेळ घालविण्यासाठी’ करतो आहोत का ‘शक्य तेव्हा उपलब्ध वेळेत निर्मितीसाठी- कामातून काही घडविण्यासाठी अधिकाधिक सक्षम होता यावं यासाठीही?’
त्यासाठी आपल्यालाही आधी ही ‘जगण्याची दिशा’ सापडायला हवी. मग आपला मनोरंजनाचा पतंग दोर तुटून भरकटणार नाही, तर मनात पक्क्य़ा धरलेल्या उद्दिष्टाच्या दिशेनं आपल्याला उंच उंच नेत राहील.
त्यासाठी निखळ आणि समृद्ध करणाऱ्या मनोरंजनाची वाट आपल्यालाही सापडावी म्हणून मन:पूर्वक शुभेच्छा!

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो