हे राष्ट्र प्रेषितांचे : फक्त लढ म्हणा..
मुखपृष्ठ >> लेख >> हे राष्ट्र प्रेषितांचे : फक्त लढ म्हणा..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

हे राष्ट्र प्रेषितांचे : फक्त लढ म्हणा.. Bookmark and Share Print E-mail

संपदा वागळे ,शनिवार , ११ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

१५नोव्हेंबर २००१ हा तो दिवस.. काश्मीरमधील नालटी गावातल्या एका जुन्या, पडक्या घरात अतिरेकी लपले आहेत अशी खबर मिळताच मेजर राजेश नायर आपल्या तीन-चार साथीदारांसह तेथे पोहोचले. अतिरेक्यांचा वेध घेत असतानाच एका अंधाऱ्या कोपऱ्यात बसलेल्या अतिरेक्याने अचूक नेम साधला. मेजर राजेश यांनी बुलेटप्रूफ जाकीट घातलं होतं, तरीही ती गोळी आत शिरली आणि तिने थेट त्यांच्या हृदयाचा वेध घेतला. पण मेजर डगमगले नाहीत, त्याही अवस्थेत त्यांनी त्या अतिरेक्याला शोधून काढले आणि ठार केले, पण तोपर्यंत त्या गोळीने आपले काम चोख बजावले होते.. मेजर नायर धारातीर्थी कोसळले. मेजर राजेश नायर यांच्या आयुष्यातला हा शेवटचा दिवस, पण त्यांची इच्छा पूर्ण करुन गेला. देशासाठी त्यांनी आपले प्राण वेचले होते. त्यांची पत्नी सुप्रिया नायर आजही आपल्या पतीने दिलेला हा संस्कार सांभाळते आहे..
alt
‘‘राजेश त्या वेळी ३० वर्षांचा होता आणि मी २९. लहानगा सिद्धांत तर जेमतेम अडीच वर्षांचा.’’ सुप्रिया सांगत होती. लोक विचारतात, ‘‘मिलिटरीमनशी लग्न करताना कधीतरी अशी वेळ येऊ शकते असा विचार आधी मनात आला होता का?..’ पण तसं नसतं. आपलं मन सांगत असतं, ‘‘आपल्यावर तशी वेळ नाही येणार.. पण ती घटना घडलीच. त्या घटनेनंतर पुढचे जवळजवळ सहा महिने मी जणू बेशुद्धच होते. दिवस कधी उगवतो, कधी मावळतो हेसुद्धा मला कळत नव्हतं. या परिस्थितीतून मला बाहेर काढलं ते माझ्या शिक्षणाने (सुप्रियाने क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये एम.ए. केलंय. तिचे अनेक रीसर्च पेपर्सही प्रसिद्ध झालेत.) आणि सर्वस्वी माझ्यावर अवलंबून असलेल्या माझ्या सिद्धांतने. सुप्रिया ही मराठी मुलगी. (माहेरची दोंदे) कॉलेजात मागे-पुढे शिकत असताना एन.सी.सी.च्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघंही ‘रायफल’ प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करू लागले, त्यासाठी एकत्र दौऱ्यावर जाऊ लागले. त्याची परिणती त्यांच्या प्रेमविवाहात झाली. पण त्याचं सैन्याचं प्रेम वाढतच गेलं.
सैन्यात जाण्याची राजेशची ओढ किती जबरदस्त होती हे सांगणारा हा एक प्रसंगच तिने सांगितला. सातवी-आठवीत शिकत असताना एकदा तो ‘भोसला मिलिटरी कॅम्प’साठी नाशिकला गेला होता. अभ्यासक्रम संपल्यावर तो एकटाच जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांना भेटला. मला आत्ताच्या आत्ता भरती करून घ्या हा त्याचा हट्ट. केंद्रप्रमुखांनी त्याला समजावलं, ‘‘हे बघ, आता तुला जवान म्हणून घेतलं जाईल, पण पदवी मिळवून, प्रवेशप्रक्रिया पार करून आलास तर तू एक आर्मी ऑफिसर होशील. राजेश तिथून परतला खरा, पण मनाशी पक्की खूणगाठ बांधूनच.’’
राजेश कसा होता, या प्रश्नावर सुप्रियाचं उत्तर होतं, ‘‘शौर्य, धाडस, शिस्त हे गुण तर प्रत्येक मिलिटरीमनकडे असतातच, पण तो ‘युनिक’ होता. अत्यंत पारदर्शी, मूल्य प्राणापलीकडे जपणारा, कधीही विचलित न होणारा.. हे त्याचे स्वभावविशेष त्याच्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येकाला जाणवायचे. या संदर्भातील एकदोन आठवणीही तिने सांगितल्या. ‘‘एकदा त्याच्या एका ट्रेनिंगच्या निमित्ताने आम्ही दोघं पुण्याला १५ दिवसांसाठी गेलो होतो. बाइकवरून जात असताना त्याने एका दुकानात सैनिक घालतात तशा टोप्या विक्रीसाठी ठेवलेल्या पाहिल्या. विकणाऱ्यानेही तशीच टोपी आपल्या डोक्यावर घातली होती. राजेशने थांबून त्या विक्रेत्याला त्या टोपीचं महत्त्व समजावून सांगितलं. त्याला ते पटलंही, पण अशा वेळी पाठ फिरल्यावर हे लोक पुन्हा तेच करतात हे माहीत असल्यामुळे तो जेवढे दिवस पुण्यात होता तितके दिवस त्या दुकानात जात राहिला. ते ठिकाण आमच्या उतरायच्या जागेपासून १५ किमीवर होतं तरीही. दुसरी गोष्ट म्हणजे पहाटे किंवा रात्री उशिरा वाहनाने येताना, रस्त्यावर चिटपाखरू जरी नसेल तरी हा हिरवा सिग्नल पडेपर्यंत थांबणारच. हळूहळू मलाही तीच सवय लागली.’’
राजेशच्या आठ-नऊ वर्षांच्या लष्करी कारकीर्दीतील दोन वर्षांचं दिल्लीतील पोस्टिंग वगळता, उरलेला सर्व काळ काश्मीरमधील कूपवाडा, अनंतनाग, डोडा.. अशा अशांत जिल्ह्य़ांत पाकिस्तानी अतिरेक्यांशी सामना करण्यात गेला. त्याचं 4RR (राष्ट्रीय रायफल) हे युनिट याच कामासाठी राखीव होतं.
त्या वेळी या परिसरातलं वातावरण खूपच तणावाचं होतं. रोजच्या व्यवहारासाठी बाहेर पडायलाही लोक घाबरायचे. रस्त्यारस्त्यावर युद्धजन्य परिस्थिती असायची. अनेक माणसं हकनाक मरायची. शेवटची दोन वर्षे (१९९९-२००१)  राजेश ‘डोडा’ जिल्ह्य़ातील ज्या ‘नालटी’ गावात होता, तिथल्या तर शाळाही बंद होत्या. हळव्या मनाच्या राजेशने इथल्या गावकऱ्यांसाठी खूप काम केलं. शिक्षकांना, मुलांना सैनिकी बंदोबस्त देऊन शाळा पुन्हा सुरू केल्या. तणावग्रस्त वातावरणात जगणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी, विशेषत: स्त्रियांसाठी सरकारच्या ज्या लाभदायक योजना असतात त्यांचा त्याने अभ्यास केला व ते फायदे आम जनतेपर्यंत पोहोचवले. त्याच्या अशा धडपडीमुळे नालटी गावातील गरीब काश्मिरी खेडूत त्याला देव मानू लागले.
फिल्डवर कुटुंबाला राहण्यासाठी परवानगी नसते त्यामुळे सुप्रिया तेव्हा नालटीपासून ३०० कि.मी. अंतरावर असलेल्या उधमपूरमध्ये राहत असे. राजेशला उधमपूरला यायचं असेल तर पुढे-मागे बंदुकधारी जवानांच्या गाडय़ांखेरीज पर्याय नव्हता. त्यामुळे तीन महिन्यांतून एकदा त्याची फेरी होई. अशांत वातावरणात काम करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीला असं सहजीवन समजून घ्यावं लागतं. ते अपरिहार्यच असतं, पण सुप्रिया रिकामी नव्हतीच. जवानांचे, विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे छोटे छोटे कॅम्प्स घेऊन त्यांना सक्षम करण्याचं तिचं काम सुरूच होतं. आर्मीच्या पब्लिक स्कूलमध्ये तर ती नेहमीच जात असे. तिच्या कामामुळे अख्खं उधमपूर तिला ओळखत होतं. म्हणूनच राजेश गेल्यानंतर तिला कोणी एकटं पडू दिलं नाही.
नालटी गावाने तर राजेशवर एवढं प्रेम केलं की, तो गेल्याची बातमी समजताच तिथले गावकरी जिवाची पर्वा न करता मिळेत त्या वाहनांनी उधमपूरला पोहोचले. या हृदयस्थ आर्मी ऑफिसरला श्रद्धांजली म्हणून नालटीच्या ग्रामस्थांनी स्वयंप्रेरणेने आपल्या गावी त्याचं स्मारकही उभारलंय.
राजेश-सुप्रियाचं वैवाहिक जीवन अवघं चार वर्षांचं. थोडं सावरल्यावर (!) तिने मिलिटरीकडे जागेसाठी अर्ज केला. तिला पुण्याजवळ ‘घोरपडी’ येथे दोन ते तीन वर्षांसाठी जागा मिळाली. राजेशचा मोठा भाऊ, त्याचे कुटुंबीय व आई नवी मुंबईत राहतात, पण सहानुभूतीच्या पांघरुणात जगणं तिला मान्य नव्हतं. अशातच या धक्क्य़ाने तिची आत्या व वडील दोघांनीही पाठोपाठ प्राण सोडला. सत्त्वपरीक्षेचा काळ होता तो, पण ती एका लढवय्याची पत्नी होती. तीन वर्षांनी ही मुंबईला आली. भाडय़ाची जागा घेऊन तिने कामाला सुरुवात केली.
हळूहळू आपल्या व्यवसायात तिचा जम बसू लागला. आज मालाडमध्ये तिचं स्वत:चं ऑफिस आहे. १४ जणांचा स्टाफ आहे. कॉर्पोरेट कंपन्यांमधील कर्मचारी, खेळाडू, विद्यार्थी यांच्यासाठी ती वर्कशॉप्स घेते. मानसिक क्षमता तसेच कार्यक्षमता वाढविण्यासाठी, अडचणींवर मात करता यावी यासाठी तिने वेगवेगळे प्रोग्रॅम तयार केले आहेत. मिलिटरीशी तिचे चांगले संबंध आहेत. त्यांच्यातर्फे जवानांचे विविध कॅम्प्स घेण्यासाठी तिला बोलवण्यात येतं. त्यासाठी चंदीगढ, हैदराबाद, पूँछ अशा ठिकाणी ती जात असते. आज तिच्याकडे स्वत:ची गाडी आहे. अंधेरीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात स्वकष्टाने मिळविलेला हजार स्क्वेअर फुटांचा ब्लॉक आहे. सगळी ऐहिक सुखं समोर हात जोडून उभी आहेत. पण..
तू अजूनही तरुण आहेस, सुंदर आहेस, कर्तबगार आहेस. पुन्हा एकदा डाव मांडावा असं तुला कधी वाटलं नाही? या प्रश्नावर तिचं उत्तर असतं. ‘‘राजेशच्या जागी दुसरा कोणी ही कल्पनाच मला सहन होत नाही.  मी त्याच्या एकूण एक वस्तू, युनिफॉर्म, शूज, मेडल्स, पुस्तकं, फोटो, पत्रं.. सगळं सगळं जपून ठेवलंय. दोन-तीन महिन्यांनी एकदा सगळं बाहेर काढते आणि त्यावर हात फिरवते. आत्ता आत्ता मी डोळ्यांतून पाणी न काढता त्याच्या विषयी बोलायला शिकलेय. माझा माझ्या मनाला एक प्रश्न असतो, ‘‘त्याला मी आयुष्यात काय केलेलं आवडलं असतं?’’ आणि त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करते. अधाशासारखी पुस्तकं वाचते, घर छान ठेवते, बागबगीचा करण्यात रमते, पेंटिंग्ज काढते, गुंतवणुकीपासून टॅक्स भरण्यापर्यंत स्वत:ची सगळी कामं स्वत: करते.’’
एक दीर्घ श्वास घेऊन ती  म्हणाली, ‘सिद्धांतला वाढविण्यासंबंधी आम्ही जे प्लॅन केले होते ते आता मला एकटीलाच पुरे करायचेत.’’ मात्र सिद्धांतचा विषय निघाल्यावर तिची कळी खुलली. म्हणाली, ‘‘शिस्त, प्रामाणिकपणा, शांत स्वभाव हे गुण त्याने वडिलांकडून जसेच्या तसे उचललेत. आज तो १३ वर्षांचा आहे. सध्या तरी मिलिटरीत जाणार नाही म्हणतोय. बोलला नाही तरी आईविषयी काळजी त्याच्या कृतीतून दिसते. कधी कधी तोही उदास होतो तेव्हा त्याला मी समजावते, ‘संस्कार काय फक्त जगण्याने होतात? आपली देशासाठी कर्तव्य निभावताना मरण कवटाळणे हा केवढा मोठा संस्कार तुझ्या पाठीशी आहे. बाळा, आपल्या नशिबात काय लिहिलंय ते आपल्या हातात नसतं, पण त्याला तोंड कसं द्यायचं, हे मात्र आपण नक्कीच ठरवू शकतो.’’
मोडून पडला संसार
परी मोडला नाही कणा
पाठीवर हात ठेवून
फक्त लढ म्हणा
ही कुसुमाग्रजांची कविता आत्तापर्यंत फक्त वाचली होती, पण बाणेदार सुप्रियाच्या रूपात ती मी प्रत्यक्ष अनुभवत होते ..
(- सुप्रिया नायर ९९२०२८६९२६)

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो