सामान्यजनांचा दादा
मुखपृष्ठ >> रविवार विशेष >> सामान्यजनांचा दादा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

सामान्यजनांचा दादा Bookmark and Share Print E-mail

 

चंद्रशेखर जोशी - रविवार, १२ ऑगस्ट २०१२
(लेखक फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, पुणे येथे चित्रपट संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)

भगवानदादांची निर्मिती-लेखन-दिग्दर्शन असलेला ‘अलबेला’ खरंच एक आगळावेगळा चित्रपट होता.  ‘अलबेला’ची गाणी हा त्याच्या सवरेत्कृष्ट आकर्षणाचा भाग ठरला. फ्लिकरिंग लाइट्सच्या प्रकाशात आणि हवाईयन नृत्यपदन्यास ठेक्यावर चित्रित केलेल्या ‘शोला जो भडके’ गाण्यानं रसिकांना अक्षरश: वेड लावलं. शिवाय त्यातील ‘भोली सूरत दिल के खोटे’ सारखं पार्टी साँग अनेक पिढय़ांतल्या युवक-युवतींना एकमेकांना चिडवण्यासाठी आकर्षित करीत आहे.

परंतु ‘अलबेला’सारखं यश पुन्हा न मिळाल्यानं भगवानदादा शेवटपर्यंत बेचैन राहिले. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने या मनस्वी कलाकाराचे स्मरण..
भारतीय चित्रउद्योगाचं शतक आणि भगवानदादांची जन्मशताब्दी हा केवळ योगायोग आहे असं म्हणता येणार नाही. सनावळीचा हिशेब लावण्याचा हा खटाटोप नाही, तर गेल्या शंभर वर्षांमध्ये बहुतांशी भारतीय चित्रपटांनी मनोरंजनाचं जे कार्य केलं त्यामध्ये भगवानदादांनी घातलेली भर महत्त्वाची मानावी लागेल. कारण चित्रपटकर्ता असल्याचा कोणताही आव न आणता, जनसामान्यांना पचेल आणि रुचेल अशी करमणूक देण्यात धन्यता मानणाऱ्या कलाकारांमध्ये भगवानदादांचं नाव वरच्या क्रमांकावर आहे. ‘पैसावसूल करमणूक’ एवढं एकच तत्त्व दादांना माहीत होतं आणि त्यांनी ते आयुष्यभर पाळलं. आज लग्नाची वरात असो वा कोणत्याही कारणानं काढलेली मिरवणूक, त्यामध्ये सामील झालेले उत्साही लोक ज्या तालावर नाचतात तो सामाजिक नृत्यप्रकार म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून ती भगवानदादांची अनोखी देणगी आहे.
alt

भगवानदादांच्या काहीशा स्थूल, ठेंगण्या शरीरयष्टीला प्रमाणाबाहेर असलेल्या डोळय़ांच्या ठेवणीमुळे एक वेगळय़ा प्रकारचं व्यक्तिमत्त्व प्राप्त झालेलं होतं. आपल्या अद्भुत व्यक्तित्वाचा त्यांनी खुबीनं उपयोग करून घेतला. आपल्या चित्रपटातल्या गाण्यांमध्ये, एका संथ लयीत पाश्र्वभाग हलवत दादा दोन्ही हात हवेत असे काही नाचवत की बघताक्षणी ताल धरावा. सहजसुंदर लय, नाच असा की जो कुणालाही करता यावा, अगदी फ्री स्टाइल. भगवानदादांची ही नृत्यशैली अनेक लोक आपापल्या पद्धतीनं अंगीकारत.
मुंबईच्या गिरणगावात १ ऑगस्ट १९१३ या दिवशी जन्मलेलं भगवान आबाजी पालव नावाचं पोर कधीकाळी आपलं नाव काढील असं कुणाला स्वप्नातही वाटलं नसेल. वडील गिरणी कामगार, पण हय़ा बेटय़ाची झेप झगमगाटी दुनियेकडे. या काळात पडेल ती कामं करतानाच, एकीकडे शरीरयष्टी बळकट करत दुसरीकडे मास्टर भगवान मूकपटाच्या जमान्यातच कॅमेऱ्यापुढे उभे राहिले. ‘बेवफा अश्क’ (१९३१) हा त्यांनी अभिनित केलेला पहिला मूकचित्रपट. एकदा स्टुडिओत गेल्यानंतर केवळ अभिनयच नव्हे, चित्रपटनिर्मितीच्या अनेक अंगांचं बारकाईनं निरीक्षण आणि हळूहळू त्यातील तंत्र आत्मसात करण्याचं त्यांचं कसब भगवानदादांच्या उपयोगी पडलं. यामुळेच या काळात त्यांची चंद्रराव कदम तसेच स्टंटपटांचे दिग्दर्शक जी. पी. पवार यांची ओळख झाली आणि ही दोस्ती त्यांच्या व्यावसायिक भागीदारीचा पायाही ठरली. पवार यांच्याबरोबर भगवानदादांनी १९३८मध्ये ‘बहादूर किसान’ सहदिग्दर्शित केला आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. यानंतर पुढच्या दहा-बारा वर्षांच्या कालावधीमध्ये भगवानदादांनी कमी निर्मिती-खर्च असलेले अनेक साहसपट दिग्दíशत केले. यामध्ये ‘बदला’ (१९४३), ‘बहादूर’ (१९४४), ‘बहादूर प्रताप’ (१९४७), ‘जिगर’ , ‘बचके रहना’ (१९४९) यांचा प्रामुख्यानं समावेश आहे. चित्रपटांमुळे भगवानदादा कामगार आणि इतर कष्टकरी वर्गामध्ये खूप लोकप्रिय झाले. दरम्यानच्या काळात, म्हणजे १९४२ मध्ये ‘जागृती पिक्चर्स’ नावाची चित्रपटनिर्मिती संस्था सुरू केली. १९४७ मध्ये ते चेंबूर येथील जागृती स्टुडिओचे मालक बनले. हा कालावधी म्हणजे भगवानदादांच्या चित्रपट कारकीर्दीचा सुवर्णकाळ ठरला.
१९५१ मध्ये त्यांनी निर्मिती-दिग्दर्शन आणि लेखन केलेला ‘अलबेला’ हा खरंच एक आगळावेगळा चित्रपट होता. यामध्ये भगवानदादांच्या जोडीला होती गीता बाली, दुलारी, सुंदर, बद्रिप्रसाद आणि प्रतिमादेवी. चित्रतारकेच्या प्रेमात पडलेल्या एका स्वप्नाळू कारकुनाची ही कथा. खरंतर हा एक सामाजिक विषयावरील चित्रपट, पण ‘अलबेला’ची गाणी हा त्याच्या सवरेत्कृष्ट आकर्षणाचा भाग ठरला. राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलेली सोप्या शब्दांतील गाणी आणि सी. रामचंद्र यांनी सहज म्हणता येतील अशा चालींमध्ये संगीतबद्ध केलेल्या रचना ही संगत अजोड ठरली. फ्लिकरिंग लाइट्सच्या प्रकाशात आणि हवाईयन नृत्यपदन्यास ठेक्यावर चित्रित केलेल्या ‘शोला जो भडके’ गाण्यानं रसिकांना अक्षरश: वेड लावलं. शिवाय त्यातील ‘भोली सूरत दिल के खोटे’सारखं पार्टी साँग अनेक पिढय़ांतल्या युवक-युवतींना एकमेकांना चिडवण्यासाठी आकर्षित करत आहे. स्वयंपाकघरातील भांडय़ांच्या गराडय़ात आणि त्यांच्याच तालावर रंगलेलं ‘ओ बेटाजी’ हे सामान्यजनांशी नाळ जोडणारं गाणं, ‘शाम ढले’मधील अभिनेत्रीशी छेडलेली जुगलबंदी, याशिवाय ‘धीरे से आजा रे’मधील विविध पातळय़ांवर वेगवेगळी सजणारी अंगाई अशा एकाचढ एक रचनांमुळे ‘अलबेला’ला मोठी उंची प्राप्त झाली. गेल्या अनेक दशकांत पुन:पुन्हा प्रदर्शित होऊनही दरवेळी अधिकच लोकप्रिय ठरणाऱ्या (‘शोले’, मुगल-ए-आझम’सारख्या) सदैव टवटवीत चित्रपटांमध्ये ‘अलबेला’चा समावेश होतो.
पुढच्या काळात सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित केलेल्या ‘मेरे आंगने में तुम्हारा क्या काम है’ या गाण्यासाठी भगवानदादा स्टाइलचा उपयोग करण्याचा मोह चित्रकर्त्यांला आवरला नाही, यातच दादांच्या नाचाला पावती मिळाली. ‘अलबेला’ चित्रपटाच्या घसघशीत यशामुळे स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाचा आणि यशस्वी हिंदी चित्रपटकर्ता म्हणून भगवानदादांना मान्यता मिळाली. यानंतर भगवानदादा आपल्या सी. रामचंद्र, गीता बाली अशा टीमसह पुन्हा ‘झमेला’ (१९५३)मध्ये सादर झाले, पण त्यांची ‘अलबेला’ची जादू परत एकदा चालू शकली नाही. दिग्दर्शक म्हणून भगवानदादांच्या नावावर ३४  चित्रपटांची लांबलचक यादी आहे. मात्र यामध्ये ‘हल्ला गुल्ला’ (१९५४), ‘भागम् भाग’ (१९५६), ‘भला आदमी’ (१९५८) असे मोजकेच गाजलेले चित्रपट आढळतात. या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे आणि ती म्हणजे मराठी कलावंत असून आणि मराठी चित्रपटांतूनही अभिनय केला असला तरी हिंदी चित्रपट करताना भगवानदादांनी हिंदी चित्रपटांची वैशिष्टय़पूर्ण शैली कायम ठेवली. यामध्ये कथानकापासून ते अभिनय, गाणी, संगीत यातील वेगळेपण काळजीपूर्वक जपले. ‘भला आदमी’चं आणखी एक कमी माहीत असलेलं वैशिष्टय़ म्हणजे भगवानदादांनी आनंद बक्षी यांना प्रथम गीतलेखनाची संधी दिली आणि त्या काळात त्यांना आपल्या कलेचा दोनशे रुपये मेहनतानाही दिला. पुढे हिंदी चित्रसृष्टीमध्ये आनंद बक्षी यांची गीतलेखनातील कामगिरी सर्वाना माहीतच आहे.
आपल्या सहा दशकांच्या कारकीर्दीमध्ये अभिनेता म्हणून भगवानदादांनी २०७ चित्रपटांत भूमिका केल्याची नोंद आहे. त्यापैकी बहुतेक भूमिका या अपरिपक्व, साध्या, पण मनाने सरळ असणाऱ्या तरुणाच्या असत. अनेक भूमिका तर चरित्र अभिनेत्याच्या होत्या. अभिनयाकरिता त्यांनी व्ही. शांताराम, राज खोसला, मनमोहन देसाई, जे. ओम प्रकाश, इस्माईल श्रॉफ, अनंत ठाकूर, ब्रीज, आत्माराम, रमेश बहेल, राहुल रवेल, सुलतान अहमद अशा प्रमुख दिग्दर्शकांबरोबर काम केलं आहे. त्यांच्या नावाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये ‘झनक झनक पायल बाजे’ (१९५५), ‘चोरी चोरी’ (१९५६), ‘मेरा गांव मेरा देश’ आणि ‘कठपुतली’ (१९७१),  ‘दो चोर’ (१९७२), ‘कच्चे धागे’ (१९७३), ‘रेशम की डोरी’ (१९७४), ‘चाचा भतीजा’ (१९७७), ‘कस्मे वादे’ (१९७८), ‘आशा’ (१९८०), ‘बुलंदी’ आणि ‘बीवी ओ बीवी’ (१९८१), ‘धरम कांटा’ (१९८२) आदींचा समावेश आहे. याशिवाय मराठी चित्रसृष्टीमध्ये दादा कोंडके, सुषमा शिरोमणी, मुरलीधर कापडी या दिग्दर्शकांबरोबर ‘राम राम गंगाराम’ (१९७७), ‘आयत्या बिळावर नागोबा’ (१९७९), ‘गुलछडी’(१९८४) अशा अनेक चित्रपटांतूनही कामं केली. या हरहुन्नरी कलाकारानं किशोरकुमार यांच्या ‘बढती का नाम दाढी’ (१९७४) मध्ये पाश्र्वगायनही केलं. चित्रपटसृष्टीतील सहकारी, नंतर चाहतेही त्यांना आदरानं भगवानदादा असं संबोधू लागले. अनेक वेळा त्यांचा दादा असाही उल्लेख होत असे.
परंतु, ‘अलबेला’सारखं यश पुन्हा न मिळाल्यानं भगवानदादा बेचैन राहिले. त्यातच ‘अलबेला’ आणि ‘भागम् भाग’ सोडल्यास त्यांच्या अनेक चित्रपटांच्या निगेटिव्ह्ज बॉम्बे लॅबोरेटरीजच्या आगीत भस्मसात झाल्याचं बोललं जातं. अपयशानंतरच्या काळामध्ये भगवानदादांनी चित्रपटनिर्मिती आणि दिग्दर्शन करणं थांबवलं. त्यामुळे बंगला आणि कार विकून ते दादर येथील एका चाळीमध्ये राहायला आले. १९८०च्या दशकात तर भगवानदादांनी येतील त्या भूमिका करण्यात समाधान मानलं. या कालावधीमध्ये त्यांना पाहुण्या कलाकाराच्याच अनेक भूमिका मिळाल्या. गंमत म्हणजे आता ज्याला आपण आयटम साँग म्हणतो तशा प्रकारची गाणी आणि (अर्थातच नाच!) भगवानदादांनी अनेक चित्रपटांमध्ये सादर केला आहे. १९९६ या वर्षी आलेला लॉरेन्स डिसोझा दिग्दर्शित ‘माहीर’ हा भगवानदादांचा अखेरचा चित्रपट मानला जातो.
चित्रपटसृष्टीमध्ये असलेल्या अलिखित नियमांप्रमाणे भगवानदादांच्या अखेरच्या काळात त्यांचे सहकारी त्यांना सोडून गेले. काही काळ सी. रामचंद्र, राजेंद्र किशन आणि ओमप्रकाश त्यांना आवर्जून भेटत. मात्र भगवानदादांचे अखेरचे दिवस एकटेपणातच गेले. ४  फेब्रुवारी २००२ रोजी वयाच्या ८९व्या वर्षी त्यांचं दादरच्या चाळीत निधन झालं.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो