खाणे पिणे आणि खूप काही : ‘नव्हतं ते होतं’
मुखपृष्ठ >> खाणे, पिणे नि खूप काही >> खाणे पिणे आणि खूप काही : ‘नव्हतं ते होतं’
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

खाणे पिणे आणि खूप काही : ‘नव्हतं ते होतं’ Bookmark and Share Print E-mail

शैला हळबे ,शनिवार, १८ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

बिघडलेले पदार्थ चटकदार बनवायचे तरआणि मिक्सर,बत्ता, दुधाची पावडर, कॉर्न फ्लॉवर  अशी आयुधं आणि डोकं शांत असायला हवं, जिथे या भन्नाट कल्पनांची रिळं उलगडत जातात आणि पदार्थाचं रूप होत्याचं नव्हतं होऊन जातं. खरं तर ‘नव्हतं ते होतं’ करून टाकतात. मग तुम्ही या प्रांतात नव्या असा नाही तर जुन्या! तुमच्या हातचे पदार्थ नेहमीच ‘हटके’ बनून जातात! ‘बिघडलंय घडलंय ’ या  लेखानंतर आमच्या चतुर पाककलासिद्ध मैत्रिणींनी आम्हाला पाठवल्या त्यांच्या  घडवलेल्या पदार्थांच्या पाककृती..त्या प्रसिद्ध होतील दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी..
नवा नवा संसार थाटला की, नवपरिणिता वधू विविध गुणदर्शनाची संधी सोडायला अजिबात तयार नसते. एरवी सकाळी सकाळी मैदानावर जाऊन बॅडमिंटनची रॅकेट फिरवत शटल-कॉक इकडून तिकडे टोलवण्यात मी अजिबात मागे नव्हते. पण घरातल्या झाऱ्या-कालथ्यांशी माझी जराही मैत्री नव्हती. वेळ पडल्यास सोसायटीतल्या सोसायटीत, फार काय गावातल्या गावातसुद्धा रंगभूमी गाजवायला डगमगले नसते. पण स्वयंपाकघरातली भूमिका? स्वयंपाकघराच्या मर्यादित चौकोनात ‘लाटा, तळा, शिजवा, भाजा’.. सारख्या कोणत्याच प्रक्रियेत माझा हातखंडा नव्हता. मात्र चाचपडत, चाचपडत वेळ मारून नेण्याची म्हणा, की वेळ सावरून घेण्याची म्हणा, कला मला चांगलीच अवगत होती.
असाच एकदा नव्या नवलाईच्या दिवसात अनपेक्षितपणे ‘रव्याचे लाडू’ बनवण्याचा बाका प्रसंग माझ्यावर गुदरला. आईच्या सुगरण हातांनी तयार केलेल्या रव्याच्या लाडूचा मुलायम रसना स्पर्श आणि खमंगशाही चव माझ्या जिभेवर सदैव ताजीतवानी होतीच. तरीही फोन करून आईकडून टिप्स घेतल्या. आहे काय त्यात? रवा तुपावर खमंग भाजायचा, थोडय़ा वेळानं ओलं खोबरंही त्यात भाजून घ्यायचं. साखरेच्या एकतारी पाकात सगळं मिश्रण टाकायचं. भरपूर वेलची पूड, बदाम, बेदाणे घालायचे नि लाडू वळायचे. आईने फोनवरून दिलेल्या सूचनांनुसार लाडू बनवले. दिसत तरी होते बेटे राजस! नवरोजी घरी येताच लाडूची बशी त्यांच्यासमोर ठेवली. चहा करायला पाठमोरी वळले.  ‘वा! काय लाडू आहे!’ ऐकायला मन अधीर झाले होते. इतक्यात, ‘‘ओय! ओय! अगं, काय लाडू आहे का दगड! दात तुटले असते ना माझे! हातोडा नाही तर बत्ता तरी आण तो लाडू फोडायला!’’ बापरे! यांचा उत्स्फूर्त शेरा ऐकून मी दचकलेच! पण या लाडूचा दगड झालाच कसा मुळी! मी तावातावाने बत्ता घेऊन गेले. लाडू ताब्यात घेतले. दणादणा दणके घालून लाडूंचे तुकडे केले. त्यांना मिक्सरमध्ये घालून छान बारीक रवाळ रूप दिले. रवाळ रूपातले ते फोडलेले लाडू कढईत घातले. कढई गॅसवर चढवली. साजूक तुपाची तपेली जवळ घेतली. त्या रवाळ लाडवांना मस्त परतत राह्य़ले. त्यावर मुक्तहस्ते तुपाची धार सोडत राह्य़ले. कढईतच त्याचे लाडू वळत राह्य़ले. इकडे कढईतलं मिश्रण परतायचं, तुपाची धार त्यात सोडायची आणि चपळाईने लाडू वळत राहायचे. कढईखाली छोटासा तवा नाही तर रिंग ठेवायला विसरायचं नाही. नाही तर खाली बुडाला करपट रव्याची भाकरी तयार होईल. तेव्हा ती काळजी घ्यायची. हाताला चटके बसतात. त्यावर फुंकर घाल घालत लाडू वळायचे. या पद्धतीने अप्रतिम लाडू तयार होतात. अगदी पहिल्या फटक्यातल्या व्यवस्थित तयार झालेल्या पाकातल्या लाडवांपेक्षासुद्धा हे हाताला चटके सोसत, बनव बनव बनवलेले लाडू जास्तच खुमासदार लागतात, पण कष्ट वाढतात..
पक्क्या पाकाच्या धास्तीने पुढच्या वेळेला लाडवासाठी साखरेचा पाक करायला ठेवला आणि लवकर गॅस बंद केला, तर बेटा तो पाक इतका कच्चा राह्य़ला की, लाडवाला त्याचा गोलाकार टिकवून धरायला तो मदतच करेना. वळला, ताटलीत ठेवला की तो आपला मान टाकून वेडा-वाकडा व्हायचा. थंड झाल्यावर वळून पाह्य़लं तरी तीच तऱ्हा! मग पुन्हा सगळे लाडू मोडून एकत्र केले. त्यात थोडी थोडी मिल्क पावडर घालत राह्य़ले आणि पाहता पाहता त्यांचा घाट जमून गेला. गोलमटोल लाडू तयार! पुन्हा त्याला दुधाच्या पावडरमुळे आलेला सुरमटपणा! लाडू करायला उभं राहताना कंबर मोडली तरी लाडू वळणं, मोडणं, पुन्हा वळणं या प्रक्रिया करायला मी तयार असते. पाकाचा असा चकवा देण्याचा पक्केपणा! तर आम्ही तरी कुठे कच्च्या आहोत? बत्ता, मिक्सर, दुधाची पावडर अशी सगळी आयुधं हाताशी असल्यावर पाक कच्चा होवो वा पक्का होवो, रव्याचे राजस लाडू बनणारच! लाडू-वडय़ा कंपनीच्या पाकाच्या कच्चेपणामुळे किंवा बेसनाच्या लाडवाच्या तुपाच्या अधिकतेमुळे आकार न धरण्याच्या वात्रटपणाला दुधाची पावडर मिक्स करणे हा एक रामबाण उपाय आहे.
हातांना आणि मनाला जरा परिपक्वता आली आणि मी अभिमन्यूसारखी पदार्थाच्या चक्रव्यूहात आत्मविश्वासाने शिरू लागले. असाच एकदा खव्याचे गुलाबजाम बनविण्याचा घाट घातला. खव्यात थोडा मैदा मिक्स करायचा. त्याचे सुबक गोल किंवा लांबट गोल बनवायचे, तुपात तळायचे आणि पाकात टाकायचे. करून टाकू झटपट म्हणत बसले, गुलाबजाम करायला! पण बेटे तुपात टाकले की हसायलाच लागायचे. चार-पाच गुलाबजामांचं असं ‘हसं’ झाल्यावर मात्र मी चपापलेच. मनात आलं, खव्यात किंचित जास्त मैदा टाकून वळून-तळून बघू आणि खरंच की! त्यांचं हसणं बंद झालं. मैद्याचा असर योग्य ठरला. गुलाबजाम शिस्तीत तळून निघत पाकात जाऊन पडले. पानातसुद्धा ऐटीत जाऊन बसले.
एकदा तर या हसऱ्या गुलाबजामांवर चिडून मी त्यांचा नक्षाच बदलून टाकला. हसरे गुलाबजाम गाळणीतून गाळून, तुपापासून त्यांना वेगळं केलं आणि त्यांचा सपशेल चुरा करून घेतला. त्याचा वापर ‘ट्रायफल पुडिंग’साठी केला. खालचा थर या हसऱ्या गुलाबजामच्या चुऱ्याचा, त्याच्यावर कस्टर्ड आणि त्याच्यावर आइस्क्रीम किंवा फळांचा थर! कशाला वाईट लागतंय त्याचं हे नवं पाश्चात्त्य रूप! ट्रायफल पुडिंग!
‘केक’ कधीही कसाही बिघडला तरी असाच ‘ट्रायफूल पुडिंग’साठी गुण्यागोविंदाने तयार होतो. आव्हानं स्वीकारायचीच म्हटल्यावर काय! श्रावणात पुरणा-वरणाच्या सव्वाष्णींचा घाट घातलेला! वरण केलं, पातळ झालं. पुरण केलं, पातळ झालं. एकदा पातळ झालेलं पुरण महाहट्टी! अगदी कडू कारलं, तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच! तस्सं पातळ पुरण पंख्याखाली ठेवलं, फ्रिजमध्ये टाकलं तरी पुरणाचं पातळपण तस्संच! असं झालंच तर काय? पुरणाची दिंडं बनवा नाही तर साटोऱ्या! पुरण-पोळ्यांसाठी भिजवलेली कणीक खटखटीत करण्याच्या नादात, जास्तच वाढली तर चटकन खव्याच्या पोळ्यांचा बेत करून टाकायचा. दोन-दोन पक्वान्नं पानात! आहे की नाही एका दगडात दोन पक्षी मारणं!
एकदा गॅसवर बासुंदी घाटतेय, घाटतेय म्हणेपर्यंत कशी कळेना, पण ती एकदम नासल्यासारखी वाटायला लागली तर गॅस पटकन बंद करून टाकायचा. थंड झाल्यावर तीच बासुंदी मिक्सरमधून काढायची. फ्रिजमध्ये थंडगार करून त्यावर बदाम-पिस्ते पेरायचे. पाहाल तर मस्त रबडी तयार! हवं तर कुल्फिकोनमध्ये ती बासुंदी घालून डीप फ्रीझरमध्ये कोन ठेवले की, पाच-सात तासांत गारेगार कुल्फी तयार! तुमच्याकडे बराच पेशन्स आणि वेळ असेल तर गॅसवरचं तेच दूध जरा गार होताच, फडक्यात बांधून ठेवायचं की, झालं पनीर तयार! त्याचे मिठे रसगुल्ले करायचे नाही तर अगदी संदेश बनवू शकता. त्याच पनीरचे गोळे वळून दुधात घालून बदाम-पिस्त्यांनी सजवले की झाली रसमलई!
आता हा एक अगदी अभिनव पदार्थ! ‘जिल्डू’! नाव ऐकलंय कधी? शक्यच नाही. ते आमचंच ‘इन्व्हेशन’. मुला-नातवंडांना जिलबी फार आवडते. म्हटलं नेहमीच कशाला हवी ती चितळे, जोशींची.. मजाल!  त्यात पुन्हा टीव्हीवरून ‘मेजवानी’, ‘खवय्ये’ सारखे ‘जिलबी बनव’, ‘जिलबी बनव’च्या भूलभुलैयात पाडत होतेच. त्यांच्या सूचनांनुसार रात्री मैदा, ताक इत्यादी पदार्थाचं मिश्रण जमवलं. रेसिपीनुसार जिलब्या तयार होऊन पाकात पडल्यासुद्धा! अगदी चाखायलासुद्धा जिलबीचा तुकडा नाही, गोळा नाही, अजिबात मोडतोड नाही. सगळ्या जिलब्या सहीसलामत! म्हटलं चला इथे काही लाडूसारखी मोडामोडी, हाणामारी करायला नको. जिलबीचा पहिला घास नातीला भरवला. कृतकृत्य होऊन तिच्याकडे पाहू लागले, तर तिचं आपलं नाक उडवून ओठाचा चंबू! ‘हे काय वेगळंच लागतंय!’ दुसरा घास स्वत:च घेऊन पाह्य़ला. ‘खरंच वेगळं लागतंय!’ रूपाने तर त्या गुलजार दिसत होत्या, पण चवीत मार खात होत्या. हा कोरडेपणा कसा काय आला? बहुतेक तयार पिठात जिलबी करताना थोडं तेल घालण्याची टीप नजरेआड झाली वाटतं! सगळ्या जिलब्या तत्क्षणी मोडून ठेवल्या. मिक्सरमधून काढल्या. त्यात दुधाची पावडर, थोडी वेलची पावडर घातली. छोटे छोटे गोल लाडू वळले. बदाम-पिस्त्याच्या चुऱ्यात घोळवले. मस्तपैकी ‘जिल्डू’ तयार झाले. उडाउडी संपले ते ‘जिल्डू’! (जिलबी + लाडू = जिल्डू)
फक्त गोडाच्याच पदार्थातून असे ‘इनोव्हेटिव्ह’ प्रकार तयार होतात असंच नाही. तिखटाचेही एका बिघाडातून अनेक प्रकार तयार होऊ शकतात. सुरळीच्या वडय़ा ताटावर पसरल्या तरी निघेनात किंवा जाड झाल्या तरी हरकत नाही. अहो, कुणाला किती वेळ, किती उष्णता हवी हे तो पाक काय किंवा सुरळीच्या वडय़ा काय! स्वत:चं स्वत:च ठरवून ठेवतात. जरा कमी-जास्त चालत नाही त्यांना! आपण तरी काय करणार! सुरळीच्या वडय़ांचं असं काही बिनसलं तर करा त्यांना एकत्र, मस्तपैकी थापा थाळीत! ‘पातवडय़ा’ नावानं खुशाल खपून जातात. कधी वडय़ा थापायच्या आधीच त्यात गरम मसाल्याचं वाटण किंवा अगदी आलं-मिरची पेस्ट, धने, जिरेपावडर.. आवडेल तो स्वाद देऊन वडय़ा थापून तळून घ्या किंवा सणसणीत वडय़ाचं सांबार बनवा. जेवणाची लज्जत अधिकच वाढेल.
ढोकळा बनविताना त्याचा ठोकळा झाला तरी नो प्रॉब्लेम! त्याला श्ॉलोफ्राय करून ओलं खोबरं, कोथिंबीर पसरून मधल्या वेळचं खाणं तयार!
मेदूवडे करायला गेलात आणि त्याचं भोक पाडायला जमेनासं झालं की, हवा कशाला तो भोकाचा सोस असा विचार करून सरळ गोल वडे तळून काढायचे, पाण्यातून काढून घ्यायचे. वर मस्त दही, तिखट, मीठ, साखर, धने-जिरेपावडर, वाटल्यास चिंचेची चटणी घालून दहीवडे तयार होतातच की!
आमटीत चुकून मीठ जास्त झालं, ब्रेडचे तुकडे टाकून पाह्य़ले, बटाटा घालून पाह्य़लं तरी आमटी आपला खारटपणा सोडायला तयार नाही. ठेवली तिला रटारटा उकळवत! चांगली आटवून घेतली. त्यात मावेल तितकी कणीक, तांदूळपीठ, त्यानुसार तिखट, धने-जिरेपावडर घालून मस्त खुसखुशीत पराठय़ांच्या बेतामुळे पंगत मस्त रंगली.
कोणतीही भाजी उरली, जळली, बिनसली तरी त्यात तांदूळपीठ, कॉर्नफ्लोअर किंवा जरूर तेवढे ब्रेडक्रम्स घालून, चवीचे मसाले घालून गरमागरम कटलेट्स वाढू शकता किंवा पराठे बनवू शकतो. कटलेट्सचं हे गुपित आता जगजाहीर आहे. त्यामुळे कटलेट्सची चव जिभेला आवडत असली तरी हॉटेलमध्ये गेल्यावर कटलेट्सची ऑर्डर द्यायला जीभ धजावत नाही. घरच्यांना तर पानात ‘कटलेट’ दिसला की, आदल्या दिवशीच्या भाज्यांची आठवण यायला लागते. ताजा मटार, मका घालून केलेले लज्जतदार कटलेट्सही ते ‘आहे मनोहर तरी’ म्हणत साशंक मुद्रेने खाऊ पाहतात. मजेची बात सोडून देऊ, पण अंदरकी बात लक्षात ठेवण्याजोगी!
असे हे स्वयंपाकघरातले किस्से, मंत्र आणि तंत्र! जितक्या मुरत जाल तितक्या यात पक्क्या व्हाल. मिक्सर, बत्त्यासारखी कठीण समयी कामास येणारी आयुधं तर हाताशी हवीतच, पण दुधाची पावडर हा गोड दुरुस्तीतला हुकमी एक्का! ब्रेडक्रम्स, वेगवेगळी पिठं, कॉर्नफ्लोअर हे तिखटा-मिठाचे पदार्थ नीटनेटके करण्यात पक्के! पण सर्वात मुख्य म्हणजे तुमचं डोकं! भन्नाट कल्पनांची रिळं तिथूनच उलगडत जातात आणि पदार्थाचं रूप होत्याचं नव्हतं करून टाकतात. खरं तर ‘नव्हतं ते होतं’ करून टाकतात. मग तुम्ही या प्रांतात नव्या असा नाही तर जुन्या! तुमच्या हातचे पदार्थ नेहमीच ‘हटके’ बनून जातात!    
  
सुगरण मी
तुम्ही घडवलाय असा बिघडलेल्या पदार्थातून चविष्ट पदार्थ? काय झालं आणि कसं घडवला नवीन पदार्थ? चटकदार माहितीसह कळवा आम्हाला. आमचा पत्ता- लोकसत्ता, चतुरंग,
प्लॉट क्र . ईएल १३८ टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई  ४००७१०  आमचा ई-मेल
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो