करिअरिस्ट मी : संकलक ते दिग्दर्शक
मुखपृष्ठ >> करिअरिस्ट मी >> करिअरिस्ट मी : संकलक ते दिग्दर्शक
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

करिअरिस्ट मी : संकलक ते दिग्दर्शक Bookmark and Share Print E-mail

पूजा सामंत ,शनिवार, १८ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

खामोशी द म्युझिकल, हम दिल दे चुके सनम, ब्लॅक आदी चित्रपटाच्या संकलक बेला भन्साली सहगल यांचा ‘शिरीन फरहाद की तो निकल पडी’ हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात आणि संकलक ते दिग्दर्शक हा प्रवास करत असताना भाऊ संजय लिला भन्साली आणि सहगल कुटुंबियांचं सहाय्य मोलाचं असल्याचं ती सांगते..
हिंदी सिनेसृष्टीतील एक प्रथितयश लेखक-दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांचं सिनेसृष्टीतील योगदान लक्षणीय आहे, पण कदाचित फार थोडय़ांना कल्पना असेल ती बेला ही संजय लीला भन्सालीची धाकटी बहीण बेला भन्साली-सहगल ही सुद्धा आता त्यांच्या पावलावर पाऊल टाकत चित्रपटाच्या दिग्दर्शन क्षेत्रात उतरली आहे. तिचा पहिलावहिला दिग्दर्शित चित्रपट ‘शिरीन-फरहाद की तो निकल पडी’ प्रदर्शित होतोय.
मात्र बेलाचं अस्तित्व इतपतच मर्यादित नाही कदाचित ही तिच्या दिग्दर्शकीय कारकीर्दीची सुरुवात असू शकते..पण बेला आज भारतातील मोजक्या स्त्री संकलकांपैकी एक आहे. संजयच्या सगळ्याच चित्रपटांचं संकलन बेलानेच  केलं आहे. त्यात ‘खामोशी द म्युझिकल’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’(काही भाग), ‘ब्लॅक’, ‘सावरियाँ’, ‘गुजारीश’ आदी चित्रपटांचा समावेश आहे. या सगळ्याच चित्रपटांचा कॅनव्हास भव्य दिव्य आहे. त्यामुळे संकलकाची कात्री लावताना फार मोठी जबाबदारी तिच्यावर होती जी तिने लीलया पेलली.  संजयचे चित्रपट म्हणजे त्याचा श्वास आहेत. त्याच्यावर कात्री लावणं म्हणजे त्याच्या स्वप्नांवर कात्री लावण्यासारखंच. पण त्यामुळे अनेकदा सिनेमा लांबलचक व्हायचा. मला योग्य ठिकाणी कात्री लावणं भागच असायचं. मला आठवतंय त्याप्रमाणे असा एकही चित्रपट नाही, असा सीन नाही जेव्हा आमचे वाद झाले नसतील. तो त्याच्या मतावर ठाम असायचा आणि मी माझ्या. ‘देवदास’ या चित्रपटातलं ‘डोला रे डोला’ गाणं सुरुवातीला चार कडव्यांचं होतं. ऐश्वर्या आणि माधुरीचं एकत्रित नृत्य हा त्या चित्रपटाचा युएसपी होता. आणि संजय त्या चार कडव्यांवर ठाम होता. माझ्या मते चार कडवी प्रेक्षकांवर अन्याय करणारी होती. त्यामुळे किमान तीनच कडवी असावी असा माझा आग्रह होता. आमची खूप वादावादी झाली पण मी त्याला पटवून देण्यात यशस्वी ठरले. ’’ ती सांगते.
आज बेला सहगल यशस्वी सिनेमा संकलक असली तरी त्यांचंही बालपण काही सुखासुखी गेलं नाही. संजयभाईचा भक्कम पाठिंबा आणि आईच्या कष्टांचा आधार तिच्या मागे असला तरी तिलाही बालपणात अस्थीर परिस्थितीचे चटके सहन करावे लागलेच. तिचा हा प्रवास जाणून घेण्यासाठी तिच्या कार्यालयात पोहोचले. मुलाखतीची  सुरुवात  ‘‘माझ्या जीवनावर माझ्या आई-वडिलांचा प्रभाव आहे, हे वाक्य अगदी सरधोपट आहे नाही का..? ..लेकिन मैं ऐसा दकियानुसी (पेटंट वाक्य) कहनेवाली हूं नहीं..’’ असं म्हणत खो-खो हसतच केली. त्याही परिस्थितीतल्या तिच्या खेळकर-मिश्कील स्वभावाची चुणूक जाणवते.
 बेलाच्या जुहूच्या घरी आणि ऑफिसमध्ये सध्या एकच गडबड सुरू आहे. तिने दिग्दर्शित केलेला पहिलावहिला चित्रपट ‘शिरीन फरहाद की तो निकल पडी’ प्रदर्शित होतोय. बेलाच्या एकूणच कारकीर्दीवर संजयचा खूप प्रभाव आहे, म्हणूनच ती सहजच सांगून जाते, माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर सर्वाधिक प्रभाव माझ्या भावाचा आहे. त्याने जर माझ्यासाठी सेतू बांधला नसता तर पुढची वाटचाल शक्यच नव्हती..
ते सांगत असताना बेलाचं मन अलवारपणे भूतकाळात जातं. मध्य मुंबईतल्या (गुल्लावाडी) एका अवाढव्य प्रशस्त चाळवजा घरात बेला, संजय आणि आई-वडील राहात असत. वडील नवीनभाई भन्सालीदेखील चित्रपटसृष्टीत निर्माता आणि फिल्म फायनान्सर होते, पण त्यांची कारकीर्द अयशस्वी ठरली आणि लवकरच त्या असफल कारकीर्दीचं ग्रहण जणू अवघ्या कुटुंबाला लागलं. अपयशाच्या धक्क्य़ातून संजयचे वडील सावरले नाहीत आणि आपल्या वैफल्यग्रस्त पित्याचा ढासळता आर्थिक-मानसिक डोलारा संजय आणि बेला या भावंडांना अजाण वयातच पाहावा लागला. समृद्धीतून अचानक दारिद्रय़ाकडे जाणारी वाटचाल काय असते याचे चटके लीलाबेन-संजयभाई बरोबर लहानग्या बेलालाही काही प्रमाणात सहन करावे लागले.
बेलाचे साश्रू नयन खूपशा अव्यक्त भावना व्यक्त करतात. घरात उद्भवलेल्या वादळाने संजयच्या स्वभावात खूप स्थित्यंतरं घडत गेलीत. तसा त्याचा परिणाम बेलाच्या आयुष्यावरही पडला. पण त्या वादळातला कडवटपणा त्यांच्यात त्यांनी उतरू दिला नाही.
त्या सांगतात, ‘‘वडिलांच्या पश्चात आईने अक्षरश: घरोघरी जाऊन घरगुती वस्तू विकल्या. आम्हाला घरी सांभाळायला कुणी नसल्याने आम्हा दोघांना ती बरोबर नेत असे. मुलांचं आणि स्वत:चं पोट भरण्यासाठी तिचा चाललेला हा अथक संघर्ष नंतर संजयने आपल्या  चित्रपटातूनही मांडला. आईने त्याची झळ आम्हाला लागू दिली नाही मात्र आम्हालाही त्या परिस्थितीतून जावं लागलंच. संजयभाईने ते माझ्यापेक्षा जास्त भोगलं. त्याच्या वेदनांची दाहकता त्याने मला दिसू न देण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण मला ते जाणवल्याशिवाय राहीलच कसं? खेळण्या-बागडण्याच्या वयात संजय दु:खांशी-वेदनांशी, परिस्थितीशी झुंज देत होता. त्याला फारसे सवंगडी मिळालेच नाहीत. तो एकटाच राहात असे, पुस्तकांना त्याने आपलं मानलं. अबोल संजय सतत कामात गर्क राहिला. त्याला झपाटून टाकलं होतं.. कामाने. मी तर त्याची सावलीच होते. त्यामुळे त्याची कामाची झिंग माझ्यातही चढत गेली. संजयने पदवी घेतल्यानंतर एफटीआयआय (फिल्म्स अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया) जॉइन करायचं ठरवलं आणि त्याला तिथे प्रवेशही मिळाला. मी तिथे एडिटिंगसाठी प्रवेश घेतला. फिल्म एडिटिंग म्हणजे नेमकं काय असतं हेही तेव्हा पुरेसं मला स्पष्ट झालं नव्हतं. पण नंतर मात्र आवड निर्माण होत गेली.’’
संजयने आखून दिलेल्या लक्ष्मणरेषेवर बेलाची कारकीर्द पुण्याच्या फिल्म्स अ‍ॅण्ड टेलिव्हिजन संस्थेत आकाराला येऊ लागली. ‘‘पण तो काळ वेगळाच होता.’’ ती सांगते, ‘‘१९३०-४० दशकात तसेच त्यानंतर पुढील दहा वर्षांत देविका राणी, दुर्गा खोटे, रुबी मायर्स व फिअरलेस  नादिया यांनी आपले वर्चस्व पुरुषप्रधान संस्कृतीतही निर्माण केले होते. या नायिकांना आदर, मानधन आणि अभिनेत्यांच्या  बरोबरीच्या भूमिका मिळत होत्या. पण नंतर मात्र नायिका अभिनेत्यांच्या तुलनेत कमी पडत गेल्या. नíगस या नावाला वलय मोठे असले तरी मानधन मात्र कमी असायचे.
१९८० पर्यंत निर्मितीशी निगडित तांत्रिक क्षेत्रात जवळजवळ महिला नव्हत्याच. माझ्या माहितीप्रमाणे, १९८० मध्ये निर्माते प्राणलाल मेहता यांच्या टीममध्ये कमला देविया ही पहिली महिला प्रॉडक्शन कन्ट्रोलर होती. कमलाने १९८४ मध्ये हे काम सोडले, पण रेणू सलुजा यांनी मात्र फिल्म एडिटिंगमध्ये खूप मेहनतीने काम केलेय. या क्षेत्रातल्या माझ्या गुरू त्याच आहेत. सिनेमाचे संकलन म्हणजे चित्रपटाचा आत्मा. मी हे सारे हळूहळू शिकत गेले. अर्थात मी सगळे चित्रपट संजयचेच केले. तो घरचा कारभार असल्याने रात्री मुली झोपल्यावर मी संकलनाचे काम करीत असे. त्यामुळे मला तुलनेने सोपं गेलं.
पण पुढे कालांतराने लोकांची मानसिकता बदलत गेली. रेणू सलुजा यांना तब्बल चार वेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. यामुळे अनेकांचा महिला संकलकांवरचा विश्वास वाढत गेला. माझ्या बाबतीत सांगायचं तर संजयच्या चित्रपटांचं फिल्म एडिटिंग माझ्यासाठी खूप आव्हान ठरले. कारण माझ्या दृष्टीने त्याचे चित्रपट मेलोड्रॅमॅटिक, रस्टीक लूकचेच असतात. मला ते आवडायचं नाही पण तो त्याबद्दल आग्रही असायचा. त्यामुळे अनेकदा कट् टू कट् एडिटिंग करणं माझ्यासाठीही वेगळं आव्हान असायचं. पण काम पूर्ण झाल्यानंतर पडद्यावर ते पहाणं हा वेगळाच अनुभव असायचा.’’
‘‘अर्थात त्यावेळी माझं लग्नही झालं होतं नी मला दोन मुलीही होत्या. त्यामुळे दुहेरी जबाबदारी होती. एडिटिंगची जबाबदारी सांभाळत असताना मला घरची आघाडीही सांभाळावी लागत होती.’’ बेला सांगत होती, ‘माझे सासरे, मोहन सगल गंभीर आजारी होते, त्याचवेळी मुलीदेखील लहान होत्या. तो काळ फार कठीण होता..’’
बेलाने  प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक मोहनकुमार (सहगल) (रेखाला ‘सावन भादो’ चित्रपटात ब्रेक देणारे) यांच्या मुलाशी विवाह केला आणि दोन कन्यकांची आई झाली. बेलाचे सासरे मोहनकुमार, पती दीपक सहगल (स्टार प्लसचे माजी कार्यकारी निर्माता), सासू अभिनेत्री अशा सगळ्या कुटुंबाला बेलाने लग्नानंतर आधार दिला आणि तिलाही तिच्या मनाजोगतं संकलनाचं काम करण्याची सहज मुभा सहगल कुटुंबाकडून मिळाली. अनेक लोकप्रिय (अदनान सामी) अल्बम्सचं दिग्दर्शन केल्यानंतर गुलशनकुमारांचे चिरंजीव भूषणकुमार यांनी बेलाला चित्रपट दिग्दर्शित करण्याचा सल्ला दिला. बेलाच्या दोन लेकी शर्मिन (आता वय १७) तर धाकटी सिमरन (वय १५) यांचाही तिला पूर्ण पाठिंबा होता. शिवाय तिचं मनोधैर्य वाढवायला सहगल कुटुंब होतंच. पण कसरत तिला करावी लागलीच..
ती सांगते, मला आठवतंय, ‘‘संजयच्या ‘हम दिल दे चुके..’ चे संकलन सुरु होतं. माझं पूर्ण लक्ष या चित्रपटात होतं, पण घरी सासऱ्यांची देखभालही करावी लागत होती शिवाय मुलीही लहान असल्याने त्यांच्याकडे लक्ष देणंही भाग होतं या कसरतीत जीव अक्षरश: मेटाकुटीला यायचा.’’
‘‘चित्रपट संकलन करत असतानाच मी चित्रपट दिग्दर्शन करण्याचे स्वप्न पाहिले होते. पण प्रत्येक गोष्टीला योग यावा लागतो. बोमन इराणी तेव्हा सिनेमाच्या दुनियेत नव्हता. फराह खान नृत्यदिग्दर्शिका होती. तेव्हा मी त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या दिग्दर्शक होण्याच्या. चित्रपटाचे नाव त्यावेळी ‘शिरीन फरहाद की तो निकल पडी’ असे नव्हते तर  ‘हदिप्पा’ होते. मात्र हा चित्रपट प्रत्यक्षात येण्यासाठी अनेक अडचणी पार करीत, तब्बल सात-आठ वष्रे जावी लागली. कथा प्रौढ प्रेमकहाणी आहे, त्यामुळे मला तसे प्रौढ कलाकार हवे होते. जे फराह खान आणि बोमन इराणीच्या रूपात मिळाले. या सात-आठ वर्षांमध्ये फराह स्वत: दिग्दर्शक झाली. बोमन खूप मोठा कलाकार म्हणून प्रसिद्ध झाला. त्यांना कनव्हिन्स करता, त्यांच्या तारखा मिळवता मिळवता आणखी वेळ गेला. कथा बदलत गेली, पटकथा बदलत गेली, शीर्षकही बदलले. ह्य़ा दरम्यान फराहचे वजन कमी-जास्त व्हायचे पण अखेर सगळे जुळून आले. यात माझी धावाधाव पाहून प्रॉडक्शनची जबाबदारी संजयने घेतली. याचा परिपाक म्हणजे मी फक्त चोपन्न दिवसांमध्ये ‘शिरीन फरहाद..’ पूर्ण करू शकले. ‘नकटीच्या लग्नाला..’ हा अनुभव गाठीशी बांधून मी पुढे चालत राहिले..
दिग्दर्शक म्हणून एखादा चित्रपट करताना जी वेगवेगळी आव्हानं असतात तसं मलाही एक होतंच. या चित्रपटात फराह आणि बोमन यांचे एक चुंबनदृश्य आहे. या सीनमुळे मी खूप अस्वस्थ झाले होते. कारण दोघे विवाहित आणि ज्येष्ठ कलाकार. त्यातून ते मुळात रोमॅन्टिक कलाकार नाहीत. प्रेक्षक त्यांना कसे स्वीकारतील, हा आणखी एक वेगळा मुद्दा. शिवाय फराह खान स्वत: दिग्दर्शक असल्याने ती या दृश्याला कसा न्याय देईल, अशा प्रश्नांनी माझी पार झोप उडवली होती. एकदाचा हा सीन मी घेतला खरा. त्या दोघांनीही चांगले सहकार्य केले. मात्र फराहलासुद्धा थोडे टेन्शन होतेच की शिरीष, तिचा पती या सीनविषयी काय म्हणेल. पण निभावलं खरं.
एकूणच जेट स्पीडने मी हा चित्रपट पूर्ण केलाय. कारण त्याची बीजे सात-आठ वर्षांपूर्वीची होती.  या सगळ्यात घर, मुली, नवरा, संजयची सिनेमाशी निगडित कामे आणि मुख्य म्हणजे बजेट. त्याचा विचार एक सेकंदही बाजूला होऊ शकला नाही. पहिला आठवडा तर मला शॉट घेण्यासाठीदेखील पुरेसा आत्मविश्वास नसायचा. माझ्या लेकी, नवरा आणि माझा छायाचित्रणातला गुरू महेश आणि फराह, बोमन यांनी मला हा विश्वास दिला. आणि माझ्या दृष्टीने असलेलं एक शिवधनुष्य पेललं. आता उत्कंठा आहे पुढच्या प्रवासाची ..   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो