गोष्टी भावभावनांच्या : कोंडमारा
मुखपृष्ठ >> गोष्ट भावभावनांची >> गोष्टी भावभावनांच्या : कोंडमारा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

गोष्टी भावभावनांच्या : कोंडमारा Bookmark and Share Print E-mail

आई - बाबा तुमच्यासाठी
नीलिमा किराणे ,शनिवार, १८ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आपली मुलगी न्यूनगंडाची कायमची शिकार होऊ शकते. ते टाळण्यासाठी तिच्या आई-बाबांचं प्रेम तिला स्पष्ट दिसायला हवं.तिच्या गतीनं वाढण्यासाठीचा अवकाश तिला मिळायला हवा..
चौथीतली ऋता आईसोबत पाढे पाठ करीत होती. पंधरापर्यंतचे पाढे बरोबर आल्यामुळे सारं मजेत सुरू होतं. पाढा चुकला की आई तिला हळूच एक टप्पल द्यायची. टप्पल बसली की जीभ बाहेर काढून ऋता तो पाढा पुन्हा पहिल्यापासून म्हणायची. पुढे मात्र चित्र बदललं. अवघड पाढय़ांसोबत हळूहळू फटक्यांचा वेग, आईची चिडचिड आणि टपलेतला जोर वाढत गेला. ऋता रडकुंडीला आली. तेवीसच्या पाढय़ानं तर कहर केला. सहा-सात वेळा थपडांसारख्या टपला खाऊनही तो जमेना. वैतागून उठताना आई म्हणाली, ‘किती बावळट आहेस गं तू. एवढा मार खाऊन आणि दहा वेळा म्हणूनसुद्धा तुझा तेवीसचा पाढा होईना. वर लाजही वाटत नाही तुला. मख्खपणे बघत राहतेस. शेजारची श्रेया काल एकोणतिसाचा पाढासुद्धा घडाघडा म्हणत होती.’  ऋताचा चेहरा एकदम पडला. त्यानंतर पंधरा दिवसांनी एकोणतीसच्या पाढय़ापर्यंत कशीबशी पोहोचलेली ऋता चाचरत चाचरत पाढे म्हणत होती. ‘अभ्यास नीट करीत नाही. असंच बावळटासारखं अडखळायला होणार’ बाबा अनेकदा म्हणाले.
* * *
‘बाबा, यंदाच्या स्नेहसंमेलनात मी नाटकात आणि गाण्यात भाग घेणार आहे.’
‘तू भाग घेणार? मग संपलंच. नाटकासाठी आवाजात चढउतार लागतो, चेहऱ्यावर भावना उमटाव्या लागतात. तुझ्या चेहऱ्यावरचे बावळटासारखे मख्ख भाव आधी सुधार. हां, नाटकात श्रेयसच्या मागे नुसतं उभं राहण्याचं किंवा एका वाक्यात निरोप सांगण्याचं काम असेल तर जमेल म्हणा तुला.’ बाबा हसत म्हणाले.
    ‘हो आणि गाण्याला हर्षदाच्या मागे कोरसमध्ये घेतलं तरी पुष्कळ.’ आईनंही हसत त्यांना साथ दिली. ऋताला कसंतरीच झालं. शाळेत गेल्या गेल्या तिनं आपलं नाव दोन्हीकडून काढून घेतलं.
‘ही कशातच पुढे नाही, कसं होणार हिचं?’ यावर चिंताग्रस्त आई-बाबा पुन:पुन्हा चर्चा करताना राजाला दिसले.
* * *
नववीतली ऋता उदासपणे मत्रिणीला सांगत होती. ‘‘आईची माझ्यावर सतत नजर असते. घरी पोहोचायला सातचे सव्वासात झाले तरी आई-बाबांचे शंभर प्रश्न. इथेच का गेलीस? तेच का केलंस? मनासारखं नाही झालं की दोघं एकदम माझ्यावर ओरडायला सुरू करतात. मला ना, सारखं बांधून ठेवल्यासारखं- बंद बंद वाटतं. काहीही करताना वाटतं, हे केलं की आई असं म्हणेल. ते केलं की बाबांना तसं वाटेल. मग काय करायचं तेच कळत नाही. वाढदिवसाचा ड्रेस आणायला गेलो होतो. मला पटकन निवडताच आला नाही. तर आई-बाबा रागावले, ‘तुला तुझा कुठलाच निर्णय घेता येत नाही’ म्हणाले. मी काहीही करायचं ठरवलं तरी आई ‘कशाला?’ म्हणणार. नाही ठरवलं तर बाबा म्हणणार, ‘तुला कशाचा उत्साहच नाही.’ बावळटासारखी वागते ना गं मी?’’
‘‘चल, माझेपण आई-बाबा असंच करतात..’’
‘‘ नाही गं, तुझं कौतुकपण करतात. आम्ही मजेत गप्पा मारल्यात, माझ्या कशाला आई-बाबांनी चांगलं म्हटलंय, असं जवळजवळ नाहीच. नापास होत नसले तरी सगळय़ात कमीच आहे मी. अभ्यास, खेळ, गाणं, कला, नाटक सगळय़ात जेमतेम. देवानं माझ्या डोक्यात काहीतरी कमीच घातलंय. आई-बाबांना माझा अभिमान वाटावा, असं काहीच नाही माझ्याजवळ. त्यांना मी आवडत नाही. लाज वाटते माझी.’ ऋताचे डोळे भरून आले. मत्रीण तिची समजूत काढत असतानाच दृश्य धूसर होत दिसेनासं झालं.
* * *
वेताळ म्हणाला, ‘‘राजा, ऋता प्रत्येक गोष्टीत एवढी कमी का? तिला कशाचाच उत्साह नाही. निर्णयक्षमता नाही. बावळटपणा वाढतोच आहे. अशा मुलीचं पुढं कसं निभावणार याची चिंता आई-बाबांना लागलीय. काय केल्यामुळे ऋता बदलेल?’’
राजा म्हणाला, ‘वेताळा, आईबाबांच्या ऋताकडून सततच्या अपेक्षा आणि त्याहीपेक्षा या अपेक्षांना ती पुरी पडणार नाहीच ही खात्री’ या समस्येच्या मुळाशी आहेत, असं मला वाटतं. ऋता अतिबुद्धिमान नाही पण मंदही नाही. ती मध्यम आहे. ती जिथे आहे तिथून प्रयत्नांनी निश्चितच पुष्कळ वर जाऊ शकते. पण प्रयत्न करण्यासाठीचा अवकाश तिला बहुधा मिळत नाही. आई-बाबांना अपेक्षित वेगाने ती वाढली तरच त्यांना ती आवडू शकते. ती जशी आहे तसा तिचा स्वीकार आई-बाबांना करता येत नाही. त्यामुळे तिच्यात ‘काहीतरी कमी आहे’ या भावनेनं ते ग्रासलेले राहतात आणि तीच भावना नंतर ऋतामध्ये भरून राहते.’
‘‘छोटय़ा ऋतानं पंधरापर्यंतचे पाढे एखादी टप्पल खात आनंदानं म्हटले होते. पुढेही ती प्रयत्न करीत होती. पण ऋताला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागतोय, असं वाटून आई अस्वस्थ होते. कदाचित श्रेयाचा २९ चा पाढा ऐकल्यामुळे असेल, आईच्या रागाची आणि फटक्यांची तीव्रता वाढते. ज्यामुळे ऋता खचते. जास्त जास्त चुकते. इथे पाढे पाठ करायची सोपी युक्ती किंवा थोडा जास्त वेळ देणं उपयोगी पडलं असतं. ‘रोज फक्त एक पाढा करायचा. सकाळी अर्धा आणि संध्याकाळी अर्धा. म्हणजे आठवडय़ाभरात उरलेले पाढे पक्केहोतील,’ असं काहीतरी आई सुचवू शकली असती. पण ‘सुधारणा शिक्षेमुळेच होते’ या आईच्या गृहीतकामुळे पाढय़ांबाबतचा ऋताचा आत्मविश्वासच संपतो. या प्रकाराची पुनरावृत्ती नेहमीच होत असणार. लहानपणी असं पुन:पुन्हा घडल्यामुळे अभ्यास आणि शिक्षेचं दडपण येऊन ऋता कायमची धास्तावलेलीच राहते.’’ राजा म्हणाला.
‘‘ऋताकडे निबंधासाठीची कल्पनाशक्ती आहे. मात्र आई-बाबांच्या मनात सगळय़ाचे मापदंड ठरलेले आहेत. त्यामुळे ऋताचा अभ्यास श्रेयासारखा हवा,  हर्षदासारखा आवाज, श्रेयससारखा अभिनय, असं आई-बाबांना वाटतं. त्यांच्या हे लक्षात येत नाही की अनेक वेगवेगळय़ा मुलांमधल्या गुणांची अपेक्षा ते नकळत एकटय़ा ऋताकडून करताहेत, वर तिच्या प्रयत्नांची थट्टा उडवताहेत. याचा परिणाम असा होतो, की प्रयत्नांनी आपणही पुढे जाऊ, हा विश्वास ऋतात कधी जागतच नाही. तिला वाटतं की ‘गुण हे जन्मजातच असतात. देवानं माझ्यात एकही जन्मजात गुण घातलेला नाही. मी बाद आहे.’’
‘अमक्यासारखं तुला थोडंच जमणार आहे?’ असं आई-बाबांकडून पुन:पुन्हा ऐकताना ऋताला कसं वाटत असेल वेताळा? एकाच वेळी तिची अनेकांशी तुलना होते, बावळटपणाचं लेबल पक्कं चिकटत जातं. यातून ती खच्ची होते. सगळय़ात वाईट घडते ते, अशा प्रत्येक अनुभवासोबत ऋतातला उत्साह, नवीन करून पाहण्याची उत्सुकता, आत्मविश्वास, निर्णयक्षमता संपत जातात. उमदेपणच हरवतं. आई-बाबा समोर नसतील तरी आई-बाबांच्या कॉमेंट्स तिला प्रत्येक क्षणाला ऐकू येत राहतात. आपल्या वागण्यावर कुणाची तरी नजर आहे, कुणीतरी आपल्याला जाब विचारणार आहे, टर उडवणार आहे ही धास्ती सतत सोबत राहते. यातून तिला कुठलाही निर्णय घेताना खात्री वाटत नाही.’’
‘‘ म्हणजे राजा, आई-बापांनी ऋताचं चुकलं असेल तरी मतं व्यक्त करायची नाहीत, सुधारणेची अपेक्षा करायची नाही. आणि असं केलं तरच त्यांनी तिचा स्वीकार केला असंच ना ?’’
‘‘असं अजिबात नाही. स्वीकार म्हणजे ऋता जशी आहे तसं तिच्या गुणदोषांसकट तिला प्रेमानं समजून घेणं. ती जिथे आहे तिथून पुढे जायला मदत करणं. आई-बाबांकडून ऋताला ‘आमचं तुझ्यावर प्रेम आहे’ हा स्पष्ट संदेश जाणं अत्याश्यक आहे. सुधारणा त्यानंतर सुचवायच्या. त्या वेळी आपली तिच्याशी बोलण्याची पद्धतसुद्धा त्रयस्थपणे तपासायची. आपल्याशी कुणीतरी सतत असा संवाद केला तर आपल्याला कसं वाटेल एवढा विचार केला तरी आई-बाबांचा सूर बदलेल. ‘तुला जमणार नाही’ असा संदेश सतत जाण्याऐवजी आधी ऋताला जेवढं जमलंय त्याचं कौतुक करायला हवं. ’’
‘आई-बाबांना माझी लाज वाटते, त्यांचं माझ्यावर प्रेम नाही,’ असं वाटून ऋताचा कोंडमारा होतो. दोघंही रागावत असल्यामुळे ती एकटी पडते. सारख्या सूचना आणि टीकेमुळे तिचा आत्मविश्वास संपतो. ती जास्त जास्त बावळट होते. आई-बाबांनी हे समजून घ्यायला हवं वेताळा, की लहानपणी रुजलेली ‘बावळट’ ही ऋताची स्व-संकल्पना पुढे आयुष्यभर सोबत राहू शकते. ती कायमची गोंधळलेली, धास्तावलेली राहू शकते. ‘आपण कमी आहोत’ या न्यूनगंडाची कायमची शिकार होऊ शकते. म्हणून आई-बाबांचं प्रेम तिला स्पष्ट दिसायला हवं. तिच्या गतीनं वाढण्यासाठीचा अवकाश तिला मिळायला हवा. ऋतात काही कमी नाही हा विश्वास आई-बाबांनी दाखवला तरच तो ऋतातही जागेल वेताळा.’’
‘हंऽ’ असा सुस्कारा सोडत वेताळ अदृश्य झाला.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो