बोधिवृक्ष : ईश्वरशक्ती
मुखपृष्ठ >> बोधिवृक्ष >> बोधिवृक्ष : ईश्वरशक्ती
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

बोधिवृक्ष : ईश्वरशक्ती Bookmark and Share Print E-mail

विनोबा ,शनिवार, १८ ऑगस्ट २०१२

आपल्याला लाभलेली शक्ती जर आपण पुरी वापरली नाही, तर शिल्लक ठेवलेली शक्ती ईश्वराने आपल्याला द्यावी तरी कशी? बापाने मुलाला व्यापारासाठी दिलेले दहा हजारांचे भांडवल त्याने वापरलेच नाही, तर बाप त्याला लाखाचे भांडवल कसे देईल? ते भांडवल जर त्याने उत्तम प्रकारे वापरून दाखविले, तर बाप म्हणेल,  ‘उरलेले सारे तुझेच आहे.’ आपण व ईश्वर यांच्या मधला संबंध असाच आहे. तो त्याच्याजवळ असलेली सगळीच शक्ती आपल्याला देऊन टाकण्यास तयार आहे. तशी गरज मात्र सिद्ध झाली पाहिजे. एखाद्याने मिळत गेलेली शक्ती वापरता वापरता सिद्ध केले की, आता मला ईश्वराची सर्वच शक्ती पाहिजे, तर ईश्वराला आनंदच होईल. तो म्हणेल, ‘मला हवा होता तसा प्रयोगी भक्त भेटलास तू.’ पण ईश्वराच्या सर्व शक्तीची गरज पडेल असे कार्यच कधी जगात उत्पन्न झाले नाही. म्हणून माणूस जेवढय़ा शक्तीची गरज सिद्ध करील, तेवढी शक्ती त्याला ईश्वराकडून बिनदिक्कत मिळत जाते. माणसाला निराश होण्याची किंवा हार मानण्याची गरज नाही. त्याने त्याच्याजवळ असलेली सगळी शक्ती वापरावी, म्हणजे त्याला जास्त शक्ती खात्रीने मिळतेच. स्वत:ची शक्ती पूर्णपणे वापरल्यावाचून देवाजवळ मदत मागितली, तर ती त्याने का करावी?  तुम्ही आपली सारी शक्ती लावून प्रयत्न करा. तुम्ही थकला, म्हणजे मग देवाचा धावा करा. तो तुम्हाला आणखी बळ देईल.
गजेंद्रमोक्षाचा सुधारलेला दृष्टान्त
गजेंद्रमोक्षाचे उदाहरण देताना भक्तिमार्गात असे सुचविण्याची रीत आहे की, अगोदर गजेंद्राने स्वत:च्या शक्तीने जय मिळविण्याचा प्रयत्न केला, म्हणून देव त्याच्या मदतीला आला नाही. त्याला स्वत:च्या शक्तीचा अहंकार होता. गजेंद्राला स्वत:च्या शक्तीचा अहंकार असेल, तर देवाने त्याचा गर्व परिहार झाल्यानंतरच त्याला मदत केली, हे ठीकच झाले. पण समजा, एक असा गजेंद्र आहे की ज्याला स्वत:च्या शक्तीचा अहंकार नाही, पण आपले बळ वापरून न पाहताच तो देवाचे साह्य़ मागतो, तर त्यात त्याचा स्वत:ची शक्ती न वापरण्याचा हट्ट हा अहंकारच आहे, त्याने स्वत:पाशी असलेले बळ का वापरू नये? ते बळ त्याचे स्वत:चे थोडेच आहे? तेही तर देवाचेच बळ आहे. आपले बळही देवाचेच आहे, अशा भावनेने स्वशक्ती वापरण्यात अहंकार नसतो. उलट आपल्याजवळ असलेले बळ न वापरण्यात अहंकार, आळस आणि अश्रद्धा आहे. जी शक्ती तुझी नाही ती तू राखून ठेवतोस व देवाचे साह्य़ मागतोस. तुझ्यात असलेली देवाची शक्ती निरहंकारपणे पुरी पुरी वापर व मग जास्त शक्तीचे आवाहन कर. असलेली शक्ती पूर्ण वापरली की नसलेली शक्ती देव देतोच.
 ईश्वर-शरणतेत पराधीनता नाही
पण यातही शेवटी ईश्वरावरच विसंबून राहावे लागते. म्हणून हे गाडे एकंदरीत पराधीनच झाले, असे कोणाला वाटेल. पण ते बरोबर नाही. कारण, तसे म्हणायचे तर आपली शक्ती खुंटली, तेव्हाच पराधीनता आली.  ईश्वर कोणी परका मानला तर ती पराधीनता होईल. पण वस्तुस्थिती तशी नाही. कोटाच्या खिशाला दोन कप्पे केले आणि दोन्ही कप्प्यांत पैसे भरून ठेवले. वरच्या कप्प्यातले पैसे संपले, की आतल्या कप्प्यातले काढले. दोन्ही कप्पे आपल्याच खिशाचे! किंवा काही पैसे तुमचे तुमच्या ट्रंकेत आहेत आणि काही बँकेत ठेवले आहेत, तसेच हे समजावे. ईश्वर व आपण एकाच चैतन्याची रूपे आहोत. आपण अंशमात्र आहोत. ईश्वर त्या चैतन्याचे पूर्ण रूप आहे. तरी पण चैतन्य एकच. म्हणून त्याची शक्ती, ती आपली शक्ती. त्यामुळे ईश्वराजवळून शक्ती मागण्यात व मिळविण्यात पराधीनता नाही.
 स्थूल सांसारिक कार्ये ईश्वराच्या मदतीचे विषय नव्हेत.
मनो-निरोधाच्या आपल्या प्रयत्नांची शिकस्त झाल्यावर भक्तीची जागा आहे. तेव्हाच तिची गरजही उत्पन्न होते, हे आपण पाहिले. आपला प्रयत्न थकल्यावर आपल्याला मदतीची तळमळ लागते. तेव्हा त्या तळमळीतून भक्तीचा जन्म होतो. त्यापूर्वी तळमळ नसते, त्यामुळे भक्ती नसते. श्रद्धा असू शकते. लोकांत सामान्य व्यावहारिक कार्याकरिता देवाची मदत मागण्याची रीत पडली आहे. आपण अशांना आस्तिक मानतो. वास्तविक ती आस्तिकता नव्हे. परीक्षा पास होण्याला ईश्वराची मदत मागणे ही कसली आस्तिकता? हा बावळटपणा आहे. पुरुषार्थहीनता आहे. शेतात पीक चांगले आले नाही, मागा ईश्वराची मदत! जणू त्याने हे सगळे प्रश्न सोडविण्याची शक्ती आम्हाला दिलेलीच नाही! हे ईश्वराच्या मदतीचे विषयच नाहीत.
 ईश्वरापाशी मागणे मागण्याची योग्य रीत
आम्हाला युद्धात जय दे, म्हणून दोन्ही पक्ष देवाची प्रार्थना करतात. ईश्वर बिचारा आपली इच्छा राखून आहे. दोघांनाही जय देणे त्याला शक्य नसते. पण मी त्याला  माझ्या इच्छेचा बंदा मानतो. त्याने माझ्या इच्छेप्रमाणे आपली दैवी शक्ती वापरावी, अशी माझी अपेक्षा असते. त्याच्या इच्छेला अनुकूल आपली इच्छा बनविणे ही आस्तिकता आहे. पण मी उलटच करतो. माझा जय झाला पाहिजे ही माझी इच्छा मी ठरवूनच टाकली. फक्त यश त्याला मागतो. माझा पक्ष न्यायाचा असला, तर माझा जय होऊ दे, नाही तर मला अपयश येऊ दे. म्हणजे माझी बुद्धी तरी शुद्ध होईल, अशी प्रार्थना करायला पाहिजे वास्तविक. एक भारतीय आख्यायिका आहे. आंधळ्या धृतराष्ट्राच्या सहानुभूतीने गांधारीने डोळ्यांना पट्टी बांधून ठेवली होती. तिचा मुलगा दुर्योधन युद्धाला निघण्यापूर्वी तिला नमस्कार करण्यास आला, तेव्हा तिने  आशीर्वाद दिला, की तू सन्मार्गाने जात असशील, तर तुला यश येवो! हाच खरा आशीर्वाद आहे. देवा, माझी हरवलेली वस्तू मला मिळू दे, अशी प्रार्थना कशाला करायची? वस्तू मिळो वा न मिळो, माझी शांती न ढळो, अशी प्रार्थना करावी. मुलगा आजारी झाला असता, ‘माझा मुलगा न मरो’ ही काय प्रार्थना झाली? मनुष्य केव्हा तरी मरणार, हे ठरलेलेच आहे. आता न मरो अशी मागणी करायची असल्यास अमुक वेळी मरायला हरकत नाही, असे तरी ठरवा. आता मरो, २८ तारखेला मरो, अशी देवाजवळ निश्चित मागणी करा. पण अशी मागणी कोण करणार? म्हणून मुलगा मरायचा असला तर मरू दे, पण मरताना त्याला मानसिक व्याकुळता न होवो, अशी मागणी मागा.
 मला काय योग्य ते ईश्वरालाच कळते, म्हणून सकाम प्रार्थना नको
आधी आपले ते योग्य, असे ठरवूनच टाकता आणि मग देवाजवळ मदत मागता, याचा अर्थ असा, की देवाला तुम्ही आपल्या बुद्धीचा गुलाम करू पाहता. उपनिषदात एक गोष्ट आहे. एकावर देव प्रसन्न झाला. त्याला देवाने म्हटले, ‘वर माग.’ तो म्हणाला, ‘देवा, मला त्यातले काय कळते? मला काय योग्य आहे, याचेही ज्ञान कोठे आहे? तुलाच सारे कळते. मला जे योग्य असेल, ते तूच दे.’ तो भक्त कसोटीला उतरला. तीच खरी परीक्षेची वेळ होती. त्या वेळी त्याने स्वत: निर्णय करून तो देवावर लादण्याचा प्रयत्न नाही केला. माझ्या अकलेप्रमाणे देव वागायला तयार होत नाही, यातच माझे कल्याण आहे. तो माझ्या अकलेप्रमाणे वागायला तयार झाला, म्हणजे त्याला माझे अकल्याण करून मला शहाणपण शिकवायचे आहे, असेच नक्की समजावे. आम्ही आपल्या बुद्धीला प्रमाण समजतो व बुद्धीच्या निर्णयाप्रमाणे देवाने वागावे अशी अपेक्षा करतो, म्हणजे परमेश्वराला आमच्या बुद्धीप्रमाणे वागणारा नोकर समजतो. शक्तिशाली खरा, पण नोकरच. निर्णयाचा, विचाराचा हक्क त्याला नाही. आम्ही विचार करणारे, निर्णय घेणारे. आम्ही ‘विधिमंडळ’ आणि तो फक्त अंमलबजावणीखात्याचा अधिकारी. एखाद्या जड उपकरणाप्रमाणे देवाला वापरू पाहणे जडतेचे लक्षण आहे. अहंकाराचे तर आहेच. यात देवाचा उपमर्द आहे, नास्तिकपणा आहे.  सकाम भक्तीलाही सशर्त मान्यता
पण गीतेने दयाळू बुद्धीने क्वचित् असेही म्हटले आहे, की सकामतेने जरी भक्त मला शरण आला, तरी मी त्याला फळ देतो. तेवढय़ापुरती मी त्याचा कामना पुरी करतो. पण ते दयाळू बुद्धीने दिलेले आश्वासन मात्र आहे. ते काही शास्त्र नव्हे. ज्याला हित हवे असेल, त्याने निष्काम भावनेनेच शरण गेले पाहिजे. अनन्य भावाने व कळकळीने सकाम प्रार्थना केली, तरी ईश्वराच्या स्पर्शाने वृत्तीला पावित्र्य लाभेल. पण साधारणपणे माणूस सकाम प्रार्थना अनन्य भावाने करीत नाही. त्याची ईश्वरावर धड अश्रद्धा नसते, धड श्रद्धा नसते. आजारी झाला म्हणजे इकडे डॉक्टरचे पाय धरतो, तिकडे ब्राह्मणाकडून अनुष्ठान करवितो. त्याची श्रद्धाही डळमळीत, पुरुषार्थही अर्धवट! अशी दुबळी श्रद्धा, अध:पाताला कारण होते. सकामता गौण असली, तरी तिला अनन्य भक्तीची जोड असल्यास ती चालून जाईल. सकामताही अनन्य  निष्ठेने पावन होईल.
(परंधाम प्रकाशन, पवनार यांनी प्रकाशित केलेल्या स्थितप्रज्ञ-दर्शन या पुस्तकातून साभार)

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो