स्त्री. पु. वगैरे वगैरे : वैवाहिक आनंदासाठी..
मुखपृष्ठ >> स्त्री. पु. वगैरे वगैरे >> स्त्री. पु. वगैरे वगैरे : वैवाहिक आनंदासाठी..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

स्त्री. पु. वगैरे वगैरे : वैवाहिक आनंदासाठी.. Bookmark and Share Print E-mail

महेंद्र कानिटकर ,शनिवार, १८ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

माणसाची लंगिक प्रेरणा ही निसर्गदत्त आहे आणि त्या प्रेरणेला वाट मिळावी म्हणून समाजाने लग्नसंस्था आखून दिली आहे. या प्रेरणा दडपल्या की, नराश्य, चिंता, चिडचिड असे मानसिक त्रास होतातच, पण काही मनोकायिक आजार होण्याची शक्यता टाळता येत नाही. सुदैवाने पुरुष ५५ वर्षांपर्यंत आणि स्त्री ५२ वर्षांपर्यंत समाधानी आणि परिपूर्ण नॉर्मल कामजीवन जगू शकते. त्याकरिता एकच नियम, जो अगदी बेसिक आहे, तो पाळायला हवा..
एक
 सुप्रिया, असेल वय सदतीस-अडतीस, एका बँकेत ऑफिसर म्हणून कामाला आहे. दिसायला फार सुंदर आहे अशातला भाग नाही, पण कमालीची स्मार्ट आहे.  स्वत:ला कॅरी कसे करायचे ते तिला पक्के ठाऊक आहे. तिचे जिमला जाणे चुकत नाही. तिच्या पार्लरच्या वारीत खंड पडत नाही. घरातसुद्धा ती नीटनेटकीच असते. पशाला कमी नाही, त्यामुळे घरात दिवसभर कामाला बाई आहे, पण त्या बाईच्या कामावर तिचे काटेकोर लक्ष असते.
खरे तर सुप्रिया अगदी बाळबोध वळणाच्या घराण्यातून आलेली. एका खोलीच्या वाडय़ातल्या घरातून पुढे चार खोल्यांत राहू लागली. वडिलांची परिस्थिती होती म्हणून ती सायन्स पदवीधर झाली आणि एका मल्टिनॅशनल बँकेत नोकरीला लागली. दरम्यान तिचे दूध व्यवसाय करणाऱ्या सुहासशी लग्न झाले. नोकरीनंतर सुप्रियात आमूलाग्र बदल झाला, पण सुहासची जीवनशैली तीच राहिली. सुहासकडे पसे भरपूर होते, पण त्याचे राहणीमान सुप्रियाच्या भाषेत अगदी भय्यासारखे होते.  लग्न झाल्यापासून सुहासच्या दोनच गोष्टी बदललेल्या होत्या. एक- पूर्वी दुधाच्या बरण्या असत. आता पिशव्यातून दूध जाई आणि पूर्वी डोक्याला मुंडासे बांधून तो दूध घालायला जात असे. आता कुणी माणूस आला नाही तरच त्याच्यावर वेळ येई.
सुप्रिया स्वत:बद्दल जितकी जागरूक तितकाच सुहास बेफिकीर. कसाही राहायचा. कुठल्याही टपरीवर चहा-भजी खायचा. रोज सकाळी ४ वाजता त्याचे काम सुरू होई म्हणून रात्री ९ वाजताच झोपायचा. सुप्रिया आठ वाजता घरी येई. दोघांच्यात संवाद जवळजवळ नव्हताच. तो रात्री जवळ घेऊन सेक्सची मागणी करे, पण तिचे त्याच्याबद्दलचे आकर्षण संपले होते. त्याला मात्र ती रोजच हवी असायची. अनेकदा ती नाहीच म्हणे, पण मग तिला नाही म्हणण्याचीसुद्धा लाज वाटून हो म्हणे, पण त्या संबंधात ओढ नसायची, समाधान तर लांबची गोष्ट.
अनेकदा सुप्रियाने त्याला चांगले राहण्याबद्दल सुचवून पाहिले, पण त्याच्यावर परिणाम झाला नाही. तो इतकेच म्हणायचा, तू जिथे कामावर जातेस तिथे तुला जसे जायचे तसे जा. मी गवळी आहे. मला माझ्या रीतीने राहू दे, पण त्याच्या अशा राहण्याचा परिणाम त्या दोघांच्या कामजीवनावर होत आहे हे सुप्रिया कधी नीट सांगू शकली नाही. परमेश्वराने दिलेला स्ट्रेस बस्टर आपल्या आयुष्यात नाही हेच तिने स्वीकारले आहे. तिला वाटते          लग्नाच्या वेळी आपण बाबांनी पसंत केला म्हणून सुहासला होकार दिला हे चुकलेच, पण तेव्हा बाबांची परिस्थिती यथातथाच होती आणि सुहासचे घर किती तरी समृद्ध होते. दोन वाडे, शिवाय गावाकडे शेती. नाव ठेवायला जागा नव्हती आणि पहिल्या कार्यक्रमातच होकार आला आणि लग्न झालेसुद्धा! एक मात्र निश्चित, सेक्सलेस जोडपे असूनही ते नांदत होते.
दोन
‘‘महेंद्र, मला खूप महत्त्वाचे शेअर करायचे आहे.’’ निनादचा फोन होता. आम्ही बऱ्याच दिवसांत भेटलो नव्हतो. तो सरकारी नोकरीत असल्यामुळे त्याच्या बदल्या होत. तसा तो खालच्या हुद्दय़ावर होता, पण राहणीमान कलेक्टरला शोभेसे. मागे एकदा त्याने सांगितले होते, पाण्यात राहून माशाशी वैर करता येत नाही. त्यामुळे जी थोडी फार वरकमाई असते ती मी उंची कपडे वगरे घेण्यात घालवतो. त्याचे तत्त्वज्ञान वेगळेच. निनादची बायको पोष्टात होती. मला नेहमी दोघांना एकत्र पाहिलं की नवल वाटायचं. हा तुकतुकीत तर त्याची बायको विद्या अगदी साधी. याच्या हातात तीन तीन अंगठय़ा, तर तिच्या गळ्यात मंगळसूत्रापलीकडे काही नाही. लग्नानंतर तिला चष्मा लागला होता. त्याचीसुद्धा फ्रेम इतकी साधी आणि बटबटीत. मी मागे एकदा निनादला विचारले होते, ‘‘तू  लेका, इतकी छानछौकी करतोस, थोडेसे पसे वहिनीच्या वाटय़ाला दे.’’ ‘‘तिला नाही आवडत.’’ इतकेच तो बोलला.
परवा अखेर आम्हाला दोघांना भेटायला वेळ मिळाला. ‘‘मला माझ्या संसाराचा कंटाळा आला आहे. तुला सांगतो, मला तिच्याबद्दल ‘काहीच’ वाटत नाही. असे वाटते बदलीच्या ठिकाणी मी एकटा असतो ते बरे असते. आता पुण्यात येऊन दोन र्वष झाली. तुझा विश्वास बसणार नाही, आमचा संबंध एकदासुद्धा आला नाही. ती इतकी गबाळी राहते की, मला तिच्या शेजारीसुद्धा जावेसे वाटत नाही. मुलांना आईजवळ झोपायची सवय आहे, त्यामुळे ती आणि मुले बेडरूममध्ये आणि मी बाहेरच्या खोलीत आणि त्याचे तिला काहीही वाटत नाही. लग्न झाल्यापासून आजपर्यंत तिने सेक्सबाबत पुढाकार घ्यायचे सोड, सिग्नलसुद्धा दिले नाहीत. मुले काय रे होतात.’’
‘‘तू तिच्याशी या विषयावर बोललास का कधी?’’ माझा समुपदेशक पद्धतीचा प्रश्न.
‘‘मी तिला वेगवेगळ्या मार्गानी सुचवून पाहिले. चष्मा जावा म्हणून तुझे नवीन निघालेले लेझर ऑपरेशन करू. तिची ना. म्हणे भीती वाटते. मग म्हणालो लेन्सेस बसवू. ती म्हणाली, फार सांभाळाव्या लागतात. मी म्हणालो, आपण चांगल्या साडय़ा आणू तुला पाहिजे त्या. बजेटची चिंता करू नको. तिचं उत्तर तयार असतं- मी पोस्टात काम करते. तिथे चांगले कपडे घातले तर लोकांची नजर सहन करावी लागते. काय सांगू, घरातसुद्धा ती अशी राहते ना की विचारूस नको. कधीही बघा, हिच्या अंगावर कळकट गाऊन, केस वर बांधलेले. मला तिच्याबद्दल आकर्षण का वाटावे? एका बाजूला वाटते, आपल्याकडे वरकमाई आहे. त्यातून इतर करतात तसे बाहेरचे शौक करावेत, पण संस्कार आडवे येतात. खूप तडफडतो. या पलीकडे काय करणार?’’ त्याने शेवटचा प्रश्न विचारला तो मात्र मला विचार करायला लावणारा होता. ‘‘महेंद्र, लग्न म्हणजे समाजमान्य शरीरसंबंध ही एक व्याख्या असेल तर माझ्या लग्नाला लग्न म्हणायचं का?’’
तीन
गेल्या आठवडय़ात एक सासरे भेटायला आले. ‘‘आमच्या मुलाचं आणि सुनेचं काही तरी बिनसलंय. लग्नाला दोन र्वष झाली, पण समाधानी वाटत नाहीत.’’
मग त्या मुलाला आणि सुनेला बोलावून घेतले. मुलगा इंजिनीअर, एका आयटी कंपनीत. सूनही चांगली शिकलेली, चांगल्या नोकरीत. नेहमीप्रमाणे आम्ही चौकशी केली. भांडणे कशामुळे होतात वगरे विचारले. त्याला त्यांनी थातूरमातूर उत्तरे दिली, पण तरीही दोघे अस्वस्थ होते. मूळ समस्या काही तरी वेगळीच आहे हे जाणवत होते. गौरीने मुलाला बाहेर थांबायची विनंती केली आणि सुनेला विचारले, ‘‘तुमचे कामजीवन कसे आहे?’’ प्रश्न साधा होता, पण उत्तर अनपेक्षित होते. ‘‘मी अजून कुमारिकाच आहे. दोन वर्षांत आमचा कधीही संबंध आला नाही आणि ही गोष्ट आज पहिल्यांदा मी कोणाशी तरी बोलत आहे. माझ्या आईलाही माहिती नाही. त्याच्या घरच्यांना माहीत असेल असे वाटत नाही.’’
 या प्रकारच्या घटना अपवादात्मक नाहीत. फक्त त्या बाहेर येत नाहीत. मुळात लग्न म्हणजे समाजमान्य शरीरसंबंध हे आपल्या मनात खोलवर रुजलेले नाही. अनेकांना शरीर संबंध हि परमेश्वराने दिलेली विशेष देणगी आहे यावर पूर्ण विश्वास नाही. कामजीवन हे दोघानांही आनंदाचे, मनोरंजनाचे साधन वाटायला हवे. ते जर एकाला कोणाला वाटत नसेल तर ते तसे का वाटत नाही याचा शोध घ्यायला हवा. कारणे शोधून काढणं मोकळेपणाने बोलल्याशिवाय होणार नाही. अनेक पती पत्नी एकमेकांना तुला कामजीवनात नेमकं काय आवडते आणि काय आवडत नाही हे प्रश्न एकमेकांना विचारत नाहीत. त्यात काय विचारायचं समजते आपोआप अशीच वृत्ती दिसून येते.
कदाचित जागेचा प्रश्न असल्यामुळे अनेकांना एकमेकांच्या  संपूर्ण उघडया शरीराचा परिचय होत नसेल तर गोष्ट वेगळी. पण स्वतंत्र बेडरूम असलेली जोडपी सुद्धा आम्ही उजेडात संपूर्णपणे पाहिलेले नाही असे सांगणारी जोडपी कमी नाहीत. कामजीवन हे अंधारात झाकलेले आणि अगदी राहवले नाही तरच करायचे असते असा मोठा  गरसमज आहे. त्यात दोघेजण नोकरी करीत असतील तर दोघे इतके दमलेले असतात कि तरुण असूनसुद्धा एकमेकांच्या कुशीत झोपायचे भानही राहत नाही.
आपल्याकडे नवरा बायकोने  चारचौघात एकमेकांना स्पर्श करणे थोडेसे चुकीचेच मानले जाते. कित्येक घरात मुलांच्या समोर आई बाबा जवळ जवळ हि बसत नाहीत.
या सगळ्या गोष्टी वैवाहिक जीवन समृद्ध होण्याच्या आड येत असतात हे अनेकांच्या लक्षात सुद्धा येत नाही. हे बदलले पाहिजे असे एकाला वाटले तरी तो पुढाकार घेऊन काही पावले उचलत नाही. आपल्याकडे ,स्त्रीने सेक्स बाबत थोडाही पुढाकार घेणे बऱ्याच पुरुषांना पसंत नसते. आणि स्त्री ही अनंत काळाची माता असल्यामुळे निनादच्या पत्नीप्रमाणे त्या कोशात जाण्याची शक्यता असते. पुन्हा हा विषय अगदी खासगी. विचार करा सुप्रिया सांगेल का कोणाला सुहासचे आणि तिचे संबंध कसे आहेत ते? एका अर्थाने सुप्रिया सुखी, निदान तिच्या टापटीप राहण्याचा सुहास संशय घेत नाही. पण नवरा साधा व पत्नी जरा नीट राहू लागली की संशय आलाच.
असे सर्व संसार फार अपुरे आणि अतृप्त असतात. माणसाची लंगिक प्रेरणा ही निसर्गदत्त आहे आणि त्या प्रेरणेला वाट मिळावी म्हणून समाजाने लग्नसंस्था आखून दिली आहे. या प्रेरणा दडपल्या की नराश्य चिंता चिडचिड असे मानसिक त्रास होतातच, पण काही मनोकायिक आजार होण्याची शक्यता टाळता येत नाही.
सुदैवाने पुरुष ५५ वर्षांपर्यंत आणि स्त्री ५२ वर्षांपर्यंत समाधानी आणि परिपूर्ण नॉर्मल कामजीवन जगू शकते. त्या करता एकच नियम , जो अगदी बेसिक आहे ,तो पाळायला हवा.
आपल्या पती किंवा पत्नीला आपल्याबद्दल शारीरिक आकर्षण वाटेल असे आपण वागायला हवे. आपण सुंदर नसू देखणेही नसू पण आपल्या जोडीदाराला अनुरक्त करण्यासाठी ज्या काही क्लुप्त्या वापराव्या लागणार आहेत त्या स्त्री आणि पुरुष दोघांनीही वापरायला हव्या आहेत. रंग रूप आपल्या हातात नसते, पण शरीराने आणि मनाने  निर्मळ आणि नीटनेटके राहणे आपल्या हातात निश्चित असते.
एकमेकांची शरीरे ओळखून स्पर्शाचा आनंद घेणे हेही तितकेच महत्त्वाचे असते. सेक्स ही केवळ क्रिया न मानता प्रेम आणि आकर्षण व्यक्त करण्याचे साधन मानले तर सहजीवनातील आनंद वाढू शकतो. त्याकरता एकमेकांचा अनुनय करणे, जोडीदाराला खुलवणे ही कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे.
परमेश्वराने सेक्स हे मनोरंजनाचे साधन म्हणून फक्त मानवजातीला दिले आहे. त्याचा उपयोग करणे तर शेवटी दोघांच्याच हाती!
यामुळे दोघांमधले कितीतरी प्रश्न कमी होतील, पण विवाहबाह्य नातीही कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो