भारत ‘त्यांचाही’ देश आहे
मुखपृष्ठ >> लेख >> भारत ‘त्यांचाही’ देश आहे
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

भारत ‘त्यांचाही’ देश आहे Bookmark and Share Print E-mail

डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी
शर्वरी जोशी ,शनिवार, १८ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

महाराष्ट्रात येऊन भारतीय संस्कृतीच्या विविध अंगांचा अभ्यास करणाऱ्या परदेशी स्त्रिया-मुलींचं प्रमाण लक्षणीय आहे. चौथ्या वर्षांपासून भरतनाटय़म शिकणारी मरियम हॉक असो की गुजरात, राजस्थानमधील कलेचे संवर्धन करण्यासाठी  ‘कला रक्षा’ ही संस्था स्थापन करणाऱ्या ज्युडी फ्रेटर असो, आयुर्वेदिक कुकिंगचं महत्त्व जगाला पटवून देणाऱ्या ईडा बेन्जेस ऊर्फ रत्ना,अद्वैत वेदांत तत्त्वज्ञाना’वर निबंध लिहिणाऱ्या ६७ वर्षीय सोफिया रिक्स अशा अनेक जणी. आज त्यांनी भारतालाच आपली कर्मभूमी मानलंय. त्यांच्या या भारतीय संस्कृती जाणून घेण्याच्या तळमळीतून आपणही खूप शिकण्यासारखं आहे..
साधारणपणे इ.स.पू. तिसऱ्या शतकापासून अफगाणिस्तानमार्गे येण्याचा मार्ग युरोप-आशियातील लोकांना माहिती झाला. या खुष्कीच्या मार्गानं अनेक आक्रमकांच्या टोळ्या भारतात आल्या. तसंच केवळ कुतूहल म्हणून अनेक परदेशी प्रवासी आणि अभ्यासकही भारतात आले. आजच्या ‘जग : एक खेडे’च्या काळात आपल्याला याचं काहीच अप्रूप वाटत नाही आणि ते स्वाभाविकही आहे. कारण आज बहुतांशी दर कुटुंबातली एक तरी व्यक्ती परदेशात असते. आणि नाशिक-कोल्हापूरसारख्या तुलनेनं लहान शहरांतूनसुद्धा परदेशी पर्यटक सहजी दृष्टीस पडतात. भारतीयांनी भौतिक समृद्धीची आस बाळगून शिक्षण-नोकरीसाठी परदेशी जाणं समजण्यासारखं (पटलं नाही तरी!) आहे. पण अशा भौतिक समृद्धीची फारशी शक्यता नसतानाही अनेक परदेशी लोक इथं येतात, राहतात. ते का? महाराष्ट्रात येऊन भारतीय संस्कृतीच्या विविध अंगांचा अभ्यास करणाऱ्या परदेशीयांत स्त्रिया-मुलींचं प्रमाण लक्षणीय आहे. शास्त्रीय संगीत, वादन, नृत्य, भाषा, लोककला, लोकसमजुती, योग, आयुर्वेद इ. सांस्कृतिक घटकांचा अभ्यास करण्यासाठी इथं वारंवार येणाऱ्या, इथंच वास्तव्य करणाऱ्या स्त्रिया व मुलींना या विशिष्ट अभ्यासाची प्रेरणा कशी मिळाली, तत्पूर्वी त्या काय करत होत्या, इथं अभ्यास करताना वा शिकताना त्यांना कोणते अनुभव आले, स्वत:च्या देशातील लोकजीवनात व इथल्या लोकजीवनात त्यांना काय फरक आढळले, भारतीय लोकांबद्दल त्यांना एकंदरीत काय जाणवलं, असे काही प्रश्न मनात घेऊन भाषा-शिक्षण, संगीत, नृत्य आणि लोकसमजुती यांचा अभ्यास करणाऱ्या स्त्रियांशी संपर्क साधला तेव्हा त्यांच्या नजरेतून आपण, आपली संस्कृती कशी दिसली? हे काही प्रमाणात जाणून घेता आलं.
ज्युडी फ्रेटर ही खरे तर अमेरिकन मानववंश शास्त्रज्ञ! १९७० साली गुजरातमध्ये सुधारित बाटिक शैलीचा अभ्यास करायला म्हणून गुजरातेतील भुज या कच्छच्या वाळवंटात आली. ‘‘तेथील अनेक कारागिरांशी संवाद साधताना मला माझ्या ‘अंतरात्म्याचा आवाज’ ऐकू आला आणि माझी कर्मभूमी हीच आहे असे स्पष्टपणे मला जाणवले,’’ ज्युडी फ्रेटर सांगतात. ‘थ्रेड्स ऑफ आयडेंटिटी’ हे पुस्तक त्यांनी ‘रबरी’ या भटक्या जमातीमधील कारागिरांवर आणि ‘मरू मेघवाल’ या कच्छमधील जमातीतील कारागिरांबरोबर वावरताना आलेल्या अनुभवांवरून लिहिले. ‘‘अनेक पाकिस्तानी रेफ्युजीदेखील इथे त्या वेळी राहात होते. यांची कलाकारी ही यांच्या जीवनानुभवाचा परिपाक आहे.’’ त्या आपला अनुभव सांगतात. त्यांच्या या कामाचं अर्थातच भारतीयांनी कौतुक केलंच. ओजस्विनी अलंकरण अ‍ॅवार्ड, क्राफ्ट कौन्सिल ऑफ इंडियाचे कमला सन्मान अ‍ॅवार्ड असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
ज्युडी यांनी पुढे पुण्यात एका सुवर्णाकाराकडे दागिन्यांशी संबंधित काही गोष्टींचे अध्ययन केले आणि नंतर ‘राजा केळकर’ संग्रहालयासाठीही काम केले. पुढील शिक्षणासाठी त्या अमेरिकेला परत गेल्या आणि १९८१ साली ‘साऊथ एशियन स्टडीज’मध्ये आणि १९८७  साली ‘म्युझिऑलॉजी’ या विषयात आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. १९९७ साली पुन्हा त्या भारतात परतल्या आणि इथल्याच होऊन गेल्या. त्यांना अस्खलित िहदी आणि थोडी मराठीदेखील बोलता येते.  
राजस्थान आणि गुजरातमधील दस्तकार जमातींमध्ये असलेली कलेची जाण त्यांनी पारखली. त्या म्हणतात, ‘‘काळाच्या ओघात ही कला कुठे तरी लुप्त होत चालली आहे असे मला जाणवत होते आणि यासाठी काही तरी आपल्याकडून व्हायला हवे असे मला वाटत होते. ‘कला रक्षा’ या संस्थेचा जन्म याच पवित्र भावनेतून झाला,’’ त्या सांगतात. ज्युडी फ्रेटर यांनी ‘म्युझियम ऑफ हायरलूम एम्ब्रॉयडरी’ची स्थापनाही केली आहे. कच्छपासून २५ कि.मी. अंतरावर हे संग्रहालय आहे. ‘कला रक्षा’ ही संस्था अशा कारागिरांच्या उत्कर्षांसाठी अविरत झटत आहे. २००० साली झालेल्या भीषण भूकंपात अक्षरश: उन्मळून पडलेल्या कच्छमधील गरीब कारागिरांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना या संस्थेने नव्याने आणि सन्मानाने जगण्यास शिकवले. ‘कला रक्षा’ या संस्थेत सूफ, रबरी, गराशिया अशा अनेक जमातींमधील गुणी कलाकारांना प्रशिक्षित केले जाते आणि त्यांना आपला व्यवसाय उभारण्यास सर्वतोपरी मदत केली जाते. ज्युडी सध्या अनेक कारागिरांना सोबत घेऊन त्यांच्या कलेचे प्रदर्शन भरवण्यासाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेल्या आहेत..
अनिता (नीरदा) गोमेन आणि ईडा बेन्जेस या दोन जर्मन महिला. भारतीय खाद्यसंस्कृती जीवनपद्धती, तत्त्वज्ञान, संगीत, रोगोपचार पद्धती यांनी प्रभावित होऊन भारतात आल्या काय आणि इथल्याच होऊन गेल्या. लोणावळ्याजवळ असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजमध्ये या दोघी जवळजवळ २०-२५ वर्षांपासून राहात आहेत.  अनिता यांचे आईवडील पूर्वी भारतात येऊन गेले असल्याने भारतीय संस्कृतीबद्दल त्यांना अपार आदर होता. मुलीचे नावही त्यांनी तसेच ठेवले. गाण्याची आवड असलेली ही मुलगी भारतीय शास्त्रीय संगीत आवडीने शिकली. लझानिया येथे शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या अनिता यांनी म्युझिक थेरपी या विषयातून झुरिक येथून आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पदवीचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘भारतीय संगीत’ या विषयावर एक प्रबंधही लिहिला. योगायोगाने त्यांना आत्मसंतुलन व्हिलेजच्या जर्मनीमधील एका सेमिनारदरम्यान भारतात म्युझिक थेरपीवर उत्तम काम सुरू आहे हे कळले आणि या क्षेत्रात आणखी काही शिकायला मिळेल म्हणून दोन-तीन महिने राहण्याचा विचार करून त्या भारतात आल्या, पण परत मात्र गेल्या नाहीत. आता तर मराठीही त्यांना छान बोलता येते.
‘वैदिक मंत्र, स्तोत्रे, भारतीय संगीतातील राग इत्यादींचा इतका सखोल अभ्यास भारतीयांनी किती तरी युगे आधीच करून ठेवला आहे. हा खजिना जेवढा लुटता येईल तेवढा लुटायला हवा. मग त्यासाठी आपला देश सोडावा लागला तरी बेहत्तर!..’ ही त्यांची भूमिका असल्याने कित्येक वर्षांपासून त्या भारतवासी आहेत. नीरदा गोमेन यांच्या स्तोत्रे, म्युझिक थेरपीसंबंधीच्या अनेक सीडीज् प्रकाशित झाल्या आहेत. रोगोपचार पद्धतीत भारतीय संगीताचे, मंत्र, श्रुती, श्लोक आदींचे स्थान या विषयाच्या प्रसाराचे कार्य त्या जगभर फिरून करीत आहेत.
आहारशास्त्रज्ञ असलेली  ईडा बेन्जेस (आताची रत्ना)म्हणते, ‘‘आमच्याकडे शाकाहारी अन्न म्हणजे अत्यंत बेचव, कुठलेही विशेष मसाले वगरे नसलेले आणि बहुधा उकडलेले, भाजलेले किंवा बेक केलेले एवढेच माहिती असते. मला माझ्या एका मत्रिणीने भारतीय शाकाहारी अन्नपद्धतीबद्दल सांगितले होते तेव्हापासूनच भारतात यायचे आणि इथला स्वयंपाक शिकायचा हे मी ठरवले होते. इथे आल्यानंतर मात्र मी अगदी मंत्रमुग्धच झाले. आपल्या आरोग्याचा आपल्या आहाराशी आणि स्वयंपाक करण्याच्या पद्धतीशी असलेला संबंध आयुर्वेदाइतका क्वचितच कोणी अभ्यासला असेल. भारतीय पद्धतीचा स्वयंपाक, पंचकर्म चिकित्सा इत्यादी बाबी जेव्हा मी शिकायला सुरुवात केली तेव्हा माझ्या लक्षात आले की, एखाददोन वर्षांत हे होण्यासारखे नाही. मग मी इथेच राहायचे ठरवले.’’
रत्ना या उत्तम चित्रकार आहेत. ‘भारतीय संस्कृती’ या विषयावर त्यांनी असंख्य चित्रे काढली आहेत. गेल्या चौदा वर्षांपासून रत्ना लोणावळ्यात आहारतज्ज्ञ म्हणून काम करीत आहेत आणि ‘आयुर्वेदिक कुकिंग’चे महत्त्व जगाला पटवून देण्यासाठी झटत आहेत..
भारतात आली आणि भारताचीच झाली अशी एक शेरिल. भारतीय संस्कृतीचा अभ्यास करत ब्लॉगच्या माध्यमातून त्याचा सर्वत्र प्रसार करते आहे. ही शेरिल कुक ऑस्ट्रेलियात जन्मलेली पण भारतीय पुरुषाशी विवाह करून आता मुंबईत स्थिरावलीय. ‘अबाऊट डॉट कॉम’च्या ‘इंडिया ट्रॅव्हल’ या साइटसाठी ती ब्लॉग्ज लिहिते आहे. २००० साली ती भारतात पर्यटनासाठी म्हणून आली आणि भारताच्या प्रेमात पडली. पुढे कोलकात्यातील एका हॉटेलमध्ये डीजे असणाऱ्या भारतीय पुरुषाशी तिने विवाह केला. भारतातील पर्यटन स्थळे, खाणंपिणं, वेशभूषा, दागदागिने, भारतीयांची श्रद्धाळू मनोवृत्ती, यांचा तिचा असलेला सखोल अभ्यास आणि त्या अनुषंगाने तिच्या कामाविषयीची तिची आस्था हेदेखील तिच्या ब्लॉग्जमध्ये उत्कटपणे व्यक्त होते. भारतीय विवाहसंस्था आणि कुटुंबव्यवस्था ही अत्यंत मजबूत आहे आणि भारतीय पुरुषाशी लग्न केल्याने मानसिक स्थर्य लाभले आणि मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करू शकले हेही शेरिल आनंदाने मान्य करते..
शेरिल प्रमाणेच भारतीय संस्कृतीच्या प्रेमात पडल्या जर्मनीच्या ६७ वर्षीय सोफिया रिक्स. त्या मूळच्या शाळा शिक्षिका आणि गायिकाही! लहानपणापासून संगीताची आवड असल्यानं व्हॉयोलिन व फ्लूट ही वाद्यं त्या शिकल्या. ‘बर्लिन फिलहार्मनिक ऑर्केस्ट्रा’ या तिथल्या प्रसिद्ध ऑर्केस्ट्रात त्या सातत्यानं गातही होत्या. प्राचीन भारतीय संस्कृतीविषयी जाणून घेण्यासाठी १९६८ मध्ये त्या पहिल्यांदा भारतात आल्या. तत्पूर्वी ‘अद्वैत वेदांत तत्त्वज्ञाना’वर त्यांनी निबंध लिहिला होता. भारतात शास्त्रीय संगीताची परंपरा, घराणा-गायकी अजूनही बरीचशी शुद्ध स्वरूपात टिकवून आहे. हे संगीत आध्यात्मिक अनुभूती देऊ शकते म्हणून स्वाभाविक ओढीनं त्या शास्त्रीय संगीताकडे वळल्या. १९९०-९६ या काळात त्या दर सुट्टीत भारतात येत गेल्या आणि १९९६ पासून त्या आता इथेच वास्तव्यास आहेत. डॉ. सुनीता खाडिलकर, पं. मोहनकुमार दरेकर यांच्याकडे त्या शास्त्रीय संगीताचं आणि विद्यानंद देशपांडे यांच्याकडे तबलावादनाचं शिक्षण घेत आहेत.
‘‘प्राचीन भारतीय संस्कृती आपल्याला ‘स्वत:पर्यंत’ जायला मदत करते, आपला ‘स्व’ शोधण्यास मदत करते,’’ असं त्यांचं म्हणणं आहे. रागदारी संगीतातून आपण ‘आतलं’ काही आविष्कृत करू शकतो, असा त्यांचा विश्वास आहे.
इथे येण्यापूर्वी त्या पाश्चिमात्य संगीत क्षेत्रात काम करत होत्या त्यामुळे साहजिकच दोन्ही पद्धतीच्या संगीताची तुलना होते. युरोपियन शास्त्रीय संगीत अगदी बारीकसारीक तपशिलासह, वेळेसह आणि कारागिरीसह अचूक बांधलेलं असतं. त्यात कलावंताच्या बाजूनं उत्स्फूर्त आविष्काराला फारसा अवकाश नसतो, पण तरीही त्यातून मिळणारा आनंद वेगळा आहे, असं त्या सांगतात. जो सांस्कृतिक वारसा, जे परंपरेचं वैभव भारतीयांना लाभलंय ते केवळ भारतीयांनाच नाही, तर आजमितीला जगभरातल्या लोकांना उपयोगी पडणारं आहे, पण त्याची असावी तशी जाण आणि व्हावी तशी जपणूक इथं होत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. आपले गुरू डॉ. सुनीता खाडिलकर आणि पं. मोहनकुमार दरेकर यांच्याविषयी त्यांना आदर तर आहेच, पण हार्मोनियमऐवजी ते तानपुऱ्यावर शिकवितात, यातलं मर्मही त्यांना जाणवलं आहे!
सोफिया रिक्स प्रमाणे श्रीमती अ‍ॅलिस व्ॉटसन याही शिक्षिका. अमेरिकेत त्या इंग्रजी शिकवत असत. निवृत्त झाल्यावर ‘शिक्षण संस्था- त्यातही बिनसरकारी शिक्षण संस्थांपुढची भाषा-शिक्षणाची आव्हानं आणि त्यांची ताकद’ या विषयावर पुस्तक लिहिण्याचं ठरवून त्या भारतात आल्या. भाषा-शिक्षणाविषयीचा दृष्टिकोन अधिक सखोल आणि अधिक व्यापक बनवायचा, जुनं सारं पुसून टाकून नवी पाटी घेऊन नितळपणे पुन्हा पहिल्यापासून शोध घ्यायचा ही यामागची प्रेरणा. यासाठी त्यांना भारतात का यावंसं वाटलं? तर इथली बहुभाषिकता! इथली बहुभाषिकता, बहुसांस्कृतिकता आणि त्यातूनही प्रकर्षांनं जाणवणारी एकात्मता यांचं त्यांना सकौतुक आश्चर्य वाटतं. त्याचबरोबर एकाच राष्ट्रीय भाषेच्या गरजेविषयी इथे जे वाद झडतात, ज्या चर्चा होतात, त्याविषयीही त्यांना उत्सुकता आहे.
माणसामाणसांतल्या संवादाचं भाषा हे श्रेष्ठ माध्यम आहे, हे आपण जाणतोच. मानवी उत्क्रांतीच्या आजच्या टप्प्यावर, वैश्विक पातळीवर मानवी संवाद कसा समृद्ध करता येईल, याचा विचार श्रीमती अ‍ॅलिस करताहेत. त्या म्हणतात, ‘‘इथे आल्यावर दोन वर्षांतच जणू २० वर्षांचा अनुभव गोळा झाला आणि माझ्या पुस्तकाचा, माझ्या चिंतनाचा रोखच बदलला!’’ त्यांच्या मते पूर्णपणे मानवी म्हणजे बुद्धी, भावना, आत्मा, चैतन्य आणि शरीरासह मानवी अस्तित्व! ‘‘बोलणं, वाचणं आणि लिहिणं यामुळे माझं जगाविषयीचं आकलन वाढेल, त्यातून माझं आयुष्य     (पान १ वरून) बदलेल, माझ्या माणसांचं बदलेल आणि अशाही माणसांचं बदलेल ज्यांना मी कधीच भेटले नाही.. जन्मत:च लाभलेल्या प्रतिभा आणि बुद्धीच्या साहाय्यानं भाषा-शिक्षक म्हणून मी काय योगदान यासाठी देऊ शकते, असा विचार मी इथे आल्यावर करायला लागले. या पुस्तकाचं बीज मी मायदेशात असताना माझ्यात रुजलं हे खरं, पण ते वाढताना मी इथे पाहतेय.’’ इथल्या लोकांनी अॅलिसना, जे मनापासून सहकार्य केलं ते त्यांना फार सुखावून गेलं. त्यामुळे भाषेच्या माध्यमातून, संवादाच्या माध्यमातून एकूण मानवी जाणीव समृद्ध होईल या त्यांच्या विश्वासाला अधिक बळकटी मिळाली.
भारतीय संस्कृतीवर विशेषत: भारतीय नृत्यावर प्रेम करणारी मरियम हॉक ही जर्मनीतल्या ब्रेमेन शहरातली मुलगी. वयाच्या चौथ्या वर्षी तिनं तिथं बंगाली लोकांच्या दुर्गापूजेच्या वेळी ‘भरतनाटय़म्’ नृत्य पाहिलं आणि ‘मला हे शिकायचंय’ असं ठरवलं. आध्यात्मिक साधना करणाऱ्या आपल्या आईबरोबर वयाच्या नवव्या वर्षी ती प्रथम भारतात- पुण्यात आली. तेव्हापासून गेली १५-१६ वर्षे जवळजवळ दरवर्षी एकदा अशी ती पुण्याला येतेय. जर्मनीत शालेय शिक्षणाबरोबरच दहाव्या वर्षांपासून एका श्रीलंकेच्या नृत्य गुरूंकडे ती भरतनाटय़म्ही शिकत होती. शालेय शिक्षण संपल्यावर मात्र अधिक गंभीरपणे, अधिक सखोल असं नृत्यशिक्षण घेण्याच्या हेतूनं पुण्यात आली. वेगवेगळ्या तीन-चार मंडळींकडे तिनं चौकशी केली असता त्या सर्वानी एकमुखानं तिला डॉ. सुचेता भिडे-चाफेकर यांचं नाव सुचवलं. आणि मरियमचं नृत्यशिक्षण सुचेताताईंकडे सुरू झालं. ती त्यांच्याचकडे राहते. ‘‘त्या चांगल्या गुरू तर आहेतच, पण माझी आईसारखीच काळजी घेतात’’ असं ती सांगते.  ‘‘एकटी मुलगी एवढय़ा लांब शिकायला जाणार याची स्वाभाविक काळजी आईला होती. पण ‘पुणं’ तसं परकं नाही तिलासुद्धा. म्हणून परवानगी मिळाली’’ असं ती म्हणाली.
इथे ती अगदी सराईतपणे रिक्षातून हिंडते. थोडं थोडं मराठी आणि हिंदीही तिला समजतं. इथल्या शाकाहारी पदार्थाच्या वैविध्यावर ती खूश आहे. दाल-चपाती-सब्जी असं जेवण तिला आवडतं, इथली उबदार हवा आवडते. जर्मनीत जरी ती नृत्य शिकली असली तरी सुचेताताईंची पद्धत निराळी असल्यामुळे पुन्हा सुरुवातीपासून नृत्याचे धडे गिरवते आहे. नृत्यासाठी ताल महत्त्वाचा. त्यामुळे तिला आता हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतही शिकायचं आहे. एकटं राहण्याचा व कंटाळा येण्याचा प्रश्नच येत नाही, कारण लहानपणापासून नृत्य शिकण्याच्या ध्यासानं झपाटलेली ही मुलगी दिवसाचा सारा वेळ नृत्यातच रमलेली असते.
इथं रस्त्यानं जाताना लोक वळून पाहतात, आपसात कुजबुज करतात, त्याची आता सवय झाली पण ते विचित्र वाटतं, असं ती सांगते. इथल्या आणि तिथल्या लोकांत सामान्यपणे काय फरक दिसला, या प्रश्नावर तिचं उत्तर होतं की इथे विचारांची स्पष्टता फार कमी आहे. म्हणजे दुकानात जाऊन हिरवी साडी द्या म्हटलं तरी दुकानदार लाल व पिवळी साडीसुद्धा दाखवतो!
स्पष्टपणे पण नम्रपणे व्यक्त होण्यात आपण (भारतीय) कमी पडतो असंच काहीसं म्हणणं आहे क्लाऊडिया (नाव बदललं आहे) या अमेरिकी तरुणीचं. ही मानववंशशास्त्राची अभ्यासक, पहिल्यांदा २००० मध्ये पर्यटक म्हणून भारतात आली. त्या वेळी मानववंशशास्त्राच्या एका संशोधन प्रकल्पासाठी जात्यावरच्या ओव्यांचं संकलन तिनं केलं. त्या वेळी महाराष्ट्रातल्या- विशेषत: पुणे आणि नाशिक परिसरातल्या खेडोपाडी ती हिंडली. आजही खेडेगावातली अनेक बाळंतपणं सुईणी करतात. या सुईणींवर तिनं एक अभ्यास प्रकल्प केला. २००६ मध्ये तिने पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधील ‘अमेरिकन इन्स्टिटय़ूट इन इंडियन स्टडीज’मध्ये मराठीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आज ती मराठी बोलू शकते. ग्रामीण भागातील स्त्रियांशी संवाद साधताना तिला भाषेची फारशी अडचण पडत नाही. महाराष्ट्रातल्या ग्रामीण आणि निमशहरी भागांतून आपल्या कामासाठी फिरताना तिला जाणवलं की इथले लोक बोलायला, माहिती पुरवायला अगदी तत्पर आहेत. आपल्या संस्कृतीविषयी कुणी परदेशी व्यक्ती- विशेषत: स्त्री काही जाणून घ्यायला उत्सुक आहे, याचं त्यांना कौतुक वाटतं. भारतीय संस्कृती फार गुंतागुंतीची आहे आणि तिच्यात स्त्रीची भूमिका फार महत्त्वाची आहे, असं तिचं निरीक्षण आहे.
मूळची अमेरिकी असलेली पण सध्या फ्रान्समध्ये वास्तव्यास असणारी क्लाऊडिया इंग्रजी आणि फ्रेंच भाषा शिकवते.  गेली १० र्वष ती सतत भारतात येते आहे. या १० वर्षांत इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे ग्रामीण भागात घडलेला बदल तिला लक्षणीय वाटतोय. इथे हिंडता-फिरताना कायमच सुरक्षित वाटल्याचं मात्र ती आवर्जून सांगते.
विविध देशांतून आलेल्या, विविध वयोगटातल्या आणि विविध विषयांच्या अभ्यासात आणि संशोधनात मनापासून रमलेल्या या काही स्त्रिया. भारतीय संस्कृती जाणून घेण्यात मनापासून रमलेल्या. त्या जेव्हा आत्मीयतेनं पण पुरेशा दूरस्थपणे आणि संशोधकाच्या वस्तुनिष्ठपणे आपल्या संस्कृतीकडे पाहतात  तेव्हा असंही काही समोर येतं, ज्याचा आपण अभिमान बाळगावा आणि असंही काही.. ज्याचा आपण अंतर्मुख होऊन विचार करावा - आणि करावी जमल्यास कृतीही!  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो