नाट्यरंग :‘टॉम आणि जेरी’
मुखपृष्ठ >> लेख >> नाट्यरंग :‘टॉम आणि जेरी’
 

लाइफ स्टाईल-मनोरंजन-कला

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नाट्यरंग :‘टॉम आणि जेरी’ Bookmark and Share Print E-mail

नात्याचं विध्वंसक पोस्टमॉर्टेम
रवींद्र पाथरे - रविवार, १९ ऑगस्ट २०१२

चित्तरंजन चिपळूणकर उर्फ चिचि आणि दीपा लेले. सात वर्षांपूर्वी उभयतांचं लग्न झालंय. लग्नानंतर दोनच महिन्यांत चिचि अमेरिकेत आपल्या नासातील नोकरीवर निघून गेलेला. नंतर तिलाही अमेरिकेला घेऊन जायचं ठरलं होतं. पण दोनदा तिचा व्हिसा रिजेक्ट झाल्यानं तिचं अमेरिकेत जाणं होत नाही. सासरच्या गोतावळ्यात नवऱ्याविना दिवस कंठताना तिचा जीव उबतो. तीही मग नोकरी शोधायचं ठरवते. उच्चशिक्षित असल्यानं तिलाही लंडनमध्ये जॉब मिळतो. दोन भिन्न देशांमध्ये दोघं एकेकटे जगू लागतात. सुरुवातीला फोन्स, ई-मेल्स, चॅटिंगद्वारे परस्परांच्या संपर्कात असलेले ते- नंतर मात्र हळूहळू मनानं एकमेकांपासून दुरावत जातात. अनेकदा एकमेकांना भेटायचं नक्की करूनही कधी वर्क कमिटमेंटमुळे, तर कधी दुसऱ्या काही कारणांनी त्यांची भेट दरवेळी लांबणीवरच पडत जाते. दिवस सरतात तसतसं याचंही त्यांना वैषम्य वाटेनासं होतं. ‘भेटू पुढच्या वेळी!’ म्हणून ते स्वत:चं आणि एक-दुसऱ्याचं तोंडदेखलं समाधान करत राहतात. त्यामुळे मुळातच आपल्यात परस्परांना भेटायची ओढ उरलीय का, असा प्रश्न दोघांनाही पडतो.
..आणि एके दिवशी चिचिची आई वारते आणि तिच्या कार्यासाठी म्हणून त्याला भारतात यावं लागतं. यानिमित्तानं दीपालाही भारतात बोलावून घेऊन आपल्यातल्या नात्याचा एकदा काय तो सोक्षमोक्ष लावावा असं तो ठरवतो. घरात सर्वासमोर तमाशा नको म्हणून एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रूम बुक करून तिथं दोघांनी आठवडाभर राहायचं आणि आपल्यात निर्माणच न झालेल्या नात्याचं भविष्यात काही होऊ शकतं का, की दोघांनी आपापल्या मार्गानं जाणं योग्य, यावर उभयतांनी शांतपणे चर्चा करायची आणि ठोस निर्णयाप्रत यायचं असं चिचिनं ठरवलेलं असतं. दीपाही त्याला राजी होते.
परंतु ती येते तीच मुळी तलवार उपसून! त्यानं हॉटेलचा पत्ता नीट न दिल्याचा कांगावा करत ती त्याला भलतंच फैलावर घेते. एकाच नावाची अनेक हॉटेलं असू शकतात हे त्याला कळलं कसं नाही, इथपासून ते तिचं वॉलेट आणि मोबाइल चोरीला गेल्याची चीडही ती त्याच्यावरच काढते. तिचा मोबाइल चोरीला गेल्यानं त्यानंही आपला मोबाइल, लॅपटॉप वापरू नये असं फर्मान ती काढते. आपली वाट बघायची सोडून तो हॉटेलात चक्क घोरत पडल्याचं पाहून तर तिचा पाराच सटकतो. चिचि तिच्या प्रत्येक प्रश्नाचं शांतपणे उत्तर द्यायचा प्रयत्न करतो, त्यामुळे ती आणखीनच संतापते. त्याला नाही नाही ते बोलते. त्याच्या प्रत्येक शब्दाचा, कृतीचा आणि वागण्याचा आपल्याला सोयीचा अर्थ लावून ती त्याचा पदोपदी पाणउतारा करते. तोही तिला भीत भीत, पण सावधपणे जशास तशी उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तर तिचा तोलच जातो. दोघंही मग एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्यात कसर सोडत नाहीत. याही स्थितीत चिचि स्वत:वर काबू ठेवत तिला, आपण कशासाठी भेटतो आहोत, याची जाणीव करून द्यायचा प्रयत्न करतो. पण तिचं ओचकारणं सुरूच राहतं.
तिच्या या हिंस्र, विध्वंसक वागण्यानं आणि केलेल्या- न केलेल्या गुन्ह्य़ांसंबंधीच्या आरोपांनी तो पार गलितगात्र होतो. तिच्याशी कसं वागायचं, हे न कळून बचावात्मक पवित्र्यात जातो. त्याची ती पराभूत माघार पाहून विकृत समाधानानं तिला आनंदाच्या उकळ्या फुटतात. इतक्या वर्षांचा आपला कोंडलेला संताप, चीड, घुसमटलेपण यांचा निचरा झाल्यानं तिला बरं वाटतं. याही परिस्थितीत चिचि आपलं डोकं शांत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. ज्याकरता आपण भेटतो आहोत, तो आपला हेतूच परस्परांवरील या चिखलफेकीमुळे साध्य होणार नाही, हे तिला परोपरीनं समजवण्याचा प्रयत्न करतो. पण ती काहीच ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसते.
अशा स्फोटक परिस्थितीत ती त्याला काही सांगत असताना त्याला थकव्यामुळे पेंग येते आणि तिच्या संतापाचा कडेलोट होतो. चिडून ती हातातला दारूचा ग्लास फोडून हाताची नस कापून घेते. या प्रकारानं चिचिची पाचावर धारण बसते. काय करावं त्याला सुचत नाही. तो तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. तिच्या जखमेवर उपचार करून ते हॉटेलवर परततात. टॅक्सीचं बिल चुकतं करून तो रूमवर परततो तो तिथं दीपा नसते. तो रात्रभर तिला शोधत राहतो, परंतु ती सापडत नाही. त्यानं तिच्या मैत्रिणीकडे तिच्या चौकशीसाठी फोन केला असता उलट ती त्यालाच पोलिसात देण्याची धमकी देते.
रात्री जणू काही घडलंच नाही अशा तऱ्हेनं दीपा सकाळी रूमवर परत येते. तिच्या या ताळतंत्र सुटलेल्या वागण्यानं आतापावेतो कसाबसा राखलेला चिचिचा संयम सुटतो आणि त्याचा स्फोट होतो. ‘आपल्यातल्या नात्याचा ‘दी एन्ड’ झालेला आहे, तेव्हा आपण आपापल्या मार्गानं जाण्यातच शहाणपण आहे. आता तू जाऊ शकतेस. गेट लॉस्ट..’ असं तो तिला निर्वाणीचं सांगून टाकतो. त्याच्या त्या रुद्रावतारानं तिला काहीसं बरं वाटतं. ‘आता आपण नवरा-बायकोसारखं आपल्या नात्याच्या भवितव्यावर खरेपणानं बोलू शकतो,’ असं म्हणत ती त्याला ‘आपल्यातल्या नात्याबद्दल आता आपण चर्चा करायला हरकत नाही,’ असं सांगते.
..त्यांच्यातली ही चर्चा सुरळीत पार पडते का? त्यांच्या नात्याला खरोखरीच भवितव्य असते का? एकमेकांबद्दल कमालीची कटुता मनात असलेल्या त्यांचं पुढचं बोलणं कसं होत असेल?.. अशा अनेकानेक प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्ष नाटक पाहूनच मिळवणं उचित ठरेल.
एक वेगळ्या जॉनरचं आणि अनवट वाटेनं जाणारं हे नाटक पडदा उघडल्या क्षणापासून प्रेक्षकांची घट्ट पकड घेतं. त्या दोघांच्या एकमेकांना ओचकारण्यानं प्रेक्षकही नकळत जखमी, विद्ध, विव्हल होतात. ‘टॉम आणि जेरी’चं हे सर्वात मोठं यश म्हणता येईल.
लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य आणि प्रमुख भूमिका अशी चतुरस्र धुरा निखिल रत्नपारखी या अत्यंत गुणवान रंगकर्मीनं या नाटकात निभावली आहे. यापूर्वी ‘साठेचं काय करायचं?’, ‘मसाज’ यांसारख्या नाटकांतून त्यांनी ताकदीचे अभिनेते म्हणून आपली प्रतिभा सिद्ध केली होती. त्यानंतर मात्र ते दीर्घ काळ रंगभूमीपासून दुरावले होते. आणि आता अश्वमी व अद्वैत थिएटर्स निर्मित ‘टॉम आणि जेरी’द्वारे त्यांनी पुनश्च एकदा रंगमंचावर दमदार पुनरागमन केलं आहे.  
आज जागतिकीकरण, आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वत्वाचं नको इतकं तीव्र भान यामुळे व्यक्तिवादानं उग्र रूप धारण केलेलं आहे. स्त्री वा पुरुष कुणीच त्याला अपवाद नाहीए. या स्वकेंद्री जगण्याच्या वाढत्या स्तोमापायी मानवी नाती उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. ‘स्व’च्या पलीकडे कुणीच विचार करायला राजी नाही. त्यातही जागतिकीकरणापायी माणसांचं स्थलांतरणही अपरिहार्यपणे होत असल्यानं नाती टिकवणं आणखीनच दुरापास्त होत चाललंय. स्वकेंद्री जगण्याची चव सर्वानाच हवीहवीशी वाटतेय. त्याच्या वाढत्या हव्यासातून आपण आपल्या (आणि आपल्याशी निगडित इतरांच्याही!) आयुष्याचं काय भजं करतोय, याचं भान सुटत चाललंय. त्याची अनिवार्य परिणती म्हणजे माणसाला येणारं तुटलेपण.. एकाकीपणा! स्वैर, उन्मुक्त जगण्याची किंमत या ना त्या रूपात कधीतरी मोजावी लागतेच. आणि त्यातून जगण्यात एक प्रकारची विकृती येत जाते. ज्यामुळे भविष्यात संपूर्ण समाजव्यवस्थाच धोक्यात येऊ घातली आहे. ‘टॉम आणि जेरी’ या येऊ घातलेल्या उद्ध्वस्ततेकडे निर्देश करतं. संवेदना बोथट झाल्यानं आपल्याच गुंगीत असलेल्या समाजाला ते झडझडून जागं करू पाहतं.
यातली पात्रं आणि त्यांचं वागणं काहींना अतिरेकी वाटेल; परंतु अशी माणसं अस्तित्वातच नसतात असं नाही. किंबहुना अशाच माणसांची संख्या हळूहळू वाढते आहे. रिसिव्हिंग बंद झालेल्या या माणसांच्या गर्दीची भयंकर दहशत येत्या काळात अनुभवास येणार आहे. नव्हे, त्याची सुरवात घराघरांत याआधीच झालेली आहे. नवरा-बायको या अत्यंत निकटच्या नात्यातही हा कली शिरला आहे, तिथं इतर नात्यांचं काय! लेखक निखिल रत्नपारखी यांनी हे एक सशक्त, आशयघन नाटक रंगभूमीला दिलं आहे. मानवी मनातले अंधारे कंगोरे, त्यांतल्या मूक, विलोल हालचाली आणि त्यातले बहुपदरी गूढ काही अंशी उलगडून दाखविण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी यात केला आहे. एका पुरुषानं हे नाटक लिहिलेलं असल्यानं यात नायकाला काहीसं झुकतं माप आणि सहानुभूती मिळालेली दिसत असली तरीही दीपासारख्या स्त्रिया नसतातच असंही नाही. समोरच्याच्या वागण्या-बोलण्याचे आपल्या सोयीचे (गैरच!) अर्थ लावून, वर आपलंच म्हणणं कसं बरोबर आहे, हे ठासून सांगणाऱ्या अशा अनेक व्यक्ती समाजात आढळतात. त्यांच्यापायी त्यांच्या अवतीभवती असलेल्यांचं जीवन नरकवत होतंच; पण आपल्याही आयुष्याचं या अशा व्यक्ती नरक करत असतात. स्त्री-पुरुषांत शारीरिक आणि आर्थिक गरजांपल्याडही ‘शेअर’ करण्यासारखं खूप काही असतं. शरीर आणि पोटाची भूक भागली म्हणजे झालं, असं माणसाच्या बाबतीत संभवत नाही. त्यापलीकडेही माणसाला काहीतरी हवं असतं. यासाठीच तो नाती निर्माण करतो. ती जपतो. प्रसंगी त्यासाठी स्वत्वाचाही त्याग करतो. त्याकरता झुरतो. विकल होतो. क्वचित मरणही पत्करतो.
लेखक-दिग्दर्शक निखिल रत्नपारखी यांनी मानवी नात्यांतले हे सूक्ष्मातिसूक्ष्म पदर ‘नाथाघरची उलटी खूण’ अशा पद्धतीनं उकलून दाखवले आहेत. त्याकरता उपहास, उपरोध, वक्रोक्ती अशा विनोदाच्या सगळ्या आयुधांचा त्यांनी मुक्तपणे वापर केला आहे. दीपा आणि चिचिच्या नात्याला गेलेले तडे जसे त्यातून व्यक्त होतात, तशीच त्यांच्या नात्यातील वैय्यर्थताही. नाटकभर मनोविश्लेषणाचा एक अदृश्य धागा सतत त्यांनी विणत नेलेला आहे. घटनांपेक्षा वाद आणि वितंडवादातूनच नाटक पुढं सरकत जातं. त्यातून चढत्या भाजणीनं अपेक्षित परिणाम त्यांनी साधला आहे. भाषेचं वजन, त्यातले आरोह-अवरोह, संवादाची फेक, विरामस्थाने यांना या नाटकात अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वत:च दिग्दर्शक असल्यानं रत्नपारखी यांनी या सगळ्या खुबी नेमकेपणानं प्रयोगात उतरविल्या आहेत. संवादांतून व्यक्त होणारी चमत्कृतीपूर्ण मतं आणि निरीक्षणं हास्याचे स्फोटावर स्फोट घडवतातच; पण त्यातल्या बौद्धिक विनोदानं आपण एका उत्तम कलाकृतीचा आस्वाद घेत असल्याचं समाधानही प्रेक्षकाला मिळतं. नवरा-बायकोच्या नात्यातले अवघड, अनवट पेच, त्यातले तिढे, अंधाऱ्या, अज्ञात गुहा ‘टॉम आणि जेरी’मध्ये प्रत्ययाला येतात. निखिल रत्नपारखी यांनी पंचतारांकित हॉटेलचं केलेलं नेपथ्य वास्तवदर्शी आहे. मिलिंद जोशी यांनी पाश्र्वसंगीतातून या खटकेबाज नाटकाला उठाव दिला आहे. शीतल तळपदे यांच्या प्रकाशयोजनेनं यातल्या पात्रांच्या नात्यातला ताणतणाव अधिक गहिरा केला आहे. गीता गोडबोले यांची वेशभूषा आणि अशोक राऊत यांची रंगभूषा पात्रांना त्यांचं व्यक्तिमत्त्व बहाल करतात.
केवळ दोनच पात्रांचं नाटक करण्याचं धाडस हल्ली सहसा कुणी करीत नाही. तेवढय़ा ताकदीचे कलाकार त्यासाठी लागतात. इथे स्वत: निखिल रत्नपारखी हे कसलेले कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. त्यांनी संयमी, समजूतदार, भांबावलेला, द्विधा मन:स्थितीमुळे सतत गोत्यात येणारा, दीपाच्या डोक्यात जाणाऱ्या वागण्या-बोलण्यानं चिडचिडलेला, तिच्याशी कसं वागावं हे न कळल्यानं सतत दबलेला आणि आपल्या स्खलनाचा अपराधगंड छळत असल्याने आधीच खच्ची झालेला असा चिचि सर्वार्थानं उभा केला आहे. आधीच त्यांचं व्यक्तिमत्त्व बिच्चारं वाटावं असं. त्यात शीघ्रकोपी बायकोच्या अतक्र्य वागण्याचा धसका घेतल्यानं कायम भेदरलेला, बचावात्मक, सावध पवित्रा घेणारा चिचि त्यांनी केवळ मुद्राभिनयातूनच नव्हे, तर अवघ्या देहबोलीतून अप्रतिम साकारलाय. त्यांच्या अविस्मरणीय भूमिकांमध्ये ही भूमिका निश्चितच गणली जाईल.
कादंबरी कदम यांनीही दीपाचा संताप, तिची चीड, तिचं घुसमटलेपण, त्यातून तिच्या वागण्या-बोलण्यात आलेली विकृतीची झाक हे सारं अक्षरश: जिवंत केलं आहे. पहिल्या अंकात तिची कमालीची चीड येते, यातूनच तिच्या प्रत्ययकारी अभिनयाचा वानवळा मिळतो. दुसऱ्या अंकातलं तिचं बदललेलं रूपही तिनं तितक्याच ताकदीनं अभिव्यक्त केलं आहे.  
एक सर्वागसुंदर अन् अस्वस्थ करणारं नाटक पाहिल्याचं समाधान घेऊन प्रेक्षक घरी परततो.                                                    

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो