दिलदार..
मुखपृष्ठ >> रविवार विशेष >> दिलदार..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

दिलदार.. Bookmark and Share Print E-mail

 

सुशीलकुमार शिंदे , शब्दांकन : सुनील चावके - रविवार, १९ ऑगस्ट २०१२

विलासराव हे नुसतेच राजकारणी नव्हते. त्यांना संगीताची आणि गाण्यांची खूप जाण होती. जेव्हा जेव्हा आम्ही राज्य मंत्रिमंडळात होतो, तेव्हा मुंबईहून कोलकाता मेलने नागपूरच्या अधिवेशनाला सोबतच जायचो. नागपूरला जाण्यासाठी फस्र्ट क्लासच्या कुपेमधल्या प्रत्येकी दोन-दोन, अशा चार सीट्स आम्ही आरक्षित करायचो. त्यावेळी प्रवासादरम्यान आमच्या गाण्यांवर गप्पा व्हायच्या. गझल, भावगीतांची विलासरावांना खूप आवड होती.

विशेषत: सुरेश भटांच्या गझला आणि कविता त्यांना तोंडपाठ असायच्या. ‘मोकळ्या केसात माझ्या..’ असे म्हटले की  ‘तू जीवाला गुंतवावे,’ अशी ते पुढची ओळ पूर्ण करायचे. अशी त्यावेळी गाडीत मजा चालायची. पुण्यात विद्यार्थी आणि प्राध्यापक असतानाच्या काळापासून विलासरावांचे आव्हाड नावाचे मित्र होते. ते वकील आहेत. त्यांच्यासोबत आपण कशा कविता म्हणायचो, हेही ते सांगायचे. मराठी साहित्यिक, कवी आणि त्यांच्या कविता यावर आमच्या गप्पा रंगायच्या. प्रवासादरम्यानच्या गप्पांमध्ये अनेकवेळा अमका नेता विधानसभेत कसा बोलला आणि तमुक विधान परिषदेत कसा बोलला, यावर आमची थट्टामस्करी आणि टिंगलटवाळीच्या सुरात चर्चा व्हायची. साहित्य, कविता यांच्यावर आमच्या भरपूर गप्पा व्हायच्या. कधी भा. रा. तांबेंची कविता, कधी वसंत बापटांची कविता. विशेषत: तारुण्यावरील मंगेश पाडगावकरांच्या कवितांची अधिक चर्चा व्हायची. मी कधी मग वा. रा. कांतांची कविता म्हणून दाखवायचो. मग वा. रा. कांत कसे होते, काय होते हे मी त्यांना सांगायचो आणि ते फार स्वारस्य घेऊन लक्षपूर्वक ऐकत. तुम्हालाच पुस्तक प्रकाशनाला कसे बोलावतात, असे ते मला नेहमी विचारायचे. नंतर नंतर त्यांनाही अनेक पुस्तक प्रकाशनांची निमंत्रणे मिळू लागली. असा आमचा दोघांचा प्रकाशन आणि साहित्यिक वर्तुळात वावर होता.
नागपूरचा मोहब्बतसिंग तुली हा आमचा दोघांचा जवळचा मित्र. त्याचे त्यावेळी ‘स्कायलार्क’ नावाचे हॉटेल होते. आता त्याने पंचतारांकित हॉटेल काढले आहे. अनेकदा आमच्या दोघांच्या मोहब्बतसिंगच्या हॉटेलात रात्री गाण्याच्या मैफिली आणि जेवणं व्हायची. स्थानिक साहित्यिकांशी मनसोक्त गप्पा रंगायच्या. तेव्हा उल्हास पवार, अंधारे, स्थानिक पत्रकार असायचे. रात्री उशिरापर्यंत गप्पांची मैफिल रंगलेली असायची. नागपुरात नरेंद्र तिडके आम्हा दोघांनाही हुर्डा पार्टीसाठी बोलवायचे. नागपुरातच नायडू नावाचा कार्यकर्ता होता. तो भंडाऱ्याहून आमच्यासाठी खेकडे आणायचा. विलासरावांना भंडाऱ्याचे मासे आणि खेकडे फार आवडायचे. ते खेकडे चवीने खायचे. आम्ही नागपूरला गेलो की दोघे मिळून विधिमंडळ अधिवेशनासाठी महाराष्ट्रातून आलेल्या पत्रकारांना ‘सुयोग’वर भेटायचो. रात्री जेवणासोबत राजकारण आणि राजकारणाबाहेरच्या विषयांवर पाच-सहा तास मनसोक्त गप्पा व्हायच्या. आज या सर्व आठवणी सारख्या मनात दाटून येतात. असा तो आमच्या मैत्रीचा काळ होता. आमचे अनेक मित्र होते, ज्यांच्याकडून आम्ही राजकारणात खूप काही शिकलो. विशेषत: रामदास फुटाणे, फ. मुं. शिंदे, गायक सुरेश वाडकर हे त्यांचे अतिशय जवळचे मित्र होते. चित्रपटसृष्टीतील लोकांशी गप्पांच्या ओघात ते जुन्या सिनेमातील आठवणी सांगायचे. असा सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचा वावर होता. विलासराव जेव्हा गंभीर व्हायचे तेव्हा ते खरोखरच गंभीर वाटायचे. शरद पवार यांच्या विरोधात आम्ही बंड केले, तेव्हापासून आम्हाला ‘दो हंसों का जोडा’ म्हटले गेले. लोक असे म्हणत असले तरी त्याच्या आधीपासूनच आम्हाला हे बिरुद लागलेले होते. अनेक कार्यक्रमांमध्ये आम्ही एकमेकांचे सदरे खेचण्याचे काम करीत होतो. कधी ते माझ्यावर टीका करीत, कधी मी त्यांच्यावर टीका करायचो. कधी आम्ही दोघे मिळून तिसऱ्याची खेचत असू. त्यामुळे हे दोघे ठरवून करतात, असे मंत्रिमंडळाच्या बैठकीतही म्हटले जायचे. कराडचे विलासकाका पाटील यांच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्यक्रमांना आम्ही मिळून जायचो. कराडला जात असताना संध्याकाळी आपले मटणाचे जेवण आहे, याची ते मला आठवण करून देत. विधानसभेचे सदस्य असताना विलासकाका आणि जयवंतराव आवळे मुंबईत एकत्र कॉफी प्यायला जात. ग्रामीण भागातून आलेले ते दोघे ताज हॉटेलमध्ये कॉफी प्यायला जातात म्हणून आम्ही दोघे मिळून त्यांची टिंगल करायचो. विलासकाका हे यशवंतराव चव्हाणांचे निष्ठावंत. मी बंड करून काँग्रेस सोडली आणि परत काँग्रेसमध्ये जाण्यासाठी यशवंतरावांच्या विरोधात भाषण केले होते. आपण पाच पिढय़ांचे काँग्रेसवाले आहोत आणि देशाने इंदिरा गांधींना निवडून दिलेले आहे. आता आपण काँग्रेसमध्ये गेले पाहिजे, असे मी त्यावेळी भाषण केले होते. तेव्हा यशवंतरावांचे चाहते विलासकाका, भालके गुरुजी आणि केशवराव शिंदे पाटील माझे अभिनंदन करायला आले होते. हा किस्सा मी विलासरावांना सांगितला तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. विलासकाकांची कमालच आहे, असे विलासराव तेव्हा उद्गारले होते.
वसंतदादा पाटील आणि शंकरराव चव्हाण यांनी विलासरावांमधील कुशाग्रता ओळखली होती आणि त्यांना पुढे आणण्यासाठी त्यांनी खूप संधी दिली. विलासरावांची आक्रमकता महाराष्ट्राच्या नेतृत्वासाठी त्यांना फार महत्त्वाची वाटत होती. दुसऱ्या फळीतील नेते तयार करताना त्यांनी विलासरावांना संधी दिली. नंतरच्या काळात विलासराव मुख्यमंत्री झाले आणि मी पण दिल्लीला होतो. त्यामुळे आमचा संबंध हळूहळू कमी होत गेला. पण जेव्हा जेव्हा भेटीचे प्रसंग आले तेव्हा आम्ही आवर्जून भेटायचो. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकींच्या निमित्ताने आम्ही एकत्र येत असू. या बैठकींमध्ये आम्हा दोघांचीही भाषणे व्हायची. आम्ही प्रचारसभांनाही जायचो. ते थोडेसे आक्रमक होते. मी आक्रमक बोलत नसे. मी सौम्य असल्यामुळे निराळा होतो. पण बरेचदा आम्ही दोघे मिळून एकत्रित प्रचार करायचो. नंतरच्या काळात मी प्रचाराला जाऊ शकलो नाही. ते स्वतंत्रपणे प्रचार करायचे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सोपविल्यानंतरही आमचा कधी संपर्क तुटलेला नव्हता. मी विलासरावांपेक्षा ज्येष्ठ असलो तरी स्वतहून त्यांच्या घरी जायचो. नंतर ते मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्याकडे येत होते. मी सोलापुरात नसताना ते दोन-तीनवेळा माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांना आमच्या कार्यकर्त्यांंच्या आग्रहावरून आले होते. माझ्याविषयी ते खूप चांगले बोलायचे. त्याचा एक वेगळा संदेश जायचा. यांची मैत्री कोणीही कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरी ती तुटत नाही, अशा प्रकारचा संदेश त्यातून गेला. आमच्यातील संबंध असे होते.
विलासराव म्हणजे उमदा, दिलदार मित्र होता. कालपरवा काही झाले असेल तर ते थोडा वेळ त्यांच्या मनात राहायचे. पण काही काळानंतर ते सारे विसरून जायचे. शेवटी आपल्याला महाराष्ट्र चालवायचा आहे. सगळयांचे सहकार्य असले पाहिजे, अशाच भावनेने ते वागत. माझा त्यांच्याशी कधी कटू प्रसंग आला नाही. समोरच्या व्यक्तीला आव्हान देणे हे माझ्या रक्तातच नाही. पक्षाने आणि परमेश्वराने मला भरपूर दिले. मिळाले तर मिळाले, नाही तर नाही, अशा वृत्तीचा मी आहे. माझ्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी त्यांची पुन्हा निवड झाली. मीच त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि हसत हसत बाहेर आलो तेव्हा जमलेल्या पत्रकारांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी माझीच निवड झाली, असे वाटले. पण मी जेव्हा विलासरावांच्या नावाची घोषणा केली तेव्हा त्यांना धक्काच बसला. आमची मैत्री अशी होती.
तुम्ही लोकसभेचे नेते होणार ही बातमी मला सर्वप्रथम विलासरावांनीच सांगितली. गृहमंत्री झाल्यानंतर त्यांनी माझे अभिनंदन केले आणि ‘जस्ट वेट, आता लवकरच ही सुद्धा नियुक्ती होणार,’ असे म्हणाले. एवढे मोठे पद मला मिळणार याचे मलाही आश्चर्यच वाटले. ‘मेरी खींचाई कर रहे हो क्या ?’ असे मी त्यांना विचारलेही. ‘नाही नाही, गळ्याशप्पथ,’ असे गळ्याला हात लावत नेहमीच्या सवयीने गंभीर होत त्यांनी मला सांगितले. ज्यांनी मला लोकसभेचा नेता होणार असे सांगितले, त्याच सभागृहामध्ये मला त्यांच्या मृत्यूची दुखद बातमी देशाला द्यावी लागली.
गेली तीन वर्षे आम्ही केंद्रात मंत्री म्हणून एकत्र होतो. कॅबिनेटच्या बैठकीत आम्ही शेजारी बसायचो. त्यांच्या निवासस्थानी १४, अकबर रोड येथे एकदा मी चहापानासाठी गेलो होतो. विलासरावांनी दिल्लीत चांगला जम बसविला होता. पण ते जास्त भेटत नव्हते. दिल्लीच्या राजकारणात आल्यानंतर विलासरावांना खूप काही मिळायला पाहिजे होते. पण दिल्लीत त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना मिळाले नाही, असेच मला नाइलाजाने म्हणावे लागत आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो