देशमुख सरकार
मुखपृष्ठ >> रविवार विशेष >> देशमुख सरकार
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

देशमुख सरकार Bookmark and Share Print E-mail

 

जयराज साळगावकर - रविवार, १९ ऑगस्ट २०१२

विलासराव देशमुख हे जन्मत:च ‘सरकार’ होते. त्यांचे घराणे नुसते देशमुखांचे नव्हे तर गढीवरच्या देशमुखांचे!  तरुणपणी पागेतला घोडा काढून ते रपेट करीत, तेव्हा बाभळगाव-लातूरच्या लोकांना ते जणू दिलीपकुमार वाटत. (प्रत्यक्षात ते शत्रुघ्न सिन्हासारखे दिसत.) हा निजामशाही संस्कारांचा सरंजामशाही थाट, त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सामावला होता. मोकळे-ढाकळे वाटत असले, तरी वर्तणुकीतील ‘आब’ सांभाळण्याचे भान कधी सुटत नसे.

हसता-हसता, अचानक करडी मुद्रा करून, तर्जनीचा वापर करीत, किंचित चढय़ा आवाजात बोलत. कधी वातावरण बदलतील, हे सांगता येणार नाही. एक प्रकारची राजेशाही अदा आणि हुकमत त्यांच्या आब-रुबाब, रहन-सहन, आचार-विचारांत स्पष्टपणे दिसे.  ‘घोडा’ हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. घोडय़ाविषयी बोलताना त्यांची कळी खुले. त्यांच्या घोडय़ाकडे पाहून, मराठवाडय़ातील इतर काही राजकारण्यांनी ‘हम भी कुछ कम नहीं’ म्हणून घोडा ठेवला. विलासरावांना हे काही रुचले नव्हते. त्यांच्या मते ते अव्यवहार्य, अनाठायी होते. त्यांचे म्हणणे होते आलिशान मर्सडिीस गाडी ठेवण्यापेक्षा घोडा ठेवणे महाग पडते. गाडी बंद करून ठेवता येते. पण घोडय़ाचे तसे नाही. त्याची रोज रपेट-खरारा व्हावाच लागतो. एका घोडय़ामागे चार माणसे देखभालीसाठी ठेवावी लागतात. आपण घोडा ठेवला तो अनिवार्यपणे, रयतेला घोडय़ाशिवायचे देशमुख चालणार नाहीत म्हणून! आणि हे खरेही होते. लातूरजवळ माळेगाव येथे दरवर्षी भटक्या-विमुक्तांची देशातील सर्वात मोठी जत्रा भरते. जनावरांचे मोठे बाजार लागतात. चार-पाच लाख लोक या जत्रेला देशभरातून येतात. परंपरेनुसार गढीवरचे देशमुख घोडय़ावरून जत्रेला आल्याशिवाय जत्रेला औपचारिकरीत्या सुरुवात होत नाही. या जत्रेला ते आवर्जून हजेरी लावीत.
लोककला आणि संगीत हा त्यांचा आणखी एक जिव्हाळ्याचा विषय. लावणीच्या कार्यक्रमांना ते आवर्जून हजेरी लावीत. प्रेक्षागृहात त्यांची उपस्थिती असल्यावर कलाकारांनाही विशेष हुरूप येत असे.  ‘आता खरी दाद मिळणार’ ही त्यांची अपेक्षा असे. एका लोक-कलोत्सवात त्यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितलेला किस्सा थोडक्यात असा- ‘आमच्या गढीवर लग्नसमारंभासाठी सगळीकडून पाहुणे येत. गढीवरचं लग्न म्हणजे फड लागलाच पाहिजे! नाच-गाणी-लावणी यांची रेलचेल असे. परंपरेप्रमाणे दौलतजादाही व्हावाच लागे. रंगात आलेले पाहुणे-रसिक प्रमाणाबाहेर दौलतजादा करीत. शेवटी त्यांच्या परतीचे तिकीट काढून त्यांना गाडीत बसवून देण्याची जबाबदारी आम्हाला पार पाडावी लागे.’ आपल्या राजेशाही परंपरेचा त्यांना मनापासून खूप अभिमान होता. विठ्ठल उमपांपासून ते वामन केंद्रे, मकरंद अनासपुरेंपर्यंत समस्त लोककलाभिमुख कलावंतांची त्यांनी कायम कदर केली.
लोकसंगीताबरोबर त्यांना शास्त्रीय संगीत आणि नाटय़संगीतातही खूप रस होता. गणपतीत दरवर्षी आमच्या घरी स्व.पं. भीमसेन जोशी यांचे गाणे असे. शक्यतो वेळात वेळ काढून विलासराव (मुख्यमंत्री असतानासुद्धा) पंडितजींचे गाणे ऐकावयास येत आणि पूर्ण वेळ बसत. त्यांना कुतूहलाने, ‘एवढा वेळ तुम्ही संगीत ऐकण्यासाठी कसा काय देता?’ असे विचारले असता, ‘राजकारणाच्या डावपेचात मेंदूवर जो कायम ताण येतो, तो पंडितजींच्या गाण्याने नाहीसा होतो. असा अनुभव नेहमी मिळत नाही,’ असे त्यांनी सांगितले. एकदा प्रभाकर कारेकर गायला आले होते. त्यांना ‘प्रिये पहा’ या आपल्या आवडत्या नाटय़गीताची फर्माइश आवर्जून केली. कारेकरांची संपूर्ण मफल त्यांनी मनापासून दाद देत ऐकली.
१९९५ साली त्यांना निवडणुकीत अनपेक्षित अपयश आले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर त्यांना भेटावयास गेलो. ‘रामटेक’वर कुणीही नव्हते. विलासराव नेहमीच्या मूडमध्ये होते. पराभवाबद्दल त्यांना कोणत्याही प्रकारचे वैषम्य वाटत नव्हते. त्यांनी दिलदारपणे हा अपघाती पराभव स्वीकारला होता (मामुली म्हणून!) उलट शंकरराव बाजीराव पाटील या अनुभवी सहकारमहर्षीबरोबर येऊ घातलेल्या युती सरकारमध्ये, पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत आपल्या (मराठवाडय़ाच्या) अपक्षांची संख्या कशी तुल्यबळ राहील आणि सरकारात मराठवाडय़ाचे हित कसे सांभाळले जाईल याचे धोरण ते आखत होते. त्यानंतरच्या निवडणुकीत ते देशातील सर्वाधिक मते मिळवणारे आमदार म्हणून दणदणीत मताधिक्याने विजयी झाले, तेव्हा त्यांच्या आत्मविश्वासाची प्रचीती आली.
त्यांच्या याच ‘पराभूत’ काळात एका ग्रंथप्रकाशनाच्या कार्यक्रमात, त्यांची ओळख करून देताना एका कॉम्पेअर- पत्रकाराने, उपहासाने त्यांना ‘महाराष्ट्राचे माजी भावी मुख्यमंत्री’ असा टोला कारण नसताना हाणला. त्यानंतर त्यांचा लालेलाल झालेला चेहरा आणि करडी तिखट नजर आजही डोळ्यासमोर येते. त्याला प्रत्युत्तर देताना आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच ते ठणकावून म्हणाले, ‘आता इथे माझा उल्लेख, महाराष्ट्राचे माजी भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला. परंतु, मी इथे आज हे खात्रीने नमूद करतो, की भविष्यात मी या महाराष्ट्राचा एकदा नव्हे, तर दोनदा मुख्यमंत्री होऊन दाखवीन!’ त्यांनी ते खरे करून दाखवले. एक चांगला, दिलदार, दिलखुलास, रसिक आणि राजिबडा मित्र गमावल्याचे दु:ख कधीही भरून येणार नाही.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो