मोटारीचा कलात्मक आविष्कार
मुखपृष्ठ >> Drive इट >> मोटारीचा कलात्मक आविष्कार
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मोटारीचा कलात्मक आविष्कार Bookmark and Share Print E-mail

रवींद्र बिवलकर, गुरुवार, २३ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

माणूस, त्याच्या भावभावना, त्याचे आदिमबंध, त्याची पारंपरिक धारणा, सांस्कृतिकता, धर्म-तत्त्वज्ञान या साऱ्यांचे परिणाम आधुनिक युगातील माणसाच्या जीवनशैलीवरही पडत असतात. त्या त्या भागातील माणसांची भावबंधवृत्ती, कृती आणि मती या ठरलेल्या असतात. त्या बदलत नाहीत. बदलल्या तरी त्या खूप कमी प्रमाणात बदलत असतात. किंवा त्यांचे बाह्य़ रूप बदललेले दिसले तरी अंतरंग हे त्याच्या आदिमबंधाशी घट्ट गडद झालेले असते. मोटारीसारख्या आधुनिक काळातील एका चैनीच्या व काही अंशी आवश्यक बनलेल्या वस्तुबाबतही असेच दिसते. मोटार ही चैनीची बाब असल्याचे एके काळी म्हटले जायचे त्या समाजाला आज मोटार ही जीवनावश्यक गरजेमधील एक वस्तू म्हणून समाविष्ट करावी लागली. अगदी अत्यावश्यक नाही तरी जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनलेली ही मोटार शहरी जीवनशैलीचे प्रतीक बनली गेली आहे, हे नाकारता येत नाही. स्वत:च्या घरात मोटार नसली किंवा स्वत:च्या मालकीची मोटार नसली तरी त्या मोटारीचे आकर्षण राहाणे हे स्वाभाविक झाले आहे. त्यामुळे समाजातील विविध स्तरांमध्ये मोटारीकडे बघण्याची वृत्तीही बदलती दिसते.
मोटारीचे रंगरूप कसे असावे, याबद्दल पाहातो, तेव्हा त्या रंगरूपामध्ये असलेले आराखडे हे वेगवेगळे असतात. त्यांच्या आरेखनात, रचनेत, अंतर्गत सौंदर्यशास्त्रात प्रत्येक देशाच्या म्हणा किंवा भागाच्या अस्मितेचा रंग पाहावयास मिळतो. काही कल्पना मानवाच्या आदिमतेशी सर्वत्र एकसारख्या असतात, असेही दिसते. त्यामुळे मोटारीचे रूप काहीना सेक्सी वाटते, काहीना सुमो पहलवानासारखे वाटते, काहींना घोडय़ाच्या ताकदीसारखे असलेले वस्तुरूप भासते तर सुंदर खाशी सुबक ठेंगणी असलेल्या ललनेसारखेही ते हवे असते. मोटारीची अंगकाठी, तिची देहबोली ही माणसाच्या भावभावनांशी, आदिम परंपरांमधून आलेल्या संस्कारित मूलतत्वांशी निगडित झाली आहे. त्यामुळेच विविध प्रकारच्या अंगकाठीच्या, रंगरूपांच्या व काचेच्या वैविध्यपूर्ण वापरातून साकारलेल्या आरेखनातून सध्या मोटारीचे रूप सजत असते. हे सारे केवळ एकाच क्षणात झालेले नाही.
मोटारीच्या विशिष्ट ठेवणीमध्ये पत्र्याला दिलेला आकार, त्याला दिलेले वळण, एखाद्या ठिकाणी असणारा फुगीरपणा व बसकेपणा इतकेच नव्हे तर पत्र्याबरोबरच प्लॅस्टिक, काचा यांचाही केलेला मोहक व जाणीवपूर्वक वापर आणि हे सारे आरेखन करतानाच alt
मोटारीची स्वत:ची असणारी ताकद म्हणजे तिचे इंजिन किती ताकद निर्माण करणारे आहे, ते मोटारीला कशी गती देणार आहे, मोटारी कोणत्या भागामध्ये अधिक वापरली जाणार आहे याचा सारा विचार करून मोटारीची रचना केली जाते. जगामध्ये विविध ठिकाणी मोटारीचा वापर होत असला तरी एखाद्या विशिष्ट वातावरणात वापरली जाणारी मोटार दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळी उत्पादित केली जाते वा विक्रीसाठी ठेवली जाते तेव्हा त्या दुसऱ्या ठिकाणच्या वातावरणाचा, तेथील लोकांच्या जीवनशैलीप्रमाणेच मूलभूत सुविधांचा व लोकांमध्ये असलेल्या आदिमबंधांचाही विचार केला जातो. अगदी साधे उदाहरण द्यायचे तर रंगाबाबत देता येते. रंगांना असणारा अर्थ, त्यातून लोकांच्या मनात निर्माण होणारी भावना ही प्रत्येक देशात सारखी असेलच असे नाही. त्या रंगमध्ये असणाऱ्या छटेमध्येही वेगळेपण असते. त्यामुळेच कॅरेबियन ब्ल्यू, स्काय ब्ल्यू, नेव्ही ब्ल्यू, वाईन रेड, स्वान व्हाइट अशा नानाविध रंगांचे भाव असणारी नावे व ते रंगही वेगळेपणाचे असतात हे लक्षात येईल.
मोटारीच्या या सौंदर्याविष्कारामध्ये विविध घटक आहेत साधारण त्यांचे वर्गीकरण खालीलप्रकारे करता येईल.
* मोटारीचा रंग
alt
* मोटारीचे पुढील भागातील दर्शन (मुखस्वरूप)
* मोटारीच्या मागच्या बाजूने होणारे दर्शन
* मोटारीच्या टपाचे स्वरूप, त्याचा आकार, त्याला दिलेली अन्य उपभागांची जोड
* लॅम्पचे आकार व रंग
* काचेचे आकार, अँगलचा त्यात केलेला वापर
* मोटारीच्या दरवाजांमुळे मिळालेले सौंदर्य
* मोटारीच्या आत बसल्यानंतरचे बाह्य़रूप दर्शन
* मोटारीला दिलेला रंग
* एकंदर मोटारीचे स्वरूप
या घटकांनुसार विचार केला तर मोटारीचे रंगरूप किती फुलविलेले असते व त्या मोटारीचे सौंदर्य जगापुढे मांडताना किती काळजी त्या त्या आरेखनामध्ये घेतलेली असते ते लक्षात येईल. या वर्गीकरणानुसार मोटारीच्या सर्वागनिर्मितीत साधारण विचार केला जातो. तो कसा कसा केला जातो ते त्या त्या घटकांनुसार अनुभविण्याचा प्रयत्न करू.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो