प्रसारभान : पसरणाऱ्या अफवा, आक्रसणारं शहर
मुखपृष्ठ >> प्रसार-भान >> प्रसारभान : पसरणाऱ्या अफवा, आक्रसणारं शहर
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

प्रसारभान : पसरणाऱ्या अफवा, आक्रसणारं शहर Bookmark and Share Print E-mail

विश्राम ढोले ,शुक्रवार, २४ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

बिऱ्हाड सोडून मिळेल त्या गाडीनं लांबलांबून आसामात अचानक परत जायला भाग पडावं, अशी विखारी अफवा कशी पसरली हे आपल्याला माहीत आहे. एसएमएस, इंटरनेटवर असा प्रचार करण्यामागे परकीय हात आहे, हेही आता उघड होतंय.. प्रश्न असा आहे की, ही अफवाच आहे आणि त्यावर विश्वास ठेवू नये, याचं भान कसं काय नव्हतं..

सार्वत्रिक बोलबच्चनपणा, बोलण्यातील ढोबळपणा आणि विश्वास ठेवण्याबाबतचा भोंगळ भाबडेपणा यांचे विचित्र मिश्रण झालेल्या भारतीय समाजात अफवा पसरणे ही काही फार नवलाईची वा दुर्मिळ बाब नाही. अंधश्रद्ध वा अतिश्रद्ध मन, चमत्काराविषयीचे एक सुप्त आकर्षण आणि सामूहिकतेभोवती गुंफलेली आपली सामाजिक रचना यामुळे आपल्याकडे अफवांना जास्त खतपाणी मिळतं हेही खरंय. त्यामुळेच आपल्याकडे गणपती दूध पितो इथपासून ते भूकंप आल्यापर्यंत आणि माकडमानव खून करीत सुटल्यापासून ते समुद्राचे पाणी गोड झाल्यापर्यंत अनेक तऱ्हेच्या अफवा पसरत आणि विरत असतात. चमत्कार किंवा संकटाच्या सूचना देणाऱ्या या अफवा लोकांना काही काळ वेठीला धरतात. सारासार विचार कुंठित करतात, पण तरीही अफवा म्हणजे माहितीचा अपघात असतात. त्यांना समाजासाठी धोक्याचा इशारा असे म्हणता येत नाही.
पण गेल्या पंधरवडय़ात ज्या अफवा पसरल्या त्यांना मात्र ही सवलत देता येत नाही. त्या विखारी होत्या. त्यांनी हजारो ईशान्य भारतीयांना वेठीस धरले होते. मुंबई, पुणे, बेंगळुरूमधील आपलं हातचं काम टाकून आपल्या भागाकडे परतण्यास भाग पाडले होते. दिलासा किंवा धीर देण्याच्या प्रयत्नांनाही न मानणारे भीतीचे सावट निर्माण केले होते. या अफवांना निश्चित असे मूळ होते, इतकेच नव्हे तर अफवा पसरविण्यामागे एक पद्धतशीर तंत्र होते आणि तंत्रज्ञानही होते, म्हणूनच आसाम दंगलीनंतर पसरलेल्या अफवांकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे.
दंगल घडणे वा त्यावर प्रतिक्रिया उमटणे, त्यातून अफवा पसरणे यासंदर्भात टीव्ही आणि वृत्तपत्रांसारख्या प्रसारमाध्यमांच्या भूमिकांची एरवी चर्चा होते, पण या वेळी प्रथमच याबाबत मोबाइल आणि सोशल मीडियासारख्या संवादसाधनांची भूमिका प्रकर्षांने पुढे आली आहे. खरे तर रझा अकादमीच्या मोर्चाला िहसक वळण लागेपर्यंत पूर्वभारत वगळता उर्वरित भागातील बहुतेक प्रसारमाध्यमांनी आसाममधील दंगलीची दखल अगदी मर्यादितच घेतली होती आणि मोर्चानंतरही ईशान्य भारतीय मोठय़ा प्रमाणात परतू लागेपर्यंत प्रसारमाध्यमांना या साऱ्या घडामोडींचा अंदाज आलेला नव्हता, त्यामुळे मुंबईतल्या मोर्चामागची चिथावणी आणि नंतरच्या स्थलांतरामागची भीती याचा संबंध प्रसारमाध्यमांपेक्षा संवादमाध्यमांशी जास्त पोहोचतो. म्हणूनच या घटनेचे गांभीर्य वाढते. कारण सोप्या, स्वस्त आणि वेगवान संपर्कसाधनांमुळे अफवा वेगाने पसरतात हा जगभरचा अनुभव आहे. भारतात मोबाइलचा आणि इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या अनुक्रमे ९० कोटी आणि १२ कोटींपर्यंत पोहोचली आहे. सुमारे ४.२ कोटी भारतीय फेसबुकवर आहेत, तर एक कोटी ट्विटरवर. ही संख्या आणि त्यातून होणाऱ्या माहितीच्या प्रवाहाचा आकार तर अफाट आणि अवाढव्य आहेच, पण त्याचे स्वरूपही गुंतागुंतीचे आहे. त्यामुळे अफवांच्या संपर्कात येण्याचा, त्याला बळी पडण्याचा आणि त्या पुढे सरकविण्यात कळत नकळत सामील होण्याचा धोकाही अनेक पटीने वाढतो. इतकेच नव्हे तर इंटरनेटवर मिळणाऱ्या अनामिकतेमुळे अफवा पसरविणाऱ्यांना पकडणेही अवघड होऊन बसते. या सगळ्या साइट्सची धोरणे आणि त्यातील तांत्रिकता यामुळे खोडसाळ माहिती काढणे वा ती वेबपेजेस बंद करणेही अवघड काम असते. त्यामुळेच असा मजकूर असलेल्या वेबपेजेसवर भारतात बंदी घालण्याची प्रक्रिया पूर्ण करता करता महत्त्वाचा असा कालावधी निघून गेला आणि त्यात व्हायचे ते नुकसान होऊन गेले.
सोशल मीडियामुळे, मोबाइलसारख्या संवाद व्यवस्थांमुळे अशा विखारी किंवा नुकसानकारक अफवा पसरण्याचे प्रसंग वाढत चालले आहे हे खरेच. पण केवळ तेवढय़ाने ते होत नसते. विशेषत: सामाजिक अफवांसंबंधीच्या अनेक अभ्यासांमधून काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. अफवांमधील विषय वा घटना वास्तवात घडण्याजोग्या आहेत असे लोकांना वाटावे लागते; तेव्हा ते त्याकडे मुळात लक्ष देतात. त्या अर्थाने पाहिल्यास मुंबई, पुणे, बेंगळुरूसारख्या शहरांतून आपल्यावर मुस्लिमांचे मोठे हल्ले होऊ शकतात, असे इतक्या मोठय़ा प्रमाणावर ईशान्य भारतीयांना वाटावे हेच आपले पहिले सामाजिक अपयश आहे. त्याला आपल्याकडील दंगलींचा इतिहास जसा कारणीभूत आहे, तसा रझा अकादमीच्या मोर्चात झालेल्या िहसाचाराच्या घटना आणि त्याबाबत सरकारने घेतलेली बोटचेपी भूमिका ही कारणेही आहेत. अनिश्चिततेचे वातावरण हे अशा अफवा पसरण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण मानले जाते. जेव्हा अधिकृत किंवा विश्वासार्ह माहितीच्या स्रोताकडून पुरेशी माहिती येत नाही वा विसंगत माहिती पाझरत राहते तेव्हा माहितीच्या अनिश्चिततेचे वातावरण तयार होते. समाज वा लोकसमूह अशी अनिश्चितता फार काळ सहन करू शकत नाही. त्यातून बाहेर पडण्यासाठी मग हा समूह पूर्वग्रहांवर आधारित अंदाज बांधायला लागतो. अपुऱ्या माहितीच्या आधारे रचलेल्या कथा मग ही माहितीची पोकळी भरून काढायला लागतात. त्यातच घडलेल्या वा घडू पाहणाऱ्या घटनांचे परिणाम िहसक वा नुकसानकारक असेल तर अनिश्चिततेसोबतच अस्वस्थता आणि तणाव वाढू लागतो. अशा परिस्थितीचा आणि विश्वासार्ह स्रोताच्या अनुपस्थितीचा गरफायदा घेत मग हितसंबंधी गट त्यांच्या सोयीची पण तितकीच अपुरी कथा रचतात. त्यावर लोकांचा विश्वासही बसू लागतो आणि माहितीला किंवा कथेलाही किमान स्वीकृती मिळाली की तिचा प्रसार वेगाने व्हायला लागतो. विखारी आणि द्वेषमूलक अफवांसंबंधीच्या अनेक अभ्यासांमधून अफवांची ही थिअरी सिद्ध झाली आहे.
या थिअरीतील एकेक बाब नेमकी त्या पद्धतीने याही उदाहरणामध्ये घडत गेली. ईशान्य भारतातील लोकांवर मुंबई-पुणे-बेंगळुरूमध्ये हल्ले होत असल्याचे किंवा होणार असल्याचे मेसेजेस पसरत असताना अधिकृत स्रोत म्हणून पोलीस किंवा शासन व्यवस्थेतील अधिकाऱ्यांकडून त्यात त्वरेने हस्तक्षेप होणे गरजेचे होते. असे हल्ले झाले नाहीत किंवा जे झाले त्यांची संख्या आणि स्वरूप खूपच मर्यादित असल्याचा एक विश्वास पोलिसांसारख्या अधिकृत स्रोतांकडून दिला जाण्याची गरज होती. पण एक तर ते झाले नाही किंवा झाले तरी मुंबईतील मोर्चाच्या आणि पुण्यातील हल्ल्यावर पोलिसांनी केलेल्या सौम्य कारवाईच्या पाश्र्वभूमीवर, अधिकृत स्रोतांवर विश्वास टाकण्याची या लोकांची तयारी नव्हती. दोन्हीचा परिणाम एकच झाला. अनिश्चितता, अस्वस्थता आणि भीतीचे सावट वाढले.
ईशान्य भारतीयांमध्ये या काळात निर्माण झालेल्या या भावनांना तात्कालिक परिस्थितीइतकेच त्यांच्या दीर्घकालीन अनुभवांचे संचितही कारणीभूत होते. एक तर मुळातच रंगरूप, भाषा आणि संस्कृतीतील फरकांमुळे ईशान्य भारतीयांच्या मनात उर्वरित भारतापासून आपण अलग पडले असल्याची भावना आहे आणि दुर्दैवाने उर्वरित भारतीयांनीही ही भावना पुसण्याचे फार प्रयत्न केले नाहीत. काही संघटनांच्या आणि व्यक्तींच्या पातळीवर हे काम सुरू असले तरी त्याला मर्यादा आहेत. या शहरातील माध्यमांशी, सांस्कृतिक-सामाजिक व्यवस्थांशी त्यांचे आपलेपणाचे नाते निर्माण झालेले नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अनिश्चिततेच्या, अशांततेच्या परिस्थितीत आपल्या शेजाऱ्यांशी बोलण्यापेक्षा आणि त्यांच्याकडे जाण्यापेक्षा, त्यांनी आपल्या समुदायातच चर्चा करणे आणि शेकडो मलांवरील आपल्या घरी परतणेच पसंत केले. एक शहर म्हणून पुणे, मुंबई आणि बेंगळुरूचे हे अपयश आहे. शहरातील विविध समुदायांचे असे आपल्यातच आक्रसत जाणं चिंताजनक आहे. शहरी ताणतणाव, हितसंबंधी गटांचे राजकारण, विश्वासार्ह वाटाव्या अशा शक्तींचा ऱ्हास, वाढत्या संपर्कशक्यता आणि आक्रसणारे समुदाय यामुळे अफवांचे पीक भविष्यात मोठय़ा प्रमाणावर येण्याची भीती आहे. गेल्या पंधरवडय़ातील अफवा आणि त्याचे झालेले परिणाम म्हणूनच माहितीचा अपघात न ठरता धोक्याचा इशारा ठरतात.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो