गोची आजी-आजोबांची!
मुखपृष्ठ >> लेख >> गोची आजी-आजोबांची!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

गोची आजी-आजोबांची! Bookmark and Share Print E-mail

डॉ. अंजली पेंडसे - शनिवार, २५  ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आजी-आजोबांनी नातवंडांना सांभाळणं यात एक सार्थ भावना असते. परमोच्च सुखाची ती परिसीमा असू शकते, परंतु जेव्हा आजी-आजोबांच्या शारीरिक-मानसिक क्षमतांचा विचार न करता हे सांभाळणं ‘लादलं’ जातं तेव्हा ते ‘काम’ होतं. आज अनेक घरा त आजी-आजोबांची त्याच मुळे गोची होते आहे, पण बोलणार कुणाला? कारण.. आपलेच दात आणि आपलेच ओठ..
‘‘एमीने, एवढा काय तू भाव खातेयस? फक्त दोन दिवसांचा तर प्रश्न आहे! आज जाऊन उद्या रात्री परत. इतकं सोपं आहे! आपण मंगळवारी निघायचं. संध्याकाळी आपली देवीच्या देवळात पूजा. पुजारी माझ्या कित्येक वर्षांचे ओळखीचे आहेत. त्यामुळे ते उत्तम पूजा सांगतील. आपण सगळ्यांनी मनोभावे पूजा करू. बुधवारी सकाळी म्हणजे पहाटेच पन्हाळा. मस्त हिंडू, जेवण करून निघू. रात्रीपर्यंत आपापल्या घरी! सगळ्या जणी तयार आहेत. तुलाच काय झालं?’’ संध्या आग्रह करत होती. सगळ्या मैत्रिणी संध्याच्या घरी जमल्या होत्या.
 मीना म्हणाली, ‘‘सगळं खरं आहे, पण मला जमणार नाही..’’
आता सगळ्या जणी चिडल्या. नंदा म्हणाली, ‘‘तुझी आपली नेहमीच नकार घंटा असते. कारण तरी सांग.’’
मीना म्हणाली, ‘‘अग कारणं काय, हजार आहेत ! मला खरोखरच जमणार नाही. तुम्ही जा. मजा करा. परत आल्यावर मला सगळं वर्णन सांगा. त्यात मला आनंद आहे.’’
संध्या आता खरोखरच वैतागली म्हणली, ‘‘मीने, आपण काही विशीतल्या तरुण पोरी नाही राहिलो. सगळ्या जणी पन्नास प्लस आहोत. अजून सगळ्या धडपणे चालू शकतोय. थोडय़ाफार गोळ्या घेऊन का होईना पण कुठे नीटपणे येऊ-जाऊ शकतोय. आणखी काही वर्षांनी काय होईल कुणी सांगावं? तुला हे कळत नाही का?’’
आता मीना एकदम गप्प झाली.. तिच्या डोळ्यात पाणी आलं, म्हणाली, ‘‘मला अजिबात जमणार नाही. माझ्या नातवंडांना मी सांभाळते हे तुम्हाला माहिती आहे. रविवारचा एकच दिवसाचा बेत असेल तर मी येऊ शकेन. पण आडवारी दोन दोन दिवस मला खरंच जमणार नाही.’’
नीलानं सुचवलं. ‘ठीक आहे गं, सुनेला दोन दिवस रजा घ्यायला सांग.’’
मीना म्हणाली, ‘‘ते नाही ना शक्य. ती आय.टी. क्षेत्रात आहे. ती जी सकाळी जाते ती रात्री लवकरात लवकर म्हणजे साडेआठ-नऊपर्यंत येते. सुटीच्या दिवशीही लॅपटॉपवर काम करत असते. तिला रजा घेताच येत नाही आणि माझ्या मजेसाठी मी तिला सांगू शकत नाही. मला काय यावंसं वाटत नाही का? पण खरंच जमणार नाही.’’
त्यावर संध्या आणखीनच वैतागली. म्हणाली, ‘‘मग तू एक पाळणाघरच उघड ना. निदान पैसे तरी मिळतील. नातवंडं असली तरी हे कसलं कम्पल्शन? लग्नानंतर तुझी दोन मुलं सांभाळून तू तुझं करिअर केलंस ना? तुझ्या सासूने तुला स्वच्छ सांगितलं होतं, ‘आम्ही तुमची मुलं सांभाळणार नाही.’ म्हणून तू पाठोपाठ बाळंतपण स्वीकारलीस आणि तीनचार वर्ष घरीच राहिलीस, संसार-पाहुणे, मुलांचं संगोपन, सासू-सासऱ्यांचं आजारपण - सगळ्याला तू पुरी पडलीस. आता मुलांची लग्न झाली आहेत. तर तू पुन्हा आपली संसारात नव्याने अडकली आहेस. तुझं काय हे वय आहे का नातवंडांच्या मागे धावण्याचं? तुझ्या सुनेच्या करिअरची किंमत तू का चुकवते आहेस?’’
इतक्या वादविवादानंतरही मीना मैत्रिणींबरोबर दोन दिवस जाऊ शकली नाही ती नाहीच .. अशा मीना हल्ली घरोघरी आहेत.. आपापल्या वेदनेसह.. ही आजच्या बहुतांश आजीआजोबांसाठी वस्तुस्थिती आहे.
तसा हा प्रश्न नाजूकच आहे. कारण नातवंडं म्हणजे दुधावरची साय! प्रेमाचा झरा तर आजी-आजोबांच्या हृदयात झुळझुळतच असतो. त्याचं नातवंडावर प्रेमच नाही की काय? अशी शंका कुणी घेऊ नये. या नातवंडांना ‘सांभाळणं’ हा खरा प्रश्न आहे. खरं तर काही तासांसाठी सांभाळणं, कधी तरी सलग दोनचार दिवस सांभाळणं हे आजी-आजोबांना जड नसतं. त्याचं
कामही वाटत नाही. त्याचं ओझंही होत नाही. किंबहुना चांगल्या संवादातून नातवंडांबरोबरचं नातं फुलायला छान मदत होऊ शकते. पण बदलत्या काळात, बदलत्या गरजांबरोबर ही पण एक ‘गरज’ उत्पन्न झाली. आहे. स्त्रिया शिकल्या. नोक ऱ्या करू लागल्या. फक्त गरज म्हणून नाही तर स्वत:च्या क्षमतांना आजमावण्यासाठी, नव्या वाटांच्या नव्या करिअरला घडवण्यासाठीही! चांगलंच आहे. पण मग लग्न केल्यावर संसारात
पडताना संसारासाठीचं जे योगदान पती-पत्नीचं असायला हवं, ते आपण देऊ शकतो का याचाही विचार लग्न करतानाच त्यांनी करायला हवा. तो बऱ्याचदा केला जात नाही. तिथे अनेकदा आपल्या पालकांनाच गृहित धरणं होतं.
नीता आणि नीलेश दोघंही नोकरी करतात. त्यांच्या लग्नाला तीन र्वष झाल्यावर दोघांचे आई-बाबा ‘‘आता आम्हाला गोड बातमी कळू दे’’ किंवा ‘‘वेळेत मुलं झाली की आपल्या उमेदीत त्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या निभावता येतात,’’ असं ऐकवू लागले. नीताने स्पष्ट सांगितलं, ‘‘मी नोकरी सोडणार नाही, आणि मुलाला पाळणाघरात ठेवणं मला मुळीच आवडत नाही.’’ साहजिकच तिचं मूल आणि आपलं नातवंड सांभाळण्याची जबाबदारी नीलेशच्या आई-बाबांनी घेतली. घेतली म्हणण्यापेक्षा त्यांच्यावर ती लादली गेली. पहिलं नातवंड म्हणून वेगळंच सुख वाटलं. सार्थपणाची भावना आली. प्रेमाला वेगळं हळवं परिमाण लाभलं, पण दोन-चार दिवसांतच आजीच्या कमरेचा काटा ढिला झाला आणि आजोबांचा दमा टेन्शनमुळे आणखी वाढला. प्रश्न प्रेमाचा नव्हताच. आजी-आजोबांच्या शारीरिक माणि मानसिक क्षमतांचा होता..
सध्या तरी एकत्र कुटुंबाचं बहुतांशी चित्र असं दिसतंय, की लग्नानंतर सून नोकरी करते - दोघंच राजा-राणी असतात, तोपर्यंत काही प्रश्न नसतो. सारं ‘गुडी गुडी’असतं. पण मूलं झालं की नातवंडांचं सुख आजी-आजोबांना वेगळंच सुख देतं. नातवंडांना खेळवावं ही आजी-आजोबांच्या सुखाची परिसीमाही त्यांना वाटू शकते. मुलाचा-मुलीचा भरलेला छान संसार पाहाणं भाग्याचंच असतं. पण नातवंडांना
केवळ अधून मधून न सांभाळता त्यांची पूर्णच जबाबदारी आली की आजी-आजोबाही गडबडतात. कारण शरीर पूर्र्वीसारखं कणखर नसतं. शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढत्या वयाबरोबर कमी होत जातात. पंचविशी,तिशीच्या आसपासची स्त्री ज्या उमेदीने आणि उत्साहाने  छोटय़ा मुलांशी खेळेल, त्यांच्या मागे धावेल, त्यांना अंगाखांद्यांवर घेईल आणि त्यांचे लालनपालन ज्या ताकदीने करेल, ती ताकद ती पन्नासपंचावन्न वयाला आणू शकत नाही. सांधे धरतात, डोकं दुखतं, हालचाली आणि प्रतिसाद संथ होतात. वार्धक्याच्या अनेक व्याधींपैकी काही प्रत्येकीच्या वाटय़ाला येतात. आजोबांचीही तीच अवस्था असते. मग सून नोकरी करते म्हणून पूर्ण दिवस नातवंडांना सांभाळणं हे ‘काम’ होतं. मोठी जबाबदारी वाटते. प्रेम असलं तरी क्षमता नसतात. नातवंडांचा खेळताना सहज होणारा आरडाओरडा नको वाटतो. कारण मोठा आवाज सहन होत नाही. नातवंडं वाढीच्या वयातली मुलं असतात. उत्साहाने सळसळत असतात. या सगळ्याचा मेळ बसणं कठीणच असतं. अनेकदा तर दोन मुलं असतील तर दोघांचे हट्ट पुरवण्यात किंवा शाळेतून घरी आल्यानंतर त्यांचे कपडे बदलण्यापासून, जेवणापर्यंत आणि दुपारी झोपवण्यापर्यंत अनेक गोष्टी करण्यात आजी आजोबांची कसरत होते. अनेकदा तर त्या गडबडीत स्वत:ची औषधं, पथ्य पाणी याकडे बघायला त्यांना वेळ होत नाही. आणि मग मानसिक, शारीरिक तोल अधिकच ढासळतो.
कमलाताईंचा चेहरा उतरलेला होता. त्यांना ‘‘कशा आहात?’’ म्हणून विचारलं. कमलाताई म्हणाल्या, ‘‘ठीकच आहे म्हणायची!’’ ‘‘असं का म्हणता?’’ म्हणून विचारलं तर गप्प बसल्या. पण त्यांचे पती रागावून म्हणाले, ‘‘काही ठीक नाही. सध्या ही आजी नाही दाई आहे आणि मी आजोबा नाही हिचा हेल्पर आहे!’’ ‘‘म्हणजे काय?’’ मी विचारलं त्यावर ते म्हणाले, ‘‘अहो सगळ्यांच्या मतानुसार आणि गरजेनुसार आम्ही आमची दोन नातवंडं वय र्वष अडीच आणि एक अशी सांभाळतो. त्यांची आई नोकरीला बाहेर पडली की ऑफिसला पोहोचण्याआधीच फोन करते, ‘‘मुलं रडली का?’’ नंतर ऑफिसमधून तिचे तासा-दीड तासाने फोन येतच असतात. ‘‘औषध दिलं का?’’ ‘‘टीव्ही लावला नाही ना?’’ ‘‘टीव्हीवर फक्त कार्टूनच दाखवा.’’ ‘‘खायला वेळेवर दिलं का? मुलांनी खाल्लं का? काय खायला दिलं? स्वत:च्या हातांनी खाल्लं का आम्ही भरवलं? नंतर त्यांनी चूळ भरली का?’’ ‘‘दुपारचे तीन वाजले. मुलं झोपली आहेत ना?’’ ‘‘शाळेतून कधी आली? त्यांचे कपडे बदलले का?’’ एक ना दोन हजार तऱ्हेच्या सूचना आणि चौकशा करते. जणू आम्ही आमच्या मुलांना कधी वाढवलंच नाही. आणि बोलण्याचा टोन असा की, जणू कामासाठी ठेवलेल्या माणसांकडून जाब घेतेय! तिला एकदा स्पष्ट सांगितलं,  ‘‘बाई, तुझा विश्वास नसेल तर तू दुसरी व्यवस्था बघ.  हिच्या फोनच्या माऱ्यात आम्हाला एखाद तासही शांत झोप घेता येत नाही. वैतागलोय आम्ही!’’
नीलमताईंची तर वेगळीच गोची आहे. त्यांना दोन मुलीच. दोघी नोकरी करणाऱ्या. नीलमताईंना तशी मुलांची, म्हणजे नातवंडांची आवड. सगळं प्रेमाने करणाऱ्या, पण त्यांच्या या प्रेमाचा अति फायदा घेतला गेला तो त्यांच्याच मुलींकडून. दोन्ही मुलींनी माहेर जवळ असावं म्हणून त्यांच्या जवळच घरं घेतली. सकाळी ऑफिसला जाण्यापूर्र्वी दोघी आपापली मुलं त्यांच्याकडे सोडून जाऊ लागल्या. मुलं लहान होती, घरातच होती आणि नीलमताई आणि त्यांच्या पतीची वयंही फार जास्त नव्हती तोपर्यंत ठीक होतं, पण नंतर मुलांच्या शाळा, त्यांच्या टय़ुशन्स, त्याचं खाणं पिणं सगळंच सांभाळणं कठीण व्हायला लागलं. त्यातच आज काय घरी स्वयंपाक करायचा कंटाळा आला आता तुझ्याच घरी जेवते आणि जाते, असंही व्हायला लागलं. इथे आपलेच दात आणि आपलेच ओठ. दोघंही नवरा बायको आपली द:ुखं फक्त एकमेकांजवळ सांगू शकत होते.
याशिवाय या सांभाळण्यात आजोबा-आजी आणि नातवंड यांच्यातला जरनरेशन गॅपचाही मुद्दा महत्त्वाचा  ठरतो. नव्या जगातल्या छोटय़ांना कॉम्प्युटर आणि रोबो हे जगण्याचे भाग वाटतात. मोबाईल, प्लेस्टेशन वा इतर गॅझेटस् यांच्याशिवाय अनेक मुलांचं पान हलत नाही. त्या मानाने आजी-आजोबा टेक्नोसॅव्ही नसतात.  मोहनरावांच्या घरात सध्या तोच मोठा चर्चेचा वा वादाचाच म्हणू विषय झाला आहे. ते ज्या संस्कारात वाढले त्यांच्या दृष्टीने मैदानी खेळ वा शारीरिक खेळ मुलांच्या वाढीच्या दृष्टीने महत्वाचं योगदान ठरतात परंतु जेव्हा त्यांची सात आणि पाच वर्षांंची दोन्ही नातवंडं शाळेत जाण्यापूर्वी आणि शाळेतून आल्यानंतर फक्त कम्प्युटरवरच गेम खेळताना आणि फेसबुकवर गप्पा मारताना पाहातात तेव्हा त्याच्यातला सजग पिता जागृत होतो. खेळाचं महत्व मुलांना, नातवंडांना समजून सांगितलं जातं. पण त्यावर वैतागणे किंवा दुर्लक्ष करणं एवढय़ा दोनच प्रतिक्रिया जेव्हा त्यांना मिळतात तेव्हा ते अस्वस्थ होतात. आपण मुला-नातवंडांच्या भल्यासाठीच सांगतोय ना मग.. या प्रश्नाचा भुंगा मन पोखरत रहातो..
वयात येणाऱ्या नातीचे कपडे हा सुद्धा अनेकदा आजी-आजोबांच्या चिंतेचा विषय होतो मग एखादे आजोबा  तिला तिच्या कपडय़ांवरून बोलतात.. तर कधी आजीच्या प्रेमाने केलेल्या चविष्ट थालीपीठाकडे दुर्लक्ष करून नातू पिझा किंवा बर्गर खायला जातो. त्यावरून भांडणं होतात ती इतकी टोकाला जाऊ शकतात की वृद्ध आजी-आजोबांची रवानगी ओल्ड होम वा वृद्धाश्रमात होऊ शकते.  यातली सर्वांत मोठी शोकांतिका ही असते की एकदा का नातवंडं मोठी झाली की त्यांना सांभाळण्यासाठी आजी-आजोबांची गरज नसते. त्यानंतर तर अनेकदा या आजी आजोबांचं ऐकायचंच नाही हेच त्यांचं गृहित वाक्य होतं. त्या बद्दल आपल्या मुलांकडे वा सुनेकडे तक्रार केली तर तिथेही त्यांचं एकून घेतलं जाईलच याची खुद्द आजी-आजोबांनाच खात्री नसते. तर दुसरीकडे आजी-आजोबा आपल्या तक्रारी सांगतात म्हणून नातवंड त्यांच्याशी अबोला तरी धरतात किंवा त्यांच्याविरुद्धच आई वडिलांकडे तक्रारी करतात, असंही काही घरात घडतं आणि मग दोन - तीन पिढय़ामधली वादावादी भांडणाचं कटू रुप घेऊन नाती कायमची बिघडू शकतात..
मुलांना सांभाळायचं कुणी? हा प्रश्नच मुळी हवा तसा वेडावाकडा फिरवता येतो. तो तसा ट्विस्ट करून प्रश्न सुटत नाही. उलटा आणखी ओंगळ होतो. म्हणून तसं न करता त्यावर उपाय शोधायला हवेत. शोधले तर अनेक पर्याय उपलब्ध राहतात. एक पर्याय म्हणजे मूल झाल्यावर दोन-तीन वर्षांची गॅप सुनेने वा मुलीने नोकरीमध्ये घ्यावी. ही करिअरमधली गॅप फुकट जात नाही. मुलांना ज्या वेळी आईची-आजीची नव्हे- पूर्णवेळ नितांत गरज असते, त्या वेळी आई मिळते. त्यांची शारीरिक, मानसिक, बौद्धिक जडण-घडण व्यवस्थित फुलण्यासाठी मदत होते. नेहाला हे जाणवून दिल्यावर ती मोठय़ा फटकळपणाने म्हणाली, ‘‘त्यात काय हो मोठं? सासू-सासरे घरीच तर असतात. दिलं मुलांकडे लक्ष तर काय मोठं? आणि त्यांचीही ती नातवंडंच आहेत. काय उपकार करतात की काय? आणि लग्न करताना माझी नोकरी आणि मला मिळणारा पगार हा प्लस पॉइंट होत नाही?’’ अशावेळी  सुनेला-सुनेच्या नवऱ्यालाही त्यांची त्यांची भूमिका होती किंवा असते. पण यात नुकसान कोणाची आणि किती होतंय याचंही भान ठेवायला हवं.
दुसरा पर्याय म्हणजे सुसज्ज आणि बाळांची सर्वतोपरी काळजी घेणारी ‘सेकंड होम’सारखी पाळणाघरं असावीत. तिथे मुलांना सोडून जाताना दिवसभर मुलं छान असतील याची खात्री त्यांच्या आई-वडिलांना वाटेल. मग गंमत म्हणून कधी तरी मुलं दिवसभर आजी-आजोबांकडे राहिली तर गोडी राहील.
नवरा-बायको दोघांनी नोकरी करावी. पगार घरी आणावा. मग तो घरासाठी - म्हणजे घरातल्या सर्वासाठी वापरला जावा. मग थोडे पैसे खर्च करून घरात आजीला एक मदतनीस ठेवली तर? तिची धावपळ कमी होईल.  हा तिसरा पर्याय झाला. त्यामुळे तिचे आणि आजोबांचे शारीरिक कष्ट जितके कमी करता येतील, तेवढे त्यांचे समाधान राहील. सुपरव्हिजन करत थोडीशी धावपळ करणं आजी-आजोबा सहज स्वीकारतील. खरं तर या नातवंडांच्या सांभाळण्याच्या प्रश्नावर कुटुंबातल्या सर्वानी बसून उपाय काढता येतील. तो प्रश्न योग्य त्या नजरेने पाहिला तर समस्येचे निराकरणही सर्वानुमते होऊ शकेल. शिवाय आपला संसार सांभाळून निवृत्तीच्या वाटेवर असणाऱ्या आपल्या आई-बाबांना पुन्हा आपला संसार सांभाळायला सांगायचं (आई-वडील तयार असले तरी), आयुष्यभर संसाराच्या रामरगाडय़ात अनेक करायच्या राहून गेलेल्या गोष्टी करायला त्यांना आता तरी मोकळं न सोडणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय नाही का, हा ही विचार त्यांच्या मुलांनी करण्याची गरज आहे.
 या सगळ्याला अनेक पैलू आहेत. प्रत्येकाची आपली भूमिका असते. यासाठी कुटुंबातल्या साऱ्यांनी एकत्र बसून मार्ग काढण्याची गरज आहे. अन्यथा अनेक घरातले आजी-आजोबा जगण्यातल्या साध्या साध्या आनंदांना मुकताहेत आणि ते सांगूही शकत नाहीत. अशी विचित्र गोची होत आहे!  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो