बोधिवृक्ष : शांतीची निवड
मुखपृष्ठ >> बोधिवृक्ष >> बोधिवृक्ष : शांतीची निवड
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

बोधिवृक्ष : शांतीची निवड Bookmark and Share Print E-mail

ओशो - शनिवार, २५ ऑगस्ट २०१२

जीवनात दु:ख आहे आणि सुखही आहे, कारण जन्म आहे आणि मृत्यूही आहे; परंतु या दोन्हींपैकी कुणाची निवड करून आपण जीवनाचा पाया घालतो यावर सगळं अवलंबून आहे. मृत्यू हाच जीवनाचा पाया, अशी जर निवड केली तर जन्म म्हणजे मृत्यूची सुरुवात आहे, असेच वाटेल आणि जीवन हाच पाया समजला तर मृत्यूसुद्धा जीवनाची परिपूर्णता आणि अंतिम उमलणे वाटेल. एखाद्या व्यक्तीने दु:खालाच जीवनाचा आधार मानले तर सुखपण केवळ दु:खात प्रवेश करण्याचा मार्ग वाटू लागेल ते तुमच्या निवडीवर अवलंबून आहे. जीवनात दोन्ही आहे. आपण काय आणि कशाची निवड करतो यावर संपूर्ण जीवन अवलंबून असतं. जीवनात अशांती आहे आणि शांतीपण आहे. आपण काय निवड करतो, त्यावर सगळं अवलंबून आहे.
ध्यान हा जीवनाच्या पायापासून अशांतीला हटवण्याचा विधी आहे आणि जीवनाचा पाया मौन, शांतचित्तावर उभारण्याची व्यवस्था आहे; परंतु आपण अशांत होण्यात कुशल आहोत आणि आपण एकही संधी सोडत नाही. अशांतीची कोणतीही संधी आपण सोडत नाही. अगदी तत्पर असतो, वाटच बघत असतो, कारण सापडलं की झालो अशांत.
अशांत होण्याची एखादी संधी तुम्ही सोडली असे एक तरी उदाहरण तुम्हाला आठवतंय का? आठवणार नाही. कुणी तुम्हाला शिवी दिली आणि तुम्हाला राग आला नाही असं कधी झालंय का? नाही, क्रोधित होण्याचे काही तरी कारण तुम्ही शोधून काढालच. तुम्ही संधी सोडणार नाही.
पण काही वेळा अशी संधी सोडण्याचा प्रयत्न करा. ध्यानामध्ये प्रगती करायची असेल तर काही संधी सोडण्याचा प्रयत्न करा. कुणी शिवी दिली तर शिवीकडे लक्ष देऊ नका. ही संधी आपण सोडू शकतो का, याकडे लक्ष द्या आणि जी व्यक्ती अशांत होण्याची एकही संधी सोडत नाही ती नेहमी अशांत होणारच. असा माणूस शांत होण्याची संधी सोडत असतो, कारण या दोन्ही गोष्टी सोबत राहत नाहीत.
संधी दोन प्रकारच्या असतात, हे लक्षात घ्या. शांत होण्याची संधी आणि अशांत होण्याचीपण संधी. तुम्ही जर अशांत होण्याची संधी निवडली तर शांती कधीच मिळणार नाही, कारण आपली मानसिकता निवड करण्याचीच असते. आपण लगेच अशांतीची निवड करतो.
एखाद्याने जर तुमच्याकडे रागाने बघितले तर त्याचा राग खोटा असेल असा तुम्ही कधीच विचार करणार नाही, पण तुमच्याकडे बघून कोणी हसले तर ते तुम्हाला लगेच नाटकी वाटेल; पण राग मात्र कधीच तुम्हाला नाटकी वाटणार नाही. कुणी तुमच्यावर प्रेम करत असेल तर मनात शंका येते की, काय हेतू असेल बरं याचा प्रेम करण्याचा? पण कुणी रागावून बघितलं तर काय हेतू असेल बरं याच्या रागावण्याचा, असा तुम्ही कधीच विचार करणार नाही. हेतू अगदी स्पष्ट आहे. तुम्हाला निवड करण्याची सवय आहे.
तो खूप चांगला माणूस आहे, असं कुणी जर एखाद्याविषयी सांगितलं तर तुम्हाला वाटेल कसं शक्य आहे? पण तेच जर एखाद्याविषयी तो वाईट माणूस आहे असं सांगताच तुमचा विश्वास बसतो. खरं असेल, तो माणूस सांगतोय तर वाईट असणारच. एखाद्याविषयी कुणी चांगले बोलले तर हा बोलणारा माणूसच चांगला नाही, तर तो दुसऱ्याविषयी काय चांगलं बोलणार आहे, असा विचार तुमच्या मनात येतो; पण तेच एखाद्याविषयी वाईट बोलत असेल तर बोलणारा माणूस वाईट तर नाही ना, अशी शंकासुद्धा तुमच्या मनात कधी येत नाही. आपण निवड करत असतो. वाईटाला आपण लगेच निवडतो, संवेदनशील असतो ना, एकदम धरून ठेवतो.
हे बदला. ध्यानामध्ये जर खोलवर जायचं असेल तर चोवीस तास आठवण राहू द्या की, अशांत होण्याची संधी सोडायची आहे आणि शांत होण्याची संधी कधी सोडायची नाही. क्षणभर का होईना शांत होण्याची संधी मिळाली तर लगेच शांत व्हा आणि अशांत होण्याची संधी मिळाली तर कृपा करा आणि ती संधी सोडून द्या. काही दिवसांतच तुमची निवड करण्याची वृत्ती बदलेल आणि तुम्हाला आजपर्यंत जे दु:ख होतं, ते म्हणजे तुमचीच निवड होती, हे तुमच्या लक्षात येईल.
या जगाला कुणालाही दु:ख देण्यात रस नाही. या जगाने कुणासाठीही नरक किंवा स्वर्ग निर्माण केले नाहीत. निसर्ग कधीच पक्षपात करत नाही. निसर्ग अगदीच पूर्वग्रहरहित असतो. तुम्ही कोण आहात याची त्याला पर्वा नसते; पण नरकाची निवड तुम्हीच करीत असता आणि गंमत म्हणजे नरकावर लोकांचा फार विश्वास असतो. स्वर्गावर विश्वास ठेवणारा माणूस शोधूनही सापडत नाही. ध्यानमार्गावर निघालेल्या लोकांनी हे लक्षात ठेवावं की, केवळ ध्यान पुरेसं नाही. निवड करण्याची तुमच्या मनाची सवय बदलायला हवी.
शुभ बघण्याची सवय करा. सुंदर बघण्याची सवय करा. असुंदराची उपेक्षा करा. कुरूपाकडे दुर्लक्ष करा. अंधाराची निवड कशाला करायची? या जगतात आपल्यापुरता प्रकाश पुष्कळ आहे आणि एखाद्याची इच्छा असेल तर तो आपले सारे जीवन प्रकाशात घालवू शकतो. परंतु प्रकाश आणि अंधार असेल तर आपण लगेच अंधारात जाऊन उभे राहू अशी आपली निवड असते आणि अंधारात उभे राहून आपण ओरडत राहू की, अंधारच अंधार आहे इथं. दु:खच दु:ख आहे इथं. सुखाचा एक किरणसुद्धा दिसत नाही.
लक्षात ठेवा, आनंद मिळवायचा असेल तर निवड करण्याची पद्धतच एकदम बदलायला हवी. ते तुमच्याच हातात आहे, सकाळी उठल्यापासून..
एक झेन साधू होता, बोकोजू. जपानचा सम्राट त्याला भेटायला आला. सम्राटाने त्याला विचारलं की, नरक आहे का?
बोकोजूने नरकाविषयी तर काही सांगितलं नाही. सम्राटाला नखशिखांत बघितलं. तो सैनिकी वेशामध्ये होता. बोकोजू म्हणाला, मी कुणालाही सैनिकी वेशात बघितलं, की त्या माणसाच्या आतमध्ये एक भित्रा माणूस लपलेला आहे असं वाटतं.
सम्राटाचं मन एकदम पालटलं. आला तेव्हा त्याचं मन श्रद्धेनं भरलेलं होतं, आता एकदम अश्रद्धा निर्माण झाली आणि त्यात बोकोजू म्हणाला की, तू सम्राटासारखा अजिबात दिसत नाहीस. नाटकात काम करत असलेल्या सम्राटासारखा दिसतोस. सम्राटाचा हात लगेच तलवारीच्या मुठीवर गेला, तर बोकोजू म्हणाला, मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण मी नुसता जोरात ओरडलो तरी तू इथून पळ काढशील.
आता मात्र हद्द झाली. तो आला होता काही तरी विचारायला आणि हा माणूस काय सांगतोय. त्याने लगेच तलवार उपसली आणि बोकोजूच्या मानेवर ठेवली.
बोकोजू म्हणाला, तू नरकाचं दार उघडतो आहेस. हे नरक आहे आणि त्याचं दार तू उघडत आहे. या तीन गोष्टी मी तुला यासाठी सांगितल्या की, तुला नरकाच्या दारापर्यंत न्यावं आणि मगच सांगावं की, हा बघ नरक. आता बस, नुसतं उघडलंस की आत जाशील. आता तुझी मर्जी. माघारीपण जाऊ शकतोस किंवा आतही जाऊ शकतोस.
तुमच्याच निवडीवर तुम्ही रोज नरकाच्या दारापर्यंत गेलेले असता. निवडीला फार महत्त्व आहे. सुख-दु:ख इतके महत्त्वाचे नाहीत. सुख-दु:ख सामान्य घटना आहे. निवड ही तुमची आतली महत्त्वपूर्ण घटना आहे. तुम्ही निवड केली म्हणून ध्यानाचा मार्ग स्वीकारलात. आता लक्षात ठेवा आणि या आनंदापाठोपाठ परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला लागते. तोच आहे सगळीकडे. आत-बाहेर तोच आहे. येणाऱ्या श्वासामध्ये जाणाऱ्या श्वासामध्ये तोच आहे. अनुभव घ्या. त्याच्या अस्तित्वाने भरून जा..
 (‘ध्यानकमळे’ या साकेत प्रकाशनाच्या डॉ. अरुण मांडे यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकातील हा संपादित भाग, साभार)

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो